Category: होम

शिंदेंच्या सेनेतील नाराजी दूर

पुणे : राज्यातील मंत्रिमंडळ विस्तारानंतर महायुतीच्या तिन्ही पक्षात नाराजी पसरली होती. त्यापैकी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील नाराज आमदारांची नाराजी दुर करण्यात शिंदे यशस्वी ठरले.  मंत्रिमंडळ विस्तारात आपणास संधी मिळेल अशी आशा असतानाही अनेकांना…

कारागृहातून बाहेर पडल्यावर उद्योजकता विकास प्रशिक्षणाचा बंद्याना फायदा – किशन जावळे

अशोक गायकवाड रायगड : उद्योजकता विकास प्रशिक्षणाच्या माध्यमातून बंद्यांना चांगले वायरमन निर्माण होण्याची संधी मिळणार आहे. या उपक्रमातून रोजगार खुले करता येणार आहे. कारागृहातून बाहेर पडल्यावर समाजात वावरत असताना या…

मुजोर अखिलेश शुक्लाला बेड़्या ठोकल्या !

मराठी माणूस भडकला,शुक्लाचा माज उतरवला नोकरीतून बडतर्फ संपत्तीचीही चौकशी कल्याण : मराठी माणसाच्या स्वाभिमानावर घाला घालणाऱ्या मुजोर अमराठी अखिलेश शुक्लाचा माज अखेर महाराष्ट्राने उतरवला. मराठी माणूस भडकल्यावर काय होते याची चुणूक…

अरबी समुद्रात पाणी असेपर्यंत गोदी कामगारांना पेन्शन मिळत राहील – ॲड. एस. के शेट्ट्ये

ठाणे: भारतातील प्रमुख बंदरांमध्ये पूर्वी तीन लाख गोदी कामगार होते. आता वीस हजार कामगार राहिले आहेत. मुंबई बंदरात पूर्वी चाळीस हजार कामगार होते, आता फक्त तीन हजार गोदी कामगार राहिले…

धरणासाठी जमिनी दिलेल्या माजी सैनिकांची शासनाकडून फसवणूक?

डाॅ. जितेंद्र आव्हाडांनीही दिले मुख्यमंत्र्यांना पत्र येत्या प्रजासत्ताक दिनी आजी – माजी सैनिकांनी दिला जलसमाधीचा इशारा   अनिल ठाणेकर ठाणे : रत्नागिरी जिल्ह्याच्या खेडच्या मौजे शिवतर या गावात लघुपाटबंधारे योजने…

युपीएससीच्या मुख्य परीक्षेत यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांसाठी सी. डी. देशमुख प्रशासकीय प्रशिक्षण संस्थेत होणार प्रतिरुप मुलाखती

ठाणे : ठाणे महानगरपालिका संचालित चिंतामणराव देशमुख प्रशासकीय प्रशिक्षण संस्थेच्या वतीने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या सन २०२४ मधील मुख्य परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी जानेवारी २०२५ मध्ये दोन दिवसीय ‘प्रतिरूप मुलाखत (MOCK-INTERVIEW)’…

सलमान खान पहिल्या खो खो वर्ल्ड कपचा ब्रँड अॅम्बेसेडर

नवी दिल्ली : भारतीय मातीतील खो-खो आता कात टाकून पुढे जात आहे. खो खो फेडरेशन ऑफ इंडिया (KKFI) ने पहिला वर्ल्ड कप १३ ते १९ जानेवारी या कालावधीत नवी दिल्ली…

२९ डिसेंबरला प्रल्हाद नलावडे स्मृती मोफत शालेय कॅरम स्पर्धा

मुंबई : आयडियल स्पोर्ट्स अकॅडमीतर्फे कॅरमप्रेमी स्व. प्रल्हाद नलावडे यांच्या चतुर्थ स्मृतीदिनानिमित्त १५ वर्षाखालील शालेय मुलांमुलींची विनाशुल्क एकेरी कॅरम स्पर्धा २९ डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आली आहे. को-ऑप. बँक एम्प्लॉईज…

शहापूर तालुक्यातील नडगाव येथे शेतकरी मेळावा संपन्न

ठाणे : 12 डिसेंबर 2024 रोजी अग्रणी बँक, बँक ऑफ महाराष्ट्र, ठाणे, मार्डेफ ट्रस्ट, पुणे व आर्थिक साक्षरता केंद्र, ठाणे यांच्यावतीने मौजे नडगाव ग्रामपंचायत, नडगाव, तालुका शहापूर, जिल्हा ठाणे येथील…

