आजची युवा पिढी व सद्यस्थिती
जगातील सर्वात तरुण जन देश जर कोणता असेल तर तो आपला भारत देश आहे. आज आपल्या देशाची लोकसंख्या १४४ कोटी इतकी आहे. आपल्या देशाच्या एकूण लोकसंख्येपैकी ६० टक्के लोकसंख्या ही…
जगातील सर्वात तरुण जन देश जर कोणता असेल तर तो आपला भारत देश आहे. आज आपल्या देशाची लोकसंख्या १४४ कोटी इतकी आहे. आपल्या देशाच्या एकूण लोकसंख्येपैकी ६० टक्के लोकसंख्या ही…
भाविकांची हुल्लडबाजी आणि बालाजी मंदिर प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे बुधवारी झालेल्या चेंगराचेंगरीत तिरुमल्ला येथे सहा भाविकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. प्रत्येक शहरांमध्ये प्रति बालाजी मंदिरे असताना इतक्या गर्दीच्यावेळी जाऊन जीव धोक्यात घालण्याची…
महाविकास आघाडीच्या नव्या सरकारची स्थापना सरत्या वर्षी 5 डिसेंबरला झाली. सरकारचा शपथविधी झाला आणि 17 डिसेंबरला सरकारमध्ये मंत्री मंडळातील सर्व 42 जागा एकाच फटक्यात भरल्या गेल्या. त्या मंत्र्यांना खाते वाटप…
नवी मुंबई : नियमित स्वच्छता करण्यासोबतच ज्या रस्त्यांवर अधिक वर्दळ असते किंवा एखादा दुर्लक्षित परिसर असतो अशा ठिकाणांकडे विशेष लक्ष देत त्याठिकाणी डीप क्लिनींग करण्याच्या दृष्टीने महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे…
कल्याण : कल्याण पूर्वेतील राष्ट्रीय सेवा परिषद संस्थेच्या नूतन हिंदी प्राथमिक विद्यालयातील प्राथमिक विभागाचे सुंदर कलाकृती व विज्ञानावर आधारित प्रयोग यांचे प्रदर्शन मोठ्या उत्साहात पार पडले. विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी शिक्षक शाळेत संस्थापक शिवकुमार त्रिपाठी व मुख्याध्यापिका अनुप्रिता पटवर्धन मार्गदर्शनाखाली दरवर्षी विविध शालेय उपक्रमांचे आयोजन करत असतात. विद्यार्थी दरवर्षी कला, व्यावहारिक अनुभव आणि विज्ञान विषयांवर आधारित शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या कलाकृती आणि प्रयोग सादर करतात. या प्रदर्शनाचा मुख्य उद्देश मुलांच्या सर्जनशीलतेला चालना देणे आहे. यावर्षी देखील याच उद्देशाने एक प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. ज्यामध्ये गणेश विद्या मंदिराच्या मुख्याध्यापिका स्मिता मराठे यांना प्रमुख पाहुण्या म्हणून आमंत्रित करण्यात आले होते. प्रदर्शन व्यवस्थित पार पडण्यासाठी अन्नू पांडे, मीनल पाटील, वृता पाटील, चंद्रकला सिंग, रशिदा खान, सोनल त्रिपाठी, अंजू पांडे आणि कमलेश मिश्रा ह्या शिक्षकांनी व शाळेतील कर्मचारी रामजी यांनी मेहनत घेतली. तसेच विद्यार्थी व पालक इत्यादींच्या सहकार्यामुळे हा कार्यक्रम यशस्वी झाला.
