Category: होम

मुरबाड नगरीत भव्य अखंड हरीनाम सप्ताहचे आयोजन

मुरबाड नगरीत भव्य अखंड हरीनाम सप्ताहचे आयोजन राजीव चंदने मुरबाड : गुरूप्रतिपदेच्या पर्वकाळी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पटांगणात  मुरबाड तालुका भागवत वारकरी समाजसेवा मंडळाच्या विद्यमाने भव्य  अखंड हरिनाम सप्ताह सोमवार, २ फेब्रुवारी ते सोमवार, ९ फेब्रुवारी या कालखंडात आयोजित करण्यात आला आहे. इ.स. १९९८ साली गुरुवर्य वैकुंठवासी श्रीराम दादा जोशी यांनी अनुष्ठानपूर्वक सामुदायिक श्रीज्ञानेश्वरी पारायणाची मुहूर्तमेढ मुरबाडच्या मातीत रोवली. यावर्षी पारायण सोहळ्याचे एकोणतीसावे वर्ष आहे. आचार्य अशोकभाई खरे , निलेश जोशी आणि योगी फुलनाथ महाराज यांच्या पावन उपस्थितीत पारायण सोहळ्याचा प्रारंभ होईल.पारायण नेतृत्व श्रीमहंत प्रमोद महाराज जगताप आणि पारायणाचार्य,एकनाथ महाराज कोष्टी करणार आहेत.सदर उत्सवात पुणे येथील वेदमूर्ती शमंदारशास्त्री खळदकर यांची दररोज सायंकाळी चार ते सहा या वेळेत श्रीरामरक्षा या विषयावर प्रवचने होणार आहेत.रोज रात्री आठ ते दहा या वेळेत सर्वश्री विक्रांत महाराज पोंडेकर,जयेश महाराज भाग्यवंत,सुभाष महाराज गेठे,माधवदास महाराज राठी,भगीरथ महाराज काळे,ओंकार महाराज दुडे,आचार्य डॉ.रामकृष्णमहाराज लहवितकर यांची कीर्तने होणार आहेत.दिनांक आठ फेब्रुवारीला भव्य पालखी सोहळा आणि दिव्य असा दीपोत्सव संपन्न होईल. सोमवार दिनांक नऊ रोजी वैष्णवभूषण श्रीमहंत प्रमोद महाराज जगताप यांच्या काल्याच्या कीर्तनाने उत्सवाची सांगता होणार आहे.या महोत्सवात हजारो भाविकांना अन्नदान करण्यात येणार आहे.या  धर्मकार्यात भाविकांनी सर्वतोपरी सहकार्य करावे तसेच सोहळ्यात उपस्थित राहून भक्तिसुखाचा आनंद लुटावा असे आवाहन उपरोक्त मंडळाने केले आहे.

 मतदानाअगोदरच बिनविरोध निवडीचा महायुतीचा राणे पॅटर्न…!

