अजित पवारांच्या विमान अपघाताची चौकशी सुरू
मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या विमान अपघाताची चौकशी आता केंद्रीय संस्थेकडून होणार आहे. विमान अपघात तपास ब्युरो या संस्थेने अपघाताची चौकशी सुरू केली असून त्याचा अहवाल आल्यानतंर तो राज्य सरकारलाही पाठवण्यात येणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी या अपघाताची चौकशी करावी असे पत्र केंद्रीय उड्डाण मंत्री किंजरापु राममोहन नायडू यांना लिहिलं होतं. त्यानंतर केंद्रीय मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात ही माहिती दिली. विमान अपघात तपास ब्युरो यांनी तपास सुरु केला आहे. विमानातील ब्लॅकबॉक्स ताब्यात घेण्यात आला आहे. विमान अपघात आणि घटना नियमांनुसार, तपास सुरु केला आहे. तो पारदर्शी आणि कालबद्ध पद्धतीने होईल. या अपघातातील सर्व टेक्निकल रेकॉर्डस, ऑपरेशनल तपशील, घटनास्थळावरील तथ्य याचा तपास केला जात आहे. भविष्यात अशा घटना होऊ नयेत, या आपल्या विनंतीची मंत्रालयाने दखल घेतली असून, चौकशी अहवाल येताच त्यादृष्टीने उपाययोजना करण्यात येतील. या चौकशीत महाराष्ट्र सरकारचेही सहकार्य आम्हाला मौल्यवान असेल. स्थानिक प्रशासनाची यात मदत लागेल. हा संपूर्ण चौकशी अहवाल राज्य सरकारलाही आम्ही देऊ.
युजीसीच्या नव्या नियमास सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती
नवी दिल्ली : देशातील महाविद्यालय आणि विद्यापीठांसाठी कार्यरत असलेल्या युजीसीने लागू केलेल्या नव्या निमयमास सर्वोच्च न्यायालयातकडून स्थगिती देण्यात आली आहे. देशभरातली अनेक विद्यार्थी संघटना, संस्थांनी विरोध दर्शविला आहे. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, ओबीसी, दिव्यांग आणि महिलांच्या संरक्षणार्थ युजीसीने एक नवा नियम जारी केला होता. मात्र, आता विद्यापीठ अनुदान आयोगाच्या नव्या नियमांना सर्वोच्च न्यायालयातकडून स्थगिती देण्यात आली आहे. अशाने वेगवेगळ्या प्रवर्गाची वेगेवगळी वसतिगृह तयार होतील, अशी चिंता न्यायाधीशांनी व्यक्त केली. तसेच, केंद्र सरकारकडून नियमांचा मसुद्यावर पुनर्विचार करण्याबाबत सुतोवाचही न्यायालयाकडून करण्यात आले आहेत. सर्वोच्च न्यायालयात दाखल याचिकेत, याचिकाकर्त्यांच्यावकिलांनी युक्तिवाद करताना म्हटले की, संविधनाने सर्वांनाच संरक्षण दिलं असून सर्वच नागरिकांचे रक्षण झाले पाहिजे. मात्र, युजीसीचा नवा नियम संभ्रमात टाकणारा असून भेदभाव करणारा आहे. या नियमांत केवळ ओबीसी, एसी आणि एसटी प्रवर्गातील विद्यार्थ्यांच्याच संरक्षणाचा मुद्दा आहे.
विस्मरण होवू न देणारे अजितदादांचे ‘ वेगळेपण ‘
दिवाकर शेजवळ राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, उप मुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या विमान अपघातात झालेल्या करुण अंताने सारा महाराष्ट्र हळहळत आहे. एक दमदार नेतृत्व अकाली काळाच्या पडद्याआड गेले आहे. दादांचा राजकारणातील उदय, त्यांना मिळालेली…
अलविदा दादा
बारामती : महाराष्ट्राच्या राजकारणातील दादा माणूस अजित पवार त्यांच्या बारामतीच्या मातीत विसावले. गुरूवारी दुपारी १२ वाजून ८ मिनिटांनी बारामती येथील विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. पार्थ आणि जय पवार यां दोघांनी अजित पवारांच्या पार्थिवाला अग्नी दिला. अवघा महाराष्ट्र अजितदादांच्या निधनाने शोकसागरात बुडाला. दादांना अलविदा करण्यासाठी आज देशभरातुन नेतेमंडळी आणि दादांच्या चाहत्यांनी लाखोंच्या संख्येन गर्दी केली…
राष्ट्रवादीचे नेतृत्व सुनेत्रा पवारांकडे ?
