Category: होम

वाळू व्यावसायिकांच्या १८ लाखाच्या बोटी नष्ट;

भिवंडीतील कशेळी, दिवे-अंजूर खाडीत महसुल विभागाची कारवाई   कल्याण : भिवंडी तालुक्यातील अंजुरदिवे, कशेळी, आलिमघर खाडी भागात दिवसरात्र बेकायदा वाळू उपसा करणाऱ्या वाळू व्यावसायिकांच्या १८ लाखाच्या बोटी, सक्शन पंप असे…

भाजपातर्फे शहराच्या विविध भागात कागदपत्रांसाठी शिबिरांचे आयोजन

भाजपाचे जिल्हाध्यक्ष संजय वाघुले यांची माहिती   ठाणे : भाजपा ठाणे शहर जिल्ह्याच्या वतीने ठाण्यातील नागरिकांच्या सुविधांसाठी टपाल विभागाच्या माध्यमातून आधार कार्ड नोंदणी व दुरुस्ती शिबीर, आदित्य बिर्ला आरोग्य विमा,…

जल जीवन मिशन कार्यक्रमाचे प्रभावी अंमलबजावणीसाठी प्रशिक्षण

ठाणे : जल जीवन मिशन कार्यक्रमाचे गावपातळीवर प्रभावी अंमलबजावणीसाठी ग्रामपंचायत स्तरावरील पाणी पुरवठा योजनेचे संचालन, देखभाल व दुरुस्ती आणि सुयोग्य व्यवस्थापन विषयक गाव पातळीवरील भागघारकांचे प्रशिक्षण दि. १६ डिसेंबर २०२४…

महिला कर्मचा-यांना कामाच्या ठिकाणी सुरक्षित वातावरणासाठी विशाखा समिती कार्यरत -आयुक्त डॉ. कैलास शिंदे

अशोक गायकवाड नवी मुंबई : सर्व शासकिय / निमशासकिय कार्यालयांप्रमाणेच नवी मुंबई महानगरपालिकेतील महिला कर्मचा-यांना कामाच्या ठिकाणी संतोषजनक व सुरक्षित वातावरण उपलब्ध्‍ करुन देण्याच्या दृष्टीने विशाखा समिती सक्षमतेने कार्यरत असणार…

उत्तर प्रदेशमध्ये योगींची करामत

ताज्या पोटनिवडणुकांमध्ये उत्तर प्रदेशमध्ये योगी आदित्यनाथ यांनी करून अखिलेश यादव यांना जमिनीवर आणले. लोकसभा निवडणुकीत यश डोक्यात गेल्याने महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे जे झाले, तेच उत्तर प्रदेशमध्ये अखिलेश यांचे झाले होते.…

हिंदी व गणित विषयांकरिता सहाय्यक शिक्षक पदासाठी उमेदवारांनी अर्ज करावे- समाधान इंगळे

अशोक गायकवाड रायगड : सामाजिक न्याय विभागांतर्गत रायगड जिल्ह्यात सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालयाच्या अधिनस्त अनुसूचित जाती/नवबौध्द मुलांकरिता शासकीय निवासीशाळा, जावळी, ता.माणगांव येथे शासकीय निवासी शाळा कार्यान्वीत आहे. येथे इयत्ता ६ वी ते १० वी साठी तात्पुरत्या स्वरुपात मासिका तत्वावर ६ महिने किंवा नियमित शिक्षक हजर होईपर्यंत हिंदी व गणित विषयांकरिता मासिक तत्वावर सहाय्यक शिक्षक पदासाठी पात्र व इच्छूक उमेदवारांनी (बायोडाटा, रिजूम) आवश्यक शैक्षणिक अर्हताचे कागदपत्रांसह अर्ज सादर करावेत, असे आवाहन सहायक आयुक्त, समाज कल्याण समाधान इंगळे यांनी केले आहे.* याकरिता सहाय्यक शिक्षक (मासिक तत्वावर) शैक्षणिक पात्रता-BA.B.Ed, विषय-हिंदी, आवश्यक पद संख्या ०१. सहाय्यक शिक्षक (मासिका तत्वावर), शैक्षणिक पात्रता-B.Sc. B.Ed, विषय-गणित, आवश्यक पद संख्या ०१.यासाठी अटी व शर्ती पुढीलप्रमाणे : सदर पदावर घडयाळी तासाप्रमाणे शालेय शिक्षण व क्रिडा विभागाच्या मंजूर दरानुसार मानधन देय राहील. एकत्रित मानधना व्यतिरिक्त इतर कोणतेही भत्ते देय राहणार नाही. उमेदवारांची निवड करताना अनुभव तसेच TET परीक्षा उत्तीर्ण उमेदवारांना प्रधान्य देण्यात येईल. शैक्षणिक पात्रता,अनुभव इ.अहर्ता किमान असून,किमान अर्हता धारण केली म्हणून उमेदवार मुलाखतीस बोलविण्याकरिता पात्र असणार नाही. सेवा प्रवेश नियम आणि शासनाकडून तदनंतर वेळोवेळी करण्यात आलेल्या सुधारणा तसेच कार्यनियमावलीतील तरतुदींनुसार भरती प्रक्रिया राबविण्यात येईल. सदर पदे मानधन/तासिका तत्वावर असून,भरती प्रक्रियेचे संपूर्ण अधिकार,पदे कमी जास्ती करणे,भरती प्रक्रिया कोणत्याही टप्प्यावर रद्द करणे अटी व शर्तीमध्ये बदल करणे ,सदरील पदे कधीही कोणताही कारण न देता समाप्त करण्याचे अधिकार सहाय्यक आयुक्त समाज कल्याण रायगड,अलिबागयांनी राखून ठेवलेले आहेत. पात्र व इछुक उमेदवारांनी आपला अर्ज जाहिरातीत नमूद केल्याप्रमाणे अनुसूचित जाती/नवबौध्द मुलांकरिता शासकीय निवासी शाळा, जावळी, ता.माणगांव येथे लवकरात लवकर सादर करावेत.