मतदानाअगोदरच बिनविरोध निवडीचा महायुतीचा राणे पॅटर्न…! जिल्हा परिषद आणि ६ पंचायत समिती उमेदवार बिनविरोध ऊबाठा सेनेला धक्का! सिंधुदुर्ग: सिंधुदुर्ग जिल्ह्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांचे मतदान होण्यापूर्वीच महायुतीला मोठे यश मिळाले आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची उद्याची मुदत असली तरी त्यापूर्वीच ५ जिल्हा परिषद गण आणि ६ पंचायत समिती गटातील महायुतीचे उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. सर्वात आश्चर्याची आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे या सर्व मतदार संघात उभाटाच आपले अर्ज उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत. या घटनेमुळे पक्षाच्या अस्तित्वासाठी धडपडणाऱ्या उभा ठाक सेनेला हा मोठा धक्का मानला जात आहे. अलीकडे झालेल्या जिल्ह्यातील चार नगरपरिषदांच्या निवडणुका भाजप आणि दोन्ही शिवसेना पक्षाने एकमेकांच्या विरोधात उभे ठाकत अतिशय चुरशीने लढवल्या होत्या. याही निवडणुकीत हेच चित्र पुन्हा पाहायला मिळेल असे वाटत असताना भाजपाचे नेते खासदार नारायण राणे यांनी पुढाकार घेत महायुतीतील तिन्ही घटक पक्षांना एकत्र आणत जागा वाटपाचा ‘फॉर्म्युला’ तयार केला आणि तो तिन्ही पक्षांच्या गळी उतरवला. हा ‘फॉर्म्युला ‘जाहीर होताच त्यावरून महायुतीच्या तिन्ही घटक पक्षात वाद आणि कुरबुरी सुरू झाली आणि काही ठिकाणी मोठ्या प्रमाणावर बंडखोरीही झाली. बंडखोरी  थोपवण्याचे काम सुरू असून तिन्ही घटक पक्षांचे नेते दररोज बैठका घेऊन ही बंडखोरी थोपवण्याचा प्रयत्न करत आहेत आणि त्याला उद्यापर्यंत निश्चित यश येईल अशी खात्री नेतेमंडळींना वाटत आहे. एका बाजूला हे काम सुरू असताना दुसरीकडे महाविकास आघाडीचे आव्हान मोडीत काढण्याच्या दृष्टीने महायुतीतील नेते कामाला लागले असून जिल्ह्यात ठिकठिकाणी महाविकास आघाडीतील घटक पक्षांच्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना फोडून आपल्या पक्षात घेण्याचे सत्र महायुतीतील भाजपा आणि शिंदे सेनेने सुरू ठेवले आहे. प्रत्यक्ष मतदान होईपर्यंत महाविकास आघाडीला खिंडार पाडण्याचे आणि निवडणूक एकतर्फी कशी होईल त्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान महायुतीतील बंडखोरी हे शिंदे सेनेपेक्षा भाजपा समोर मोठे आव्हान आहे.जिल्ह्यात राणे म्हणतील ठरवतील ते घडतं ही परंपरा असतांना बंडखोरीनं अचानकपणे डोकं कसं वर काढलं? त्यातही कुडाळ – मालवण तसंच जिल्ह्यात काही ठराविक भागातच बंडखोरी कशी उफाळून आली? त्यांचा बोलविता धनी भाजपामध्ये कोणी आहे का? याचा शोध राणेंच्या गोटात सुरू आहे.खासदार राणे,पालकमंत्री नितेश राणे आणि शिंदेसेनेचे आमदार निलेश राणे हे तर जिल्ह्यात तळ ठोकून आहेत गेले काही दिवस पक्षांतर्गत बंड थोपवण्याचे त्यांचे प्रयत्न सुरूच आहेत.उद्या या बंडखोरांनी आपली उमेदवारी मागे घेतली नाही तर ही बंडखोरी कशी मोडून काढायची याचाही ‘फॉर्म्युला ‘ तयार असल्याचे बोलले जात आहे. हे ठरले बिनविरोध जि. प. गट: प्रमोद कामत (बांदा-भाजपा), प्राची इस्वलकर(खारेपाटण-भाजपा), रुहीता तांबे (जानवली,शिंदेसेना), सुयोगी घाडी (पडेल-भाजपा), अवनी तेली (बापर्डे-भाजपा) पंचायत समिती गण: संजय राणे (बिडवाडी), सोनू उर्फ राजेश सावंत (वरवडे), अंकुश ठुकरूल (पडेल),गणेश राणे (ना डण), संजय लाड (बापर्डे), साधना नकाशे (कोकिसरे)–सर्व भाजपा.

कलाश्रमचा अमृत महोत्सवी ‘अभियान सन्मान’ सोहळा

कलाश्रमचा अमृत महोत्सवी ‘अभियान सन्मान’ सोहळा अमृत महोत्सवी सोहळ्याच्या निमित्ताने सहदेव सदैव कराओके अभिनव स्पर्धा कलाश्रमच्या अमृत महोत्सवी सोहळ्यात  सव्वाशे कलाकार एकत्र येणार मुंबई –‘कलाश्रम’ ही स्वातंत्र्यसैनिक डॉ. परशुराम पाटील कला केंद्राच्या अंतर्गत कार्य करणारी संस्था आहे. या संस्थेच्या वतीने प्रत्येक महिन्याला अभियान सन्मान हा उपक्रम राबवला जातो. गेल्या आठ…

