Category: होम

 ‘अॅट होम’ सोहळ्यासाठी महाराष्ट्रातील चार मान्यवरांना विशेष निमंत्रण

७७ वा प्रजासत्ताक दिन ‘अॅट होम’ सोहळ्यासाठी महाराष्ट्रातील चार मान्यवरांना विशेष निमंत्रण नवी दिल्ली: भारताच्या ७७ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त राष्ट्रपती भवनात आयोजित होणाऱ्या अत्यंत प्रतिष्ठित ‘अॅट होम’ (At Home) स्वागत समारंभासाठी महाराष्ट्रातील…

 जिल्हा रुग्णालयात ‘रजोनिवृत्ती क्लिनिक’चा शुभारंभ

जिल्हा रुग्णालयात ‘रजोनिवृत्ती क्लिनिक’चा शुभारंभ डॉ.निशिकांत पाटील आणि डॉ. शीतल जोशी यांचे मार्गदर्शन अशोक गायकवाड अलिबाग: वयाची चाळीशी ओलांडल्यानंतर महिलांच्या शरीरात होणारे हार्मोनल बदल आणि रजोनिवृत्तीच्या काळात उद्भवणाऱ्या विविध शारीरिक…

इराणमधील खोमेनी यांच्या सत्तेला सुरुंग

इराणमधील खोमेनी यांच्या सत्तेला सुरुंग इराणमधील खोमेनी सरकारच्या विरोधात गेल्या पंधरा दिवसांपासून सुरू असलेला नागरिकांचा उद्रेक थांबायचे नाव घेत नाही. इराणमध्ये खोमेनी सरकारच्या विरोधात गेल्या पंधरा दिवसांपासून जनतेचे मोठे आंदोलन…

काहींच्या पोटातली हातभट्टी…

काहींच्या पोटातली हातभट्टी… आपल्या सर्वांच्या शरीरात पोट हा भाग किती महत्वाचा असतो हे वेगळे सांगायला नको. या पोटात प्रत्यक्ष अग्नीचा निवास असतो आणि तोच आपण खाल्लेले अन्न पचवून त्याची आवश्यक…

देशातील पहिला वन्यजीव सुरक्षित महामार्ग

देशातील पहिला वन्यजीव सुरक्षित महामार्ग मध्य प्रदेशमधील घनदाट नौरादेही येथील वीरांगना राणी दुर्गावती व्याघ्र प्रकल्पातून जाणारा भोपाळ-जबलपूर हा राष्ट्रीय महामार्ग 45 देशातील पहिला वन्यजीव-सुरक्षित महामार्ग ठरला आहे. या महामार्गाच्या बांधकामात…

हिंदुत्वातून जातकारणाकडे…

हिंदुत्वातून जातकारणाकडे… बऱ्याच काळापासून उत्तर प्रदेशमध्ये विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांमध्ये ब्राह्मण मतदारांनी भाजपवर दृढ विश्वास ठेवला आहे. या निवडणुकांमधील आकडेवारीनुसार भाजपला 72 ते 82 टक्के ब्राह्मण मते मिळाली आहेत. म्हणूनच…

ही पराभवानंतरच्या प्रतिक्रीयेची रंगित तालिम – देवेंद्र फडणवीस

नागपूर : मतदानावेळी वापरण्यात आलेली शाई लगेच पुसली जात असल्याच्या ठाकरे बंधूंच्या पत्रकार परिषदेवर ही तर पराभवानंतरच्या प्रतिक्रियची ते रंगित तालिम करीत असल्याची मिश्किल प्रतिक्रीया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त…

निवडणूक आयुक्तांना तात्काळ निलंबित करा : उद्धव ठाकरे 

मुंबई : मतदानाच्या दिवशीच टपाली मतपेट्या उघडल्या. ही कसली लोकशाही आहे? विरोधक रडीचा डाव खेळतायेत असं मुख्यमंत्री म्हणतात मग निवडणूक आयुक्त त्यांचे घरगडी म्हणून काम करतायेत का? लोकशाहीची थट्टा करणाऱ्या या निवडणूक आयुक्तांना तात्काळ निलंबित करा अशी मागणी ठाकरे सेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली. साम, दाम, दंड भेद याचा वापर सगळीकडे सुरू आहे. महायुतीकडे कर्तृत्व काहीच नाही त्यामुळे निवडणुकीत वाट्टेल ते करा अशी परिस्थिती झाली असल्याचा आरोपही ठाकरे यांनी यावेळी केला. पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे म्हणाले की, गणेश नाईक यांचे मतदान केंद्रच फरार झाले. ४ तास मतदान केंद्र शोधायला लागले. ही एका मंत्र्यांची अवस्था आहे. या सगळ्या गोष्टीवर इलाज नसेल तर निवडणूक आयुक्तांना तात्काळ निलंबित करून त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे. बसल्या जागी फुकटचा जनतेचा पैसा खातायेत आणि सत्ताधाऱ्यांसमोर लाचारी करतायेत. पुरुष मतदारां समोर महिलांचा फोटो आहे. मतदान केंद्रावर भाजपा उमेदवाराच्या पाट्याच दिसतायेत. हा लोकशाहीचा खून करण्याचा प्रकार आहे. वन नेशन, वन इलेक्शन त्यासाठी मोदींना हवं. एकाच वेळी सगळीकडे गोंधळ घालून काही वाटेल ते करा पण सत्ता काबीज करा अशी टीका त्यांनी केली. दरम्यान, संविधान विरोधी निवडणूक आयोग आहे. निवडणूक आयुक्तांवर कारवाई झालीच पाहिजे. निवडणूक आयोगाचा संपूर्ण स्टाफ रोज काय करत असतो त्याचा छडा लावला पाहिजे. बसल्या जागी पगार खातायेत. त्यांच्या कार्यालयात राजकीय पक्षांचे प्रतिनिधी ठेवावे लागतील. तुमचा रोजचा लेखाजोखा जनतेसमोर आणावा लागेल. कोर्टात जाऊन करणार काय, एकदा कोर्टात गेले की पुढे ४  ते ५ वर्ष सुरूच राहते. निवडणूक आयोग झोपेचे सोंग करतंय. हा प्रश्न गंभीर आहे तो गांभीर्याने घेतला पाहिजे असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलं.

मुंबईतून ठाकरेंची ‘एक्झिट’ ? एकनाथ शिंदेनी ठाणे राखले !

मुंबई : राज्यातील २९ महानगरपालिकेसाठीची मतदान प्रक्रिया संध्याकाळी साडेपाच वाजत पूर्ण होताच दुरचित्रवाहीन्यांवर एक्झिट पोलचा धमाका सुरु झाला. जवळपास सर्वच एक्झिट पोलने मुंबईतून उद्धव ठाकेरंची शिवसेना आणि राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची एक्झिट दाखवली असून मुंबईत…