Category: होम

‘रिफार्म, परफॉर्म आणि  ट्रान्सफॉर्म’वर फोकस

 पंतप्रधान मोदींचा रोडमॅप नवी दिल्ली : देशाची आर्थिक दिशा ठरवणारे संसदचे अर्थसंकल्पीय अधिवेशनला सुरुवात झाली असून ‘रिफार्म, परफॉर्म आणि ट्रान्सफॉर्म’वर फोकस हा आपला रोडमॅम असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जाहीर केले आहे.  या अधिवेशनात अनेक महत्त्वाची विधेयके, मोठे आर्थिक निर्णय अपेक्षित आहेत. १ फेब्रुवारी रोजी सादर होणारा केंद्रीय अर्थसंकल्प आणि आज संसदेत मांडला जाणारा आर्थिक सर्वेक्षण २०२६-२७ यामुळे हे अधिवेशन अधिकच महत्त्वाचे ठरले आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसद भवन परिसरात माध्यमांशी संवाद साधला. यावेळी, पंतप्रधान मोदी म्हणाले की, २१व्या शतकाचा एक चतुर्थांश काळ पूर्ण झाला असून आता दुसऱ्या टप्प्याची सुरुवात होत आहे. २०४७ पर्यंत विकसित भारताचे ध्येय साध्य करण्यासाठी पुढील २५ वर्षे अत्यंत महत्त्वाची असतील, असे त्यांनी स्पष्ट केले. हा अर्थसंकल्प या शतकाच्या दुसऱ्या टप्प्यातील पहिला अर्थसंकल्प असून, तो देशाच्या भविष्याची दिशा ठरवणारा ठरेल, असे मतही त्यांनी मांडले. पंतप्रधान मोदी यांनी सांगितले की, अर्थमंत्री निर्मला सीतारामन सलग नवव्यांदा संसदेत अर्थसंकल्प सादर करणार आहेत. सलग ९ वेळा अर्थसंकल्प मांडणाऱ्या त्या देशातील पहिल्या महिला अर्थमंत्री ठरणार असून, हा क्षण भारताच्या संसदीय इतिहासातील गौरवशाली क्षण आहे.

हवा प्रदूषण आणि माणूस…

गेल्या काही दिवसातील बातम्या पाहिल्या तर असे दिसेल की अगदी भारताच्या राजधानीत म्हणजे दिल्लीतही हवेचे प्रदूषण प्रचंड वाढले आहे. इतर काही ठिकाणीही अशीच कठीण परिस्थिती निर्माण झाली असली तरी हे…

विरोधक सतत अपयशी का ठरताहेत?

विरोधक सतत अपयशी का ठरताहेत? अलिकडच्या काळात महाराष्ट्रामध्ये झालेल्या निवडणुकांमधील भाजपचा विजय जितका पक्षाच्या संघटनशक्तीचा, प्रचारतंत्राचा आणि सत्तेतील अधिकारांचा आहे, तितकाच इतर राजकीय पक्षांच्या अपयशाचाही आहे. विशेषतः काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस…

राजकारणातले ‘ दादा ‘ पर्व संपले

  बुधवार २८ जानेवारीची सकाळ महाराष्ट्रासाठी सकाळ न ठरता काळ रात्र ठरली कारण या सकाळी महाराष्ट्राच्या राजकारणातील धडाडीचा लोकनेता उपमुख्यमंत्री अजित पवार काळाच्या पडद्याआड गेले. बुधवारी सकाळी ९ वाजता टीव्हीवर…

खाणकामाविरोधात का एकवटले मच्छीमार?

