Category: होम

संतोष देशमुख हत्या प्रकरणी मराठा समाजाचा आंदोलनाचा इशारा

रमेश औताडे मुंबई : संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाची चौकशी व्हावी तसेच त्या प्रकरणातील आरोपी तसेच सह आरोपींना अटक व्हावी यासाठी सकळ मराठा समाजाच्या वतीने २८ डिसेंबर रोजी बिड जिल्हाधिकारी कार्यालयवर मोर्चा काढणार असल्याचा इशारा मराठा समाजाचे नेते अंकुश कदम व नरेंद्र पाटील यांनी सोमवारी मुंबई मराठी पत्रकार संघ येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिला. बीड जिल्हयातील मसाजांग या ठिकाणी संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ सकळ मराठा समाज व मराठा क्रांती मोर्चाच्या नेत्यांना आंदोलनाचा  इशारा दिला असून मारेक-यांना कठोर शिक्षा होत नाही तसेच राजकीय वरदहस्त असणा-या नेत्याची हकलपट्टी होत नाही तो पर्यंत आंदोलन सुरूच राहणार असे अंकुश कदम यांनी यावेळी सांगितले. यावेळी माजी आमदार नरेंद्र पाटील,रघुनाथ पाटील, महेश डोंगरे ,धनंजय जाधव  आदी मराठा समाजाचे नेते उपस्थित होते. बिड जिल्ह्याचा बिहार होऊ नये व संतोष देशमुख यांना न्याय मिळे पर्यंत धनंजय मुंडे यांना मंत्री पदावरून काढून टाकावे. धनजय मुंडे यांच्या जवळचा वाल्मिकी कराड यांच्यावर ३०२ अंतर्गत खुनाचा गुन्हा दाखल

सानपाड्यात सर्वपक्षीयांनी मोर्चा काढून गृहमंत्री अमित शहा यांचा केला जाहीर निषेध

नवी मुंबई : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ.  बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी  १७ डिसेंबर २०२४ रोजी भारताचे गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेत केलेल्या अपमान जनक द्वेषपूर्ण वक्तव्याचा निषेध करण्यासाठी नवी मुंबईतील सानपाडा येथील…

शतक महोत्सवी वर्षात श्री समर्थ व्यायाम मंदिर दादर संघाची विजयी  सलामी

मुंबई : सांताक्रूझ येथील  १४ व १५ डिसेंबर २०२४ रोजी साने गुरुजी आरोग्य मंदिर  आयोजित ४० वी कै. भाऊसाहेब रानडे नवोदित मल्लखांब स्पर्धेत, श्री समर्थ व्यायाम मंदिर, दादर या संस्थेच्या मुलींच्या संघाने…

अमित शहा यांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ वकिलांची निदर्शने

ठाणे : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ तसेच परभणी मधील संविधान प्रतिकृती विटंबना प्रकरणातील आरोपींवर देशद्रोहीचा गुन्हा दाखल करा, न्यायालयीन कोठडीत मृत्यूमुखी पडलेल्या संविधान रक्षक,कायद्याचा विद्यार्थी शहीद सोमनाथ…

