Category: होम

‘आप‌’ची कसोटी

दिल्ली विधानसभेची निवडणूक अपेक्षेप्रमाणे जाहीर झाली. गेल्या 27 वर्षांपासून दिल्लीत सत्ता मिळवण्याची आस असलेला भाजप, गेल्या एका तपापासून सातत्याने जनाधार गमावत असलेली काँग्रेस आणि मोदी लाटेतही सत्ता टिकवून ठेवण्यात यशस्वी…

तिळगुळ घ्या… गोड गोड बोला…..!!

भारतीय संस्कृतीत सणांना अतिशय महत्व आहे. प्रत्येक सण विशिष्ट असा संदेश देत असतो. या सणातून एक वेगळीच प्रेरणा मिळत असते. मकर संक्रात हा त्यापैकीच एक सण. मकर संक्रात हा वर्षातील…

कॅथ लॅब: हृदयविकाराच्या रुग्णांना संजीवनी

वयोवृद्धांपासून ते तरुणांपर्यंत हृदयविकाराने मृत्यू होण्याच्या घटनांवर तोडगा म्हणून महाराष्ट्राच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने विविध जिल्हा रुग्णालयांमध्ये कॅथेटेरायझेशनच्या 19 कॅथ लॅब सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. ही प्रक्रिया हृदयाशी संबंधित समस्या…

विरोधी पक्षमुक्त महाराष्ट्राचे लक्ष्य

  भारतीय जनता पक्षाने गेल्या दहा वर्षांत वारंवार काँग्रेसमुक्त भारताची संकल्पना बोलून दाखवली आहे. काँग्रेसमुक्त भारतानंतर आता विरोधी पक्षमुक्त भारताची संकल्पना बोलून दाखवली जात आहे. लोकशाही राष्ट्रात सत्ताधारी पक्ष जेवढा…

सीपीएमचे गुजरात राज्य अधिवेशन उपलेटा येथे उत्साहात संपन्न

अनिल ठाणेकर ठाणे : ११ व १२ जानेवारीला राजकोट जिल्ह्यातील उपलेटा शहरात कॉम्रेड सीताराम येचुरी नगर येथे सीपीआय(एम) चे २४वे गुजरात राज्य अधिवेशन आयोजित करण्यात आले होते. त्या अधिवेशनात १० जिल्ह्यांतील १९२ प्रतिनिधी उपस्थित होते. त्यापैकी ५६ महिला प्रतिनिधी होत्या. तसेच तरुणांचाही मोठा सहभाग होता. अधिवेशनाची सुरुवात मगनभाई जिवानी यांच्या हस्ते ध्वजारोहण करून झाली. शहीदांना पुष्पांजली अर्पण करून शोक प्रस्ताव घेण्यात आला. यांनतर उद्घाटन सत्राचे अध्यक्षपद माजी राज्य सचिव प्रागजीभाई भांभी यांनी भूषवले. स्वागत समितीच्या