मतदाराचे नाव व मतदान केंद्र शोधण्यासाठी मिरा – भाईंदर महापालिकेची Voter Help Desk सुविधा
मिरा-भाईंदर : राज्य निवडणूक आयोग यांच्या आदेशानुसार मिरा-भाईंदर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५–२६ करीता सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. दिनांक १५ जानेवारी २०२६ रोजी मतदान होणार असून मतदानाची वेळ सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत आहे. महापालिकामार्फत एकूण ९५८ मतदान केंद्र उभारण्यात आले असून मतदारांना मतदान प्रक्रियेबाबत सुलभ, पारदर्शक व अचूक माहिती मिळावी, निवडणूक विभागामार्फत मतदारांना मतदार यादीतील नाव व मतदान केंद्राची माहिती सहज शोधता यावे, यासाठी Voter Help Desk सुविधा तसेच QR कोड आधारित सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल आहे. या सुविधेमुळे नागरिकांना आपल्या मोबाईल फोनवर दिलेला QR कोड स्कॅन करून थेट मतदार यादी शोध पृष्ठावर जाता येणार आहे. याशिवाय, नागरिक https://mahasecvoterlist.in/ObjectionOnClick/SearchVoterName या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन आपले नाव मतदार यादीत आहे की नाही, तसेच मतदान केंद्राची माहिती सहज तपासू शकतात. यामुळे मतदानाच्या दिवशी होणारी गैरसोय टाळण्यास मदत होणार आहे. मतदान केंद्र तपासण्यासाठी मार्गदर्शक सूचना : दिलेला QR कोड मोबाईलवर स्कॅन करा किंवा लिंकवर क्लिक करून अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या. आवश्यक माहिती (नाव / EPIC क्रमांक) भरा. मतदार यादीतील नाव व मतदान केंद्राची माहिती तपासा. मतदार यादीत नाव आणि मतदान केंद्र शोधण्यासाठी तांत्रिक अडचण येत असल्यास खालील निवडणूक निर्णय अधिकारी किंवा मिरा भाईंदर महानगरपालिका मुख्य कार्यालयाच्या मतदार हेल्प डेस्क क्रमांकावर संपर्क साधावा. मतदाराचे नाव व मतदान केंद्र शोधण्यासाठी- whatsup chatbot क्र.: ९९६७६ ११२३४