माकपच्या बिहार राज्य अधिवेशनाला दरभंगा येथे मोठ्या जाहीर सभेने दमदार सुरुवात

अनिल ठाणेकर ठाणे : मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या २४व्या बिहार राज्य अधिवेशनाला २२ डिसेंबरला उत्तर बिहारमधील दरभंगा येथील हजारो शेतकरी आणि कामगारांच्या मोठ्या रॅलीने आणि जाहीर सभेने दमदार सुरुवात झाली. या सभेला महिलांची उपस्थिती लक्षणीय होती.संपूर्ण अधिवेशन स्थळ लाल झेंडे, लाल बॅनर आणि लाल फलकांनी सजवले होते. अधिवेशन स्थळाला माकपचे माजी सरचिटणीस सीताराम येचुरी यांचे, तर सभागृहाला बिहारचे माजी पक्ष राज्य सचिव आणि केंद्रीय कमिटी सदस्य विजयकांत ठाकूर यांचे नाव देण्यात आले होते. दरभंगा हा त्यांचा मूळ जिल्हा होता. राज्य सचिवमंडळ सदस्य श्याम भारती यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या जाहीर सभेस पॉलिट ब्युरो सदस्य ए. विजयराघवन व डॉ. अशोक ढवळे, केंद्रीय कमिटी सदस्य खासदार आमरा राम, ए. आर. सिंधू, ललन चौधरी, अवधेश कुमार, राज्य सचिवमंडळ सदस्य आमदार अजय कुमार, आणि जिल्हा सचिव अविनाश ठाकूर यांनी संबोधित केले.सर्व वक्त्यांनी केंद्रातील मोदी सरकार आणि राज्यातील ‘पलटू राम’ नितीशकुमार सरकारच्या जनविरोधी, कॉर्पोरेटधार्जिण्या, धर्मांध, जातपातवादी आणि हुकूमशाही धोरणांवर जोरदार टीकास्त्र सोडले. तसेच भाजप-एनडीएच्या विरोधात बिहारमधील सर्व डाव्या आणि धर्मनिरपेक्ष शक्तींची एकजूट आणखी मजबूत करण्याचे आवाहन केले. वक्त्यांनी केरळच्या डाव्या लोकशाही आघाडी सरकारचा पर्याय लोकांसमोर ठेवला. जमीन आणि जनतेच्या इतर ज्वलंत स्थानिक समस्यांवरील संघर्ष तीव्र आणि व्यापक करावेत, धर्मांधता, जातपातवाद आणि नवउदारवादाच्या विरोधात प्रभावी राजकीय-वैचारिक मोहिमा कराव्यात, आणि बिहारमध्ये पक्ष संघटना व जनसंघटनांना जास्त बळकट करावे, असेही आवाहन वक्त्यांनी केले. बिहारचे हे राज्य अधिवेशन २४ डिसेंबरपर्यंत चालेल.

अमीत शहांच्या निषेधार्थ महाविकास आघाडीचे जोरदार आंदोलन

बाबासाहेब आंबेडकर हे आमचे पॅशन-डॉ. जितेंद्र आव्हाड अनिल ठाणेकर ठाणे : आंबेडकर… आंबेडकर असे म्हणणे फॅशन झाली आहे, असे विधान केंद्रीय गृहमंत्री अमीत शहा यांनी केले होते. त्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस -शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीसडॉ.  जितेंद्र आव्हाड, शिवसेना नेते राजन विचारे यांच्या उपस्थितीत महाविकास आघाडीने ठाणे स्टेशन परिसरात जोरदार निदर्शने केली. *या प्रसंगी,डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी, आंबेडकर हे नाव आमची पॅशन आहे. अमीत शहा हे ज्या पक्षात आहेत; त्यांच्या मातृसंस्थेने संविधानाला विरोध केला होता. आता शहांच्या विधानाने भाजपच्या मनात काय आहे, ते उघडकीस आले आहे, अशी टीका केली. यावेळेस राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुहास देसाई, कार्याध्यक्ष प्रकाश पाटील, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विक्रांत चव्हाण,शिवसेना(उबाठा)चे जिल्हाप्रमुख केदार दिघे, रचना वैद्य, राहुल पिंगळे, रवी कोळी, राजेश साटम, राजेश कदम यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्ष,  काँग्रेस,  शिवसेना, आप, सपा आदी पक्षांनी ठाणे स्टेशन परिसरातीलडॉ.  बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर अमीत शहा यांच्या निषेधार्थ आंदोलन केले. याप्रसंगी आंदोलकांनी मोदी – शहा यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. “तडीपार तो तडीपार, त्याला काय समजणार घटनाकार, संविधान आमचा अभिमान,डॉ.  बाबासाहेब आंबेडकर हमारे भगवान, अमीत शहा मुर्दाबाद” अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या. या प्रसंगी, परभणीत संविधान प्रतिकृतीची मोडतोड करणारा माणूस विकृत होता, असे मुख्यमंत्री सांगत असतील तर संसदेतडॉ.  बाबासाहेब आंबेडकर यांचा अवमान करणाऱ्यास काय म्हणाल, असे पत्रकारांनी विचारले असता,डॉ.  बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव आम्ही हृदयातून घेत असतो. आमच्यासाठी ते नाव पॅशन आहे. कारण, त्यांच्यामुळेच आम्हा माणूस म्हणून जगण्याचा अधिकार मिळाला. स्वर्ग आणि नरक कुणीच पाहिलेले नाही. मात्र, इथल्या नरकातून माणुसकीचा स्वर्ग बाबासाहेब आंबेडकर यांनीच आम्हाला दाखविला आहे.  अमीत शहा यांच्या विधानातून भाजपच्या मनात काय आहे, हे पुन्हा स्पष्ट झाले आहे. 1950 साली भाजपच्या मातृसंस्थेने संविधानाला विरोध केला होता. आजही त्यांना मनातून संविधान नको आहे. म्हणूनच ते अशी विधाने करीत आहेत. चौकट सूर्यवंशी कसा मेला? राज्यभर बॅनर लावून प्रश्न विचारणार.. सोमनाथ सुर्यवंशीला न्याय मिळणार का? असे विचारले असता, या सरकारला सोमनाथ सुर्यवंशीला न्याय द्यायचाच नाही. जे सरकार सुर्यवंशीचे निधन कसे झाले ते सांगायला तयार नाही. ते सरकार न्याय कसा देणार? आपण पहिल्या दिवसापासून हाच प्रश्न विचारत आहोत. आता आम्ही राज्यभर “सुर्यवंशी कसा मेला” असा प्रश्न विचारणारे बॅनर लाव, असेडॉ. जितेंद्र आव्हाड म्हणाले.

