Category: होम

भारत-बांगलादेशमधील तणावाचा सामान्यांना फटका

भारत आणि बांगलादेश यांच्यातील संबंधांमधील दुरावा आता वाढू लागला आहे. एकीकडे बांगलादेशच्या अंतरिम सरकारने आधीच मंजूर केलेला बँडविड्थ ट्रान्झिट करार रद्द केला. दुसरीकडे, बटाटे आणि कांद्याच्या आयातीसाठी हा देश भारताव्यतिरिक्त…

पत्नी पीडित पुरुषांना संरक्षण मिळावे!

बंगळुरू मध्ये एका कंपनीत अभियंता असलेल्या ३४ वर्षीय अतुल सुभाष या तरुणाने पत्नीच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी या तरुणाने आपल्यावरील आपबिती ९० मिनिटांचा व्हिडिओ काढून तसेच ४० पाणी…

एकाच व्यक्तीने किती काळ पदावर रहावे यासाठी कायदा व्हावा

प्रचंड रेंगाळलेला महाराष्ट्र मंत्रिमंडळाचा विस्तार अखेर रविवारी संपन्न झाला. तिन्ही पक्षांचे मिळून एकूण३९ मंत्र्यांनी शपथ घेतली आहे. त्यात ३३ कॅबिनेट मंत्री आणि ६ राज्यमंत्री असा समावेश आहे. एकूण आता राज्यकारभाराला…

विशेष मुलांच्या कलाविष्काराने साजरा झाला ‘जागतिक दिव्यांग दिन’

ठाणे :  व्यंगत्वावर मात करीत कलागुण सादर करणाऱ्या विशेष मुलांना आत्मनिर्भर बनविण्यासाठी निश्चितपणे महापालिका त्यांच्या पाठीशी उभी राहिल  संवेदनशील अशी ही विशेष मुले असून त्यांना विविध खेळांमध्ये सहभागी करुन घेण्याच्या दृष्टीनेही महापालिका प्रयत्न करेल असे नमूद करीत महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी सर्व विशेष मुलांना, त्यांच्या पालकांना जागतिक दिव्यांग  दिनाच्या शुभेच्छा दिल्या. जागतिक दिव्यांग दिन हा सर्वत्र 3 डिसेंबर रोजी साजरा करण्यात आला, या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिकेने आज (17 डिसेंबर) डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृह येथे साजरा करण्यात आले. यावेळी  अतिरिक्त आयुक्त 2 प्रशांत रोडे, उपायुक्त उमेश बिरारी, जी.जी. गोदेपुरे, अनघा कदम, कार्मिक अधिकारी दयानंद गुंडप, जिद्द शाळेच्या मुख्याध्यापिका अर्चना शेटये, दिव्यांग कला केंद्राचे  ‍किरण नाक्ती यांच्यासह  दिव्यांग मुलांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या निमित्ताने आदित्य प्रतिष्ठान ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दिव्यांग कला केंद्र ठाणे प्रस्तुत अरेरे ते अरेव्वा..” या विशेष मुलांचा कलाविष्कार रसिकांना पाहावयास मिळाला. यावेळी आयुक्त सौरभ राव यांनी विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या कार्यक्रमाचे कौतुक केले. दिव्यांग मुलांनी सादर केलेले नृत्य, गाणी यावर रसिकांनीही एकच ठेका धरला. ‘गणेश वंदना, सत्यम शिवम् सुंदरम, डिपाडी डिपांग.., वाजले की बारा.. अभंग, कोळीगीते’ यासह विविध गाणी दिव्यांग कला केंद्राच्या विशेष मुलांनी सादर केले. या कार्यक्रमास वेळी दृष्टिहीन वादकांनी गाण्यांना साथ संगत केली.  मुलांनी सादर केलेल्या नृत्याविष्काराला रसिकांनी चांगलीच दाद दिली. तसेच दृष्टिहीन गायक गायिकांनी अवीट गोडीची गाणी सुरेल आवाजात गात रसिकांना मंत्रमुग्ध केले. यावेळी ठाणे महापालिकेचे  अतिरिक्त आयुक्त 2 प्रशांत रोडे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. विशेष मुलांमधील कलागुणांना वाव देण्यासाठी महापालिकेच्या माध्यमातून दरवर्षी या कार्यक्रमाचे आयोजन  केले जाते. दिव्यांगाना  मुख्य प्रवाहात आणणे हा या मागील हेतू असून यासाठी महापालिका सतत प्रयत्नशील असल्याचे त्यांनी प्रास्ताविकपर भाषणात नमूद केले.  संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचलन राजेंद्र पाटणकर यांनी केले.