 “पन्नाशीतील ग्रंथाली”चा बहारदार कार्यक्रम संपन्न

वैष्णो व्हिजन संस्थेच्या वतीने आयोजित ठाणे : मराठी साहित्य विश्वातील लोकप्रिय “ग्रंथाली”या संस्थेला 25 डिसेंबर 2024 रोजी पन्नास वर्षे पूर्ण होत आहे. त्यानिमित्ताने वैष्णो व्हिजन संस्थेच्या वतीने गुरुवार, 19 डिसेंबर रोजी मराठी ग्रंथ संग्रहालय, ठाणे (प.) येथे “पन्नाशीतील ग्रंथाली”या विशेष गप्पा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे अध्यक्ष पंचांगकर्ते, खगोलशास्त्र अभ्यासक श्री.दा.कृ. सोमण हे होते. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे एस.एम.सी. इन्फ्रास्टक्चर संचालक श्री.सुहास मेहता तर विशेष निमंत्रित म्हणून मराठी भाषा विभाग संस्था, महाराष्ट्र राज्य आणि महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोष निर्मिती मंडळाचे संचालक डॉ.शामकांत देवरे, ठाणे जिल्हा माहिती अधिकारी श्री.मनोज शिवाजी सानप, माहिती संचालनालयाचे माजी संचालक देवेंद्र भुजबळ हे उपस्थित होते. या कार्यक्रमात माजी राज्यसभा सदस्य तथा ज्येष्ठ पत्रकार, संपादक श्री.कुमार केतकर, ज्येष्ठ पत्रकार, संपादक श्री.दिनकर गांगल, ग्रंथालीचे संपादक श्री.अरुण जोशी, ग्रंथाली संस्थेच्या विश्वस्त डॉ.लतिका भानुशाली व डॉ.मृण्मयी भजक यांनी ग्रंथाली संस्थेच्या पन्नास वर्षांच्या वाटचाल आणि विविध टप्प्यांवरील अनुभव उपस्थितांसमोर कथन केले. त्याचप्रमाणे मराठी भाषा आणि मराठी संस्कृती टिकविण्यासाठी ग्रंथालीसारख्या संस्थांच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांना मोठ्या प्रमाणात प्रतिसाद द्यावा, असे आवाहनही केले. या कार्यक्रमात मुलाखतकार म्हणून मराठी साहित्य संस्कृती मंडळाचे सदस्य आणि मुंबई दूरदर्शनचे माजी सहाय्यक संचालक माध्यम सल्लागार जयु भाटकर यांनी मान्यवरांना गप्पांमध्ये गुंफले. यावेळी कुमार केतकर म्हणाले की, ग्रंथालीने तळागळातल्या प्रतिभावंत लेखकांना एक मुक्त व्यासपीठ उपलब्ध करून दिले. साहित्य क्षेत्रासाठी हे अत्यंत महत्वपूर्ण योगदान आहे. दिनकर गांगल म्हणाले की, ग्रंथालीने पुस्तक प्रकाशनाबरोबर अनेक सामाजिक व सांस्कृतिक चळवळी राबविल्या आणि त्यातून मराठी वाचकांचे, रसिकांचे विधायक प्रबोधन झाले. याप्रसंगी जिल्हा माहिती अधिकारी मनोज शिवाजी सानप यांनी ग्रंथालीच्या समाजातील योगदानाबद्दल त्यांचे अभिनंदन करून ग्रंथाली व वैष्णो व्हिजन संस्थेच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तसेच आजच्या पिढीमध्ये वाचन संस्कृती रुजविण्यासाठी सुरु असलेल्या प्रयत्नांमध्ये जिल्हा माहिती कार्यालयही सक्रीय सहभाग घेईल, असे आश्वासीत केले. या कार्यक्रमाच्या निमित्ताने ठाण्यातील साहित्यिक अनंत देशमुख, अशोक बागवे, अनुपमा उजगरे, चांगदेव काळे आणि डॉ.निर्मोही फडके या साहित्यिकांचा प्रातिनिधीक स्वरूपात सत्कारही करण्यात आला. वैष्णो व्हिजन संस्थेच्या संस्थापक व कार्यकारी निर्माती पद्मा भाटकर यांनी प्रास्ताविकपर भाषणात ग्रंथालीच्या पन्नास वर्षातील कारकिर्दीचा गौरवपर उल्लेख केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.अस्मिता पांडे यांनी केले. 00000