Category: होम

बदलापूरमध्ये पुन्हा शालेय मुलीवर लैंगिक अत्याचार

बदलापूर : बदलापूरमध्ये पुन्हा एकदा शाळेतील एका चार वर्षांच्या मुलीसोबत शाळेच्या बसमध्ये लैंगिक अत्याचार झाल्याचे उघडकीस आले आहे. बदलापूर पश्चिमेला असणाऱ्या नामांकित खासगी शाळेत हा प्रकार घडला आहे. याप्रकरणी पोलिसांनी…

सत्तेसाठी कुणासमोरही लाचार होणार नाही – संजय राऊत

मुंबई : उद्धव ठाकरे शिवसेना आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिंदे  शिवसेना यांच्यात संभाव्य युतीच्या चर्चांना शिवसेना खासदार संजय राऊत यांनी स्पष्ट शब्दांत नकार दिला आहे. आम्ही कोणासमोरही लाचार होणार नाही,असे ठणकावून…

छगन भुजबळांची ‘ईडी’पीडा संपली

महाराष्ट्र सदन घोटाळ्यात एसीबीनंतर आता ईडीनेही दिली क्लीनचीट मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना महाराष्ट्र सदन घोटाळ्यात एसीबीनंतर आता ईडीच्या केसमध्येही क्लीनचीट दिली आहे. सक्तवसुली संचालनालय (भुजबळ यांच्याविरुद्ध मनी लॉन्ड्रिंगच्या प्रकरणाचा…

बाळासाहेबांची स्वप्ने मोदींनी पूर्ण केली – एकनाथ शिंदे

मुंबई :  हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या जन्मशताब्दी वर्षात  महापालिका निवडणुकांमध्ये भाजपानंतर शिवसेना (शिंदेगट) हा दुसऱ्या क्रमांकाचा मोठा पक्ष ठरलाय, “चांदा ते बांदा शिवसेना घराघरात पोहोचली आहे. शिवसेना हा सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा पक्ष आहे, हे आपण…

लढत आहोत आणि लढणार आहोत !

बाळासाहेबांच्या जन्मशताब्दी वर्षात उद्धव आणि राज ठाकरेंचा एल्गार मुंबई : हिंदृहृदय सम्राट बाळासाहेबांनी मराठी माणसाला जगायचं कसं हे शिकवलं, आपण जगायचं हे कसं विसरुन गेलो तर दोन व्यापाऱ्याचे गुलाम म्हणून जगणं आपल्या…

ठाण्यात वीस हजार वर्षांपूर्वीच्या मानवी कलेचा इतिहास उलघडणार

ठाणे –  वीस हजार वर्षापुर्वीच्या मानवी कलेचा इतिहास ठाण्यात उलघडणार. कोकणातील जगप्रसिद्ध कातळ शिल्पांची ओळख नव्या पिढीपर्यंत पोहोचावी आणि मुलांमध्ये प्राचीन इतिहासाबाबत उत्सुकता निर्माण व्हावी, या उद्देशाने ठाण्यात विशेष कातळ शिल्प प्रदर्शनाचे आयोजन…

बाळासाहेबांसारखी प्रतिभा पुन्हा होणे नाही राज ठाकरे

स्व. बाळासाहेबांची आज १०० वी जयंती. इतिहासात जन्म शताब्दी वर्ष अनेकांची साजरी झाली आहेत आणि होतील देखील, पण एखादी व्यक्ती हयात नसताना देखील ती लोकांच्या स्मृतीत रहावी, आणि त्या व्यक्तीने आज देखील…

मुंबईतील कंपन्यांशी दावोसला जाऊन करार कशाला- राऊत

मुंबईतील कंपन्यांशी दावोसला जाऊन करार कशाला- राऊत मुंबई: ज्या कंपन्यांची मुख्यालये मुंबईत आहेत, त्यांच्याशी करार करण्यासाठी दावोसला जाण्याची गरजच काय ? असा सवाल करीत संजय राऊत यांनी जीएसडब्ल्यू (JSW) ज्याचे मुख्यालय मुंबईच्या बीकेसीमध्ये आहे, लोढा ज्यांचे हेडक्वार्टर मुंबईत आहे आणि संगमनेरच्या पंचशील सारख्या कंपन्यांशी दावोसला जाऊन करार केले गेले आहेत, अशी खोचक टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केली.   भारतातल्याच कंपन्यांशी दावोसला जाऊन करार करणे आणि त्याचे फोटो सर्वत्र झळकवणे, यामुळे जगामध्ये भारताचे हसे होते असे अनेक तज्ज्ञांचे म्हणणे असल्याचे राऊत यांनी नमूद केले. राज्यांच्या या मोठ्या शिष्टमंडळांवर पंतप्रधानांनी लक्ष ठेवणे गरजेचे आहे, कारण हे सर्व जनतेच्या कराच्या पैशावर सुरू आहे, अशी टीका राऊत यांनी केली. संजय राऊत म्हणाले की, सरकारने सांगितलेले आकडे सुखावणारे असले तरी ते फुगवून सांगितले जात आहेत असा त्यांचा आरोप आहे. एका दिवसात १४ लाख कोटींचे करार आणि १४ लाख रोजगार मिळणार असे सांगितले जाते, पण प्रत्यक्षात ही गुंतवणूक कुठे आहे? असा प्रश्न त्यांनी विचारला आहे. गेल्या पाच वर्षांतील दावोस दौऱ्यांचे आकडे एकत्र केले तर ते ७५ लाख कोटींवर जातात. इतकी गुंतवणूक खरंच आली असेल तर ती कुठे आहे, हे सरकारने दाखवावे. जे काम मुंबईत बसून होऊ शकते, त्यासाठी राज्याच्या तिजोरीतून पैसा खर्च करून ‘पंचतारांकित पिकनिक’ करण्याची गरज काय? असा सवाल त्यांनी केला असून, या दौऱ्यांवर किती खर्च होतोय हे राज्याला कळावे अशी मागणी त्यांनी केली.