नवी मुंबई सानपाडा येथे मराठा समाजाचा वधू वर मेळावा संपन्न
नवी मुंबई : नवी मुंबई सानपाडा येथे मराठा विकास प्रतिष्ठानच्या वतीने ११ जानेवारी रोजी केमिस्ट भवन येथे १५ वा मराठा समाजाचा वधु- वर परिचय मेळावा संपन्न झाला, अशी माहिती मराठा…
नवी मुंबई : नवी मुंबई सानपाडा येथे मराठा विकास प्रतिष्ठानच्या वतीने ११ जानेवारी रोजी केमिस्ट भवन येथे १५ वा मराठा समाजाचा वधु- वर परिचय मेळावा संपन्न झाला, अशी माहिती मराठा…
अशोक गायकवाड अलिबाग : पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे व अपर पोलीस अधीक्षक अभिजित शिवथरे यांच्या नेतृत्वाखाली महाड एमआयडीसी पोलीस ठाणे येथे पाच पुरुष व एक महिला या बांगलादेशी नागरिकांना ताब्यात घेऊन या बांगलादेशी नागरिकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रायगड जिल्हा हद्दीमध्ये गेले दोन दिवसापासून रायगड जिल्ह्यात राहणाऱ्या बांगलादेशी नागरिकांचा शोध घेण्यासाठी मोहीम राबविण्यात येत होती. त्याअनुषंगाने १२ जानेवारीला महाड एमआयडीसी पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली कि, मौजे पिंपळदरी मोरांडे वाडी ता. महाड येथे काही बांगलादेशी कामगार त्यांचे अस्तित्व लपवून अवैधरीत्या घुसखोरी करून वैध कागदपत्रांशिवाय वास्तव्य करीत आहे. त्या अनुषंगाने महाड एमआयडीसी पोलिसांनी तपास पथक तयार करून मौजे पिंपळदरी मोरांडे वाडी येथे चंद्रकांत शिंदे याचे घरात छापा टाकला असता त्यामध्ये महाड एमआयडीसी पोलिसांना अवैधरीत्या वास्तव्यास असलेले ०६ बांगलादेशी नागरिक मिळून आले. त्यांना मौजे पिंपळदरी मोरांडे वाडी ता. महाड येथून ताब्यात घेण्यात आले. सदर बांगलादेशी नागरिकांना पी.डी.आय.पी.एल या बांधकाम कंपनीने कामावर ठेवल्याचे निष्पन्न झाले आहे. सदर बांगलादेशी नागरीकांकडे पोलिसांनी बांगलादेशातून भारतात येण्याकरिता वैध प्रवासी कागदपत्राची मागणी केली असता त्या इसमांनी आमच्या कडे कोणतेही वैध कागदपत्रे नाहीत. आम्ही बांगलादेशातील गरिबी व उपासमारीस कंटाळून रोजगाराकरिता सीमेवरील गस्ती पथकाची नजर चुकवून भारतात प्रवेश केलेला आहे. अशी माहिती दिल्याने सदर इसमांनविरुद्ध महाड एमआयडीसी पोलीस ठाणे येथे गु.र.नं. ०६/२०२५ कलम ३ (१) (अ ) परकीय नागरिक आदेश १९४८, विदेशी व्यक्ती अधिनियम १९४६ चे कलम १४, पारपत्र (भारतात प्रवेश) १९५० चे कलम ३ (अ ) ६(अ ) प्रमाणे बांगलादेशी नागरिकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास महाड एमआयडीसी पोलीस करीत आहे. १) माणिक तुफेझेल विशष वय ३२ वर्ष धंदा सेंट्रिंग चे काम सध्या रा. पिंपळदरी ता. महाड जि. रायगड, मूळ रा. सुबोधपुर बडतळा बाजार, पो. ठाणे दश्शोना, जि. चौंडगा जोषारे खुलना, देश -बांगलादेश, २) नूर इस्माल बिस वास उर्फ सिकंदर रोने मानेरूलखान वय ३० वर्ष सध्या रा. वरंध ता. महाड जि. रायगड मूळ रा. बासग्रॅम, पोलीस ठाणे कालिया, विभाग खुलना जि. नोडाई, देश बांगलादेश, ३) सागर मिराज शेख वय ३० वर्ष रा. पिंपळदरी ता.महाड जि. रायगड मूळ रा.