गिरणी कामगार घराच्या प्रश्नावर विधानसभा अधिवेशनामध्ये आवाज उठविला जाईल -सचिन अहिर

गिरणी कामगार घराच्या प्रश्नावर विधानसभा अधिवेशनामध्ये आवाज उठविला जाईल -सचिन अहिर राजेंद्र साळसकर मुंबई-एक काळ असा होता,स्वातंत्र्य मिळालेल्या भारतात सुई देखील बनत नव्हती, पण सत्तेवर आलेल्या प्रत्येक नेतृत्वाने आपापल्या परीने योगदा‌न दिले आणि देशाला राष्ट्रीय- आंतरराष्ट्रीय स्तरावर यशाच्या शिखरावर नेऊन ठेवले‌.पण अलीकडे सत्तेवर आलेल्या सरकारने हा इतिहास पुसून टाकण्याचा प्रयत्न चालविला आहे.इतिहास आमच्याच काळात २०१४ नंतर घडलाय, अशी खोटी हाकाठी पिटण्यास सुरुवात केली आहे.परंतु इतिहासामधील सत्य कदापि पुसता येणार नाही.हे सांगण्यासाठी आता नव्या पिढीने पुढे आले पाहिजे,असे प्रतिपादन राष्ट्रीय मिल मजूर संघाचे अध्यक्ष आमदार सचिन अहिर यांनी येथे ध्वजरोहन प्रसंगी बोलताना केलेआहे. राष्ट्रीय मिल मजदूर संघ‌ आणि महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय कामगार संघाच्या संयुक्त विद्यमाने सालाबाद प्रमाणे यार्षीही मजदूर मंझील समोरील प्रांगणात,देशाचा ७७ वा प्रजासत्ताकदिन समारोह आयोजित करण्यात आला होता.अध्यक्ष आमदार सचिन अहिर यांच्या हस्ते ध्वजारोहण पार पडले.याप्रसंगी सरचिटणीस गोविंदराव मोहिते आणि सर्व पदाधिकारी, तसेच कामगार,आंबेकर प्रतिष्ठान कॅटरिंग कॉलेजचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या शूर वीरांना अभिवादन करून अध्यक्ष आमदार सचिन अहिर म्हणाले,आज राज्यसरकार परदेशातून गुंतवणूक आणली,असे मोठ्या तोऱ्यात म्हणत असले तरी,राज्यात कारखाने बंद पडत आहेत, बेरोजगारी आणि उपासमारीचा प्रश्न चिंताग्रस्त होऊन बसला आहे,ही गोष्ट सोयीस्करपणे विसरली गेली आहे!गेल्या पाच वर्षापासून मुंबईसह महाराष्ट्र आणि देशातील बंद एसटीसी गिरण्यांच्या प्रश्नाकडे केंद्र सरकारने डोळेझाक केली आहे. या प्रश्नावर लोकसभेत आवाज उठवण्यासाठी खासदारांना लवकरच निवेदन देण्याचे सत्र सुरू करण्यात येईल,अशी आपल्या भाषणात सचिन आहिर यांनी ग्वाही दिली आहे गिरणी कामगार घराच्या रखडलेल्या प्रश्नावर सचिन अहिर म्हणाले, कामगारांना जाचक ठरणारे १७ वे कलम राज्यसरकारने रद्द केले, हे १४ कामगार संघटना एकत्र येऊन  उभारण्यात आलेल्या लढ्याचे यश आहे! परंतु सरकारने जे सकारात्मक आश्वासन दिले आहे, त्याची अंमलबजावणी व्हावी,यासाठी लवकरच होणाऱ्या विधानसभा अधिवेशनामध्ये निश्चितपणे आवाज उठविला जाईल. ध्वजारोहण सोहळा सेवा दलाचे प्रमुख लालचंद पांडे यांच्या संयोजनाखाली पार पडला. उपाध्यक्ष बजरंग चव्हाण यांचे याकामी महत्व पूर्ण सहकार्य लाभले.