स्वाती घोसाळकर मुंबई – उपमुख्यमंत्री अजितदादा पवार याच्या निधनानंतर राष्ट्रवादी पक्षाचे नेतृत्व त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी करावे यासाठी जोरदार हालचाली सुरु झाल्या आहेत. अजितदादांच्या अकाली जाण्याने उपमुख्यमंत्रीपद रिक्त झाले आहे. राष्ट्रवादीत छगन भुजबळ हे माजी उपमुख्यमंत्री होते. त्यानंतर सुनील तटकरे,…
जिल्हा परिषद- पंचायत समिती निवडणुका आता ७ फेब्रुवारीला
मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या अपघाती निधनामुळे राज्यात तीन दिवसांचा दुखवटा जाहिर करण्यात आला आहे. त्यामुळे राज्यातील १२ जिल्हा परिषदा आणि त्याअंतर्गत १२५ पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुका दोन दिवसांनी पुढे ढकलल्या आहेत. त्यानुसार ५ फेब्रुवार रोजी होणारे मतदान आता ७ फेब्रुवारी रोजी होणार आहे. तर मतमोजणीची तारीखही आता ९ फेब्रुवारी करण्यात आली आहे. राज्य निवडणूक आयोगाने या निवडणुकांसाठी १३ जानेवारी २०२६ रोजी सविस्तर निवडणूक कार्यक्रम जाहीर केला होता. त्या कार्यक्रमानुसार नामनिर्देशनपत्र दाखल करणे, नामनिर्देशनपत्र मागे घेणे, निवडणूक चिन्ह वाटप तसेच अंतिम उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. मात्र मतदान, मतमोजणी आणि निवडून आलेल्या सदस्यांची नावे राजपत्रात प्रसिद्ध करणे हे टप्पे अद्याप शिल्लक आहेत. या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांबाबत सर्वोच्च न्यायालयाने ३१ जानेवारी २०२६ नंतर फक्त दोन आठवड्यांची मुदतवाढ दिली होती. त्यामुळे निवडणूक प्रक्रिया १४ फेब्रुवारीच्या आत पूर्ण करणे आवश्यक होते. या सर्व बाबी लक्षात घेऊन राज्य निवडणूक आयोगाने मतदान आणि मतमोजणीच्या तारखा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे.
‘रिफार्म, परफॉर्म आणि ट्रान्सफॉर्म’वर फोकस
पंतप्रधान मोदींचा रोडमॅप नवी दिल्ली : देशाची आर्थिक दिशा ठरवणारे संसदचे अर्थसंकल्पीय अधिवेशनला सुरुवात झाली असून ‘रिफार्म, परफॉर्म आणि ट्रान्सफॉर्म’वर फोकस हा आपला रोडमॅम असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जाहीर केले आहे. या अधिवेशनात अनेक महत्त्वाची विधेयके, मोठे आर्थिक निर्णय अपेक्षित आहेत. १ फेब्रुवारी रोजी सादर होणारा केंद्रीय अर्थसंकल्प आणि आज संसदेत मांडला जाणारा आर्थिक सर्वेक्षण २०२६-२७ यामुळे हे अधिवेशन अधिकच महत्त्वाचे ठरले आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसद भवन परिसरात माध्यमांशी संवाद साधला. यावेळी, पंतप्रधान मोदी म्हणाले की, २१व्या शतकाचा एक चतुर्थांश काळ पूर्ण झाला असून आता दुसऱ्या टप्प्याची सुरुवात होत आहे. २०४७ पर्यंत विकसित भारताचे ध्येय साध्य करण्यासाठी पुढील २५ वर्षे अत्यंत महत्त्वाची असतील, असे त्यांनी स्पष्ट केले. हा अर्थसंकल्प या शतकाच्या दुसऱ्या टप्प्यातील पहिला अर्थसंकल्प असून, तो देशाच्या भविष्याची दिशा ठरवणारा ठरेल, असे मतही त्यांनी मांडले. पंतप्रधान मोदी यांनी सांगितले की, अर्थमंत्री निर्मला सीतारामन सलग नवव्यांदा संसदेत अर्थसंकल्प सादर करणार आहेत. सलग ९ वेळा अर्थसंकल्प मांडणाऱ्या त्या देशातील पहिल्या महिला अर्थमंत्री ठरणार असून, हा क्षण भारताच्या संसदीय इतिहासातील गौरवशाली क्षण आहे.
हवा प्रदूषण आणि माणूस…
गेल्या काही दिवसातील बातम्या पाहिल्या तर असे दिसेल की अगदी भारताच्या राजधानीत म्हणजे दिल्लीतही हवेचे प्रदूषण प्रचंड वाढले आहे. इतर काही ठिकाणीही अशीच कठीण परिस्थिती निर्माण झाली असली तरी हे…
विरोधक सतत अपयशी का ठरताहेत?
विरोधक सतत अपयशी का ठरताहेत? अलिकडच्या काळात महाराष्ट्रामध्ये झालेल्या निवडणुकांमधील भाजपचा विजय जितका पक्षाच्या संघटनशक्तीचा, प्रचारतंत्राचा आणि सत्तेतील अधिकारांचा आहे, तितकाच इतर राजकीय पक्षांच्या अपयशाचाही आहे. विशेषतः काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस…
