Category: होम

ठाण्याला ३ फेब्रुवारीला महापौर मिळणार

ठाण्याला ३ फेब्रुवारीला महापौर मिळणार सिद्धेश शिगवण ठाणे : ठाण्याला येत्या ३ फेब्रुवारीला महापौर मिळणार आहे. ठाणए महापौर पदासाठी येत्य ३० जानेवारीला अर्ज दाखल केले जाणार आहेत. तर, ३ फेब्रुवारी रोजी महापौर पदासाठी निवडणूक…

मुंबईत एकत्रित गटनोंदणीवरून भाजप, शिंदेसेनेचा गोंधळ सुरूच

मुंबईत एकत्रित गटनोंदणीवरून भाजप, शिंदेसेनेचा गोंधळ सुरूच स्वाती घोसाळकर मुंबई: मुंबई महापालिका निवडणुकीत भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या युतीने काठावरचे बहुमत मिळवले. बहुमताचा हाँ आकडा अधिक भक्कम करण्याच्या दृष्टीनं पक्षाने स्वतंत्र…

मीरा भाईँदरमध्ये फोर टू का वन; चार पदरी पुलाचे दोन पदर गायब

मीरा भाईँदरमध्ये फोर टू का वन; चार पदरी पुलाचे दोन पदर गायब अरविंद जोशी मिरा-भाईंदर : मिरा-भाईंदर शहरात वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी बांधण्यात आलेल्या ब्रिजमध्ये फोर टू का वन करण्यात…

भारत-युरोपियन युनियनमध्ये मुक्त व्यापार कराराची घोषणा

भारत-युरोपियन युनियनमध्ये मुक्त व्यापार कराराची घोषणा नवी दिल्ली : भारत आणि युरोपियन युनियनमध्ये मुक्त व्यापार कराराची अधिकृत घोषणा आज  करण्यात आली आहे. भारत आणि युरोपियन युनियन यांच्यातील बहुचर्चित ‘मदर ऑफ ऑल डील’वर स्वाक्षरी करण्यात आली…

महामंडलेश्वर पद ममताने त्यागले  

महामंडलेश्वर पद ममताने त्यागले मुंबई :  सिनेस्टार ममता कुलकर्णीने किन्नर आखाड्यातील महामंडलेश्वर पद त्यागले आहे. महाकुंभ मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर ममता यांनी राजीनामा दिल्याने महामंडलेश्वर आखाड्यात आणि सिनेसृष्टीतही याची चर्चा रंगली आहे. गतवर्षी महाकुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर किन्नर…

शिवसेनेचे नामोनिशाण मिटवण्याची  परवानगी द्याच… आम्ही तयार आहोत

शिवसेनेचे नामोनिशाण मिटवण्याची परवानगी द्याच… आम्ही तयार आहोत नरेश म्हस्केंचा भाजप प्रदेशाध्यक्षांवर ‘लेटर बॉम्ब’ ठाणे :   भाजपाने परवानगी दिली तर, यांचे नामोनिशाण मिटवून टाकीन, असे विधान वनमंत्री गणेश नाईक यांनी काही दिवसापूर्वी केले होते. याचा खरपूस समाचार…

