घुसखोर बांगलादेशींचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर
ठाणे : भिवंडी येथील रेडलाईट एरिया म्हणून प्रचलित असलेल्या हनुमान टेकडी परिसरातून ठाणे गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्ष आणि भिवंडी पोलिसांनी कारवाई करून सहा घुसखोर बांगलादेशी महिलांना नुकतीच…
ठाणे : भिवंडी येथील रेडलाईट एरिया म्हणून प्रचलित असलेल्या हनुमान टेकडी परिसरातून ठाणे गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्ष आणि भिवंडी पोलिसांनी कारवाई करून सहा घुसखोर बांगलादेशी महिलांना नुकतीच…
नागरिकांचे हाल ठाणे : ठाणे महापालिकेच्या परिवहन सेवेतील सुमारे ५५० कंत्राटी चालक मंगळवारी सकाळी अघोषित संपावर गेले आहेत. ठेकेदारामार्फत वाढीव वेतन मिळालेले नाही. त्यामुळे हा संप पुकारल्याचे कंत्राटी कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. या संपामुळे बस थांब्यावर प्रवाशांची गर्दी झाली आहे. वाहतूक कोंडी त्यातच, टिएमटी चालकांचा संप या दोन्ही प्रकारामुळे नागरिकांचे हाल झाले. ठाणे महापालिका क्षेत्रात टिएमटीच्या माध्यमातून महापालिका सार्वजनिक वाहतुकीचा पर्याय उपलब्ध करून देते. टिएमटीच्या ताफ्यात ४७४ बसगाड्या असल्या तरी यातील सुमारे ५० बसगाड्या विविध कारणांमुळे प्रवासी वाहतुकीसाठी उपलब्ध होत नाही. यातील २२५ बसगाड्या खासगी ठेकेदारामार्फत चालविल्या जातात. या बसगाड्या घोडबंदर येथील आनंद नगर आगारातून सुटतात. ठाण्यातील लोकसंख्येच्या तुलनेत टिएमटी बसगाड्यांची सुविधा पुरेशी नाही. त्यामुळे दररोज सकाळी आणि रात्रीच्या वेळेत या बसगाड्यांमध्ये प्रवाशांची गर्दी असते. मंगळवारी सकाळी टिएमटीचे चालक अघोषित संपावर गेले. ठेकेदारने नियमानुसार वेतन वाढविले नसल्याने हा संप पुकारण्यात आल्याचे कंत्राटी कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. या संपाचा परिणाम नागरिकांना सहन करावा लागत आहे. टिएमटीच्या बसथांब्यांवर प्रवाशांची गर्दी झाली आहे. त्यातच मुंबई नाशिक महामार्गावर वाहतूक कोंडी झाल्याने टिएमटीच्या इतर बसगाड्या प्रवाशांना वेळेत उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे नागरिकांचे हाल झाले आहेत. प्रशासनाकडून हा संप मिटविण्याबाबत मार्ग काढला जात असल्याची माहिती टिएमटीच्या अधिकाऱ्यांनी दिली. प्रशासनाने वाढीव वेतनाबाबत लिखित द्यावे. त्यानंतर लगेचच संप मागे घेतला जाईल असे कंत्राटी कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. 00000
डॉ. प्रवीण घाडीगावकर यांनी केले मार्गदर्शन डोंबिवली : डोंबिवलीत हजारो नागरिकांची गर्दी झालेल्या अखिल भारतीय आगरी महोत्सवात सामाजिक, सांस्कृतिक आणि प्रबोधनात्मक कार्यक्रमांबरोबरच उत्तम आरोग्यासाठी ह्रदयरोग व मधुमेहाबाबतही जनजागृती करण्यात आली. माधवबाग क्लिनिकचे डॉ. प्रवीण घाडीगावकर यांनी तारुण्यातही ह्रदयरोगाचा धोका वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना जीवनशैलीत बदल करण्याचे आवाहन केले. आगरी युथ फोरमतर्फे डोंबिवलीतील संत सावळाराम म्हात्रे क्रीडा संकुलात सुरू असलेल्या आगरी महोत्सवातील सातव्या दिवशी डॉ. प्रवीण घाडीगावकर यांचे व्याख्यान आयोजित केले होते. आगरी युथ फोरमचे अध्यक्ष गुलाब वझे यांनी स्वागत केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शरद पाटील यांनी केले. बदलत्या जीवनशैलीमुळे सध्या ह्रदयरोग व मधुमेहाचा धोका वाढला आहे. एखादी व्यक्ती फिट दिसत असतानाही, त्याला अचानक ह्रदयरोगाचे निदान होते. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने काळजी घेण्याची गरज आहे. ह्रदयाच्या कार्यात अडथळा आणण्यासाठी मोठे शत्रू हे वजन, वाढलेला रक्तदाब आणि साखर आहेत. ते नियंत्रणात न आल्यास पुढील चार ते पाच वर्षात ह्रदयाचा त्रास होऊ शकतो.त्यामुळे आजारी पडण्याआधीच ह्रदयरोग व मधुमेह होऊ नये, यासाठी काळजी घ्यावी, असे आवाहन डॉ. घाडीगावकर यांनी केले. दररोज दोन किलोमीटर अंतर अर्ध्या तासात चालल्यानंतर तुम्हाला धाप लागल्यास ह्रदयाची तपासणी आवश्यक आहे, असे प्रतिपादन डॉ. घाडीगावकर यांनी केले. ह्रदयविकाराचा ह्रदयाकडून सिग्नल दिला जातो. तो ओळखून वेळीच उपचार करावेत. चालताना लागलेली धाप, छातीत वेदना आणि पायावरील सूज येत असल्यास तुमच्या ह्रदयातील ताकद कमी झाल्याची दाट शक्यता आहे. अशा परिस्थितीत ह्रदयविकाराचा धक्का बसल्यास जीवावर बेतू शकते, ते ध्यानात घेऊन प्रत्येक व्यक्तीने काळजी घ्यावी. दररोज चालण्याबरोबरच आहारात बदल करावेत. वजन वाढणार नाही, असा आहार घ्यावा. मीठ, साखर, मैदा व तेलाचे प्रमाण कमी करावे. आपल्या जीवनशैलीत बदल केल्यास ह्रदयरोग व मधुमेहाला दूर ठेवता येईल, असे आवाहन डॉ. घाडीगावकर यांनी केले. भारत ही मधुमेहाची राजधानी झाली आहे. शत्रू राष्ट्राने हल्ला करण्यापेक्षा भविष्यात मधुमेहामुळे नागरिकांना अनेक व्याधींचा सामना करावा लागेल, अशी भीती डॉ. घाडीगावकर यांनी व्यक्त केली. या महोत्सवासाठी आगरी युथ फोरमच्या पदाधिकाऱ्यांसोबत दिलीप देसले, संतोष संते, गुरुनाथ म्हात्रे, कांता पाटील, अशोक पाटील, सदा म्हात्रे, नारायण म्हात्रे, जयेंद्र पाटील यांच्याकडून मेहनत घेतली जात आहे. 000
तीन वर्षांत नऊ हजारहून अधिकजणांवर कारवाई ठाणे : मध्य रेल्वे मार्गावरील उपनगरीय प्रवासात मागील काही वर्षांपासून अपंगांच्या डब्यात प्रवास करण्याचे प्रकार वाढले आहेत. मागील तीन वर्षांत ठाणे रेल्वे स्थानकातून नऊ हजार ३६२ प्रवाशांवर रेल्वे सुरक्षा दलाने कारवाई केली आहे. सर्वाधिक कारवाई या वर्षी म्हणजेच १ जानेवारी ते १३ डिसेंबर या कालावधीत झाली असून या प्रवाशांची संख्या तीन हजार ८७० इतकी आहे. असे असले तरी कारवाई होत असतानाही अपंगांच्या डब्यातील प्रवास कमी होत नसल्याचे चित्र आहे. ठाणे रेल्वे स्थानकातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अपंगांना सुरक्षित प्रवास करता यावा यासाठी उपनगरीय रेल्वेगाड्यांमध्ये