Category: होम

सर्वेक्षणाअभावी बेघर झालेल्या 18 झोपडीधारकांना न्याय द्या

 आमदार बाळा नर यांची विधानसभेत मागणी   केतन खेडेकर जोगेश्वरी गुंफा परिसरात गेल्या 50 वर्षापासून अस्तित्वात असलेली जयंत चाळ ही सन 2004 मध्ये पुनर्वसनाकरिता निष्कासित करण्यात आली होती. याठिकाणी महानगरपालिकेतर्फे सर्व्हेक्षण करण्यात आले.जोगेश्वरी गुंफे परिसरात झोपडयाचे सर्व्हेक्षण करण्यात आले. त्योवळी घरे अगोदरच निष्कासित केलेली असल्यामुळे आणि तेथे ते राहत नसल्याने त्यांचे सर्व्हेक्षण शासनामार्फत करण्यात आले नाही. त्यामुळे या 18 रहिवाश्यांना पात्र ठरविण्यात न आल्यामुळे सध्यस्थितीमध्ये 18 रहिवाशी बेघर झालेले आहे. गेली 50 वर्षे राहत असलेल्या रहिवाश्यांचे केवळ सर्व्हेक्षण न झाल्यामुळे त्यांच्यावर बेघर होण्याची वेळ आलेली आहे. रहिवाश्यांवर होत असलेला अन्याय पाहता शासनाने तातडीने त्यांना न्याय दयावा याकरिता  औचित्याच्या मुददयाद्वारे शासनास आमदार बाळा नर यांनी मागणी केली आहे. 000000

 मुंबईत सातशे चौरस फुटांच्या घरांना मालमत्ता कर माफ करा

 आमदार अजय चौधरी यांची मागणी   केतन खेडेकर मुंबईसाठी मराठी माणसाने दिलेले बलिदान लक्षात घेता मुंबईत मराठी माणसाचे अस्तित्व टिकून राहावे आवश्यक आहे. पुनर्विकासानंतर मालमत्ता कर परवडत नसल्याने मराठी माणसे घर विकून टाकतात. त्यामुळे मराठी माणूस मुंबईच्या बाहेर जाऊ नये यासाठी मुंबईत सातशे चौरस फूटांपर्यंतच्या घरांना मालमत्ता कर माफ करावा, अशी मागणी शिवसेना आमदार अजय चौधरी यांनी आज  विधानसभेत केली. औचित्याच्या मुद्द्याद्वारे अजय चौधरी यांनी हा प्रश्न मांडला. मुंबईतील मराठी माणूस घर विकून मुंबईबाहेर जाऊ नये आणि मुंबईत मराठी माणसाचे अस्तित्व टिकावे, म्हणून महाविकास आघाडी सरकारच्या काळात तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबई महापालिका क्षेत्रात ५०० चौरस फूटांच्या निवासी घरांना मालमत्ता कर पूर्णपणे माफ केला. मुंबईतील लाखो सदनिकाधारकांना याचा फायदा झाला. मुंबईतील वाढते पुनर्विकास प्रकल्प आणि विकास नियंत्रण नियमावलीतील सुधारित तरतुदींचा विचार करता, सध्या मुंबईतील जुन्या चाळींच्या तसेच म्हाडा इमारतींच्या समुह पुनर्विकासातही विकास नियंत्रण निमयावलीतील तरतुदीनुसार ५५० ते ६०० चौरस फूटांपर्यंत घर उपलब्ध होते. पुनर्विकास प्रकल्पात बहुतांश मराठी कुटुंबे राहतात. पण मालमत्ता करामध्ये त्यांना सवलत मिळत नाही. शिवसेना आमदार अजय चौधरी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन निवेदन दिले आणि मुंबई महानगरपालिका क्षेत्रात ७०० चौरस फुटांपर्यंतच्या घरांना मालमत्ता कर पूर्णपणे माफ करण्याची विनंती केली. वाढीव मालमत्ता कर परवडत नसल्याने अनेकदा घर विकून ते मोकळे होतात. त्यामुळे मुंबईतील मालमत्ता कर ७०० चौरस फुटांपर्यंत माफ करणे आवश्यक आहे. अभ्युदयनगर पुनर्विकासात ६००. चौरस फुटांपेक्षा मोठे घर देण्याचे सरकारने घोषित केले आहे. यातील मराठी माणसे याच परिसरात टिकवणे गरजेचे आहे. मुंबईतील गोरगरीबांना न्याय मिळावा म्हणून सातशे चौरस फूटांपर्यंतच्या घरांना आणि निवासी गाळ्यांना मालमत्ता कर माफ करावा, अशी मागणी अजय चौधरी यांनी केली. 0000