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची पुण्यतिथी – राजन राजे

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची पुण्यतिथी – राजन राजे ठाणे : ३० जानेवारी, याच दिवशी, अहिंसेच्या राष्ट्रपिता महात्मा गांधी या पुजाऱ्याची, एका अधम वृत्तीच्या माथेफिरुकरवी कट रचून निर्घृण हत्या करविली गेली.बरोबर ७८ वर्षांपूर्वी ‘गांधी’ नावाच्या महात्म्याची हत्या झाली खरी; पण, ‘गांधीवाद आणि गांधीविचार’ कधिच मेले नाहीत, कधिच मरणार नव्हते…कारण, आजच्या जागतिक-तापमानवाढीसारख्या महासंकटामुळे भयग्रस्त झालेल्या व भांडवली-नववसाहतवादी दुष्प्रृत्तींमुळे, अशांत-अस्वस्थ झालेल्या जगाला.केवळ, ‘गांधीविचार’च तारु शकतो; हे एव्हाना, या समरप्रसंगी, अवघ्या जगाच्या चांगलंच ध्यानी आलंय, असे मत धर्मराज्य पक्षाचे अध्यक्ष राजन राजे यांनी व्यक्त केले. आपल्या याच, विश्ववंदनीय महात्म्याचे, हेच वैश्विक-विचार पुढे नेण्यासाठी ‘धर्मराज्य पक्ष’, ठाणे जिल्हा काँग्रेस आणि ‘मूलभूत अधिकार संघर्ष समिती’ या समविचारी पक्ष-संघटनांच्या वतीने, ३० जानेवारी-२०२६ रोजी, सायंकाळी ठीक ५ वा. मराठी ग्रंथ संग्रहालय, ठाणे येथे एका व्याख्यानाचे आयोजन करण्यात आलंय. ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत डॉ. विवेक कोरडे आणि डाव्या चळवळीतील विद्रोही नेते कॉ. आनंद तेलतुंबडे, हे दोघे मान्यवर प्रभावी वक्ते ‘गांधी-विचारविश्वावर’ प्रकाशझोत टाकताना, आपल्यातील समाजघातकी, राष्ट्रद्रोही व अतिरेकी अशा उजव्याशक्तिंचा यथोचित समाचार घेतील.  सर्वसामान्यांना अज्ञात असलेल्या ‘गांधींची ओळख’, या व्याख्यानातून होईलच; पण, त्याचबरोबर गांधीहत्येचं नेमकं ‘सत्य’ही, या व्याख्यानातून पुढे येईल. आजपर्यंत ढोंगी व जात्यंध्य हिंदुत्ववाद्यांकडून, आपल्या महात्म्याबद्दल आणि त्यांच्या हत्येसंदर्भात अनेक अफवा बेमालुमपणे प्रसारित केल्या गेल्या; त्या सप्रमाण, पुराव्यांसह खोडून काढण्याचं महान कार्य, या कार्यक्रमाच्या माध्यमातून व्हावं, ही अपेक्षा आहे. आपल्या राष्ट्रपित्याचं कळीकाळाला पुरुन उरणारं महान कार्य व त्याचा संदेश…जनसामान्यांपर्यंत साद्यंत पोहोचावा; तसेच, त्याच्या ‘हौतात्म्या’तून अंशतः का होईना, पण उतराई होता यावे, यासाठीच,”गांधीहत्या आणि आपण…” या व्याख्यानाचं प्रयोजन आहे आणि त्यासाठीच, आपली उपस्थिती आवर्जून प्रार्थनीय आहे, असे आवाहन राजन राजे यांनी केले.