उत्तर शिंगे, पोलीस ठाणा नोडल, जि. नोडल विभाग खुलना, देश बांगलादेश, ४) शांतु शकुरअली शेख वय-१९ वर्ष सध्या रा. पिंपळदरी ता. महाड जि. रायगड, मूळ रा. पुरुलिया, पोलीस ठाणा कालिया, जि. नाडाई विभाग खुलना, देश- बांगलादेश., ५) शिलीम हामशेर परामणी वय-४० वर्ष, सध्या राहणार पिंपळदरी तालुका महाड जिल्हा रायगड, मूळ रा अब्दुलपुर ठाणा-लालपुर जिल्हा नाटोर विभाग रासई देश बांगलादेश असे पाच पुरुष व एक महिलेस ताब्यात घेण्यात आले आहे. सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर पोलीस अधीक्षक अभिजित शिवथरे, उपविभागीय पोलीस अधिकारी माणगाव विभाग पुष्पराज सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली महाड एमआयडीसी प्रभारी सपोनि/जीवन माने व पोसई/संजय मुंडे, पोसई/समेळ सुर्वे. सफौ/हनुमंत पवार, सफौ/दीपक ढेपे, पोह/राजेश गोरेगावकर, पोह/चनप्पा अंबरगे, पोह/सिद्धेश मोरे, पोना/राजेश माने, पोना/सतीश बोटे,पोना/गणेश भैलुमे,पोशी/सुनील पाटील, पोशी/सुनीलकांजर, पोशी/शीतल, बंडगर, पोशी/निखीलबळे, पोशी/अमोल कुंभार, पोशी/शुभम पवार, पोशी/सुजील गोंधळी, पोशी/सागर गुलींग, पोशी/विजय दळवे मपोशी/ तेजश्री भोईर, यांनी गुन्हयाचे तपासात उत्कृष्ट कामगिरी केली आहे.
ठाणे : भव्य दिव्य असा `वैश्य मेळावा, लक्ष्य 2025′ हा 600 पेक्षा जास्त समाजबांधवांच्या उपस्थितीत उत्साहात आणि आनंदात संपन्न झाला. अनेक मान्यवर पाहुण्यांनी उपस्थिती लावून मार्गदर्शन केले. मेळाव्याला प्रमुख पाहुणे म्हणून माजी मंत्री व विद्यमान आमदार दिपक केसरकर, खासदार नरेश म्हस्के तसेच प्रसिद्ध उद्योगपती विवेक माणगांवकर, भाई कामेरकर, हनुमंत हेडे, अरुंधती भालेराव, कीर्ती गावडे, भाई शेटये, अशोक नर, संस्थेचे अध्यक्ष डॉ. संतोष कामेरकर, दिपक मेजारी, रुपाली तेलवणे, संजय भाट, विष्णु सातवसे, मनोज आंग्रे, चंद्रकांत खाडये आदी मान्यवर उपस्थित होते. खासदार नरेश म्हस्के आणि माजी मंत्री विद्यमान आमदार दिपक केसरकर यांच्या हस्ते सर्व समाज संस्था आणि प्रतिष्ठित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. वैश्य उद्योजक समाज बांधवांसाठी वैश्य ग्लोबल चॅरिटेबल ट्रस्ट चांगले कार्य करीत आहे, त्याला आमचे सर्वतोपरी सहकार्य असेल. वैश्य समाजाच्या कार्याची तोंड भरून स्तुती केली आणि कोणत्याही प्रकारचे सहकार्य लागल्यास आम्ही सोबत असू असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. संस्थेचे अध्यक्ष डॉ. संतोष कामेरकर यांनी समाज संपन्न, समृद्ध झाला तर देश संपन्न होईल असे सांगून मान्यवरांना पुरस्कार देताना पुरस्कारामुळे प्रेरणा मिळते आणि प्रेरणेने राष्ट्र मोठे होते असे सांगितले. सकाळी 8 ते रात्री 7 पर्यंत मेळाव्याचे प्रत्येक सत्र अतिशय नीटनेटके आणि व्यवस्थित होत गेले. अनेकांचे मार्गदर्शन प्रेरणादायी ठरणारे होते. विविध सांस्कृतिक कार्यक्रम, मोटिवेशनल स्पीच आणि मार्गदर्शन खूपच सुंदर झाले. संपूर्ण हॉल सकाळपासून शेवटपर्यंत भरगच्च भरलेला होता, यावरूनच या कार्यक्रमाची यशस्विता सांगता येते.…