 पायाभूत प्रकल्पांसाठी आदिवासींचे बळी

आमदार राजेंद्र गावित यांची चौकशीची मागणी नुकसान भरपाई न देता आदिवासींना केले बेघर योगेश चांदेकर पालघरः पालघर जिल्ह्यातून जाणाऱ्या पायाभूत सुविधा प्रकल्पांसाठी या जिल्ह्यातील आदिवासी बांधव सकारात्मक आहेत; परंतु त्यांना कोणतीही नुकसान भरपाई न देता बेघर केले जाते. त्यांची घरे, जमिनी हडपल्या जातात. त्यातून एका आदिवासी महिलेने आत्महत्या केली असून, या प्रकरणाची चौकशी करावी आणि संबंधित प्रांताधिकारी आणि उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी आमदार राजेंद्र गावित यांनी आज विधानसभेत औचित्याच्या मुद्द्यावर झालेल्या चर्चेत केली. विधानसभेच्या निवडणुकीनंतर झालेल्या विधिमंडळाच्या पहिल्याच हिवाळी अधिवेशनात आ. गावित यांनी पालघर जिल्ह्यातील विविध प्रकल्पांसाठी होणारे भूसंपादन आणि त्यात आदिवासींवर होणारा अन्याय विधानसभेत मांडून विधानसभेच्या अध्यक्षांचे या प्रकरणाकडे लक्ष वेधले. प्रशासनाकडून आदिवासींचा छळ तलासरी येथील कोचाई, बोरमाळ, आणि धानीवरी या ठिकाणी भूसंपादन करताना प्रांताधिकारी आणि उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांनी कसा जाच केला, याचे पाढे आ. गावित यांनी विधानसभेत वाचले. ते म्हणाले, की पालघर जिल्ह्यातून मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन, मुंबई वडोदरा द्रुतगती महामार्ग, मुंबई दिल्ली कॉरिडॉर, मेट्रो प्रकल्प, टेक्सटाईल पार्क, वाढवण बंदर आदींसाठी भूसंपादन केले जात आहे. भूसंपादन करण्याला कोणाचाही विरोध असण्याचे कारण नाही; उलट विकासासठी या भागातील आदिवासींची भूमिका सकारात्मक आहे. नुकसान भरपाई न देताच जागांचा ताबा वर्षानुवर्षे आणि पिढ्यानपिढ्या ज्या जमिनी आदिवासी बांधव कसत आहेत आणि ज्या जागेवर ते राहत आहेत, त्या जागा दांडगाई करून प्रशासन ताब्यात घेत आहे. कोणतीही नुकसान भरपाई न देता या जमिनी प्रशासनाने ताब्यात घेतल्या असून त्यामुळे आदिवासी बेघर आणि भूमिहीन झाले आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वी प्रचंड पोलिस फौजफाटा   बरोबर घेऊन प्रांताधिकारी आणि उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांनी आदिवासी बांधवांच्या घरांवर बुलडोझर चालवले. त्यांच्या जमिनी संपादित केल्या. घरे पाडली, असे गावित यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणले. सहा वर्षे पाठपुरावा करूनही भरपाई नाही गेल्या सहा वर्षांपासून आदिवासी बांधव नुकसान भरपईसाठी डहाणू येथील उपविभागीय अधिकाऱ्यांच्या कार्यालयात चकरा मारत आहेत. पत्रव्यवहार करत आहेत; परंतु तरीही प्रशासन कोणतीच दाद द्यायला तयार नाही. या प्रकरणात पोलिस आणि प्रशासन कायदा हातात घेऊन आदिवासी बांधवांना बेघर करत त्यांना भूमिहीन करत आहेत. प्रशासन कायदा हातात घेत आहे, असे त्यांनी निदर्शनास आणले. आत्महत्येस भाग पाडल्याचा गुन्हा दाखल करा शासनाने आता या प्रकरणात दोषी असणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची आवश्यकता आहे. पोलिस आणि प्रशासनाच्या दडपशाहीला आणि दांडगाईला कंटाळून आदिवासी महिला लखमी बरफ यांनी आत्महत्या केली प्रशासनावर आदिवासी महिलेला आत्महत्या करण्यास भाग पाडल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून योग्य ती कारवाई करावी अशी मागणी पालघर विधानसभेचे आमदार राजेंद्र गावित यांनी विधिमंडळाच्या अधिवेशनात केली आहे.