वाल्मिकी नगरात महाभंडाऱ्याचे आयोजन

माथेरान : माथेरान मधील युवा रुखी गुजराती समाजाच्या वतीने श्री अंबे मातेच्या पूजेनिमित्ताने मंगळवार दि.१७ रोजी येथील वाल्मिकी नगरात वाल्मिकी बांधवांकडून महाभंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले यावेळी भाविकांनी अंबे मातेचे दर्शन घेऊन महाभंडाऱ्याचा लाभ घेतला. अत्यंत प्रसन्न वातावरणात वाल्मिकी बांधवांनी येणाऱ्या भाविकांची उत्तम प्रकारे सोय करून उपस्थित मान्यवरांचे शाल आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.याप्रसंगी माजी नगरसेवक शिवाजी शिंदे, नरेश परदेशी, निखिल शिंदे, प्रकाश सुतार,प्रमोद नायक, मुकुंद रांजणे, जनार्दन पार्टे आदी उपस्थित होते. युवा रुखी गुजराती समाजाचे अध्यक्ष गौरंग वाघेला त्याचप्रमाणे अंबालाल वाघेला, दीपक पुरबिया,रुपचंद वाघेला, छगन पुरबिया, राजेश वाघेला,कांती पुरबिया, माजी नगरसेवक संतोष लखन,नरेश पुरबिया यांसह अन्य समाज बांधवांनी हा छोटेखानी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष मेहनत घेतली. 0000

ठाण्यात उड्डाणपूलाखाली बेकायदा वाहनतळासह टपऱ्या

ठाणे : सुरक्षेच्या दृष्टिने उड्डाणपूलाखाली वाहनतळ किंवा वाहने उभी करण्यास बंदी असतानाही ठाणे शहरातील कापूरबावडी, माजिवडा, मीनाताई ठाकरे चौक येथील उड्डाणपूलाखाली वाहनतळ, बेकायदा टपऱ्या, रिक्षा थांबा थाटण्यात आल्याचा प्रकार उघडकीस…

घुसखोर बांगलादेशींचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर

ठाणे : भिवंडी येथील रेडलाईट एरिया म्हणून प्रचलित असलेल्या हनुमान टेकडी परिसरातून ठाणे गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्ष आणि भिवंडी पोलिसांनी कारवाई करून सहा घुसखोर बांगलादेशी महिलांना नुकतीच…

ठाण्यात टिएमटीचे कंत्राटी चालक अघोषित संपावर

 नागरिकांचे हाल   ठाणे : ठाणे महापालिकेच्या परिवहन सेवेतील सुमारे ५५० कंत्राटी चालक मंगळवारी सकाळी अघोषित संपावर गेले आहेत. ठेकेदारामार्फत वाढीव वेतन मिळालेले नाही. त्यामुळे हा संप पुकारल्याचे कंत्राटी कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. या संपामुळे बस थांब्यावर प्रवाशांची गर्दी झाली आहे. वाहतूक कोंडी त्यातच, टिएमटी चालकांचा संप या दोन्ही प्रकारामुळे नागरिकांचे हाल झाले. ठाणे महापालिका क्षेत्रात टिएमटीच्या माध्यमातून महापालिका सार्वजनिक वाहतुकीचा पर्याय उपलब्ध करून देते. टिएमटीच्या ताफ्यात ४७४ बसगाड्या असल्या तरी यातील सुमारे ५० बसगाड्या विविध कारणांमुळे प्रवासी वाहतुकीसाठी उपलब्ध होत नाही. यातील २२५ बसगाड्या खासगी ठेकेदारामार्फत चालविल्या जातात. या बसगाड्या घोडबंदर येथील आनंद नगर आगारातून सुटतात. ठाण्यातील लोकसंख्येच्या तुलनेत टिएमटी बसगाड्यांची सुविधा पुरेशी नाही. त्यामुळे दररोज सकाळी आणि रात्रीच्या वेळेत या बसगाड्यांमध्ये प्रवाशांची गर्दी असते. मंगळवारी सकाळी टिएमटीचे चालक अघोषित संपावर गेले. ठेकेदारने नियमानुसार वेतन वाढविले नसल्याने हा संप पुकारण्यात आल्याचे कंत्राटी कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. या संपाचा परिणाम नागरिकांना सहन करावा लागत आहे. टिएमटीच्या बसथांब्यांवर प्रवाशांची गर्दी झाली आहे. त्यातच मुंबई नाशिक महामार्गावर वाहतूक कोंडी झाल्याने टिएमटीच्या इतर बसगाड्या प्रवाशांना वेळेत उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे नागरिकांचे हाल झाले आहेत. प्रशासनाकडून हा संप मिटविण्याबाबत मार्ग काढला जात असल्याची माहिती टिएमटीच्या अधिकाऱ्यांनी दिली. प्रशासनाने वाढीव वेतनाबाबत लिखित द्यावे. त्यानंतर लगेचच संप मागे घेतला जाईल असे कंत्राटी कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. 00000

