Category: होम

पर्यटकांसाठी सुलभ शौचालय ताबडतोब सुरू करावीत

पर्यटकांसाठी सुलभ शौचालय ताबडतोब सुरू करावीत पर्यटकांची मागणी मुकुंद रांजाणे माथेरान: केवळ पर्यटनावर अवलंबून असणाऱ्या इथल्या सर्वच व्यावसायिक, दुकानदार, हॉटेल इंडस्ट्री,लॉज धारक, सर्वसामान्य स्टॉल वाले, हमाल,मजूर, रिक्षावाले, घोडेवाले या सर्वांचा…

ठामपा निवडणुकीत ३२ प्रभागांमध्ये चार तर एका प्रभागात तीन उमेदवारांना मतदान केल्यावरच प्रक्रिया पूर्ण – सौरभ राव

ठामपा निवडणुकीत ३२ प्रभागांमध्ये चार तर एका प्रभागात तीन उमेदवारांना मतदान केल्यावरच प्रक्रिया पूर्ण – सौरभ राव अनिल ठाणेकर ठाणे- ठाणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६साठी ठाणे महापालिका क्षेत्रातील एकूण ३३ प्रभागांमध्ये विभाजन…

कवी नारायण सुर्वेच्या कवितेवर आधारित रिल स्पर्धा

कवी नारायण सुर्वेच्या कवितेवर आधारित रिल स्पर्धा कल्याण:  पु.ल. कट्टा कल्याण ही साहित्य, सांस्कृतिक, कला क्षेत्रात काम करणारी संस्था असून सदर संस्थेच्या वतीने विविध साहित्यिक सांस्कृतिक उपक्रम राबविण्यात येत असतात.…

 दोन हातभट्टी दारूचे अड्डे उद्ध्वस्त, ४४ हजाराचा मुद्देमाल हस्तगत

किन्हवलीत पोलीसांची यशस्वी कारवाई दोन हातभट्टी दारूचे अड्डे उद्ध्वस्त, ४४ हजाराचा मुद्देमाल हस्तगत अविनाश उबाळे ठाणे : शहापूर तालुक्यातील किन्हवली पोलीस ठाणे अंतर्गत असणाऱ्या खरपत गाव हद्दीतील शाही नदी किनारी…

औंध – बोपोडी परिसराच्या विकासाला गती देणार- सनी विनायक निम्हण

औंध – बोपोडी परिसराच्या विकासाला गती देणार- सनी विनायक निम्हण पुणे: महापालिकेच्या माध्यमातून नागरिकांचे जगणे सुलभ आणि वेगवान करणाऱ्या प्रकल्पांवर भर देणार असल्याचा निर्वाळा भारतीय जनता पक्ष –रिपब्लिकन पक्ष (आठवले)…

रोजगारासाठी आलात, रोजगार करा, राजकारण करून आमच्या डोक्यावर बसू नका – गोवर्धन देशमुख

रोजगारासाठी आलात, रोजगार करा, राजकारण करून आमच्या डोक्यावर बसू नका – गोवर्धन देशमुख अरविंद जोशी मिरा – भाईंदर: मराठी एकीकरण समितीने आज आपला निवडणुकीसाठीचा वचननामा प्रसिद्ध केला. काही दिवसांवर आलेल्या…

मुरबाड तालुक्यातील तंटामुक्त गाव कमिट्या बाद

मुरबाड तालुक्यातील तंटामुक्त गाव कमिट्या बाद अवैध धंद्यांना गुन्हेगारी घालते साद. राजीव चंदने मुरबाड: गावातील वाद गावातच मिटला जावा आणि गाव शांततेकडुन समृद्धीकडे कसा जाईल यासाठी शासनाने तंटामुक्त गाव मोहीम…

एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत माजी आमदार दगडू सकपाळ यांचा शिवसेनेत प्रवेश

एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत माजी आमदार दगडू सकपाळ यांचा शिवसेनेत प्रवेश ठाणे: उबाठाचे ज्येष्ठ नेते माजी आमदार दगडू सकपाळ यांनी शेकडो समर्थकांसह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला.…

तामिळनाडूतील पेरियार विद्यापिठाच्या कुलपतींकडून ऐरोली येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर ज्ञानस्मारकाची प्रशंसा नवी मुंबई : महानगरपालिकेचे ऐरोली येथील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर ज्ञानस्मारक हे बाबासाहेबांच्या प्रेरणादायी विचारांना व्यापक अवकाश उपलब्ध करुन देणारे स्मारक म्हणून देशा-परदेशातील नामवंतांकडून तसेच नागरिकांकडून नावाजले जात आहे. स्मारकाला दररोज मोठया संख्येने नागरिक व पर्यटक भेट देत असतात. तामिळनाडू येथील पेरियार मणियम्मई विज्ञान आणि तंत्रज्ञान संस्थेचे (अभिमत विद्यापीठ) कुलपती डॉ. के. वीरमणी यांनी स्मारकाला भेट देत येथील वैविध्यपूर्ण दालनांचे, त्याच्या मांडणीचे व त्यामध्ये जपलेल्या कलात्मकतेचे मनापासून कौतुक केले. स्मारकातील समृध्द ग्रंथालय हा अभ्यासकांसाठी माहिती व ज्ञानाचा खजिना असून येथील दुर्मीळ छायाचित्र संग्रहालयातील बाबासाहेबांचे जीवन चरित्र पाहून भारावून गेलो असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. महत्वाचे म्हणजे हे स्मारक अत्यंत विचारपूर्वक डिझाईन केलेले, सुव्यवस्थित आकर्षक मांडणी असलेले आणि शैक्षणिकदृष्ट्या प्रभावी असल्याचे असल्याचे ते म्हणाले. त्यांनी असेही निरीक्षण नोंदविले की, हे स्मारक डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवन, घटनात्मक दृष्टी आणि सामाजिक न्यायाचा संदेश प्रत्येक माणसापर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचे महत्वाचे काम करते तसेच वर्तमानातील व भावी पिढ्यांना संवेदनशील बनविण्यात महत्त्वाची भूमिका बजावतांना दिसते. या भेटीदरम्यान कुलपती डॉ. के. वीरमणी यांनी स्मारकाविषयीच्या भावना आणि सदिच्छा अंत:करणापासून असल्याचे सांगत यामधून आयुक्तांची दूरदृष्टी आणि समतेची मूल्ये जपण्याची वचनबद्धता दिसून येते असे मत व्यक्त केले. त्यांनी स्मारकासोबत संयुक्त उपक्रम आणि कार्यक्रमांद्वारे शैक्षणिक आणि विद्यापीठीय सहकार्य वाढवण्याची इच्छाही व्यक्त केली.