ठाकरेंनी लालबाग-परळचा किल्ला अभेद्य राखला
मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकीत भाजपा आणि एकनाथ शिंदेंची शिवसेना विजयाकडे घोडदौड करीत असताना लालबाग परळने ठाकरे बंधूंना हात दिला. लालबाग-परळच्या बालेकिल्ल्यात ठाकरे बंधूंचाच भगवा फडकल्याचं पाहायला मिळाले. गिरणगावचा गड ठाकरे बंधूंनी राखला. गिरण गावातील सातपैकी सहा जागांवर ठाकरे बंधूंचा विजय झाला, तर एका जागेवर समाजवादी पक्षाचा विजय झाला. श्रद्धा जाधव, पेडणेकर, किरण तावडे यांच्यासह ठाकरे बंधूंच्या युतीच्या सहा उमेदवारांनी विजय मिळवला. मुंबई शिवसेनेची आणि शिवसेना मुंबईची ही बाळासाहेब ठाकरेंची टॅगलाईन असायची. यात उद्धव ठाकरेंनी…