प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा

प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा रमेश औताडे मुंबई : क्रांती सम्राट डॉ बाबासाहेब गोपले प्रवेशद्वार लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नगर  मानखुर्द येथे जय लहुजी रिक्षा स्टँड यांच्या  वतीने ७७ वा प्रजासत्ताक दिन  मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. त्याप्रसंगी समाजभूषण सुदाम आवाडे यांनी  ध्वजारोहण केले. श्रावण नाटकर सर , नितीन हिवाळे , संदेश सुतार, दत्तात्रय आवाडे , गोपीनाथ पांजगे , भिमा गायकवाड , अँड दिलीप दुनघव , सुरेश उफाडे , दत्ता दुनघव , देविदास उफाडे , सोमनाथ शिंदे   , दादाराव पारवे आधी मान्यवर व जय लहुजी रिक्षा युनियनचे सर्व सदस्य व नगरातील समाज बांधव उपस्थित होते.

ग्लोबल इंग्लिश स्कूलमध्ये ७७ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

ग्लोबल इंग्लिश स्कूलमध्ये ७७ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा दिवा : देशाच्या प्रजासत्ताक दिनाच्या औचित्यावर ग्लोबल इंग्लिश स्कूलमध्ये मोठ्या उत्साहात ७७ वा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे चेअरमन महेंद्र दळवी होते. कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख पाहुणे मुंब्रा पोलिस ठाण्याचे ए. पी.आय वसंत खतेले, ए. पी.आय. अमोल कोळेकर आणि ए. पी.आय राजेंद्र तोरडमल यांच्या हस्ते ध्वजारोहण करून करण्यात आली. ध्वजारोहणानंतर राष्ट्रगीत व प्रतिज्ञा घेण्यात आली. यावेळी शाळेच्या प्राचार्या श्रीमती ज्योत्स्ना सोनी, किरण सावंत सर, शिक्षकवर्ग, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. ध्वजारोहणानंतर विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीत, समूहगायन, नृत्य, कवितावाचन व प्रभावी भाषणे सादर करून उपस्थितांची मने जिंकली. विद्यार्थ्यांच्या सादरीकरणामुळे संपूर्ण परिसर देशभक्तीमय व प्रेरणादायी वातावरणाने भारावून गेला. याप्रसंगी प्रमुख पाहुण्यांनी आपल्या भाषणातून भारतीय संविधानाचे महत्त्व, नागरिकांचे हक्क व कर्तव्ये, शिस्त, एकता व बंधुता याविषयी मार्गदर्शन केले. तरुण पिढीने व्यसनांपासून दूर राहून शिक्षण, शिस्त व देशसेवेला प्राधान्य द्यावे, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी चेअरमन महेंद्र दळवी यांनी विद्यार्थ्यांना राष्ट्रप्रेम, नैतिक मूल्ये व सामाजिक जबाबदारी यांचे महत्त्व सांगून शाळा नेहमीच सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील असल्याचे नमूद केले. कार्यक्रमाच्या शेवटी प्राचार्या श्रीमती ज्योत्स्ना सोनी यांनी सर्व मान्यवरांचे, पालकांचे व उपस्थितांचे आभार मानले. विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे व शिक्षकांच्या योग्य मार्गदर्शनामुळे हा कार्यक्रम अत्यंत यशस्वीपणे पार पडल्याचे त्यांनी सांगितले.