त्रासमुक्त परवानग्या मिळण्याण्यासाठी आँनलाईन प्रणालीची प्रभावी अंमलबजावणी कल्याण : कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात बांधकाम व्यावसायिकांना बांधकाम परवानगीसाठी अधिकाऱ्यांच्या कार्यालयात फेऱ्या माराव्या लागणार नाहीत. नवीन वर्षात, कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने इमारत आराखडा मंजुरीची संपूर्ण सुविधा टिडीआर्, रिडेव्हलमेन्ट, परवानगी शुल्क फी, आदी परवानग्या आँनलाईन माध्यमातून राबिविण्यासाठी मनपा यंत्रणा सज्ज झाली आहे. केडीएमसीच्या मते, बांधकाम आराखड्यांसाठी ही सुविधा आधीच होती, परंतु अनेक तांत्रिक कारणांमुळे लोक बांधकाम परवानगी ऑफलाइन घेत असत. अलीकडेच, बांधकाम परवानगीशी संबंधित कामात पारदर्शकता आणण्यासाठी केडीएमसी आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड यांनी ही सुविधा पूर्णपणे ऑनलाइन करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर केडीएमसीच्या नगररचना विभागाने गुरुवारी शहरातील बांधकाम व्यावसायिक आणि वास्तुविशारदांची बैठक बोलावली, जिथे त्यांना इमारत आराखड्यासाठी ऑनलाइन अर्ज कसा करायचा आणि त्याबाबत उद्भवणाऱ्या सर्व प्रश्नांचे निराकरण कसे करायचे याचे प्रशिक्षण देण्यात आले. केडीएमसी नगररचना विभागाचे प्रभारी सहाय्यक नगररचना संचालक नगररचनाकार सुरेंद्र टेंगळे यांनी सांगितले की ही सुविधा पूर्णपणे ऑनलाइन करण्यात आली आहे. कोणताही विकासक देशातील कोठूनही ऑनलाइन बांधकाम परवानगीसाठी आराखडा सादर करू शकतो. टेंगळे यांनी सांगितले की, या ऑनलाइन सुविधेअंतर्गत बांधकाम व्यावसायिकाला त्याच्या योजनेशी संबंधित फाइल कोणत्या विभागात आहे हे पाहता येईल आणि जर त्या फाईलमध्ये काही प्रलंबित कागदपत्रे असतील तर ती तो ऑनलाइन पाठवू शकेल. या सर्व कामांसाठी त्याला कार्यालयात जावे लागणार नाही. केडीएमसी इमारत आराखडे ऑनलाइन सादर करण्यासाठी आणि मंजुरीसाठी राज्य सरकारने प्रदान केलेल्या बीपीएमएस सॉफ्टवेअरचा वापर करत आहे आणि ते सुरळीतपणे काम करत आहे. शहरातील बांधकाम व्यावसायिक आणि वास्तुविशारदांनी केडीएमसीच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे. याबाबत विकासक विमल ठक्कर म्हणाले, “आजच्या काळात सर्व काही ऑनलाइन झाले आहे, ज्यामुळे काम सोपे होत आहे. अशा परिस्थितीत, बांधकाम आराखड्याची परवानगी ऑनलाइन असल्याने, आम्हाला आता अधिकाऱ्यांना वारंवार भेटण्यासाठी जावे लागणार नाही आणि आराखडा मंजूर करणे पूर्वीपेक्षा खूप सोपे होईल.” या आँनलाईन परवानगी प्रक्रिया मुळे जलदगतीने तसेच पारदर्शक, परवानगी प्रक्रिया मार्ग मोकळा झाल्याचे चित्र यानिमित्ताने दिसत आहे.
नवी मुंबई : महानगरपालिकेच्या वतीने राजमाता जिजाऊ माँसाहेब जयंती आणि स्वामी विवेकानंद जयंती यानिमित्त मुख्यालयातील ॲम्फीथिएटर येथे समाजविकास विभागाचे उपआयुक्त किसनराव पलांडे यांच्या हस्ते, इतर अधिकारी – कर्मचारी यांच्या उपस्थितीत…
ठाणे : सर्वधर्मपरिषदेतील स्वामी विवेकानंद यांच्या भाषणाचा जगावर अद्भूत प्रभाव पडला. जगावर आजही स्वामीजींच्या विचारांचे गारुड कायम आहे. आजचा आधुनिक भारत हा स्वामी विवेकानंद यांच्या विचारांनी बांधलेला आहे, असे प्रतिपादन…
