Category: होम

मोदी सरकारचा लोकशाहीवर विश्वास आहे की नाही?- पवार

नगर : ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषदच्या निवडणूका हे लोक घेत नाहीत.  सध्या घटनेबाबत चिंता व्यक्त करावी अशी परिस्थिती निर्माण झालीये. या देशाची घटना बदलण्याची गरज असल्याचे हे लोक सांगतात. त्यासाठी मोदींना अधिक अधिकार देण्याची…

‘काँग्रेसची विचारसरणी मुघलांची, त्यांना  औरंगजेबाचे अत्याचार आठवत नाहीत’

मोदींचा कर्नाटकात काँग्रेसवर हल्लाबोल कर्नाटक : लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्यासाठी प्रचार शिगेस पोहचला आहे. भाजपाने यंदा दक्षिणेकडील राज्यांवर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वत: जोरदार प्रचार करत आहेत. कर्नाटकमधिल सभेत मोदी यांनी काँग्रेसवर जबरदस्त…

महाराष्ट्रात दोन दिवसात पंतप्रधान मोदींच्या ६ सभा

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी राज्यात येत्या दोन दिवसांत 29 व 30 एप्रिल रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या  सहा सभा होणार आहेत, अशी माहिती भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी रविवारी दिली. श्री.मोदी यांच्या…

मनोज जरांगेचे मिशन विधानसभा ?

बीड: अवघ्या देशात लोकसभेची धुम सुरु असतानाच आज मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी आपले मिशन विधानसभा जाहिर केले. सगेसोयऱ्यांच्या मराठा आरक्षणाची अंमलबजावणी न झाल्यास विधानसभेच्या सर्वच्या सर्व 288 जागा मराठा आंदोलक लढवती आणि…

सांगा हे पैशे कुणाचे ?

मुंबई : महाराष्ट्रात आदर्श लोकसभा लागू होताच निवडणूक आयोगाकडून त्याची कडक अंमबाजवाणी सुरु आहे.  निवडणूकीच्या काळात पन्नास हजार रुपायांहून अधिकची कॅश सोबत बाळगण्यास बंदी आहे. आणि ती सोबत असेल तर त्याबाबतची संबधित कागदपत्र सोबत असणे…

महायुतीत जागावाटपाचा तीढा कायम

मुंबई : महाराष्ट्रातील लोकसभेच्या पाचव्या आणि शेवटच्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज भरायला सुरुवात झाली असली तरी अजुनही महायुतीतील जागावाटपाचा तिढा सुटलेला नाही. महायुतीच्या पाच जागांवरील उमेदवारांची घोषणा अद्याप ही बाकी आहे. दक्षिण मुंबईतून…

गद्दारांनी बाळासाहेब ठाकरेंचं नाव घेऊ नये- आदित्य ठाकरे

कोल्हापूर : “आमच्यावर जे खोटे आरोप करतात त्यांच्याकडे कुणी लक्ष देण्याची गरज नाही. खोटारड्यांकडे लक्ष देऊ नका. एका प्रश्नाचं उत्तर मला घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांनी द्यावं, आमच्याकडून फुटून गेल्यानंतर गद्दार गँगमध्ये एकजण गेला.…

ठाण्यात कोण ? सस्पेंस कायम

ठाणे: एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचा बालेकिल्ला असणाऱ्या ठाणे लोकसभा मतदार संघात महायुतीचा उमेदवार कोण असणार याबाबतचा सस्पेंस रविवारीही कायम राहीलाय. अवघ्या २२ दिवसावर मतदान येऊन ठेपलेय. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून राजन विचारे यांनी…

भुजबळांचा महायुतीला घरचा आहेर

राज्यात ठाकरे, पवारांसाठी सहानुभूतीची लाट मुंबई: आपल्या वादग्रस्त विधानाने नेहमीच चर्चेत असणाऱ्या राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी आज महायुतीलाच घरचा आहेर दिला.आहे. निवडणूक एन टप्यात असतानाच राज्यात उध्दव ठाकरे आणि शरद पवार…

पावसाळ्यापूर्वी रखडलेली कामे पूर्ण करण्याचे निर्देश

उल्हासनगर महापालिका आयुक्त आणि ठेकेदारात बैठक उल्हासनगर – महापालिका आयुक्त अजीज शेख यांनी महापालिका ठेकेदारांची बैठक घेऊन त्यांच्या समस्या एकून घेतल्या. तसेच पावसाळ्यापूर्वी अर्धवट कामे पूर्ण करण्याचे निर्देश देऊन यापुढे रस्ते न खोदण्याच्या सूचना आयुक्तांनी ठेकेदाराला दिल्या आहेत. उल्हासनगर महापालिका आयुक्त अजीज शेख यांनी शुक्रवारी महापालिका सभागृहात कंत्राटदार व ठेकेदार असोसिएशनची बैठक बोलाविली होती. पावसाळा तोंडावर आला असून त्यापूर्वी शहरातील विकास कामे पूर्ण करा. असा सूचना आयुक्तांनी ठेकेदाराला केले. तसेच त्यांच्या समस्या एकून कारवाई करण्याचे आश्वासन दिले. महापालिका बांधकाम विभागामार्फत रस्त्याची तर पाणीपुरवठा विभागामार्फत मलनिस्सारण योजनेची कामे सुरू आहेत. दोन्ही विभागाने एकमेकांशी समन्वय ठेवून कामे केल्यास समस्या निर्माण होणार नाही. असा सल्ला महापालिका अधिकाऱ्यांसह ठेकेदारांना आयुक्त शेख यांनी दिला. पावसाळ्यापूर्वीची कामे वेळेत करण्यात यावीत, तसेच नवीन खोदकाम करण्यात येवू नये, रस्त्यावर धूळ होणार नाही. याची खबरदारी घ्यावी, नागरिकांना वाहतूक कोंडीची त्रास होणार नाही. यासह दक्षता व सुरक्षा विषयक साधनांचा वापर करावा. अशा सूचना यावेळी आयुक्तांनी ठेकेदाराला दिल्या आहेत. महापालिका ठेकेदाराच्या बैठकीत आयुक्त अजीज शेख यांच्यासह अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर, मुख्य लेखाधिकारी किरण भिलारे यांनी ठेकेदारांच्या समस्यांबाबत आढावा घेतला. यावेळी उपायुक्त किशोर गवस, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता तरुण शेवकानी, पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता परमेश्वर बुडगे, जनसंपर्क अधिकारी छाया डांगळे, ठेकेदार असोसिएशनचे अध्यक्ष राजेश लडाख, सोनु खटवाणी, शशी जगत्यांनी, प्रभु चंद्राणी यांच्यासह अन्य ठेकेदार उपस्थित होते. पावसाळ्यापूर्वीची कामे पूर्ण करण्यासाठी नियमित आढावा घेतला जाणार असेही आयुक म्हणाले.