 ह्रदयरोग व मधुमेहाबाबत आगरी महोत्सवात जनजागृती

डॉ. प्रवीण घाडीगावकर यांनी केले मार्गदर्शन   डोंबिवली : डोंबिवलीत हजारो नागरिकांची गर्दी झालेल्या अखिल भारतीय आगरी महोत्सवात सामाजिक, सांस्कृतिक आणि प्रबोधनात्मक कार्यक्रमांबरोबरच उत्तम आरोग्यासाठी ह्रदयरोग व मधुमेहाबाबतही जनजागृती करण्यात आली. माधवबाग क्लिनिकचे डॉ. प्रवीण घाडीगावकर यांनी तारुण्यातही ह्रदयरोगाचा धोका वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना जीवनशैलीत बदल करण्याचे आवाहन केले. आगरी युथ फोरमतर्फे डोंबिवलीतील संत सावळाराम म्हात्रे क्रीडा संकुलात सुरू असलेल्या आगरी महोत्सवातील सातव्या दिवशी डॉ. प्रवीण घाडीगावकर यांचे व्याख्यान आयोजित केले होते. आगरी युथ फोरमचे अध्यक्ष गुलाब वझे यांनी स्वागत केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शरद पाटील यांनी केले. बदलत्या जीवनशैलीमुळे सध्या ह्रदयरोग व मधुमेहाचा धोका वाढला आहे. एखादी व्यक्ती फिट दिसत असतानाही, त्याला अचानक ह्रदयरोगाचे निदान होते. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने काळजी घेण्याची गरज आहे. ह्रदयाच्या कार्यात अडथळा आणण्यासाठी मोठे शत्रू हे वजन, वाढलेला रक्तदाब आणि साखर आहेत. ते नियंत्रणात न आल्यास पुढील चार ते पाच वर्षात ह्रदयाचा त्रास होऊ शकतो.त्यामुळे आजारी पडण्याआधीच ह्रदयरोग व मधुमेह होऊ नये, यासाठी काळजी घ्यावी, असे आवाहन डॉ. घाडीगावकर यांनी केले. दररोज दोन किलोमीटर अंतर अर्ध्या तासात चालल्यानंतर तुम्हाला धाप लागल्यास ह्रदयाची तपासणी आवश्यक आहे, असे प्रतिपादन डॉ. घाडीगावकर यांनी केले. ह्रदयविकाराचा ह्रदयाकडून सिग्नल दिला जातो. तो ओळखून वेळीच उपचार करावेत. चालताना लागलेली धाप, छातीत वेदना आणि पायावरील सूज येत असल्यास तुमच्या ह्रदयातील ताकद कमी झाल्याची दाट शक्यता आहे. अशा परिस्थितीत ह्रदयविकाराचा धक्का बसल्यास जीवावर बेतू शकते, ते ध्यानात घेऊन प्रत्येक व्यक्तीने काळजी घ्यावी. दररोज चालण्याबरोबरच आहारात बदल करावेत. वजन वाढणार नाही, असा आहार घ्यावा. मीठ, साखर, मैदा व तेलाचे प्रमाण कमी करावे. आपल्या जीवनशैलीत बदल केल्यास ह्रदयरोग व मधुमेहाला दूर ठेवता येईल, असे आवाहन डॉ. घाडीगावकर यांनी केले. भारत ही मधुमेहाची राजधानी झाली आहे. शत्रू राष्ट्राने हल्ला करण्यापेक्षा भविष्यात मधुमेहामुळे नागरिकांना अनेक व्याधींचा सामना करावा लागेल, अशी भीती डॉ. घाडीगावकर यांनी व्यक्त केली. या महोत्सवासाठी आगरी युथ फोरमच्या पदाधिकाऱ्यांसोबत दिलीप देसले, संतोष संते, गुरुनाथ म्हात्रे, कांता पाटील, अशोक पाटील, सदा म्हात्रे, नारायण म्हात्रे, जयेंद्र पाटील यांच्याकडून मेहनत घेतली जात आहे. 000