शुक्रवारी ठाण्यात पाणी नाही

शुक्रवारी ठाण्यात पाणी नाही ठाणे : ठाणे महानगरपालिका क्षेत्रात मुंब्रा,  दिवा, कळवा, माजिवडा – मानपाडा व वागळे (काही भागात) प्रभाग समितीमध्ये महाराष्ट्र औद्योगिक  विकास महामंडळामार्फत पाणीपुरवठा करण्यात येतो. महाराष्ट्र औद्योगिक  विकास महामंडळाच्या पाणी पुरवठा योजनेच्या अंतर्गत जांभूळ जलशुध्दीकरण केंद्रातील जलाशय (HSR) येथे बारवी गुरूत्ववाहिनी  क्र. १, २ व ३ वर वाहिन्याचे उन्नतीकरण व तातडीचे देखभाल दुरूस्तीचे काम करण्यात येणार आहे. परिणामी गुरूवार रात्री १,२ वाजल्यापासून ते रात्री १२ वाजेपर्यत एकूण २४ तास पाणीपुरवठा बंद राहणार आहे. सदर शटडाऊन कालावधीत ठाणे महानगरपालिकेअंतर्गत दिवा, मुंब्रा (प्रभाग क्र. २६ व ३१  चा काही भाग वगळता) आणि कळवा प्रभाग समितीमधील सर्व भागामध्ये व वागळे प्रभाग समिती मधील रुपादेवी पाडा, किसननगर नं. २, नेहरुनगर तसेच मानपाडा प्रभाग समिती अंतर्गत कोलशेत खालचा गाव येथील पाणीपुरवठा २४  तासासाठी पूर्णपणे बंद राहील. पाणीपुरवठा सुरू झाल्यानंतर पुढील १ ते २ दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा होईल याची कृपया नागरिकांनी नोंद घ्यावी. पाणी कपातीच्या कालावधीत नागरिकांनी पाणी काटकसरीने वापरुन ठाणे महानगरपालिकेस सहकार्य करावे असे आवाहन महापालिकेच्या पाणीपुरवठा  विभागातर्फे करण्यात आले आहे.

गुणवंत विद्यार्थ्यांना नगराध्यक्षांच्या हस्ते सन्मानित

गुणवंत विद्यार्थ्यांना नगराध्यक्षांच्या हस्ते सन्मानित मुकुंद रांजणे माथेरान : माथेरान मधील शालेय विद्यार्थ्यांच्या गुणात्मक कौशल्याबाबत शैक्षणिक आणि क्रीडा क्षेत्रात उत्तम कामगिरी पार पाडत असतात. याकामी केंद्रप्रमुख शिक्षक नारायण सोनावणे आणि पत्रकार मुकुंद रांजणे यांच्या संकल्पनेतून यावेळी पहिल्यांदाच तिन्ही शाळेतील दोन गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या कार्याची पोचपावती म्हणून प्रमाणपत्र दिल्यास अन्य विद्यार्थी सुध्दा शैक्षणिक क्षेत्रात,त्याचप्रमाणे विविध क्षेत्रात आपल्यातील कलागुणांना वाव मिळवून देऊ शकतात ज्यामुळे शाळेच्या नावासह गावाचे नावलौकिक सुध्दा वाढू शकते यासाठी भारतीय स्वातंत्र्याच्या ७७ व्या प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून येथील वीर हुतात्मा भाई कोतवाल नगरपरिषद प्राथमिक शाळा, गव्हाणकर एज्युकेशन शाळा आणि सेंट झेव्हियर स्कुल मधील गुणवंत विद्यार्थी, विद्यार्थीनिंना विद्यमान नगराध्यक्ष चंद्रकांत चौधरी,मुख्याधिकारी राहुल इंगळे आणि उप नगराध्यक्ष संतोष शेलार यांच्या शुभहस्ते प्राथमिक शाळेच्या प्रांगणात  प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.वीर हुतात्मा भाई कोतवाल नगरपरिषद प्राथमिक शाळेचे सई उमेश लोखंडे इयत्ता ५ वी,  विरेन पांडुरंग झोरे-इयत्ता ७ वी, सेंट झेव्हीअर्स हायस्कुलचे उमेर अनिस शेख- इयत्ता आठवी व रिचा राजेश दळवी इयत्ता दहावी तसेच प्राचार्य शांताराम यशवंत गव्हाणकर विद्यामंदिर, या शाळेतील गुणवंत विद्यार्थी कु. सानिया सुखदेव पारधी इयत्ता – १ 0 वी, प्रेम गोविंद दाभाडे इयत्ता १ 0 वी या सर्व गुणवंत  विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर नवनिर्वाचित लोकप्रतिनिधी,गव्हाणकर शाळेचे मुख्याध्यापक रमेश ढोले, संघपाल वाठोरे, प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक दिलीप अहिरे, संतोष चाटसे तसेच अन्य शिक्षक वृंद आणि पालकवर्ग मोठया संख्येने उपस्थित होते.