 भारताचा ७७ वा प्रजासत्ताक दिन साजरा  

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात भारताचा ७७ वा प्रजासत्ताक दिन साजरा हरिभाऊ लाखे नाशिक : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात भारताचा ७७ वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यापीठाचे मा. कुलगुरू प्रा. संजीव सोनवणे यांच्या हस्ते भारतीय तिरंगा ध्वज फडकावण्यात आला. यानिमित्ताने मा. कुलगुरू प्रा. सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली भारतीय राज्यघटनेच्या उद्देशिकेचे सामुहिक वाचन करण्यात आले. यावेळी बोलतांना मा. कुलगुरू प्रा. संजीव सोनवणे म्हणाले की भारतीय संविधान देशातील सर्व प्रकारच्या जनतेस जगण्याचे – अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य, हक्क व अधिकार प्रदान करते. त्यामुळे सर्वांना विकासाची समान संधी देखील प्राप्त होते. याचा लाभ घेत असतांना आपण सर्वांनी आपली कर्तव्ये देखील प्रामाणिकपणे व मेहनतीने पूर्ण केली पाहिजेत असे आवाहन त्यांनी केले. यावेळी त्यांनी विद्यापीठाच्या विविध विद्याशाखांच्या शिक्षणक्रमांची माहिती देखील दिली. त्यात प्रामुख्याने नवीन कौशल्याधारित व रोजगाराभिमुख, कृषी विज्ञान केंद्राचे व नवीन तंत्रज्ञानावर आधारित असलेले शिक्षणक्रम यांचा समावेश होता. मुक्त विद्यापीठाच्या शीर्ष नेतृत्वाखाली सुरु असलेला महाज्ञानदीप प्रकल्प, वाढवन बंदर साठी कुशल मनुष्यबळ पुरविण्याच्या हेतूने सुरु झालेले शिक्षण – प्रशिक्षणाचे काम, शेतकरी वर्गास एआय तंत्रज्ञान आधारित दिले जात असलेले शिक्षण, सामाजिक बांधिलकी म्हणून बंदिवान, तृतीयपंथी तसेच नक्षलग्रस्त भागातील युवक युवती यांच्या शिक्षणासाठी विद्यापीठातर्फे सुरु असलेले विशेष उपक्रम यांची देखील त्यांनी माहिती दिली. सन २०४७ पर्यंत विकसित भारत बनवण्याचे स्वप्न आपण सर्वांनी मिळून साकार करुया असे आवाहन मा. कुलगुरू प्रा. सोनवणे यांनी आपल्या भाषणाच्या अखेरीस केले. यावेळी विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. जोगेंद्रसिंह बिसेन,  विद्यापीठ व्यवस्थापन मंडळ सदस्या डॉ. संजीवनी महाले, कुलसचिव तथा वित्त अधिकारी डॉ. गोविंद कतलाकुटे, परीक्षा नियंत्रक श्री. भटूप्रसाद पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. जनसंपर्क अधिकारी श्री. महेंद्र बनसोडे यांनी सूत्रसंचलन केले. यावेळी विद्यापीठाच्या सर्व विद्याशाखांचे संचालक, प्राध्यापक, अधिकारी – कर्मचारी, शैक्षणिक संयोजक, दैनंदिन वेतन व सुरक्षा कर्मचारी, विद्यार्थी, शेतमजूर आदी उपस्थित होते.

आदिवासी बांधवांच्या घरे तोडण्याच्या कारवाईला वनमंत्र्यांची स्थगिती

आदिवासी बांधवांच्या घरे तोडण्याच्या कारवाईला वनमंत्र्यांची स्थगिती शिवसेना उबाठाची मागणी मान्य मुंबई: संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, बोरिवली पूर्व येथील आदिवासी बांधवांच्या घरे तोडण्याच्या कारवाईला स्थगिती देण्याबाबत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांना मंत्रालयातील त्यांच्या दालनात विभागप्रमुख उदेश पाटेकर, मुंबई विद्यापीठ सिनेट सदस्य व विधानसभा निरीक्षक शशिकांत झोरे, स्थानिक नगरसेविका सारिका शशिकांत झोरे यांनी निवेदन दिले. वनमंत्री गणेश नाईक यांनी संपूर्ण माहिती जाणून घेतली आणि तत्काळ आदिवासी बांधवांची घरे तोडण्याच्या कारवाईला महाराष्ट्र शासनातर्फे स्थगिती देण्याचे आदेश वन विभागाला दिले. नगरसेवक धरम काळे, ऍड संदेश नारकर, महेश मोरे, प्रशांत वरठे, विनायक मराठे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

अमोघ शर्मा टायब्रेकवर विजेता

प्रेस एन्क्लेव्ह बुद्धिबळ स्पर्धा मुंबई : प्रतिष्ठेच्या प्रेस एन्क्लेव्ह बुद्धिबळ स्पर्धेत अमोघ शर्माने टायब्रेकवर विजेतेपद पटकावले. १६ वर्षांखालील आयोजित या बुद्धिबळ स्पर्धेत चार खेळाडूंचे समसमान गुण झाले होते. अखेर अमोघ…