Category: होम

महिलांना बेस्टचे हाफ तिकीट

   महायुतीचा ‘वचननामा‘ जाहीर ० ५ वर्षांसाठी पाणीपट्टी स्थगीत ० २४ तास पाणी ०   लाडक्या बहिणींना लघु उद्योगासाठी ५ लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज मुंबई : मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी आज भाजपा, एकनाथ शिंदें यांची शिवसेना आणि रामदास आठवलेंची आरपीआय यांच्या महायुतीने आपला वचननामा प्रसिद्ध केला.  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी हा वचननामा प्रसिद्ध केला. महायुतीच्या या वचननाम्यात पाच वर्षांसाठी पाणीपट्टी वाढ स्थगित करणे, बेस्टमध्ये महिलांना ५० टक्के सवलत देणे, लाडक्या बहिणींना लघु उद्योगासाठी ५ लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज, झोपडपट्टीमुक्त मुंबई, ३० ते ३५ लाख घरांची निर्मिती करणे, रोहिंग्या आणि बांगलादेशी मुक्त मुंबई करणे, तसेच, धारावीचा विकास आदी अनेक घोषणा करण्यात आल्या आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, इतर कुणीही वचननामा दिला तरीही त्यांचा ट्रॅक रेकॉर्ड आणि आमचा ट्रॅक रेकॉर्ड मोठा असेल. पुढील पाच वर्षानंतर आम्ही कायकाय केलं याचा एक रिपोर्ट जनतेसमोर आम्ही मांडू. आम्ही मुंबईकरांना मुंबईबाहेर जाऊ देणार नाही. काही लोक बोलत राहिले आम्ही मात्र करून दाखवलं. बीडीडी, अभ्युदय नगर, विशाल सह्याद्री नगर याचे उदाहरण आहे.हा वचननामा मुंबईकरांच्या दररोजच्या जीवनात बदल घडवणारा ठरेल, असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. अडीच वर्ष मी मुख्यमंत्री होतो. त्यानंतर देवेंद्र फडणवीसांचे एक वर्ष, आम्ही मुंबईत जे काम केले, ते आपल्यासमोर आहेच. मुंबईच्या विकासाचा वेग आणखी वाढवायचा आहे. मुंबईत आलेल्या मराठी माणसाचे रक्षण करणे, संस्कृती जतन करणे आमची जबाबदारी आहे. वचन आहे. महत्वाचे म्हणजे, मुंबईबाहेर गेलेला मुंबईकर आम्हला पुन्हा एकदा मुंबईत आणायचा आहे असा…

महाराष्ट्र नव्हे ‘अदानीस्तान’?

भाजपाने अख्खी मुंबई विकायला काढली आहे, अशा शबदात राज ठाकरे यांनी भाजपाच्या अदानी प्रेमाचा बुरका टराटरा फाडला. २०२४ लोकसभा निवडणुकीनंतर एका व्यक्तीने माहिती दिली, माझी रिसर्च टिम कामाला लागली. आत्ता हे सगळं मी तुम्हाला…

‘शिवतिर्था’वरून ठाकरेंची महाराष्ट्राला साद आता चुकलात तर कायमचे संपलात…

स्वाती घोसाळकर मुंबई : मराठी मनाचा हुंकार म्हणून ओळख असणाऱ्या शिवाजीपार्कवर म्हणजेच शिवतिर्थावरून आज तब्बल २० वर्षांनी उद्धव ठाकरें आणि राज ठाकरे यां ठाकरें बंधूनी अवघ्या महाराष्ट्राला साद घातलीय. आता चुकलात तर…

आक्रमक इतिहासजमा झाले, पण सोमनाथ मंदिर तिथेच उभं आहे पंतप्रधान मोदींचे शौर्य यात्रेत प्रतिपादन

  सोमनाथ : गझनीपासून औरंगजेबापर्यंत सोमनाथ मंदिरावर आक्रमक करणारे अनेक आक्रमक इतिहासाच्या पानांमध्ये गडप झाले, पण सोमनाथ मंदिर तिथेच गर्वाने उभं आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. सोमनाथ मंदिराच्या स्वाभिमान पर्वामध्ये रविवारी  नरेंद्र मोदी यांनी सहभाग घेतला यावेळी ते बोलत होते. सोमनाथ मंदिर येथे १०८ अश्वांसह काढण्यात आलेल्या शौर्य यात्रेमध्ये ते सहभाही झाले होते. ही शौर्य यात्रा सोमनाथ मंदिराच्या रक्षणासाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या अगणित वीर योद्ध्यांना श्रद्धांजली अर्पण करण्याच्या उद्देशाने काढण्यात आली होती. शौर्यसभेला संबोधित करताना नरेंद्र मोदी म्हणाले की,  एक हजार वर्षांपूर्वी १०२६  साली महमूद गझनी याने केलेल्या हल्ल्यावेळी इथे काय वातावरण असेल,  आज इथे उपस्थित आहेत, त्यांच्या पूर्वजांनी, आमच्या पूर्वजांनी आपल्या आस्थेला वाचवण्यासाठी आपल्या महादेवांसाठी प्राणांची बाजी लावली होती. एक हजार वर्षांपूर्वी हे आक्रमक विचार करत होते की, त्यांनी आम्हाला जिंकलंय. मात्र आज एक हजार वर्षांनंतरही सोमनाथ महादेव मंदिरावर फडकत असलेला ध्वज हिंदुस्तानची शक्ती काय आहे, त्याचं सामर्थ्य काय आहे हे संपूर्ण सृष्टीला दाखवून देत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितले की, जेव्हा गझनीपासून औरंगजेबापर्यंत सर्व आक्रमक सोमनाथ मंदिरावर हल्ले करत होते. तेव्हा त्यांना वाटत होते की, त्यांची तलवार सनातन सोमनाथवर विजय मिळवत आहे. मात्र ज्या सोमनाथला ते नष्ट करू इच्छित होते, त्याच्या नावामध्येच सोम अर्थात अमृत आहे, हे धर्मांध कट्टरपंथी समजू शकले नाहीत.  त्याच्यामध्ये हलाहल प्राशन करून अमर राहण्याचा विचार जोडलेला आहे. तसेच त्यामध्ये सदाशि महादेवांच्या रूपात चैतन्यशक्ती प्रतिष्ठित आहे.  ती कल्याणकारक आहे आणि प्रचंड तांडव: शिव: हा शक्तीचा स्रोहती आहे. त्यामुळेच गझनीपासून औरंगजेबापर्यंत सोमनाथवर हल्ला करणारे सर्व आक्रमक इतिहासाच्या पानांमध्ये गडप झाले. मात्र चिरंतन सोमनाथ मंदिर सागर किनाऱ्यावर अभिमानानं उभं आहे. असेही नरेंद्र मोदी यावेळी म्हणाले.

महाप्रचार रॅलीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

महाप्रचार रॅलीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आशीर्वाद देण्यासाठी नागरिक रस्त्यावर दिवा, दि. ११ डिसेंबर : ठाणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२६ अंतर्गत शिवसेना–भाजपा– आर.पी.आय. महायुतीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या प्रभाग क्रमांक २७ च्या शैलेश पाटील, स्नेहा पाटील, दिपाली भगत आणि ऍड. आदेश भगत या चारही उमेदवारांच्या महाप्रचार रॅलीला दिवा परिसरात नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. रविवारी सायंकाळी आयोजित या रॅलीदरम्यान उमेदवारांना आशीर्वाद देण्यासाठी नागरिक मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले होते. रॅली मार्गावर ठिकठिकाणी नागरिकांनी फुलांची उधळण करत, घोषणा देत उमेदवारांचे स्वागत केले. महिला, युवक, ज्येष्ठ नागरिकांसह मोठ्या प्रमाणावर लोकसहभाग दिसून आला. नागरिकांची गर्दी एवढी वाढली की काही काळासाठी मुख्य रस्ता वाहतुकीसाठी बंद करावा लागला, त्यामुळे परिसरात उत्साहाचे आणि चैतन्याचे वातावरण निर्माण झाले होते. “काम करत आलो… काम करत राहू…” या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. महायुतीच्या उमेदवारांच्या समर्थनार्थ निघालेल्या या रॅलीमुळे दिवा शहरात निवडणुकीचे वातावरण तापले असून, नागरिकांचा वाढता पाठिंबा स्पष्टपणे दिसून आला. रॅली शांततेत व शिस्तबद्ध पद्धतीने पार पडली. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी कार्यकर्ते व स्वयंसेवकांनी चोख नियोजन केले होते. या महाप्रचार रॅलीने महायुतीच्या उमेदवारांना मोठे बळ दिल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू होती.