अध्यक्षा किरणबेन कालावाडिया यांनी सर्वांचे स्वागत केले. अधिवेशनाचे उद्घाटन डॉ. अशोक ढवळे यांनी केले. त्यांनी आंतरराष्ट्रीय क्षेत्रात साम्राज्यवाद व झायोनिझमचा आणि राष्ट्रीय क्षेत्रात नव-फॅसिस्ट आरएसएस-भाजपचा धोका स्पष्ट केला. यावेळी सर्व धर्मनिरपेक्ष शक्तींच्या एकतेची गरज त्यांनी अधोरेखित केली तसेच सीपीआय(एम) ची स्वतंत्र ताकद आणि प्रभाव वेगाने वाढवण्याची निकड देखील विषद केली.अधिवेशनात अहवाल दोन भाग्गत सादर करण्यात आला आणि दोन भागात त्यावर चर्चा झाली. राज्य सचिव एच.आय.भट्ट यांनी राजकीय भाग मांडला आणि केंद्रीय समिती सदस्य अरुण मेहता यांनी संघटनात्मक भाग मांडला. पहिल्या भागावर २४ प्रतिनिधींची भाषणे झाली आणि दुसऱ्या भागावर १७ प्रतिनिधींची भाषणे झाली. अहवाल एकमताने मंजूर झाला, तसेच प्रमुख मुद्द्यांवर १२ ठरावही करण्यात आले. पहिल्या दिवशी उपलेटा टाऊन हॉलमध्ये “शेतकऱ्यांच्या समस्या आणि त्यांचे निराकरण” या विषयावर चर्चासत्र आयोजित करण्यात आले. डॉ. अशोक ढवळे, मुरलीधरन आणि दयाभाई गजेरा यांची भाषणे झाली. अधिवेशनात माजी राज्य सचिव सुबोध मेहता यांनी लिहिलेल्या “कम्युनिस्ट विचारसरणी” या गुजराती पुस्तिकेची नवीन आवृत्ती प्रकाशित करण्यात आली. उदय जोशी यांनी क्रेडेन्शियल अहवाल सादर केला. या अधिवेशनाने एकमताने ३० सदस्यांची नवीन राज्य समिती आणि कायमस्वरूपी निमंत्रितांची एकमताने निवड केली. नवीन राज्य समितीने एकमताने एच. आय. भट्ट यांची राज्य सचिवपदी फेरनिवड केली आणि ९ सदस्यांचे राज्य सचिवमंडळ निवडले. मदुराई पक्ष काँग्रेससाठी ६ प्रतिनिधी, २ पर्यायी प्रतिनिधी आणि २ निरीक्षकांची निवड केली. मुरलीधरन यांनी समारोपाचे भाषण केले, ज्यामध्ये त्यांनी संघटनेशी संबंधित प्रमुख मुद्द्यांवर भर दिला. उपलेटा तहसील आणि राजकोट जिल्हा संचाने परिषदेसाठी उत्कृष्ट व्यवस्था केली होती. आयोजक आणि स्वयंसेवकांचे आभार मानल्यानंतर, मोठ्या उत्साहात अधिवेशनाची सांगता झाली.

५वी अजित घोष स्मृती महिला टी-२० क्रिकेट भामाच्या प्रिती अय्यरचे नाबाद शतक

यजमान स्पोर्टिंग युनियन, भामा सी.सी. विजयी मुंबई : सलामीच्या प्रिती अय्यरचे फटकेबाज शतक आणि तिने आयुषी इंदुलकर (२६) आणि अंजू सिंग (नाबाद ६७) यांच्यासह केलेल्या अनुक्रमे १०० आणि ११५ धावांच्या भागिदाऱ्या यामुळे भामा क्रिकेट क्लबला ५व्या अजित घोष स्मृती महिला टी-२० क्रिकेट स्पर्धेमध्ये जे भाटिय़ा क्रिकेट क्लबवर १३२ धावांनी मोठा विजय प्राप्त करता आला. स्पोर्टिंग युनियन क्लब आणि कल्याणदास मेमोरियल स्पोर्ट्स फौंडेशन यांनी आयोजित केलेल्या या स्पर्धेच्या अन्य एका साखळी लढतीमध्ये यजमान स्पोर्टिंग युनियनने देखील ५ विकेटसनी महाराष्ट्र यंगला पराभूत केले. त्यांच्या या विजयामध्ये सलामीच्या प्रांजल मयेकर (५५) हिची महत्वपूर्ण भूमिका होती. प्रितीच्या झंझावाता पुढे हतबल झालेल्या जे. भाटिया संघाला प्रतिस्पर्ध्यांच्या एक बाद २१५ या प्रचंड धावसंख्येला केवळ ९ बाद ८३ असे प्रतिउत्तर देता आले. प्रितीने ७२ चेंडूमध्ये नाबाद ११५ धावांच्या खेळीमध्ये १७ चौकार आणि ३ षटकार होते. अंजू सिंगने भाटियाच्या जखमांवर मीठ चोळताना केवळ २९ चेंडूत ६७ धावा फटकावताना ६ चौकार आणि ५ षटकारांची बरसात केली. अंजूने अष्टपैलू खेळाचे प्रदर्शन करताना १२ धावात २ बळीही देखील घेतले. कर्णधार सानया जोशी नाबाद ५२ हिच्या खेळीमुळे महाराष्ट्र यंगला ७ बाद १२१ अशी माफक धावसंख्या रचता आली. स्पोर्टिंगला ध्रुवी पटेल (३०) प्रांजल यांनी ८६ धावांची सलामी दिली. पण त्यानंतर १०५ धावांवर दुसरी विकेट गमावण्या पाठोपाठ त्यांनी आणखी तीन विकेट गमावत काहीश्या तणावाखाली आपले लक्ष १८व्या षटकात पार केले. आज माटुंगा जिमखाना येथे मुंबई क्रिकेटचे मानद सचिव अभय हड़प यांनी स्पर्धेचे उद्घाटन केले. यावेळी अविसा आणि “एसजी”चे विजय कुमार यांची प्रमुख उपस्थिती लाभली. संक्षिप्त धावफलक महाराष्ट्र यंग २० षटकात ७ बाद १२१ धावा (जयनी शाह २३, सानया जोशी नाबाद ५२, गगना मुल्का १५ धावात ३ बळी, तन्वी चव्हाण २० धावात २ बळी) पराभूत विरुद्ध स्पोर्टिंग युनियन १७.५ षटकात १२२ धावा (ध्रुवी पटेल ३०, प्रांजल मयेकर ५५, अनन्या अय्यर २८ धावात २ बळी, जैनी शाह १९ धावात २ बळी) सर्वोत्तम प्रांजल मयेकर भामा सी. सी. २० षटकात १ बाद २१५ धावा (प्रीती अय्यर नाबाद ११५, आयुषी इंदुलकर २६, अंजू सिंग नाबाद ६७) विजयी विरुद्ध जे. भाटिया सी. सी. २० षटकात ९ बाद ८३ (इशा शाह २१, सौम्या पान्डे २३ धावात २ बळी, अंजू सिंग १२ धावात २ बळी, चांदनी कनुजिया १० धावात ३ बळी) सामन्यात सर्वोत्तम प्रिती अय्यर. 00000

ठाण्याच्या युनायटेड क्रिकेट क्लब असोसिएशनने विजेतेपद राखले

मुंबई : ठाण्याच्या युनायटेड क्रिकेट क्लब असोसिएशनने स्पोर्ट्स फिल्डचे ११८ धावांचे आव्हान तब्बल ६ गडी आणि १७ चेंडू राखून पराभव करत कुर्ला स्पोर्ट्स क्लब आयोजित ६६ व्या बाळकृष्ण बापट स्मृती…

वक्फ कायदा संविधानाच्या चौकटीत बसत नाही – ॲड. पारिजात पांडे

अनिल ठाणेकर ठाणे : वक्फ कायद्याकडे धार्मिक कायदा म्हणुन बघण्याचे काही कारण नाही. यात मुख्य न्याय तत्वाचे (प्रिन्सिपल ऑफ जस्टीस) पालन होत नाही, या दृष्टीने या कायद्याकडे बघितले तर वक्फ कायदा संविधानाच्या चौकटीत बसत नाही. त्यामुळे या कायद्यात बदल आवश्यक आहेत. असे परखड मत बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवाचे ॲड. पारिजात पांडे यांनी व्यक्त केले. तरीही, धार्मिक आधारावर उन्माद निर्माण करण्याचा जो प्रयत्न सुरू आहे, तो चुकीचा असल्याचे निरिक्षणही त्यांनी नोंदवले. ठाण्यात सुरु असलेल्या ३९ व्या कै. रामभाऊ म्हाळगी व्याख्यानमालेत ‘कायदा वक्फ बोर्डाचा’ हे पाचवे पुष्प ॲड. पारिजात पांडे यांनी गुंफले. यावेळी व्याख्यानमाला समितीचे अध्यक्ष आमदार संजय केळकर, या सत्राचे अध्यक्ष ठाणे जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. प्रशांत कदम, माजी उपमहापौर सुभाष काळे उपस्थित होते. १९९५ साली काँग्रेस सरकारने व्यापक अधिकार दिलेल्या वक्फ कायद्यावर लख्ख प्रकाश टाकून ॲड. पांडे यांनी, वक्फ बोर्डाच्या मर्यादांना कात्री लावण्यासाठी विद्यमान केंद्र सरकारकडून केल्या जाणाऱ्या प्रस्तावित ४० दुरुस्त्यांचा मुद्देसूद आढावा घेतला. ही धार्मिक लढाई निश्चित नाही. हा वक्फ कायदा संविधानाच्या चौकटीत बसतो की नाही, याची ही लढाई आहे. ११३ कलमे असलेला हा वक्फ कायदा सर्वसामान्यांना आपला वाटत नाही. तरीही धार्मिक आधारावर जो उन्माद निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे, तो चुकीचा असल्याचे स्पष्ट केले. या कायद्याकडे धार्मिक कायदा म्हणुन बघण्याचे काही कारण नाही. हा कायदा संविधानाच्या चौकटीत बसतो की नाही, हा कायदा सर्वसामान्य व्यक्तीला आपले म्हणणे मांडण्याचा अधिकार देतो की नाही, यात प्रिन्सिपल ऑफ जस्टीस फॉलो होत नाही, या दृष्टीने या कायद्याकडे बघितले तर संविधानाच्या चौकटीत वक्फ कायदा बसत नाही. त्यामुळे या कायद्यात बदल आवश्यक आहेत. आणि हे प्रस्तावित बदल बोर्डाच्या कामकाजात पारदर्शकता आणण्यासाठी सुचविलेले असून एकप्रकारे बोर्डाच्या कामाची गती वाढवण्यासाठी बदल आवश्यकच असल्याचे ॲड. पांडे यांनी नमुद केले. चौकट केंद्रात सुदैवाने बदल करण्याची मानसिकता असलेले सरकार विराजमान आहे. असा उल्लेख करीत ॲड. पांडे यांनी एकप्रकारे मोदी सरकारची स्तुती करून, या सरकारने वक्फ कायद्याचे नाव ‘एकत्रित वक्फ व्यवस्थापन, सक्षमीकरण, कार्यक्षमता आणि विकास कायदा’ (युनिफाईड वफ्फ मॅनेजमेंट इन्पॉवरमेंट इफिशिएन्सी डेव्हलपमेंट ॲक्ट) असे केले. तसेच १४ ऑगस्ट १९४७ नंतर पाकिस्तान वा बांग्लादेश येथे गेलेल्याच्या इथल्या जागा वक्फच्या नावे होत्या. ही तरतुदच आता प्रस्तावित कायद्यात बदलण्यात आली आहे. त्यामुळे भविष्यात हात ठेवाल ते वक्फचे हे चालणार नाही. याकडे ॲड. पांडे यांनी लक्ष वेधले. केंद्र सरकारने वक्फ कायद्यातील मर्यादेच्या तरतुदी रद्द करण्यासाठी सादर केलेल्या दुरुस्ती विधेयकाविरोधात सध्या जो फेक नॅरेटीव्हचा प्रकार सुरु आहे तो समाजामध्ये संभ्रम निर्माण करण्यासाठी आहे. असे स्पष्ट करून ॲड.पांडे यांनी, त्यांचे बालेकिल्ले १०० टक्के ढासळणार असुन बालेकिल्यावरून त्यांचे निशाणही उतरणार आहे. असा सूचक इशारा दिला. तसेच आपणही समाज म्हणुन एक जबाबदारी निश्चितपणे पार पाडण्याची वेळ आली असल्याचे प्रेरीत करताना त्यांनी रामायणातील घटनेचा दाखला दिला.

१६ वर्षाखालील गटात लोबो फेरडीनने मारली बाजी

चेस मास्टर्स बुद्धिबळ स्पर्धा   मुंबई : ओढ हिरवळी आणि माझगाव येथील सर एली कदुरी शाळेतर्फ विविध वयोगटासाठी चेस मास्टर्स बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यात १६ वर्षाखालील वयोगटात लोबो फेरडीनने ४.५…