अपंगांना डबा आरक्षित केलेला असतो. परंतु या डब्यांमध्ये धडधाकड प्रवाशांची घुसखोरी वाढली आहे. रात्री आणि सकाळच्या वेळेत प्रवास करताना नोकरदारांची लोकलमध्ये गर्दी होत असते. ही गर्दी टाळण्यासाठी अपंग नसलेले प्रवासी थेट अपंग डब्यांमध्ये प्रवेश करून प्रवास करतात. अनेकदा हे प्रवासी त्यांच्या आसनाचाही ताबा घेत असतात. त्यामुळे अपंग प्रवासी हैराण झाले आहेत. मागील तीन वर्षांत म्हणजेच, २०२२ ते २०२४ या कालावधीत नऊ हजार ३६२ प्रवाशांवर कारवाई करण्यात आली. या प्रवाशांवर कारवाई केल्यानंतर त्यांना न्यायालयात हजर करण्यात येते. त्यानंतर न्यायालय ठरवेल त्या प्रमाणे त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली जाते. ठाणे रेल्वे स्थानकामध्ये २०२२ या वर्षात २ हजार ५१५ प्रवाशांवर कारवाई झाली. तर २०२३ या वर्षी २ हजार ९७७ प्रवाशांवर कारवाई झाली आहे. सर्वाधिक कारवाई २०२४ या वर्षामध्ये झाली आहे. १ जानेवारी ते १३ डिसेंबर २०२४ या कालवधीत ३ हजार ८७० प्रवाशांवर कारवाई झाली आहे. यावर्षी १ जानेवारी ते ३० जून या कालावधीत २ हजार ६१ प्रवाशांवर कारवाई झाली. तर १ जुलै ते १३ डिसेंबर या कालावधीत १ हजार ८०९ प्रवाशांवर कारवाई झाली आहे. कोट प्रवाशांनी अपंगांच्या डब्यात प्रवेश करून प्रवास करू नये. अन्यथा त्यांच्यावर कायद्यानुसार कारवाई केली जाईल. अपंगांच्या डब्यात घुसखोरी रोखण्यासाठी आम्ही अभियानही सुरू केले आहे. – सुरेंद्र कुमार कोस्टा, निरीक्षक, रेल्वे सुरक्षा दल, ठाणे स्थानक. ०००००
अलिबाग : ज्येष्ठ चित्रकार चंद्रकला कदम यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त अलिबागमधिल मापगावचे माजी सरपंच सुनिल थळे यांनी अभिष्ठचिंतन केले. आपल्या चित्रकलेने चंद्रकला कदम यांनी अलिबागचे नाव देशात उंचावले अशा शब्दात थळे यांनी त्यांचा गौरव केला. यावेळी मापगांवमधिल अनेक मान्यवर चंद्रकला कदम यांना शुभेच्छा देण्यासाठी उपस्थिती होते. चंद्रकला कदम यांनी चितारलेल्या चिंत्रांना महाराष्ट्राच्या विधीमंडळासह देशाच्या संसदेतही मानाचे स्थान मिळाले आहे. तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयींच्या काळात देशाच्या संसदेत स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे तैलचित्र लावले गेले. हे तैलचित्र चंद्रकला कदम यांनी चितारले होते. चंद्रकला कदम यांना शुभेच्छा द्यायला यावेळी मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष संदीप चव्हाण, पत्रकार चाळके आणि ज्येष्ठ पत्रकार आणि चंद्रकला कदम यांचे पती कुमार कदम उपस्थित होते. फोटोओळ ज्येष्ठ चित्रकार चंद्रकला कदम यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त अलिबागमधिल मापगावचे माजी सरपंच सुनिल थळे यांनी अभिष्ठचिंतन केले. यावेळी मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष संदीप चव्हाण, ज्येष्ठ पत्रकार कुमार कदम, पत्रकार वैभव चाळके आणि मापगावचे मान्यवर उपस्थित होते.