अश्लील आणि विकृत सामग्रीचा मुद्दा खासदार नरेश म्हस्के यांनी संसदेत मांडला

 सोशल मीडिया आणि ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रसारित होत असलेल्या नवी दिल्ली : ठाणे लोकसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के यांनी “सोशल मीडिया आणि ओटीटीवरील अश्लील आणि विकृत सामग्रीचा प्रसार रोखण्यासाठी कठोर पावले उचलण्याची गरज आहे” यासंदर्भात संसदेत नियम 377 अन्वये प्रस्ताव दाखल केला. एक अतिशय महत्त्वाचा मुद्दा उपस्थित करून म्हस्के यांनी केंद्र सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. खासदार नरेश म्हस्के यांनी आपला मुद्दा मांडताना म्हटले की,  सोशल मीडिया आणि ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रसारित होणाऱ्या अश्लील सामुग्रीमुळे आपल्या कुटुंबव्यवस्थेचे पावित्र्य बिघडवण्याबरोबरच समाजात असुरक्षित वातावरण निर्माण होत आहे. सोशल मीडिया आणि ओटीटी प्लॅटफॉर्मवर उपलब्ध असलेल्या अश्लील आणि आक्षेपार्ह साहित्यापासून मुलांना दूर ठेवण्याची पालकांची चिंता दिवसेंदिवस वाढत आहे, परंतु कठोर कायदेशीर तरतुदी नसताना, ते चालवणाऱ्या कंपन्या भारतात प्रचंड नफा कमावत आहेत. अशी विकृत सामग्री देशाच्या सांस्कृतिक आणि नैतिक मूल्यांवरही खोलवर आघात करत आहे. त्याचा प्रसार गुन्हेगारी आणि तरुणांमध्ये दिशाभूल करण्यास प्रोत्साहन देत आहे. पैसे कमावण्याच्या व्यवस्थेने ही एक घातक परिसंस्था बनवली आहे, ज्याला तोडण्यासाठी सरकारकडून कठोर कारवाईची गरज आहे. ओटीटी प्लॅटफॉर्मवर नियंत्रण नसल्याबद्दल माननीय सर्वोच्च न्यायालयानेही चिंता व्यक्त केली आहे. देशात घडणाऱ्या काही घटना, आंध्र प्रदेशातील ८ वर्षांच्या मुलीची शोकांतिका, डुंगरपूर आणि छत्तीसगडमधील घटना ही या विकृतीची उदाहरणे आहेत. हा मर्यादा पुरुषोत्तम श्री रामाचा देश आहे, जिथे विनयशीलता आणि नैतिकतेला विशेष महत्त्व आहे. अश्लील साहित्याचा नागरिकांच्या मनावर, शरीरावर आणि आत्म्यावर खोलवर आणि घातक परिणाम होतो. एकीकडे सोशल मीडियावर मुबलक कंटेंट असताना दुसरीकडे अधिक व्ह्यूज आणि संपत्ती मिळवण्यासाठी अश्लील कंटेंटची संख्याही वाढत असल्याची बाब खासदार नरेश म्हस्के यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिली. केंद्र सरकारकडे बीएनएस कायदा, महिलांचे अशोभनीय प्रतिनिधीत्व कायदा, आयटी कायदा यांसारख्या सध्याच्या कायद्यांमध्ये सुधारणा करून कठोर तरतुदी जोडण्याची मागणी खासदार नरेश म्हस्के केली. संसदीय स्थायी समितीने अशा संवेदनशील विषयावर विचार करून एकमत घडवून आणावे, जेणेकरून अशा साहित्याचा प्रसार रोखता येईल असे खासदार नरेश म्हस्के यांनी मत व्यक्त केले. 000

वीज ग्राहकांना लोक अदालतीतून प्रलंबित‍ प्रकरणांचा निपटारा करण्याची संधी

कल्याण : कल्याण आणि भांडुप परिमंडलातील कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित प्रकरणे तसेच वीजबिलाबाबत वाद आणि वीज चोरीच्या दाखलपूर्व व प्रलंबित प्रकरणांचा तडजोडीने निपटारा करण्याची संधी आहे. संबंधित ग्राहकांनी तालुका न्यायालय स्तरावर…

श्री मार्तंड देवस्थान जेजुरी’ यांच्या वतीने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व ठाण्याचे आमदार संजय केळकर यांचा सत्कार करण्यात आला. श्री मार्तंड देवस्थान जेजुरी’चे अध्यक्ष अभिजीत देवकाते – पाटील यांनी गुरुवारी  उपमुख्यमंत्री एकनाथ…