२४ डिसेंबरला ४०४ महसूल गावांमध्ये ‘पेसा दिन’ – रोहन घुगे

अनिल ठाणेकर ठाणे : २४ डिसेंबरला ४०४ महसूल गावांमध्ये ‘पेसा दिन’ साजरा होणार आहे.पेसा कायद्याशी संबधित घोष वाक्य व बॅनर यांचा वापर करून पेसा कायद्याची जनजागृती करण्यात येणार असून अनुसूचित क्षेत्रांतील ग्रामस्थांनी पेसा दिनाच्या निमित्ताने कार्यक्रमात मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांनी केले आहे. केंद्र शासनाने २४ डिसेंबर, १९९६ रोजी पंचायती संबंधीचे उपबंध(अनुसूचित क्षेत्रांवर विस्तारित करणे) अधिनियम, १९९६ अर्थात पेसा कायदा पारित केला आहे. पेसा कायद्याच्या निर्मितीला दि. २४ डिसेंबर रोजी २८ वर्षे पूर्ण होत आहे, त्यानिमित्ताने पंचायती राज मंत्रालयाच्या निर्देशाने हा दिवस “पेसा दिन” म्हणून मुरबाड, भिवंडी, शहापूर तालुक्यातील महसूल गावांमध्ये साजरा करण्यात येणार आहे. पंचायती राज मंत्रालयाचे अनुसूचित क्षेत्रांमध्ये पेसा कायद्याच्या अंमलबजावणीला बळकटी देण्यासाठी विशेष प्रयत्न करत आहे. पेसा दिनाच्या निमित्ताने ग्रामसभा सदस्य, पंचायत सदस्य तसेच शासकीय अधिकारी व कर्मचारी यांची क्षमताबांधणी व्हावी व त्यांच्यामध्ये जनजागृती वाढावी तसेच त्यांचा या कायद्याच्या अंमलबजावणीतील सहभाग वाढवून, ग्रामसभांचे सक्षमीकरण आणि अनुसूचित क्षेत्रातील ग्रामपंचायतींच्या कामकाजात सुधारणा ही विशेष उद्दिष्टे साध्य करण्यासाठी पेसा दिन साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्ताने गाव/ग्रामपंचायत पातळीवर मेळावा, प्रशिक्षण, कार्यशाळा आयोजन करण्यात येणार आहे. ग्रामपंचायत अंतर्गत सर्व पेसा गावातील संबंधीत घटकांनी सहभाग नोंदवावा तसेच ग्रामसभा सदस्यांनी जास्तीतजास्त उपस्थिती रहावे, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांनी केले आहे. ठाणे जिल्ह्यातील अनुसूचित क्षेत्रातील, मुरबाड पंचायत समिती क्षेत्रातील ५५ ग्रामपंचायतींमधील १०१ महसूल गाव, भिवंडी पंचायत समिती क्षेत्रातील ४० ग्रामपंचायतींमधील ७३ महसूल गाव तर शहापूर पंचायत समिती क्षेत्रातील ११० ग्रामंपचायतींमधील २३० महसूल गाव असे एकूण ग्रामपंचायत २०५ तर महसूल गाव‌ ४०४ येथे पेसा दिन प्रभावीपणे साजरा करण्यासाठी ग्रामपंचायत विभागाच्यावतीने नियोजन करण्यात येत आहे. पेसा कायद्याचे उत्तम ज्ञान असलेल्या व शक्यतो स्थानिक बोली भाषेचे जाणकार व्यक्ती, संस्था, अधिकारी यांनी उपस्थित सर्वांना पेसा कायद्याविषयी माहिती देणार आहेत, अशी माहिती उप मुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) प्रमोद काळे यांनी दिली.जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे व उप मुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) यांनी पंचायत समिती भिवंडी,शहापूर व मुरबाड येथील गट विकास अधिकारी,  अधिनस्त विस्तार अधिकारी (पं), तालुका व्यवस्थापक(पेसा), तालुका प्रशिक्षण समन्वयक (पेसा), ग्रामपंचायत अधिकारी, ग्रामसभा मोबिलायझर व ग्रामस्तरीय कर्मचारी  इ. सर्व यंत्रणेला पेसा दिन अंमलबजावणी उत्कृष्टपणे नियोजित करण्याबाबत निर्देशित केले आहे.