उद्योग व मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांची ग्वाही ठाणे : मराठीत उत्तमोत्तम पुस्तके प्रकाशित व्हावीत यासाठी प्रकाशकांना राजाश्रय मिळायला हवा. तसेच पुस्तकांच्या प्रसारासाठी ग्रंथालयांना सक्षम करण्याची गरज आहे. खासगी उद्योग-व्यवसायांकडून देण्यात येणारा सीएसआर निधी ग्रंथालयांच्या संवर्धनासाठी वापरला जायला हवा. त्यादृष्टीने आम्ही प्रयत्नशील आहोत, असे प्रतिपादन राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी केले. ज्येष्ठ लेखक व राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे उपाध्यक्ष प्रा. डॉ. प्रदीप ढवळ लिखित ‘संन्यस्त ज्वालामुखी’ या चरित्रकादंबरीचे प्रकाशन रविवारी मंत्री उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले. त्यावेळी ते बोलत होते. कोकण मराठी साहित्य परिषद, शारदा एज्युकेशन सोसायटी आणि शारदा प्रकाशन यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी ठाण्यातील डॉ. काशीनाथ घाणेकर नाट्यगृह येथे प्रा. डॉ. प्रदीप ढवळ लिखित ‘संन्यस्त ज्वालामुखी’ या स्वामी विवेकानंद यांच्यावरील चरित्रकादंबरीचा प्रकाशन सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी मंत्री उदय सामंत, मंत्री प्रताप सरनाईक, राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे, विश्वकोश निर्मिती मंडळाचे अध्यक्ष डॉ. रवींद्र शोभणे, ज्येष्ठ नाटककार अशोक समेळ, लेखक-कवी प्रा. अशोक बागवे, प्रा. प्रवीण दवणे, किशोर कदम (सौमित्र), कोकण मराठी साहित्य परिषदेच्या अध्यक्ष नमिता कीर, शारदा एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष विलास ठुसे, शारदा प्रकाशनाचे प्रा. संतोष राणे यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवरांच्या उपस्थितीत ‘संन्यस्त ज्वालामुखी’चे प्रकाशन करण्यात आले. यावेळी मनोगत व्यक्त करताना मंत्री उदय सामंत म्हणाले की, ‘वाचाल तर वाचाल’ असे ट्रकच्या मागे लिहून बिंबवण्याची वेळ आपल्यावर आली आहे. ही परिस्थिती सुधारायची असेल तर प्रत्येक जिल्ह्यात चांगले लेखक आणि वक्ते तयार व्हायला हवेत. हिंदुत्व काय आहे हे जगाला ठासून सांगणारे स्वामी विवेकानंद यांचे विचार आजच्या पिढीला सांगायला हवेत. ‘संन्यस्त ज्वालामुखी’ ही कादंबरी त्यादृष्टीने राज्यातील सर्व ग्रंथालयांमध्ये पोहोचायला हवी, अशी भावना मंत्री उदय सामंत यांनी याप्रसंगी व्यक्त केली. यावेळी राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे म्हणाले की, महाराष्ट्राने स्वामी विवेकानंदांवर नेहमीच प्रेम केले आहे. लोकमान्य टिळकांपासून वि. रा. करंदीकरांपर्यंत अनेकांनी स्वामी विवेकानंदांच्या विचारांची ओळख मराठी समाजाला करून दिली आहे. त्या परंपरेतील स्वामी विवेकानंदांच्या विचारांचे महाराष्ट्रातील आजचे पाईक प्रा. डॉ. प्रदीप ढवळ हे आहेत, अशा शब्दांत डॉ. सदानंद मोरे यांनी चरित्रलेखक प्रा. डॉ. ढवळ यांचा गौरव केला. तर विश्वकोश निर्मिती मंडळाचे अध्यक्ष डॉ. रवींद्र शोभणे मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, धर्म आणि राजसत्ता यांचे द्वंद्व भारतीय समाजात पूर्वापार आहे. हिंदू धर्म नेमका काय आहे, हे सांगणे अतिशय गुंतागुंतीचे आहे. मात्र हिंदू धर्माच्या शोधात