ठाणे पत्रकार भवन गैरव्यवहार प्रकरण अनिल ठाणेकर ठाणे : ठाणे जिल्हा पत्रकार भवन गैरव्यवहार प्रकरणात ठेकेदारासह संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत. ठाणे जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष संजय पितळे यांनी सातत्याने केलेल्या पाठपुराव्याला यश आले असुन ठेकेदार राजन शर्मा आणि संबधितांच्या समोरील अडचणीत वाढ झाली आहे. ठाणे जिल्हा पत्रकार संघाला राज्य शासनाने गावदेवी येथील भूखंड पत्रकार भवन बांधण्यासाठी दिला होता. पत्रकार संघाच्या तत्कालीन कार्यकारीणी सदस्यांनी ठेकेदार राजन शर्मा सोबत बेकायदेशीर करारनामा करून शासनाची कोणतीही परवानगी न घेता पत्रकार भवन उभारले होते. ठेकेदार राजन शर्मा यांनी पत्रकार भवना व्यतिरिक्त लगतच्या जागेत आणखी एक बेकायदा तीन मजली इमारत उभारली होती. याप्रकरणी शासनाने शर्तभंगाची कारवाई सुरू केली असता ठेकेदार शर्मा याने न्यायालयातुन स्थगिती मिळवली होती. तत्कालीन संघाची कार्यकारीणी, जिल्हा प्रशासन यांनी सदरची स्थगिती उठवण्याबाबत कोणतेही प्रयत्न न केल्यामुळे गेली पंचवीस वर्षे या दोन्ही इमारतींचा ताबा ठेकेदार शर्मा याच्याकडेच होता. तो या दोन्ही इमारतींचा गैरवापर करून यातील काही गाळे भाड्याने तर काही गाळे विक्री करून शासनासह पत्रकारांची फसवणूक केली होती. पत्रकारांसाठी राखीव असलेल्या या भूखंडावरील भवनाचा उपयोग पत्रकारांना झालाच नव्हता. ही बाब ठाणे जिल्हा पत्रकार संघाचे विद्यमान अध्यक्ष संजय पितळे यांनी प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिल्याने तत्कालीन उपविभागीय अधिकाऱ्यांनी हा भूखंड शासनाच्या ताब्यात घेण्याचा आदेश ३ ऑगस्ट २०२२ रोजी दिला होता. तसेच, तहसिलदारांच्या आदेशान्वये या जागेवरील इमारती निष्काषित करून रिकाम्या भूखंडाला तारेचे कंपाउंड उभारून शासनाचा बोर्ड लावला आहे. ठेकेदार शर्मा याने तत्कालीन महसुल मंत्र्याकरवी या गैरव्यवहार प्रकरणाला स्थगिती मिळवली होती. यावर जिल्हाध्यक्ष संजय पितळे यांनी,ठाणे उपविभागीय अधिकाऱ्याकडे वारंवार पाठपुरावा सुरूच ठेवला होता. त्यानुसार सहायक सरकारी वकील व अतिरिक्त सरकारी अभियोक्ता, यांच्या १३ जाने. २०२२ रोजीच्या पत्रात नमूद केल्यानुसार या गैरव्यवहार प्रकरणात ठेकेदार शर्मा व संबंधीतांवर फौजदारी गुन्हा दाखल करुन त्या कार्यवाहीचा अनुपालन अहवाल सादर करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत. ०००००
ठाणे : ज्ञानपीठ एज्युकेशन सोसायटी संचलित, ज्ञानपीठ विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, मनोरमा नगर , ठाणे (पश्चिम) या विद्यालयातील प्राथमिक विभागाचा विज्ञान प्रकल्पाला ठाणे महापालिका शिक्षण विभागाच्या वतीने आयोजित तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन २०२४-२५ मध्ये…
अनिल ठाणेकर ठाणे : शहराच्या मनोरमा नगर या दाट लोकवस्ती असलेल्या परिसरात, आंबेडकरी विचारांच्या कार्यकर्त्यांकडून उभारण्यात आलेल्या, डॉ. बाबासाहेब आंबेडकर संस्कार केंद्राची अत्यंत दुरवस्था झाली असून, संस्कार केंद्राची अनेक महिने स्वच्छता न केल्याने, पालापाचोळा आणि कचरा साचल्यामुळे, साहजिकच भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा हा एकप्रकारे अवमान असल्याची प्रतिक्रिया परिसरातील नागरिकांकडून व्यक्त होत आहे. दुर्दैवाची बाब म्हणजे, ६ डिसेंबर या बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणाच्या दिवशीदेखील, संबंधित संस्कार केंद्राच्या कार्यकर्त्यांचे याठिकाणी दुर्लक्ष झालेले असल्याने आंबेडकरी जनतेमध्ये तीव्र संताप व्यक्त होताना दिसत आहे. मनोरमा नगरमधील श्रुती पार्क कॉम्प्लेक्सच्या शेजारी असणाऱ्या, ठाणे महानगरपालिका परिवहन सेवेच्या (टीएमटी) बसथांब्याला लागुनच हे संस्कार केंद्र असून, आधीच फेरीवाल्यांच्या विळख्यामुळे आणि त्यांच्याकडून होणाऱ्या भाजीपाल्याच्या कचऱ्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर संस्कार केंद्राची अवस्था अत्यंत दयनीय झाल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, मनोरमा नगरमध्ये वास्तव्यास असणारे आंबेडकरी चळवळीतील पत्रकार आणि ‘लोकमित्र’ दैनिकाचे संपादक कुणाल बागुल यांच्याशी संपर्क साधला असता, या संस्कार केंद्राशी संबंधित असणाऱ्यांचा, बाबासाहेबांच्या विचारांशी कोणताही संबंध नसून, निव्वळ बॅनरवर झळकून स्वतःच्या प्रसिद्धीसाठी झटणारे ते कार्यकर्ते असल्याची प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली. सध्या ठाणे शहराच्या विविध भागांत, ‘धर्मराज्य पक्षा’च्या वतीने ‘ईव्हीएम’विरोधी जनजागृती मोहीम व “जनमत-चाचणी” सुरु करण्यात आलेली असून, त्याच अनुषंगाने सोमवार, १६ डिसेंबर-२०२४ रोजी, मनोरमा नगर येथे, पक्षाध्यक्ष राजन राजे यांच्या प्रमुख उपस्थितीत, मतपत्रिकेद्वारे मतदान करण्याचे आवाहन, पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून परिसरातील नागरिकांना केले जात असताना, याच डॉ. बाबासाहेब आंबेडकर संस्कार केंद्राच्या एका कार्यकर्त्याने, याठिकाणी बांधण्यात आलेला ‘धर्मराज्य पक्षा’च्या घोषणांचा फलक, जो कार्यक्रम संपेपर्यंत ठेवण्यात येणार होता, तो दादागिरी करुन काढायला लावला होता. यासंदर्भात, पत्रकार कुणाल बागुल यांच्याशी संपर्क साधला असता, मतदानाचा अधिकार हा, बाबासाहेबांच्या संविधानाने प्रत्येक भारतीय नागरिकाला दिलेला अधिकार असून, त्याचा प्रसार करणारा फलक लावण्यास संस्कार केंद्राच्या कार्यकर्त्याने आक्षेप घेणे, ही लाजिरवाणी घटना असल्याचे परखड मत त्यांनी व्यक्त केले. एकेठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाखाली संस्कार केंद्राची उभारणी करायची आणि दुसरीकडे त्याची स्वच्छता न राखता, उलट लोकशाहीमार्गाने जनजागृती करणाऱ्या ‘धर्मराज्य पक्षा’च्या कार्यकर्त्यांवर अरेरावी करायची, ही संस्कृती नसून, विकृती असल्याचे तिखट प्रतिक्रिया पत्रकार कुणाल बागुल यांनी, याप्रकरणी दिली आहे. 0000
डोंबिवली : भारताचे पारपत्र (पासपोर्ट) आणि व्हिसाविना गेल्या आठ वर्षांपासून कल्याण पूर्वेकडे असलेल्या विठ्ठलवाडीतील जुनी सोनिया कॉलनीत वास्तव्य करणाऱ्या दोघा बांग्लादेशी घुसखोर दाम्पत्याला कोळसेवाडी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी…
मुंबई : संविधान बदलाचे रक्त काँग्रेसच्या तोंडाला लागले आहे या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विधानाचा खासदार वर्षा गायकवाड यांनी खरपूस समाचार घेतला. काँग्रेसचे रक्त देशाची एकता व अखंडतेसाठी या मातीत…