प्राण्यांचीही संस्कृती असते…

जगातील प्रत्येक देशाच्या माणसांची संस्कृती असते तशीच ती प्राण्यांच्या अनेक प्रजातीचीही असते असे आता विज्ञानाने सांगितले आहे. संस्कृती म्हणजे योग्य रीतीने आखून दिलेले आणि सामाजिक पातळीवर शिकलेले व्यवहार असा अर्थ…

कर्मयोगी संत गाडगे महाराज

महाराष्ट्रातील थोर संत, किर्तनकार, समाजसुधारक, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे खंदे समर्थक, स्वच्छतेचे पुढारक संत गाडगे महाराज यांची आज पुण्यतिथी. संत गाडगे महाराज यांचे पूर्ण नाव डेबूजी झिंगराजी जानोरकर असे होते.…

दिल्लीसाठी आप-भाजपमध्ये लढाई

दिल्ली विधानसभेची निवडणूक आणखी दोन महिन्यांनी होणार आहे. सध्याची परिस्थिती पाहता काँग्रेस येथे शर्यतीत नाही. ‌‘आप‌’ आणि भाजप यांच्यातच दिल्लीची सत्ता काबीज करण्यासाठी लढाई सुरू आहे. परस्परांवर कुरघोड्या, आरोप-प्रत्यारोप, नेत्यांची…

ड्रॅगनची तिरकी चाल

  आपल्या विस्तारवादी धोरणाचा भाग म्हणून शेजाऱ्यांच्या जमिनीवर कब्जा करून त्यावर दावा सांगण्याची चीनची जुनी सवय आहे. गेल्या काही महिन्यांपूर्वी जेव्हा चीनने गलवान खोऱ्यातून माघार घेण्याचा करार केला आणि सैन्य…

डोंबिवलीत कस्तुरी प्लाझाजवळील वाहनांचे सुट्टे भाग गोदामाला आग

डोंबिवली : येथील पूर्वेतील कस्तुरी प्लाझा संकुलाजवळील श्री माऊली प्रसन्न सोसायटीच्या तळमजल्याला असलेल्या वाहनांच्या सुट्टे भागाच्या गोदामाला गुरुवारी सकाळी आग लागली.गोदामात टायर, वाहन वंगण असे ज्वलनशील घटक असल्याने गोदाम आगीत…

ठाण्यात सुट्टीच्या दिवशीही कर संकलन केंद्र सुरूच राहणार, ठाणे महापालिकेचा निर्णय

ठाणे : ठाणे महापालिकेच्या अर्थसंकल्पात ठरवून दिलेले मालमत्ता कराचे उद्दीष्ट पुर्ण करण्यासाठी प्रशासनाकडून विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून पुढील वर्षाच्या मार्च महिन्याअखेरपर्यंत शनिवार, रविवार आणि सार्वजनिक…

बेलापूर कौटुंबिक न्यायालयात राष्ट्रीय लोकअदालत संपन्न

ठाणे : बेलापूर कौटुंबिक न्यायालयात नुकतेच राष्ट्रीय लोकअदालतीचे यशस्वी आयोजन करण्यात आले होते. या लोकअदालतीमध्ये एकूण 23 प्रकरणे निकाली काढण्यात आली, ज्यामध्ये 9 प्रकरणांमध्ये पती-पत्नींनी एकमेकांसोबत पुन्हा एकत्र येण्याचे ठरवले.…