स्वामी विवेकानंद यांनी सांगितलेले तत्त्वज्ञान भारतातील डाव्या-उजव्या अशा सर्वच विचारसरणींना स्वीकारार्ह वाटते, यातच त्यांचे मोठेपण आहे. त्यामुळे आजच्या पिढीला विवेकानंदांचे विचारच तारू शकतात, अशी भावना डॉ. शोभणे यांनी यावेळी व्यक्त केली. याप्रसंगी कवी-गीतकार प्रा. प्रवीण दवणे यांनीदेखील स्वामी विवेकानंदांच्या विचाराची आजच्या पिढीला ओळख करून देण्याची गरज व्यक्त केली. याबाबत बोलताना प्रा. दवणे म्हणाले की, आज समाजाच्या सर्वच क्षेत्रांत भेसळ झाली आहे. विचार, संस्कार, संस्कृती, नीती यांचा विसर पडत चालल्याची परिस्थिती आहे. अशा काळात स्वामी विवेकानंद यांचे विचार ‘संन्यस्त ज्वालामुखी’ या कादंबरीच्या माध्यमातून आजच्या पिढीपुढे आणण्याचे काम झाले आहे, असे प्रतिपादन प्रा. दवणे यांनी केले. तर कवी-गीतकार व अभिनेते किशोर कदम (सौमित्र) याप्रसंगी म्हणाले की, भारतीय समाजातील अनेक महनीय व्यक्तींच्या जीवनविचाराला आध्यात्मिकतेची किनार आहे. याचे कारण त्यांनी संपूर्ण देश पिंजून काqढला, आपला संपूर्ण समाज जाणून घेतला. त्यातूनच त्यांनी आध्यात्मिक विचारांचा संदेश आपल्याला दिला आहे. स्वामी विवेकानंद यांनी देखील आपापला धर्म, स्व-धर्म शोधण्याची प्रेरणा जगाला दिली आहे, असे प्रतिपादन किशोर कदम यांनी केले. यावेळी ज्येष्ठ नाटककार अशोक समेळ, कवी प्रा. अशोक बागवे आणि मंत्री प्रताप सरनाईक यांनीदेखील मनोगत व्यक्त करून ‘संन्यस्त ज्वालामुखी’ या चरित्रकादंबरीचे महत्त्व अधोरेखित केले. प्रकाशनसोहळ्याचे प्रास्ताविक शारदा एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष विलास ठुसे यांनी केले, तर प्रा. संतोष राणे यांनी प्रकाशक म्हणून भूमिका मांडली. कार्यक्रमाचा समारोप गायिका फाल्गुनी नातु यांच्या भैरवी गायनाने झाली, तर प्रकाशन सोहळ्याचे सूत्रसंचालन डॉ. अरुंधती भालेराव यांनी केले.
कल्याणमध्ये वकील संघटनांच्या वतीने कल्याण : बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा गजानन चव्हाण यांच्या प्रयत्नातून कल्याण येथे दिवाणी वकील संघटना, कल्याण जिल्हा न्यायालय वकील संघटना कल्याण, उल्हासनगर वकील संघटना, मुरबाड…
कल्याण : मकरसंक्रातीनिमित्त बाजारात पतंग आणि मांजा विक्रीची झुंबड आहे. शासनाने हा आनंद घेत असताना नायलॉन मांजा, चिनी, प्लास्टिक कृत्रिम मांजा यांचा वापर पतंग उडविण्यासाठी करू नये असे आदेश दिले…
हरिभाऊ लाखे नाशिक : सप्तशृंगी गड विकास आराखडा योजनेतून चार महिन्यांपासून सुरू असलेले सप्तशृंगी गड- नांदुरी घाट मार्गातील कड्याकडील बाजूस दरड प्रतिबंधक जाळी लावण्याचे काम पूर्ण झाल्याने रस्ता वाहतुकीसाठी पूर्ववत करण्यात आला आहे. सप्तशृंगी गडावर जाण्यासाठी नांदुरीपासून १० किलोमीटर घाटरस्ता आहे. या घाट रस्त्यावर दरड कोसळणे, मोठे दगड पडून रस्ता बंद होण्याचे प्रकार बरेचदा झाले आहेत. काही भाविकांच्या वाहनांचे नुकसानही त्यामुळे झाले आहे. गडावर दररोज भाविकांची संख्या वाढतच असल्याने सावधगिरी म्हणून सप्तशृंगी देवी विश्वस्त मंडळ आणि ग्रामपंचायतीने घाट रस्त्याच्या कडेला दरड प्रतिबंधक जाळी (रॉकफॉल प्रोटेक्शन) लावून रस्ता सुरक्षित करण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा केला होता. या अनुषंगाने शासनाने सप्तशृंगी गड विकास आराखडा योजनेत या कामासाठी ३३ कोटी रुपये मंजूर केले होते. या कामाला २३ सप्टेंबर रोजी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिपत्याखाली सुरूवात झाली होती. यानंतर नवरात्रौत्सव, दिवाळी, नाताळ, नविन वर्ष दरम्यान काम बंद ठेवण्यात आले होते. सकाळी सहा ते ११.३० या वेळेत रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात येत होता. यामुळे सप्तशृंगी गडावर भाविकांची संख्या मोठ्या प्रमाणात कमी झाली होती. आता काम पूर्ण झाल्याने वाहतूक पूर्ववत झाली आहे. संपूर्ण घाट रस्त्याची पाहणी करण्यात आल्यानंतर डोंगरावरील सैल दगड काढून टाकण्यात आले. डोंगराच्या मध्यापासून रस्त्याच्या काठापर्यंत दरड प्रतिबंधक लोखंडी जाळ्या बसविण्यात आल्या. जेणेकरून पावसाळ्यात, उन्हाळ्यात सैल झालेले दगड खाली आल्यास ते जाळीमध्ये अडकतील किंवा रस्त्याच्या कडेला पडतील. कुठलीही जीवित वा वित्तहानी होणार नाही. यामुळे भाविकांचा प्रवास सुरक्षित होईल, असे सार्वजनिक बांधकाम विभागाने म्हटले आहे.
ठाणे : राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या निर्देशानुसार व याँनच्या विशेष निधितून खासदार नरेश म्हस्के, आमदार रविन्द्र फाटक यांच्या मार्गदर्शनाने कोपरीतील प्रभाग क्रमांक २० मधील लकी व्यायामशाळेच्या नूतनीकरणाच्या कामाचा नुकताच…
डॉ. निर्मोही फडके यांच्या व्याख्यानाने होणार उद्घाटन ठाणे : राज्यभरात १४ जानेवारी ते २८ जानेवारी, २०२५ हा मराठी भाषा संवर्धन पंधरवडा म्हणून साजरा केला जात आहे. त्यानिमित्ताने ठाणे महानगरपालिकेतही विविध उपक्रम आणि कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचे उद्घाटन मंगळवार, १४ जानेवारी रोजी सकाळी १०.३० वाजता कै. नरेंद्र बल्लाळ सभागृह येथे होणार आहे. त्यानंतर, महापालिका अधिकारी आणि कर्मचारी यांच्यासाठी डॉ. निर्मोही फडके यांचे ‘जगू मराठीचे रंगी’ या विषयावर व्याख्यान होणार आहे. पंधरवड्यात होणाऱ्या विविध कार्यक्रमांची माहिती अतिरिक्त आयुक्त (१) संदीप माळवी यांनी सोमवारी, कै. नरेंद्र बल्लाळ हॉल येथे झालेल्या पत्रकार परिषदेत दिली. त्यावेळी, अतिरिक्त आयुक्त (२) प्रशांत रोडे, उपायुक्त (माहिती व जनसंपर्क) उमेश बिरारी उपस्थित होते. ग्रंथदिंडी व पुस्तक प्रदर्शन या पंधरवड्यात, सोमवार, २० जानेवारी रोजी स. १०.३० ते स. ११.३० या वेळेत महापालिका भवन ते परमार्थ निकेतन ते ज्ञानराज सभागृह ते महापालिका भवन अशी ग्रंथ दिंडी काढण्यात येणार आहे. त्यानंतर, प्राच्य विद्या संस्थेच्या सहकार्याने कै. नरेंद्र बल्लाळ सभागृह येथे जुन्या आणि नवीन पुस्तकांचे प्रदर्शन भरविण्यात आलेल्या प्रदर्शनाचे उद्घाटन होईल. त्याचवेळी, सभागृहात सुलेखनकार अच्युत पालव यांचे सुलेखन पाहण्याची संधी मिळेल. पुस्तक प्रदर्शनात जुन्या पुस्तकांसह कोश, रामायण, महाभारत यांचे खंड पाहता येतील. तसेच, पुस्तक विक्रीचे स्टॉलही यावेळी ठेवण्यात येणार आहेत. हे