Category: होम

बदलापूरच्या थकबाकीदार बालाजी हाईट्स सोसायटीचा कांगावा

– दोन लाख ४६ हजार रुपयांची थकबाकी , महावितरणचे स्पष्टीकरण कल्याण: बदलापूर पश्चिमेतील प्राईम बालाजी हाईट्स या सोसायटीकडे वीजबिलाची २ लाख ४६ हजार रुपयांहून अधिकची रक्कम थकीत आहे. रितसर नोटिस देऊन वीजपुरवठा खंडित केल्यानंतर सोसायटीकडून महावितरणच्या कर्मचाऱ्यांकडून दमदाटी झाल्याचा अपप्रचार झाला. यासंदर्भात पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेल्यानंतर सोसायटी पदाधिकाऱ्यानीच टप्प्याटप्प्याने थकबाकी भरण्याची ग्वाही देत दीड लाख रुपयांचा धनादेश दिला. त्यानंतरच सोसायटीचा वीजपुरवठा पुर्ववत करण्यात आला आहे. बदलापूर गाव पश्चिम येथे न्यू डीपी रोड परिसरात प्राईम बालाजी हाइट्स या सोसायटीला सामान्य वापरासाठी (लिफ्ट, अंतर्गत पथदिवे आणि पाणीपंप) महावितरणने मे २०१८ मध्ये वीजपुरवठा दिला आहे. मार्च-२०२४ नंतर सोसायटीने या वीजजोडणीचे बिल भरलेले नाही. थकीत वीजबिलाचा भरणा करण्याबाबत सोसायटी पदाधिकाऱ्यांकडे वारंवार पाठपुरावा करण्यात आला. अखेर थकबाकी न भरल्यास वीजपुरवठा खंडित करण्याबाबत लेखी नोटीसही बजावण्यात आली. परंतू सोसायटीने थकबाकीचा भरणा केला नाही. त्यामुळे सोसायटीचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला. यावेळी जमलेल्या सोसायटीधारकांनी वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई करणाऱ्या शाखा अभियंत्यांच्या कामात अडथळा आणला. उलट महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी अरेरावी केल्याचा कांगावा करत अपप्रचार केला. शाखा अभियंत्यांनी यासंदर्भात बदलापूर पोलीस ठाण्यात तक्रार देण्याचा प्रयत्न केला असता सोसायटी पदाधिकारी बाबु तांबे व इतरांनी संपर्क साधून थकबाकी भरण्याचे मान्य केले. प्रत्येकी ७५ हजार रुपयांचे दोन धनादेश तातडीने देत उर्वरित थकबाकी लवकर भरण्याची ग्वाही सोसायटी पदाधिकाऱ्यांनी पोलिसांसमक्ष दिली. त्यानंतर सोसायटीचा वीजपुरवठा पुर्ववत करण्यात आला.

नवीन ठाणे रेल्वे स्थानकाच्या शेजारील उच्च दाब वीज वाहिनीच्या पर्यायावर महिनाभरात तोडगा काढण्याचे निर्देश

ठाणे  : ठाणे-मुलुंड दरम्यान होत असलेल्या नवीन रेल्वे स्थानकांच्या शेजारील उच्च दाब वीज वाहिनीच्या पर्यायावर महिनाभरात तोडगा काढण्याचे निर्देश महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिले आहेत. ठाणे आणि मुलुंड दरम्यान मनोरुग्णालयाच्या लगत ठाणे स्मार्ट सिटीतंर्गत नवीन रेल्वे स्टेशन बांधण्यात येत आहे. यामध्ये रेल्वे परिचलन क्षेत्रामधील ट्रॅक बांधणे, रेल्वे स्टेशन इमारत बांधकाम बांधणे आदी अनुषंगिक कामे रेल्वेकडून तर,परिचलन क्षेत्राच्या बाहेरील डेक, रॅम्प आदी अनुषंगिक कामे स्मार्ट सिटीच्यावतीने करण्यात येत आहेत. त्या कामाची पाहणी महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी नुकतीच केली. त्यावेळी, अतिरिक्त आयुक्त (१) संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त (२) प्रशांत रोडे, उप नगर अभियंता सुधीर गायकवाड, कार्यकारी अभियंता धनाजी मोदे, महावितरणचे अधिकारी आदी उपस्थित होते. या पाहणी दरम्यान या प्रकल्पाशी निगडित वेगवेगळ्या विषयांची आयुक्त राव यांनी माहिती घेतली. मध्य रेल्वेच्या मार्गावरून जाणाऱ्या उच्च दाब वीज वाहिनीमुळे काम थांबू नये, यासाठी आयुक्तांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना १५ डिसेंबरपर्यंत तात्परुती उपाययोजना आणि महिनाभरात पर्यायी उपाययोजना काढण्याचे निर्देश दिले. तसेच, या वाहिनीचा टॉवर हटवून ही वाहिनी भूमिगत करण्याबाबत रेल्वे, महापालिका आणि महावितरण यांनी एकत्रित मार्ग काढावा, असेही आयुक्तांनी सांगितले. नवीन उपनगरीय रेल्वे स्थानकाच्या कामामुळे बाधित होणाऱ्या झोपडीधारकांचे पुनर्वसन करण्याबाबतही तत्काळ कार्यवाही करण्याचे निर्देशही आयुक्त राव यांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना दिले. या पाहणीदरम्यान, आयुक्त राव यांनी आतापर्यंत झालेले काम, पोहोच मार्गाचे काम, पूल आदी कामांचा आढावा घेतला. नवीन उपनगरीय रेल्वे स्थानकाविषयी माहिती…

महापालिका लोकशाही दिनाचे ६ जानेवारीला आयोजन

२३ डिसेंबरपूर्वी निवेदन सादर करण्याचे नागरिकांना आवाहन ठाणे : ठाणे महापालिकेचा पुढील लोकशाही दिन ६ जानेवारी २०२५ रोजी होणार आहे. तरी नागरिकांनी जानेवारी महिन्याच्या लोकशाही दिनाच्या १५ दिवस आधी म्हणजेच…

ज्या कॉलनीच्या विटा आईने उचलल्या तिथेच घर घेतले-पारधे

ठाणे : माझ्या आईने ज्या कॉलनीच्या विटा उचलल्या,घाम गाळला, त्याच कॉलनीत मी घर घेतले. आईच्या हातात चावी दिली, त्यावेळी तिला या कॉलनीत आता तुझे घर झाले, असे सांगितले तेव्हा ती…

सत्तार राठोड नापास, मंत्रिमंडळातून डच्चू ? 

स्वाती घोसाळकर मुंबई: शिवसेनेचे अब्दुल सत्तार आणि संजय राठोड हे दोन्ही मंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या प्रगति परिक्षेत नापास झाल्याचे वृत्त आहे. त्यांची कामगिरी समाधानकारक नसल्याने त्यांना मंत्रिमंडळातून डच्चू मिळणार असल्याचे…

भाजपाचे राहुल नार्वेकर पुन्हा विधानसभा अध्यक्ष

  मुंबई  : विधानसभा अध्यक्षपदी भाजपाचे  आमदार राहुल नार्वेकर यांची निवड होणार आहे. राहुल नार्वेकर यांनी सकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत विधानसभा अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केला.…

आता स्वयंचलित प्रयोगशाळा…

प्रयोगशाळा जशा सामान्य माणसाच्या भल्यासाठी आरोग्यासाठी आणि उत्तम जीवनासाठी वेगवेगळे शोध लावून त्याचे जीवन संपन्न करतो तशाच या प्रयोगशाळा देशामधील उद्योग, उत्पादन आणू त्यामधून होणारी निर्यात यातून देशासाठी संपन्नता आणीत…

एहसान फरामोश बांगलादेशला त्याची जागा दाखवून द्या

१९७१ पर्यंत बांगलादेश हा पाकिस्तानचा एक भाग होता. तेंव्हा त्याला पूर्व पाकिस्तान असे म्हंटले जायचे. पाकिस्तानच्या राजवटीत बांगलादेशातील नागरिकांवर अनन्वित अत्याचार होत होते. बांगलादेश हा पाकिस्तानचा घटक असूनही बांगलादेशी नागरिकांवर…

आधारहीन पोकळीत टांगलेली आंबेडकरी जनता

जसे दुभंगलेले घर संकटांना सामोरे जावू शकत नाही तशीच अवस्था आज आंबेडकरी समाजाची झालेली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीचा एकेकाळी अग्रदूत राहिलेला हा समाज देशातील एकूणच दलित शोषित समाजाचे पुढारपण…