Category: होम

फडणवीसांच्या भेटीसाठी अदाणी सागर बंगल्यावर

मुंबई: लोकसभेत गौतम अदाणी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मैत्रीमुळे रोज हल्लाबोल होत असतानाच आज गौतम अदाणीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेटीसाठी सागर बंगला गाठला. त्यांच्या या भेटीमुळे चर्चांना उधाण आले आहे.…

कल्याणमधील दुर्गाडी किल्ल्यावरील मुस्लिमांचा दावा कोर्टाने फेटाळला

ठाणे : कल्याणमधील दुर्गाडी किल्ल्यावरील मुस्लिम संघटनांचा दावा कोर्टाने आज फेटाळून लावला… या संदर्भांत कल्याण न्यायालयाने आज निर्णय देत 48 वर्षांपासून सुरू असलेला खटाला मार्गी काढला आहे. यात मुस्लिम पक्षाचा दावा कल्याण न्यायालयाने फेटाळला आहे. मुस्लिम पक्षाच्या वतीने सर्फउद्दिन कर्ते यांनी दुर्गाडी किल्ला मुस्लिम पक्षाच्या ताब्यात द्या, अशी मागाणी केली होती. 1976 पासून  कल्याण न्यायालयात या प्रकरणी सुनावणी सुरु होती. दरम्यान 48 वर्षांच्या प्रतिक्षेनंतर कोर्टाने शासनाच्या बाजूने निकाल दिला आहे. परिणामी कल्याणमध्ये शिवसेना कार्यकर्ते आणि हिंदू संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आरती करत उत्साह साजरा केला आहे. मात्र 1976 पासून सुरू असलेले हे प्रकरण नेमकं काय याबाबत माहिती सरकारी वकील सचिन कुलकर्णी यांनी दिली आहे. नेमकं प्रकरण काय? 1976 साली  माजलीसे मुशावरा ट्रस्ट या  मुस्लिम संघटनेने दुर्गाडी किल्ल्याची मालकी हक्क मिळण्यासाठी दावा दाखल केला होता. तसेच सरकारकडून मालकी मिळावी यासाठी कोर्टात पुरावा दाखल करण्यात आला होता. 1994 साली निशाणी 130 आणि 137 वर कोर्टाने हुकूम केला आहे. महाराष्ट्र शासनाने दुर्गाडी किल्ल्याची दुरुस्ती पीडब्ल्यूडी मार्फत करावी. तसेच त्याचा अहवाल सादर करावा, त्या अनुषंगाने ही जागा शासनाच्या मालकीची आहे. त्या जागेवर कोणालाही हक्क सांगता येणार नाही, असे शासनाच्या…

दिव्यातील अनधिकृत शाळा बंद करा मेस्टा संघटनेची मागणी

ठाणे : दिव्यातील अनधिकृत शाळेमध्ये झालेल्या निंदनीय प्रकाराबाबत चौकशी करून कारवाई व्हावी तसेच दिवा भागात असलेल्या अनधिकृत शाळा बंद कराव्यात, अशी मागणी मेस्टा संघटनेचे ठाणे जिल्हा अध्यक्ष नरेश पवार यांनी…

१ कोटी ८४ लाख ८० हजार एवढे ध्वजदिन निधी संकलनाचे उद्दिष्ट – हरिश्चंद्र पाटील

अनिल ठाणेकर ठाणे : भारतीय लष्करातील सैनिक हे अहोरात्र आपल्या सीमेवर रक्षण करत असतात. त्यांच्या प्रती कृतज्ञता दाखविण्यासाठी सशस्त्र सेना ध्वजदिन निधीची संकल्पना अंमलात आणली आहे. या निधीच्या माध्यमातून सैनिक/माजी…

रायगड किल्ला पर्यटन विकास कामासाठीचा शासन निधी १०० टक्के खर्चासाठी नियोजन करा – छत्रपती संभाजी राजे

अशोक गायकवाड नवी मुंबई : रायगड किल्ला व परिसर पर्यटन विकासाचे काम उत्तम दर्जाचे व जलदगतीने व्हावे यासाठी जिल्हा प्रशासनाने प्राधिकरणाशी समन्वय राखून काम करावे. यासाठी शासनाव्दारे मंजूर झालेला निधी…

माजिवड्यातील अनधिकृत फेरिवाले व कचऱ्याच्या समस्‍येने नागरिक हैराण

आमदार निरंजन डावखरे व भाजपा उपाध्‍यक्षा अनुराधा रोडे यांची समस्‍या समाधानासाठी आयुक्‍तांची घेतली भेट ठाणे : वाढत्‍या नागरिकरणामुळे शहराचा मध्‍यवर्ती भाग म्‍हणून ओळखला जात असलेला माजिवडा परिसर सध्‍या कचरा व…

शास्त्रीनगर येथील आरोग्य केंद्राच्या जागेवर भूमाफियांचे अतिक्रमण

माजी नगरसेवक हणमंत जगदाळे यांचे प्रभाग समितीमध्ये ठिय्या आंदोलन   अनिल ठाणेकर ठाणे : शास्त्रीनगर नंबर १ मधील आरोग्य केंद्रासाठी मंजूर असलेल्या मोकळ्या भूखंडावर आणि विकास आराखड्यामध्ये आरक्षित असलेल्या रस्त्यावर…

नाशिक विभागात एसटी बसच्या अपघात वाढ नऊ महिन्यांत १२० अपघात, २२ जणांचा मृत्यू

नाशिक : राज्य परिवहन महामंडळाच्या नाशिक विभागात एप्रिल ते नोव्हेंबर २०२४ या नऊ महिन्यांच्या कालावधीत बसचे एकूण १२० अपघात होऊन त्यामध्ये २२ जणांचा मृत्यू तर, १९६ जण जायबंदी झाले. महत्वाची…

कल्याणमधील दुर्गाडी किल्ला शासनाच्या मालकीचा;

न्यायालयाने मुस्लिम संघटनेचा दावा फेटाळला   कल्याण – येथील दुर्गाडी किल्ल्याची जागा ही राज्य शासनाच्या मालकीची आहे, यावर शिक्कामोर्तब करत कल्याणच्या दिवाणी न्यायालयाचे न्यायाधीश ए. एस. लांजेवार यांनी दुर्गाडी किल्ल्यावरील…

भारतातील बंदर व गोदी कामगार वेतनकराराची अंमलबजावणी न झाल्यास १७ डिसेंबर नंतर बेमुदत संप !

अनिल ठाणेकर ठाणे : भारतातील बंदर व गोदी कामगारांसाठी कायद्यानुसार झालेल्या वेतन कराराची त्वरित अंमलबजावणी न केल्यास १७ डिसेंबर २०२४ नंतर बंदर व गोदी कामगार केव्हाही बेमुदत संपावर जातील,असा स्पष्ट…