Heading – संगमेश्वर येथील छत्रपती संभाजी महाराजांचे स्मारक आणि सांगलीतील कोकरूड येथील शिवाजीराव देशमुख यांच्या स्मारकासाठी निधीची मागणी

पुरवणी मागण्यावरील चर्चेदरम्यान आमदार प्रसाद लाड यांनी केली मागणी राजेंद्र साळसकर नागपूर :  रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर येथे छत्रपती संभाजी महाराज यांच्या भव्य स्मारकासाठी आणि सांगली जिल्ह्यातील कोकरूड येथे विधान परिषदेचे माजी सभापती स्व. शिवाजीराव देशमुख यांच्या स्मारकासाठी निधी देण्याबाबत पुरवणी मागण्यांवरील चर्चेदरम्यान आमदार प्रसाद लाड यांनी मागणी केली. रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील मौजे कसबा येथे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचे भव्य स्मारक बांधण्याचे प्रयोजन आहे. याच ठिकाणी मुघलांकडून धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना अटक करण्यात आली होती. या स्मारकासाठी १० कोटींचा प्राथमिक निधी वर्ग करण्यात आला होता. येथील जमीन उपलब्ध होण्यास काही तांत्रिक अडचणी होत्या, परंतु त्या आता दूर झाल्या आहेत. याठिकाणी केवळ पुतळा न उभारता स्वराज्यरक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास याठिकाणी दाखवता येईल, असे किमान १०० एक्करमध्ये स्मारक बनले पाहिजे, याकरिता ५० कोटींचा निधी द्यावा, अशी आग्रही मागणी आमदार लाड यांनी केली आहे. त्याचप्रमाणे सांगली जिल्ह्यातील कोकरूड येथे विधान परिषदेचे माजी सभापती स्व. शिवाजीराव देशमुख यांच्या स्मारकासाठी १० कोटींचा निधी देण्याची मागणी याप्रसंगी आमदार लाड यांनी केली.

नागपूर – महाराष्ट्र राज्याचे सहकार गृहनिर्माण गृह ग्रामीण खणीकर्म शालेय शिक्षण राज्यमंत्री  पंकज भोयर यांचे अभिनंदन करताना मुंबई हाउसिंग फेडरेशनचे अध्यक्ष व महाराष्ट्र राज्य गृहवित्त  महामंडळाचे संचालक प्रकाश दरेकर सोबत आमदार समीर…