अनिल ठाणेकर ठाणे : आताच्या पिढीने इतका ताण वाढवुन घेतलाय की, हा ताण कसा कमी करायचा, त्या संभ्रमाचाही वेगळा ताण त्यांना उद्भवत आहे. तेव्हा, तणावमुक्त होण्यासाठी श्रीमत् दासबोधांतील सलोकता, समीपता, सरूपता व सायोज्यता या चार मुक्तींचा अवलंब दैनंदिन जीवनात करा. असे उदबोधक प्रवचन सद्गुरू श्री वेणाभारती महाराज यांनी दिले. ठाण्यात सरस्वती क्रीडा संकुलाच्या प्रांगणात सुरू असलेल्या ३९ व्या कै. रामभाऊ म्हाळगी स्मृती व्याख्यानमालेत ‘तणावमुक्त जीवनाची गुरुकिल्ली’ हे तिसरे पुष्प शुक्रवारी सद्गुरू श्री वेणाभारती महाराज ह्यानी गुंफले. यावेळी, व्यासपीठावर व्याख्यानमालेच्या या सत्राचे अध्यक्ष सीए संजीव ब्रम्हे, सुहास जावडेकर तर श्रोत्यांमध्ये व्याख्यानमालेचे अध्यक्ष आमदार संजय केळकर, सचिव शरद पूरोहित, विद्याधर वैशंपायन तसेच, सौ.कमल संजय केळकर आदीसह अनेक मान्यवर उपस्थित होते. तणावमुक्त जीवनाचे सार उलगडताना सद्गुरू श्री वेणाभारती महाराज ह्यांनी, ताणतणाव अनेक प्रकारचे आहेत. हे ताण कमी करण्यासाठी सिंहावलोकन करा, वृद्ध मंडळीकडून जाणून घ्या. आपल्या परंपरा सोडु नका, त्या आपल्या आरोग्याशीच नव्हे तर, भाग्याशी निगडीत आहेत. एखाद्याचा आदर्श घ्या, पण विनाकारण स्पर्धा करू नका. शेजाऱ्याकडे अमुक आहे, तमुक आहे म्हणुन आपल्याकडे हवे ही असुया नसावी. पाळण्यात होतो, तेव्हा कुठे आजार होते ? शरीर आजारी होत नाही तर, मानसिक अस्वस्थता, ताणतणाव आहेत म्हणून आजार आहेत. शेवटी अग्नी जर शरीर स्विकारत असेल तर त्या शरीरात आजार नाहीत. असे स्पष्ट करून आज जगण्यातील आत्मा हरवला आहे. जे आपल्या वेदामध्ये, उपनिषदांमध्ये, सनातन ग्रंथामध्ये लिहिले आहे ते सर्वोत्कृष्ठ आहे. ग्रंथ हेच गुरु आहेत, हीच खरी संपत्ती आहे. हे सत्य आपल्याला जाणता आले पाहिजे. आपण कितीही शिकलो तरी वेदांपेक्षा उपनिषदांपेक्षा लहान आहोत. वेद हेच आपले गुरु आहेत. त्यामुळेच भारत हा सगळ्यांचा आध्यात्मिक गुरु असुन भगवद्गीता हा आद्यग्रंथ असल्याचे त्यांनी सांगितले. पूर्वजांचे देणे नाकारले तर, ताण वाढणे स्वाभाविक आहे. तेव्हा, ताण कमी करण्यासाठी श्रीमत् दासबोधामधील सलोकता, समीपता, सरूपता व सायोज्यता या चार मुक्तीचा अवलंब दैनंदिन जीवनात करा. जीवनात प्रवाही राहुन सगळ्या गोष्टी सहज करायला शिका, घरातील देवघरात मुक्तीच्या शक्तीचा धागा आहे, पुढील अनंत पिढयांसाठी तो जपुन ठेवत ह्या मुक्ती त्यांना सोपवा. अशा प्रकारे अध्यात्म आणि ईश्वराशी कृतज्ञ राहण्याचे महत्त्व सोदाहरण विषद करून सद्गुरू श्री वेणाभारती महाराज ह्यांनी, गृहस्थधर्मातील कौटुंबिक गमतीजमती सांगत उपस्थित श्रोत्यांना तणावमुक्तीसाठी अनेक सहजसुलभ मार्मिक तोडगे देखील सुचवले. चौकट आजकाल सत्य ऐकण्याची कुणाचीच हिंमत नाही. कारण सत्य कटू असते, ते सत्य नारायण आहे. तेव्हा, रस्त्यावर असेल अथवा कुठेही सत्यनारायणाच्या दर्शनाचा संकोच करू नका. किंबहुना, वर्षभरात प्रत्येकाच्या घरात एक तरी सत्यनारायण झाला पाहीजे. घरातील हॉलमध्ये सत्यनारायण आणि महाप्रसाद टेरेसवर असे प्रघात टाळा. असे स्पष्ट करून श्री वेणाभारती यांनी केळीच्या पानावरील शिऱ्याच्या प्रसादाची महती विषद केली.
हरिभाऊ लाखे नाशिक –मंत्रिमंडळात समावेश न झाल्यामुळे राष्ट्रवादीच्या (अजित पवार) प्रमुख नेत्यांना लक्ष्य करणारे माजीमंत्री छगन भुजबळ आणि त्यांना सडेतोड भाषेत प्रत्युत्तर देणारे कृषिमंत्री ॲड. माणिक कोकाटे यांच्यातील कलगीतुरा तूर्तास…