Category: होम

‘गावपळण’ आचरा गाव झाले निर्मनुष्य…!

सिंधुदुर्ग : आचरे गावचे ग्रामदैवत श्री रामेश्वर मंदिरातले चौघडे निनादू लागले. तोफा धडाडल्या. गावकऱ्यांना गाव सोडण्याचा इशारा झाला बारा पाच मानकऱ्यांनी मंदिराचे प्रवेशद्वार,पहिला दिंडी दरवाजा आतून बंद केला. मंदिराच्या पुढल्या…

आजपासून २४ डिसेंबरपर्यंत ठाणे महापालिका राबविणार ‘सुशासन सप्ताह’ विशेष मोहिम – सौरभ राव

ठाणे, सर्वसामान्य नागरिकांच्या तक्रारींचे निराकरण तातडीने व्हावे यासाठी केंद्रशासनाने Good Goverence Week 2024 हा सप्ताह महापालिका स्तरावर राबविण्याचे निर्देश दिले आहेत, त्यानुसार महापालिका कार्यक्षेत्रात दिनांक 19 ते 24 डिसेंबर 2024…

बुद्धिब‍ळाचा नवा बादशहा

  एखाद्या व्यक्तीवर एखाद्या प्रसंगाचा इतका परिणाम होतो, की त्या क्षणी तो जगावेगळे काहीतरी करण्याचा संकल्प मनाशी ठरवतो. आपल्या आदर्शाचा कुणी पराभव करीत असेल, तर त्याच वेळी आपल्या आदर्शासारखे होऊन…

भारत-बांगलादेशमधील तणावाचा सामान्यांना फटका

भारत आणि बांगलादेश यांच्यातील संबंधांमधील दुरावा आता वाढू लागला आहे. एकीकडे बांगलादेशच्या अंतरिम सरकारने आधीच मंजूर केलेला बँडविड्थ ट्रान्झिट करार रद्द केला. दुसरीकडे, बटाटे आणि कांद्याच्या आयातीसाठी हा देश भारताव्यतिरिक्त…

पत्नी पीडित पुरुषांना संरक्षण मिळावे!

बंगळुरू मध्ये एका कंपनीत अभियंता असलेल्या ३४ वर्षीय अतुल सुभाष या तरुणाने पत्नीच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी या तरुणाने आपल्यावरील आपबिती ९० मिनिटांचा व्हिडिओ काढून तसेच ४० पाणी…

एकाच व्यक्तीने किती काळ पदावर रहावे यासाठी कायदा व्हावा

प्रचंड रेंगाळलेला महाराष्ट्र मंत्रिमंडळाचा विस्तार अखेर रविवारी संपन्न झाला. तिन्ही पक्षांचे मिळून एकूण३९ मंत्र्यांनी शपथ घेतली आहे. त्यात ३३ कॅबिनेट मंत्री आणि ६ राज्यमंत्री असा समावेश आहे. एकूण आता राज्यकारभाराला…

विशेष मुलांच्या कलाविष्काराने साजरा झाला ‘जागतिक दिव्यांग दिन’