मासेमारी करून उपजीविका करणे हेच मच्छिमार समाजाचे दैनंदिन जीवन. त्यांनी फारसे कौशल्य शिक्षण घेतलेले नसते. त्यामुळे समुद्राशी कुणी खेळायला लागल्यास त्यांना सहन होत नाही. रोजीरोटीवर गंडांतर येत असेल, तर कोणत्याही…

संविधान अधिकार देतो, तर भाषा आपल्याला ओळख देते- दिलीप कोरे

संविधान अधिकार देतो, तर भाषा आपल्याला ओळख देते- दिलीप कोरे कल्याण:  स्वतंत्र भारताचा प्रजासत्ताक दिन सार्वभौम, लोकशाही प्रधान आहे. या प्रसंगी आपण आपली भाषा स्वतंत्र ठेवली आहे का? याचा विचार होणे आवश्यक आहे कारण संविधान आपल्याला अधिकार देतो तर भाषा आपल्याला ओळख देते. मराठी भाषा ही इतिहासाची भाषा आहे. अभंग, पोवाडे, लोकगीते, भारुडे यातून मराठी भाषा समृद्ध झाली आहे. परंतु सांस्कृतिक घसरण होऊ नये म्हणून मराठीचे संवर्धन ही काळाची गरज आहे. त्यासाठी भाषेचा सक्रीय वापर, निर्मिती, एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे अभिजात मराठी हस्तांतरित करा असे मोलाचे मार्गदर्शन प्रमुख पाहुणे म्हणून कोकण ग्रंथालय संघाचे अध्यक्ष दिलीप कोरे यांनी प्रजासत्ताक दिनी सार्वजनिक वाचनालय कल्याण मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त आयोजित विविध स्पर्धांच्या पारितोषिक वितरण सोहळ्या प्रसंगी केले. देशाचे सज्ञान, सुजाण, आदर्श नागरिक होण्याकरिता मराठी भाषेशी समरस व्हा, आपली भाषा वापरातून जिवंत ठेवा. असा मोलाचा सल्ला वाचनालयाचे अध्यक्ष मिलिंद कुलकर्णी यांनी कार्यक्रमाच्या प्रस्ताविकेतून उपस्थित विद्यार्थ्यांना दिला. मराठी भाषा संवर्धन पंधरवडा वाचनालयाचे सरचिटणीस भिकू बारस्कर यांच्या संकल्पनेतून महाविद्यालयीन विद्यार्थी चालवितात वाचनालय, पुस्तक रसग्रहण स्पर्धा २०२६, माझे कल्याण शहर – प्रश्नमंजुषा स्पर्धा २०२६ अशा विविध स्पर्धातून मराठी भाषेचा प्रचार व प्रसार व्हावा या उद्देशातून या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धांमध्ये बिर्ला महाविद्यालय कल्याण, प्रगती महाविद्यालय, डोंबिवली, अॅचिव्हर्स महाविद्यालय,कल्याण, सी.एच.एम. महाविद्यालय, उल्हासनगर अशा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी अत्यंत उत्साहात सहभाग नोंदविला होता. विजयी स्पर्धकांना पारितोषिक प्रदान करण्यात आली. रोटरी क्लब ऑफ कल्याणच्या अध्यक्षा रुईता सपकाळ यांनी प्रमुख पाहुण्या म्हणुन वाचनालयाच्या सर्व उपक्रमाला व पुढील वाटचालीला शुभेच्छा देऊन २१ हजारांची देणगी देणार असल्याचे जाहीर केले. प्रसंगी वाचनालयाच्या उपाध्यक्षा आशा जोशी, चिटणीस नीलिमा नरेगलकर, कार्यकारणी सदस्या अमिता कुकडे, कार्यकारिणी सदस्य अरुण देशपांडे, वाचक वर्ग, शिक्षक गण, विद्यार्थी वर्ग व वाचनालयाच्या ग्रंथसेविका मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या.