 अपक्ष उमेदवाराकडून आचारसंहितेचा भंग

अपक्ष उमेदवाराकडून आचारसंहितेचा भंग निवडणूक आयोगाकडे कारवाईची मागणी दिवा: ठाणे महानगरपालिका निवडणुकीत दिवा प्रभाग क्रमांक २७ (क) मधून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवणाऱ्या सीमा गणेश भगत यांच्यावर निवडणूक आचारसंहितेचे उल्लंघन केल्याचा आरोप करण्यात आला असून, याबाबत निवडणूक आयोगाकडे लेखी तक्रार सादर करण्यात आली आहे. सीमा गणेश भगत यांनी अपक्ष उमेदवार म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केलेला असतानाही, त्यांच्या प्रचारासाठी वापरण्यात येणाऱ्या प्रचार पत्रिकेवर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आदित्यनाथ योगीराज यांचे छायाचित्र वापरण्यात आले आहे. विशेष म्हणजे, त्या भारतीय जनता पार्टीच्या अधिकृत उमेदवार नसताना भाजपच्या वरिष्ठ नेत्यांचे फोटो वापरून मतदारांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच, निवडणूक आयोगाकडून सीमा भगत यांना “हेलिकॉप्टर” हे निवडणूक चिन्ह देण्यात आले असून, ही भाजपच्या वरिष्ठ नेत्यांचे फोटो वापरण्यात येत आहे. सदर प्रकार हा निवडणूक आचारसंहिता व निवडणूक नियमांचे स्पष्ट उल्लंघन असल्याचे तक्रारदारांचे म्हणणे आहे. या प्रकरणाची तातडीने चौकशी करून संबंधित प्रचार साहित्य जप्त करावे, आचारसंहितेचा भंग सिद्ध झाल्यास सीमा गणेश भगत यांच्यावर योग्य ती कठोर कारवाई करावी, तसेच भविष्यात अशा प्रकारचा प्रचार त्वरित थांबवण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी निवडणूक आयोगाकडे करण्यात आली आहे. निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकता आणि लोकशाही मूल्ये जपण्यासाठी निवडणूक आयोगाने याची गंभीर दखल घ्यावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

निवडणूक कर्तव्यावर नियुक्त ४३० कर्मचा-यांनी पहिल्या दिवशी केले पोस्टल मतदान

निवडणूक कर्तव्यावर नियुक्त ४३० कर्मचा-यांनी पहिल्या दिवशी केले पोस्टल मतदान नवी मुंबई : (अशोक गायकवाड ) नवी मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूकीत प्रत्येक मतदाराने आपला मतदानाचा हक्क बजावावा याकरिता पॅम्पेलेट्स, पोस्टर्स, बॅनर्स, ऑडिओ, व्हिडीओ, डिजीटल तसेच सोशल मिडीया अशा विविध माध्यमांतून व्यापक स्वरूपात जनजागृती करण्यात येत आहे. मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी विविध स्वरुपात प्रचार प्रसार करतांनाच निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी मोठया संख्येने निवडणूक कर्तव्यावर कार्यरत असणा-या शासकीय – निमशासकीय कर्मचारी यांचा मतदानाचा हक्क डावलला जाऊ नये याकरिता महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आठही निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात टपाली मतदान सुविधा केंद्रे कार्यरत करण्यात आलेली आहेत. १५ जानेवारी रोजी होणा-या नमुंमपा निवडणूकीमध्ये कर्तव्यासाठी नेमणूक झालेल्या १३९ महिला व २९१ पुरुष अशा ४३० कर्मचा-यांनी शनिवार १० जानेवारी रोजी पहिल्या दिवशी टपाली मतदान करुन आपला मतदानाचा हक्क बजावला अशी माहिती उपआयुक्त तथा पोस्टल मतदान नोडल अधिकारी स्मिता काळे यांनी दिली. मतदान केल्यानंतर या कर्मचा-यांनी “आम्ही मतदान केले, तुम्हीही मतदान करा” असे आवाहन सेल्फी काढत सर्व मतदार नागरिकांना केले. निवडणूकीसाठी मतदान केंद्रावर नियुक्त अधिकारी, कर्मचारी यांना मतदानाच्या दिवशी कर्तव्यावर कार्यरत असल्याने मतदान करण्याची संधी उपलब्ध होणार नसल्याने महानगरपालिकेने पोस्टल मतदानाची प्रक्रिया प्रभावीपणे राबवली आहे. त्यासाठी आठही विभागातील निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयांमध्ये टपाली मतदान सुविधा केंद्रे स्थापन करण्यात आलेली आहेत. नवी मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूकीकरिता प्राधान्याने रायगड जिल्हयातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कर्मचाऱ्यांप्रमाणेच नवी मुंबईतील सिडको व इतर शासकीय – निमशासकीय कार्यालये, खाजगी शाळा तसेच पोलीस विभाग येथील कर्मचाऱ्यांची निवडणूक कामाकरिता नेमणूक करण्यात आली आहे. अशा कर्मचाऱ्यांकरिता तसेच जे कर्मचारी नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील मतदार आहेत मात्र त्यांची नेमणूक इतर शहरांमध्ये निवडणूक कर्तव्यावर झालेली आहे अशा कर्मचा-यांना मतदान करता यावे यासाठी राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार व नियमानुसार स्थापन करण्यात आलेल्या या विशेष टपाली मतदान सुविधा केंद्राचा लाभ घेऊन निवडणूक कर्तव्यावर कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांनी मतदान करावे असे आवाहन नवी मुंबई महानगरपालिका निवडणूक विभागाच्या वतीने करण्यात येत आहे.