ठाणे :  व्यंगत्वावर मात करीत कलागुण सादर करणाऱ्या विशेष मुलांना आत्मनिर्भर बनविण्यासाठी निश्चितपणे महापालिका त्यांच्या पाठीशी उभी राहिल  संवेदनशील अशी ही विशेष मुले असून त्यांना विविध खेळांमध्ये सहभागी करुन घेण्याच्या दृष्टीनेही महापालिका प्रयत्न करेल असे नमूद करीत महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी सर्व विशेष मुलांना, त्यांच्या पालकांना जागतिक दिव्यांग  दिनाच्या शुभेच्छा दिल्या. जागतिक दिव्यांग दिन हा सर्वत्र 3 डिसेंबर रोजी साजरा करण्यात आला, या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिकेने आज (17 डिसेंबर) डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृह येथे साजरा करण्यात आले. यावेळी  अतिरिक्त आयुक्त 2 प्रशांत रोडे, उपायुक्त उमेश बिरारी, जी.जी. गोदेपुरे, अनघा कदम, कार्मिक अधिकारी दयानंद गुंडप, जिद्द शाळेच्या मुख्याध्यापिका अर्चना शेटये, दिव्यांग कला केंद्राचे  ‍किरण नाक्ती यांच्यासह  दिव्यांग मुलांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या निमित्ताने आदित्य प्रतिष्ठान ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दिव्यांग कला केंद्र ठाणे प्रस्तुत अरेरे ते अरेव्वा..” या विशेष मुलांचा कलाविष्कार रसिकांना पाहावयास मिळाला. यावेळी आयुक्त सौरभ राव यांनी विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या कार्यक्रमाचे कौतुक केले. दिव्यांग मुलांनी सादर केलेले नृत्य, गाणी यावर रसिकांनीही एकच ठेका धरला. ‘गणेश वंदना, सत्यम शिवम् सुंदरम, डिपाडी डिपांग.., वाजले की बारा.. अभंग, कोळीगीते’ यासह विविध गाणी दिव्यांग कला केंद्राच्या विशेष मुलांनी सादर केले. या कार्यक्रमास वेळी दृष्टिहीन वादकांनी गाण्यांना साथ संगत केली.  मुलांनी सादर केलेल्या नृत्याविष्काराला रसिकांनी चांगलीच दाद दिली. तसेच दृष्टिहीन गायक गायिकांनी अवीट गोडीची गाणी सुरेल आवाजात गात रसिकांना मंत्रमुग्ध केले. यावेळी ठाणे महापालिकेचे  अतिरिक्त आयुक्त 2 प्रशांत रोडे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. विशेष मुलांमधील कलागुणांना वाव देण्यासाठी महापालिकेच्या माध्यमातून दरवर्षी या कार्यक्रमाचे आयोजन  केले जाते. दिव्यांगाना  मुख्य प्रवाहात आणणे हा या मागील हेतू असून यासाठी महापालिका सतत प्रयत्नशील असल्याचे त्यांनी प्रास्ताविकपर भाषणात नमूद केले.  संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचलन राजेंद्र पाटणकर यांनी केले.

वाल्मिकी नगरात महाभंडाऱ्याचे आयोजन

माथेरान : माथेरान मधील युवा रुखी गुजराती समाजाच्या वतीने श्री अंबे मातेच्या पूजेनिमित्ताने मंगळवार दि.१७ रोजी येथील वाल्मिकी नगरात वाल्मिकी बांधवांकडून महाभंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले यावेळी भाविकांनी अंबे मातेचे दर्शन घेऊन महाभंडाऱ्याचा लाभ घेतला. अत्यंत प्रसन्न वातावरणात वाल्मिकी बांधवांनी येणाऱ्या भाविकांची उत्तम प्रकारे सोय करून उपस्थित मान्यवरांचे शाल आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.याप्रसंगी माजी नगरसेवक शिवाजी शिंदे, नरेश परदेशी, निखिल शिंदे, प्रकाश सुतार,प्रमोद नायक, मुकुंद रांजणे, जनार्दन पार्टे आदी उपस्थित होते. युवा रुखी गुजराती समाजाचे अध्यक्ष गौरंग वाघेला त्याचप्रमाणे अंबालाल वाघेला, दीपक पुरबिया,रुपचंद वाघेला, छगन पुरबिया, राजेश वाघेला,कांती पुरबिया, माजी नगरसेवक संतोष लखन,नरेश पुरबिया यांसह अन्य समाज बांधवांनी हा छोटेखानी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष मेहनत घेतली. 0000

ठाण्यात उड्डाणपूलाखाली बेकायदा वाहनतळासह टपऱ्या

ठाणे : सुरक्षेच्या दृष्टिने उड्डाणपूलाखाली वाहनतळ किंवा वाहने उभी करण्यास बंदी असतानाही ठाणे शहरातील कापूरबावडी, माजिवडा, मीनाताई ठाकरे चौक येथील उड्डाणपूलाखाली वाहनतळ, बेकायदा टपऱ्या, रिक्षा थांबा थाटण्यात आल्याचा प्रकार उघडकीस…