प्रदर्शन नागरिकांना पाहण्यासाठी सोमवार, २० आणि मंगळवार २१ रोजी स. १० ते सायं. ६ वाजेपर्यंत खुले राहील. महापालिका अधिकारी व कर्मचारी यांच्या स्पर्धा बुधवार, २२ जानेवारी रोजी महापालिका अधिकारी आणि कर्मचारी यांच्यासाठी निबंध, सुलेखन (हस्ताक्षर), शुद्धलेखन आणि वक्तृत्व स्पर्धा आयोजित केली जाणार आहे. या पंधरवड्याच्या काळात, शिक्षण विभागातर्फेही शालेय स्तरावर विविध स्पर्धा, ग्रंथ प्रदर्शन यांचे आयोजन करण्यात येणार आहे प्रा. प्रवीण दवणे यांचे व्याख्यान आणि समारोप मंगळवार, २८ जानेवारी रोजी पंधरवड्याचा समारोप आणि पारितोषिक वितरण समारंभ केै. नरेंद्र बल्लाळ सभागृहात होईल. त्यात, महापालिका अधिकारी, कर्मचारी यांच्यासह शालेय स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट विद्यार्थ्यांना पारितोषिेके देण्यात येतील. त्यानंतर, ज्येष्ठ साहित्यिक प्रा. प्रवीण दवणे यांचे मराठी भाषेचे अभिजात सौंदर्य या विषयावर व्याख्यान होईल. हे व्याख्यान सर्व नागरिकांसाठीही खुले आहे.
दोन कोटींच्या विकासकामांचा शुभारंभ कल्याण : ऑल इंडिया केमिस्ट ॲण्ड ड्रगिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष, माजी आमदार जगन्नाथ उर्फ आप्पा शिंदे यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त २ कोटी रुपयांच्या विकास कामांचा शुभारंभ व लोकार्पण कल्याण पूर्व विजयनगर परिसरात करण्यात आले. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये गेले तीन वर्षे प्रशासकीय राजवट सुरू असून नगरसेवकांना जनतेच्या कामाची पूर्तता करण्यासाठी पुरेसा निधी मिळत नसल्याने, शिवसेना नगरसेविका माधुरी प्रशांत, शिवसेना संपर्कप्रमुख, निरीक्षक कल्याण पूर्व विधानसभा क्षेत्र प्रमुख प्रशांत काळे यांनी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, कल्याण लोकसभा खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या निदर्शनात परिस्थिती आणून जनतेच्या विकास कामासाठी 2 कोटी निधी उपलब्ध करून आणला. त्यातील बहुतांशी कामे पूर्ण होऊन त्याचे रविवारी स्थानिक कार्यकर्ते यांच्या हस्ते प्रशांत काळे आणि माधुरी काळे यांच्या उपस्थितीत लोकार्पण करण्यात आले. पोहच रस्ता, पेव्हर ब्लॉक, सिमेंट काँक्रीट रस्ते, पाणी योजना अश्या अनेक केलेल्या कामांचे लोकार्पण करण्यात आले. याबाबत प्रशांत काळे यांनी पत्रकारांशी संवाद साधून तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचे आभार मानून, आपल्या पाठीशी उभे राहणारे नागरिक यांच्यासाठी आपण सदैव विकास कामांसाठी बांधील असल्याचे सांगितले. यावेळेस शिवसेनेचे विभाग प्रमुख सत्यवान खेडेकर, संतोष साळवी, अनंत आंब्रे, विभाग संघटक प्रशांत मांजरेकर, दिलीप कोल्हे, विशाल विरा, विभाग समन्वयक महेंद एटमे, उपविभाग प्रमुख संभाजी माने, भगवान सोंडकर, शाखाप्रमुख विशाल वाघमारे, प्रदीप तांबे, उपशाखाप्रमुख विकास गुरव, अतुल वाघमारे, सुरेंद्र मोरे, प्रमोद लाड, अमर मलाह, नंदकिशोर सुरकुतवार, राजाराम पठारे, साहेबराव आहिरे आणि मोठ्या संख्येने महिला आघाडी पदाधिकारी, शिवसैनिक उपस्थित होते. 00000