कल्याण डोंबिवली महापालिकेच्या मतदारांना मतदान केंद्राची माहिती आता एका क्लिकवर

कल्याण डोंबिवली महापालिकेच्या मतदारांना मतदान केंद्राची माहिती आता एका क्लिकवर कल्याण :  कल्याण डोंबिवली महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ च्या अनुषंगाने मतदारांना मतदान करणे सुलभ व्हावे, त्यांना आपल्या मतदान केंद्राची माहिती त्वरित उपलब्ध व्हावी, यासाठी महापालिकेमार्फत विशेष ऑनलाईन सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. या ऑनलाईन सुविधेमार्फत मतदारांना त्यांचे नाव सर्च केल्यावर, मतदान केंद्राचे जीपीएस लोकेशनसह माहिती उपलब्ध होणार आहे. या माध्यमाद्वारे मतदारांना मतदान कोणत्या केंद्रात करावयाचे आहे, मतदार यादीचा भाग क्रमांक, अनुक्रमांक ही वैयक्तिक माहिती एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे. मतदान क्रमांक व मतदान केंद्र शोधण्यासाठी मतदारांनी https:kdmc.localbody.org/Home/Voter_Search या लिंकचा किंवा  QR Code चा वापर करावा. या सुविधेमुळे मतदारांना वोटर स्लिपवर अवलंबून राहण्याची गरज भासणार नाही आणि घर बसल्या आपापल्या मतदान केंद्राची माहिती जीपीएस लोकेशनसह सहजरित्या उपलब्ध होईल. यामुळे मतदान प्रक्रिया अधिकाधिक सुलभ व पारदर्शक होण्यास मदत होणार आहे.

ठाण्यात आज उद्धव ठाकरे, राज ठाकरे यांची तोफ धडाडणार

ठाण्यात आज उद्धव ठाकरे, राज ठाकरे यांची तोफ धडाडणार अनिल ठाणेकर ठाणे: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची सोमवारी, १२ जानेवारीला ठाण्यात तोफ धडाडणार आहे. दोन्ही ठाकरे बंधूं एकत्र आल्यानंतर त्यांची ठाण्यात पहिलीच संयुक्त सभा होणार असल्याने दोन्ही पक्षातील कार्यकर्ते आणि ठाणेकरांमध्ये उत्सुकता वाढली आहे. मराठी भाषा, मराठी अस्मिता, मराठी माणूस या महत्वाचा मुद्यावर आणि तत्वावर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आले आहेत. दोन्ही ठाकरे बंधूं एकत्र आल्याने महाराष्टात उत्साहाचे वातावरण आहे. सध्याच्या पालिका निवडणुकीत दोघे ही  ताकदीने उतरले असून महाराष्ट्राचे प्रश्न आणि सध्याची राजकीय परिस्थिती या मुद्द्यांवर दोन्ही नेते मार्गदर्शन करणार आहेत. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि मनसे यांच्यातील राजकीय समन्वयाच्या पार्श्वभूमीवर ही सभा अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. या सभेला शिवसेना, मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व उमेदवार हजेरी लावणार आहेत. सभेसाठी ठाणे जिल्ह्यातून मोठ्या संख्येने पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित राहणार आहेत. ही सभा आगामी राजकीय घडामोडींच्या दृष्टीने निर्णायक ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सोमवारी  १२ जानेवारी संध्याकाळी ठीक ६ वाजता ठाणे गडकरी रंगायतन समोर सभा पार पडणार आहे. ठाण्याच्या या सभेमुळे राज्याच्या राजकारणात मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.

 नमुंमपा निवडणुकीसाठी ईव्हीएम यंत्रणा सज्ज

नमुंमपा निवडणुकीसाठी ईव्हीएम यंत्रणा सज्ज आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी केली पाहणी नवी मुंबई: नवी मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ व्यवस्थितपणे पार पाडण्यासाठी संबंधित सर्व यंत्रणा तत्परतेने काम करीत असून निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात सुरु असलेल्या ईव्हीएम यंत्रे निवडणूकीसाठी सज्ज करण्याच्या कामकाजाची महापालिका आयुक्त डॉ. कैलास‍ शिंदे यांनी कोपरखैरणे व तुर्भे येथे पाहणी केली. नवी मुंबई महानगरपालिका निवडणूकीकरिता नुकत्याच रायगड जिल्ह्यात झालेल्या नगरपरिषद निवडणूकीसाठी वापरलेली ३५०० हून अधिक निवडणूक यंत्रे महानगरपालिकेने १३ ठिकाणांहून ताब्यात घेतली असून त्याची प्रथमस्तरीय तपासणी पूर्ण झालेली आहे. मध्यप्रदेशातून आणलेल्या या ईव्हीएम मशीन पोलीस बंदोबस्तात व वाहनांना जीपीएस ट्रॅकर लावून सुरक्षितपणे नवी मुंबईत आणल्यानंतर या ईव्हीएम मशीनची प्रथम स्तरीय तपासणी बेलापूर येथील वारकरी भवन या ठिकाणी ईव्हीएम मशीन कार्यवाहीचे नियंत्रण अधिकारी उपआयुक्त डॉ. कैलास गायकवाड आणि समन्वय अधिकारी कार्यकारी अभियंता विद्युत  प्रविण गाडे यांच्या नियंत्रणाखाली ३५ निवडणूक मास्टर ट्रेनर्स यांच्या माध्यमातून पूर्ण करण्यात आलेली आहे. सदर प्रथम स्तरीय तपासणी राजकीय पक्ष प्रतिनिधींच्या समक्ष करण्यात आलेली आहे. हैद्राबाद येथील इलेक्ट्रॉनिक कमिशन ऑफ इंडिया यांच्या ३ तज्ज्ञ अभियंत्यांकडून या प्रत्येक मशीनची सखोल तपासणी करण्यात आली असून या मशीन प्रमाणित करुन घेण्यात आलेल्या आहेत. या प्रमाणित मशीनपैकी प्रत्येक निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात १० याप्रमाणे एकूण ८० ईव्हीएम मशीन ८ विभागांमध्ये प्रशिक्षणासाठी पाठविण्यात आलेल्या आहेत व त्यावर सर्व विभागांचे प्रथम प्रशिक्षण सत्र पार पडले आहे. ही १५०० हून अधिक कन्ट्रोल युनिट व ३५०० हून अधिक बॅलेट युनिट असलेली मतदान यंत्रे आठही विभागांमधील निवडणूक निर्णय अधिका-यांच्या कार्यालयाकडे मतदान केंद्रांची संख्या लक्षात घेऊन व त्यामध्ये अधिकच्या २० टक्के मशीन देऊन वितरीत करण्यात आलेली आहेत. या मशीनचे निवडणूक निर्णय अधिकारी स्तरावर मतदान केंद्रनिहाय बॅलेट पेपर लावून पुनर्तपासणी करुन  घेण्यात येत आहे. महापालिका आयुक्त तथा निवडणूक अधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी सहा. संचालक नगररचना  सोमनाथ केकाण यांच्यासह कोपरखैरणे व तुर्भे येथील निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयास भेट देऊन निवडणूक यंत्र सिलींग प्रक्रियेची पाहणी केली. या प्रक्रियेकरिता प्रत्येक निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात मास्टर ट्रेनर्सची नेमणूक करण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे ऐनवेळी उद्भवणा-या तांत्रिक अडचणींच्या निराकरणासाठी स्वप्निल देसाई, राजेश पाटील, प्रविण पाटील हे अभियंत्यांचे मास्टर ट्रेनर्स पथक तयार असणार आहे. त्याचप्रमाणे प्रत्येक विभागासाठी एक याप्रमाणे ईसीआयचे ८ तज्ज्ञ  अभियंतेही कार्यरत असणार आहेत. ईव्हीएम मशीनची वाहतूक, तपासणी, वर्गीकरण आणि वितरण या सर्व प्रक्रिया काटेकोरपणे नियमानुसार पार पाडण्यात आल्या आहेत. निवडणूक यंत्रणेच्या कालबध्द व काटेकोर नियोजनाद्वारे महापालिका प्रशासन निवडणूकीसाठी सज्ज असून प्रत्येक टप्प्यावर पारदर्शकता, सुरक्षा आणि तांत्रिक अचूकतेला प्राधान्य देण्यात येत आहे.