देशभक्तीच्या जयघोषात टिटवाळा पोलीस ठाण्यात प्रजासत्ताक दिन साजरा

देशभक्तीच्या जयघोषात टिटवाळा पोलीस ठाण्यात प्रजासत्ताक दिन साजरा कल्याण : भारतीय लोकशाहीचा गौरव, संविधानिक मूल्यांचा अभिमान आणि राष्ट्रप्रेमाची चेतना यांचे प्रतीक असलेल्या प्रजासत्ताक दिनानिमित्त कल्याण तालुका पोलीस स्टेशन, टिटवाळा येथे अत्यंत सन्मान, शिस्तबद्ध वातावरण आणि भावनिक देशभक्तीच्या वातावरणात भव्य ध्वजारोहण सोहळा पार पडला. तिरंग्याच्या साक्षीने देशभक्तीचा जागर अनुभवायला मिळालेल्या या कार्यक्रमाने परिसरात राष्ट्राभिमानाची एक नवी ऊर्जा निर्माण केली. सकाळी ध्वजारोहणाच्या क्षणी राष्ट्रगीताच्या सूरांमध्ये संपूर्ण परिसर भारावून गेला. पोलीस अधिकारी, कर्मचारी, नागरिक, सामाजिक कार्यकर्ते आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. तिरंग्याला मानवंदना देताना उपस्थित प्रत्येकाच्या मनात देशासाठी काहीतरी करण्याची प्रेरणा जागृत होताना दिसून आली. राष्ट्रध्वज फडकताना केवळ एक औपचारिक विधी नव्हे, तर देशाच्या स्वातंत्र्य, एकता, अखंडता आणि लोकशाही मूल्यांप्रती असलेली निष्ठा अधिक दृढ करणारा क्षण म्हणून हा सोहळा नागरिकांना अनुभवता आला.

संविधानातील लोकशाहीचा चौथा स्तंभ प्रसार माध्यमं

संविधानातील लोकशाहीचा चौथा स्तंभ प्रसार माध्यमं बाबासाहेबांनी सर्व घटकांना समान न्याय व हक्क देणारे संविधान दिले   – आनंद गायकवाड कल्याण: पाली भाषा प्रचार आणि प्रसार ट्रस्ट संचालित सम्राट अशोक विद्यालय सेंट वाय सी इंग्लिश स्कूल सम्राट अशोक इंग्लिश स्कूल आणि विपश्यना बालविहार यांच्या संयुक्त विद्यमाने प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. भारतीय संविधानात लोकशाहीचा चौथा स्तंभ प्रसार माध्यम पाहता संस्थेने प्रमुख मान्यवर म्हणून ज्येष्ठ पत्रकार आनंद गायकवाड यांच्या हस्ते तिरंगी ध्वजारोहण केले. आनंद गायकवाड आपल्या मनोगतात म्हणाले देशाला स्वातंत्र्य मिळून सतत्याहत्तर वर्षे झाली. शेवटच्या घटकापर्यंत अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत गरजा अद्यापही मिळत नाहीत. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी या देशातील सर्व घटकांना समान न्याय व  हक्क देणारे संविधान दिले  परंतु आजही देशात गरिबी आणि दारिद्र्य आहे. बिनविरोध निवडणूक करून नागरिकांचा मतांचा अधिकारच काढून घेत आहेत हे लोकशाहीला घातक आहे. संविधानातील लोकशाहीचा चौथा स्तंभ प्रसार माध्यम पत्रकारितेच्या माध्यमातून घडलेल्या घटना नागरिकांपर्यंत पोहोचवल्या जातात माझ्या हस्ते ध्वजारोहण करून माझा सन्मान केला मी धन्य झालो. शाळेतील विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीतांच्या चालीवर आकर्षक कवायतीच्या माध्यमातून देशभावना जागृत केल्या.आर. एस. पी. आणि एम. सी. सी. च्या विद्यार्थ्यांनी संचलन करत तिरंगी झेंड्यास सलामी दिली. महापुरुषांच्या वेशभूषेवर आलेली लहान मुले सर्वांचे लक्ष वेधून घेत होते कार्यक्रमाप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष पी.टी. धनविजय माध्य. मुख्याध्यापक गुलाबराव पाटील प्राथ. विभाग मुख्याध्यापिका सुजाता नलावडे तसेच पालक प्रतिनिधी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक गुलाबराव पाटील यांनी केले.