 अपंगांच्या डब्यात धडधाकड प्रवाशांची घुसखोरी

तीन वर्षांत नऊ हजारहून अधिकजणांवर कारवाई   ठाणे : मध्य रेल्वे मार्गावरील उपनगरीय प्रवासात मागील काही वर्षांपासून अपंगांच्या डब्यात प्रवास करण्याचे प्रकार वाढले आहेत. मागील तीन वर्षांत ठाणे रेल्वे स्थानकातून नऊ हजार ३६२ प्रवाशांवर रेल्वे सुरक्षा दलाने कारवाई केली आहे. सर्वाधिक कारवाई या वर्षी म्हणजेच १ जानेवारी ते १३ डिसेंबर या कालावधीत झाली असून या प्रवाशांची संख्या तीन हजार ८७० इतकी आहे. असे असले तरी कारवाई होत असतानाही अपंगांच्या डब्यातील प्रवास कमी होत नसल्याचे चित्र आहे. ठाणे रेल्वे स्थानकातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अपंगांना सुरक्षित प्रवास करता यावा यासाठी उपनगरीय रेल्वेगाड्यांमध्ये अपंगांना डबा आरक्षित केलेला असतो. परंतु या डब्यांमध्ये धडधाकड प्रवाशांची घुसखोरी वाढली आहे. रात्री आणि सकाळच्या वेळेत प्रवास करताना नोकरदारांची लोकलमध्ये गर्दी होत असते. ही गर्दी टाळण्यासाठी अपंग नसलेले प्रवासी थेट अपंग डब्यांमध्ये प्रवेश करून प्रवास करतात. अनेकदा हे प्रवासी त्यांच्या आसनाचाही ताबा घेत असतात. त्यामुळे अपंग प्रवासी हैराण झाले आहेत. मागील तीन वर्षांत म्हणजेच, २०२२ ते २०२४ या कालावधीत नऊ हजार ३६२ प्रवाशांवर कारवाई करण्यात आली. या प्रवाशांवर कारवाई केल्यानंतर त्यांना न्यायालयात हजर करण्यात येते. त्यानंतर न्यायालय ठरवेल त्या प्रमाणे त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली जाते. ठाणे रेल्वे स्थानकामध्ये २०२२ या वर्षात २ हजार ५१५ प्रवाशांवर कारवाई झाली. तर २०२३ या वर्षी २ हजार ९७७ प्रवाशांवर कारवाई झाली आहे. सर्वाधिक कारवाई २०२४ या वर्षामध्ये झाली आहे. १ जानेवारी ते १३ डिसेंबर २०२४ या कालवधीत ३ हजार ८७० प्रवाशांवर कारवाई झाली आहे. यावर्षी १ जानेवारी ते ३० जून या कालावधीत २ हजार ६१ प्रवाशांवर कारवाई झाली. तर १ जुलै ते १३ डिसेंबर या कालावधीत १ हजार ८०९ प्रवाशांवर कारवाई झाली आहे. कोट प्रवाशांनी अपंगांच्या डब्यात प्रवेश करून प्रवास करू नये. अन्यथा त्यांच्यावर कायद्यानुसार कारवाई केली जाईल. अपंगांच्या डब्यात घुसखोरी रोखण्यासाठी आम्ही अभियानही सुरू केले आहे. – सुरेंद्र कुमार कोस्टा, निरीक्षक, रेल्वे सुरक्षा दल, ठाणे स्थानक. ०००००