पनवेल महानगरपालिकेतील महायुतीची आयुक्त कार्यालयात अधिकृत गट नोंदणी

पनवेल महानगरपालिकेतील महायुतीची आयुक्त कार्यालयात अधिकृत गट नोंदणी पनवेल: पनवेल महानगरपालिकेतील भारतीय जनता पार्टी, शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या महायुतीची अधिकृत गट नोंदणी कोकण विभागीय आयुक्त कार्यालयात पार पडली. यावेळी गटनेते नितीन पाटील यांच्यासोबत महायुतीचे नगरसेवक नगरसेविका उपस्थित होते. माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, माजी नगराध्यक्ष जे. एम. म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली पनवेल महानगरपालिकेच्या २०२६ सार्वत्रिक निवडणुकीत भाजप–शिवसेना–राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या महायुतीने दणदणीत विजय मिळवत स्पष्ट बहुमत प्राप्त केले आहे. महायुतीचे एकूण ५९ नगरसेवक विजयी झाले असून यामध्ये भाजपचे ५५, शिवसेनेचे २ व राष्ट्रवादी काँग्रेसचे २ नगरसेवकांचा समावेश आहे.याआधी नवनिर्वाचित नगरसेवक व नगरसेविकांच्या संयुक्त बैठकीत महायुतीच्या गटनेतेपदी नितीन जयराम पाटील यांची निवड करण्यात आली होती. आज झालेल्या गट नोंदणी प्रक्रियेमुळे नितीन पाटील यांची गटनेतेपदी शासनाकडे अधिकृत नोंद करण्यात आली आहे. महायुतीची गट नोंदणी पूर्ण झाल्यानंतर आता महापौर व उपमहापौर पदांसाठी निवडणूक प्रक्रिया येत्या १० फेब्रुवारी रोजी पार पडणार आहे.

 बांदोडकर महाविद्यालयात उपयोजित प्राणीशास्त्रावरील आंतरराष्ट्रीय परिषद उत्साहात संपन्न

बांदोडकर महाविद्यालयात उपयोजित प्राणीशास्त्रावरील आंतरराष्ट्रीय परिषद उत्साहात संपन्न “भविष्यासाठी शाश्वत प्रगती” या संकल्पनेवर दोन दिवसीय शास्त्रीय मंथन मुंबई : विद्या प्रसारक मंडळ संचलित बा. ना. बांदोडकर स्वायत्त विज्ञान महाविद्यालय, ठाणे येथील…

महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या वतीने

महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या वतीने ३१ जानेवारीला अजितदादा पवार यांची शोकसभा मुंबई:-महाराष्ट्र राज्य कबड्डी असो. च्या वतीने कबड्डीचे आधारवड संघटनेचे माजी अध्यक्ष स्व. अजितदादा पवार यांची शोकसभा आयोजित करण्यात आली आहे. संघटनेचे मुंबई, दादर, छत्रपती शिवाजी महाराज मैदान(शिवाजी पार्क)…

महिलांच्या सुरक्षिततेसाठी कायदेशीर जागृती

महिलांच्या सुरक्षिततेसाठी कायदेशीर जागृती कोकण कृषी विद्यापीठात लैंगिक छळ प्रतिबंधक कार्यक्रम अशोक गायकवाड रत्नागिरी: राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या समान किमान कार्यक्रमा अंतर्गत डॉ. बाळासाहेब सावंत, कोकण कृषी विद्यापीठात जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्यावतीने “महिलांचे कामाच्या ठिकाणी लैंगिक छळापासून संरक्षण” या विषयावर प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश विनोद यशवंतराव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमास जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव आर. आर. पाटील, कृषी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. संतोष विष्णू सावर्डेकर हे प्रमुख उपस्थित होते. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव पाटील यांनी कामाच्या ठिकाणी महिलांचे लैंगिक छळापासून संरक्षण कायदा याबाबत सविस्तर माहिती दिली. लैंगिक छळ म्हणजे काय, कोणती कृत्ये लैंगिक छळाच्या व्याख्येत येतात, याविषयी उदाहरणांसह मार्गदर्शन केले. कामाच्या ठिकाणी लैगिक छळ होत असल्यास महिलांनी कोणती पावले उचलावीत, तक्रार कशी करावी, याबाबतही माहिती दिली. लैगिक छळ तक्रार निवारण समितीची रचना, तिची कार्यपद्धती व जबाबदाऱ्या याविषयी सविस्तर माहिती देण्यात आली. मार्गदर्शनानंतर उपस्थित विद्यार्थिनी व कर्मचाऱ्यांचे शंकानिरसन करण्यात आले. कार्यक्रमासाठी विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी व महिला कर्मचारी तसेच महिला व पुरुष शिक्षकवृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते.