Category: होम

नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात पल्स पोलिओ लसीकरण मोहीम यशस्वी

नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिका आरोग्य विभागाच्या वतीने दिनांक ०८ डिसेंबर २०२४ रोजी उपराष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम प्रभावीपणे राबविण्यात आली. नवी मुंबई महानगरपालिकेच्या २५ नागरी आरोग्य केंद्रांमार्फत खाजगी…

डॉ.तात्याराव लहाने यांच्या प्रमुख उपस्थितीत ध्यान महोत्सव संपन्न

– तेजज्ञान ग्लोबल फाउंडेशनच्या वतीने ध्यान महोत्सवाचे आयोजन पनवेल : राज भंडारी ‘हॅपी थॉट्स’ नावाने ओळखल्या जाणाऱ्या तेजज्ञान ग्लोबल फाउंडेशन या आध्यात्मिक सेवाभावी संस्थेला २५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त पनवेल येथे…

महसूल वाढीवर भर देण्याचे आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांचे निर्देश

नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिकेचे लोकार्पण झालेले प्रकल्प, इमारती उपयोगात असल्याची खात्री संबधित विभागाने करुन घ्यावी व अद्याप कार्यान्वित न झालेल्या नागरी सुविधा तत्परतेने वापरात येतील याकडे प्राधान्याने लक्ष…

अमंली पदार्थांची विक्री व वाहतूक रोखण्यासाठी जिल्ह्यातील यंत्रणांनी सक्रिय सहभाग नोंदवावा

 निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. संदीप माने ठाणे : समाजात अंमली पदार्थांचा वापर टाळण्यासाठी व युवा पिढीला अंमली पदार्थांपासून दूर ठेवण्यासाठी सर्व यंत्रणांनी सक्रिय सहभागी व्हावे. ठाणे जिल्ह्यातील रासायनिक कंपन्या, परदेशातून येणारी…

डोंबिवलीत मालमत्ता कर थकबाकीदारांच्या गाळ्यांना टाळे

डोंबिवली : वारंवार नोटिसा पाठवूनही अनेक वर्षाच्या थकीत मालमत्ता कराची ४० लाखाहून अधिक रकमेची थकबाकी भरण्यास टाळाटाळ करणाऱ्या चार थकबाकीदारांच्या गा‌ळ्यांना टाळे लावण्याची कारवाई कल्याण डोंबिवली पालिकेच्या ग प्रभागाच्या अधिकाऱ्यांनी…

काळा तलाव साफसफाईत दिरंगाई करणाऱ्या ठेकेदाराला नोटीस

कल्याण : येथील पश्चिमेतील काळा तलाव परिसरातील दैनंदिन साफसफाईत दिरंगाई केल्याने कल्याण डोंबिवली पालिकेच्या आयुक्तडॉ. इंदुराणी जाखड यांनी येथील स्वच्छतेचे काम पाहणाऱ्या ठेकेदाराला ठेका रद्द करण्याची नोटीस बजावली आहे. ठेकेदार…

डोंबिवलीत काँक्रीट रस्ते कामांच्या ठिकाणी वाहतूक सेवकांची फौज

कल्याण : डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानक परिसरात एमएमआरडीएतर्फे काँक्रीट रस्ते कामांसाठी रस्त्यांची खोदाई करण्यात आली आहे. महानगर गॅस कंपनीनेही काही ठिकाणी वाहिन्या टाकण्यासाठी खोदकाम केले आहे. या खोदकामांमुळे डोंबिवलीतील वर्दळीच्या…

डॉ. समीर तोडणकर यांच्या हस्ते सेवानिवृत्त २३ कर्मचाऱ्यांचा सन्मान

ठाणे : जिल्हा परिषदेच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांच्या मार्गदर्शनाने प्रत्येक महिन्यात आनंददायी निवृत्ती वेतन योजना राबविण्यात येत आहे. त्याअनुषंगाने ऑक्टोबर व नोव्हेंबर  महिन्यात सेवानिवृत्त झालेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा…

ठाणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार ॲग्रिस्टॅक ‘फार्मर आयडी’ – रोहन घुगे

अनिल ठाणेकर ठाणे : विविध योजनांचा लाभ ठाणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांपर्यंत जलद गतीने व परिणामकारकरित्या पोहोचवता यावा यासाठी कृषी क्षेत्रासाठी सर्वसमावेशक डिजीटल पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी ॲग्रिस्टॅक (Digital Public Infrastructure for Agriculture) ही योजना राबविण्यात ये-त असून या योजनेचे प्रत्यक्ष काम जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात सुरू करावे, असे निर्देश मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांनी दिले. केंद्र शासनाने ॲग्रिस्टॅक योजनेच्या मार्गदर्शक सुचनेनुसार ॲग्रिस्टॅक हे कृषि क्षेत्रात डेटा आणि डिजिटल सेवा वापरुन शासनाच्या विविध योजनांचा लाभ पात्र शेतकऱ्यांपर्यंत जलद गतीने व परिणामकारकरित्या पोहचण्यासाठी मदत होणार आहे.ॲग्रिस्टॅक संकल्पनेच्या अंमलबजावणीसाठी गट विकास अधिकारी व ग्रामविकास अधिकारी यांचे नियोजन व कामकाजाकडे नियंत्रण असणार आहे, अशी माहिती कृषी विकास अधिकारी एम एम बाचोटीकर यांनी दिली.सर्व ग्रामपंचायतींमार्फत कॅम्प नियोजन करण्यात येणार असून शेतकऱ्यांना फार्मर आयडी तयार करून देणार आहेत. शेतकऱ्यांचा व त्यांच्या शेतांचा आधार संलग्न माहिती संच निर्मितीमध्ये पथकातील कर्मचारी प्राथमिक जबाबदारी पार पाडणार आहेत. कृषि क्षेत्रासाठी सर्वसमावेशक डिजिटल पायाभूत सुविधा निर्माण करणे हा ॲग्रिस्टॅक उपक्रमाचा उद्देश आहे. या प्रकल्पामुळे माहिती आधारित योग्य निर्णय घेणे, गरजू शेतकऱ्यांना योग्य वेळी सेवा प्रदान करणे, कृषि उपक्रमांची कार्यक्षमता सुधारण्यासाठी शक्य होईल. विविध शेतकरी आणि कृषि-केंद्रित योजनांची आखणी करणे व अंमलबजावणी करणे सुलभ होणार आहे. विविध योजनांतर्गत शेतकऱ्यांना लाभ देताना आधार प्रणालीचा वापर करुन लाभार्थीची ओळख पटविण्यात येते. तसेच महसूल विभागाने त्यांच्याकडील अधिकार अभिलेखाचे तसेच गाव नकाशांचे संगणकीकरणाचे काम पूर्ण केले आहे. महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग संस्थेने राज्यातील जमिनींचे भू-संदर्भीकरण (जिओ रेफरन्सिंग) करुन दिले आहे. यामुळे शेत जमिनीची  इत्यंभूत अद्ययावत माहिती डिजिटाईज स्वरुपात तात्काळ उपलब्ध होणार असून ॲग्रिस्टॅक (Digital Public Infrastructure for Agriculture) ही योजना यशस्वीपणे राबवण्यासाठी शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवावा, असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात येत आहे.

ठाणे महापालिका क्षेत्रात चिनी मांजा, चिनी दोरा वापरण्यास प्रतिबंध

ठाणे : पतंग उडवण्यासाठी वापरला जाणारा प्लास्टिक किंवा सिंथेटिक पदार्थापासून तयार केलेला चिनी मांजा, चिनी दोरा किंवा नायलॉन किंवा प्लास्टिक कृत्रिम मांजा हा माणसांसाठी तसेच पक्ष्यांना घातक ठरतो. त्यामुळे या…