Category: होम

 संविधानातील लोकशाहीचा चौथा स्तंभ प्रसार माध्यमं

विधानातील लोकशाहीचा चौथा स्तंभ प्रसार माध्यमं बाबासाहेबांनी सर्व घटकांना समान न्याय व हक्क देणारे संविधान दिले   – आनंद गायकवाड कल्याण: पाली भाषा प्रचार आणि प्रसार ट्रस्ट संचालित सम्राट अशोक विद्यालय सेंट वाय सी इंग्लिश स्कूल सम्राट अशोक इंग्लिश स्कूल आणि विपश्यना बालविहार यांच्या संयुक्त विद्यमाने प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. भारतीय संविधानात लोकशाहीचा चौथा स्तंभ प्रसार माध्यम पाहता संस्थेने प्रमुख मान्यवर म्हणून ज्येष्ठ पत्रकार आनंद गायकवाड यांच्याहस्ते तिरंगी ध्वजारोहण केले. आनंद गायकवाड आपल्या मनोगतात म्हणाले देशाला स्वातंत्र्य मिळून सतत्याहत्तर वर्षे झाली. शेवटच्या घटकापर्यंत अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत गरजा अद्यापही मिळत नाहीत. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी या देशातील सर्व घटकांना समान न्याय व  हक्क देणारे संविधान दिले  परंतु आजही देशात गरिबी आणि दारिद्र्य आहे. बिनविरोध निवडणूक करून नागरिकांचा मतांचा अधिकारच काढून घेत आहेत हे लोकशाहीला घातक आहे. संविधानातील लोकशाहीचा चौथा स्तंभ प्रसार माध्यम पत्रकारितेच्या माध्यमातून घडलेल्या घटना नागरिकांपर्यंत पोहोचवल्या जातात माझ्या हस्ते ध्वजारोहण करून माझा सन्मान केला मी धन्य झालो. शाळेतील विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीतांच्या चालीवर आकर्षक कवायतीच्या माध्यमातून देशभावना जागृत केल्या.आर. एस. पी. आणि एम. सी. सी. च्या विद्यार्थ्यांनी संचलन करत तिरंगी झेंड्यास सलामी दिली. महापुरुषांच्या वेशभूषेवर आलेली लहान मुले सर्वांचे लक्ष वेधून घेत होते कार्यक्रमाप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष पी.टी. धनविजय माध्य. मुख्याध्यापक गुलाबराव पाटील प्राथ. विभाग मुख्याध्यापिका सुजाता नलावडे तसेच पालक प्रतिनिधी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक गुलाबराव पाटील यांनी केले.

दादा : परफेक्शनचा आग्रह, स्पष्टतेचा ध्यास आणि माणुसकीचा स्पर्श आज सकाळी उठलो आणि कळलं की दादा आपल्यात नाहीत… क्षणभर विश्वासच बसला नाही. हे खरं आहे की नाही, याची खात्री करून…

एका दादा माणसाचे धक्कादायक जाणे!

एका दादा माणसाचे धक्कादायक जाणे! अजितदादा अनंतराव पवारांसारखा इतका निर्भीड, स्पष्टवक्ता व कोणालाही अंगावर घेण्याची तयारी असणारा फायटर नेता, इतक्या भीषण पद्धतीने नाहिसा व्हावा, हे दुर्दैवी तर आहेच. पण त्याही…

अवघे राज्य शोकसागरात

अवघे राज्य शोकसागरात अवघ्या राज्याच्या राजकारणाला नखशिखांत हादरवून टाकणारी बातमी अजितदादांच्या अकाली निधनाच्या निमित्ताने आली. महाराष्ट्राच्या राजकारणात अजित पवार हे नाव साडेतीन दशके सातत्याने चर्चेत राहिले. लोकसभेची अल्पकालीन कारकीर्द वगळता…

अपघाताच्या चौकशीची सर्वपक्षीय नेत्यांकडून मागणी नवी दिल्ली : अजित पवारांच्या विमान अपघातानंतर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यासह पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी चौकशीची मागणी केली आहे. ममता म्हणाल्या, कोणीही सुरक्षित नाही.…

ते सर्वार्थाने ‘दादा’ होते- उद्धव ठाकरे

ते सर्वार्थाने ‘दादा’ होते– उद्धव ठाकरे मुंबई : “एक खंबीर नेता व माझ्या मंत्रिमंडळातील मी उमदा सहकारी गमावला! मी मुख्यमंत्री असताना अजित पवार हे उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री होते. अत्यंत शिस्तप्रिय, आपल्या खात्यावर वचक…

हा निव्वळ अपघात, राजकारण नको- शरद पवार

हा निव्वळ अपघात, राजकारण नको– शरद पवार बारामती : “हा महाराष्ट्राला प्रचंड मोठा धक्का आहे. एक कर्तृत्ववान नेता हरपला. हे नुकसान कधीही भरून निघणार नाही. पण, सगळ्याच गोष्टी आपल्या हातात नसतात. ही घटना निव्वळ…

माझा मोठा भाऊ हरपला- एकनाथ शिंदे

माझा मोठा भाऊ हरपला- एकनाथ शिंदे ठाणे : “आज माझा मोठा भाऊ हरपला आहे. अजित पवार हे केवळ नेते नव्हते, तर ते एक अभ्यासू, वेळेचं भान ठेवणारे आणि प्रशासनावर मजबूत…

दिलदार मित्र गमावला- फडणवीस

दिलदार मित्र गमावला- फडणवीस मुंबई – जमिनीशी घट्ट नाळ असलेले जननेते, माझे मित्र सहकारी, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा विमान अपघातात मृत्यू झाल्याची घटना मनाला अत्यंत व्यथित करणारी मनाला चटका लावणारी आहे.…

दादा गेले

दादा गेले विमान अपघातात उपमुख्यमंत्री अजित पवारांचा मृत्यू अपघातात ५ जणांचा मृत्यू ० महाराष्ट्रावर शोककळा बारामती : अवघ्या महाराष्ट्राचे धडाडीचे नेते… लाडक्या बहीणींचा लाडका दादा… महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात…