जगातील पहिले सुवर्ण स्वरमंडल पनवेलमध्ये
पनवेल : शास्त्रीय गायनात स्वरमंडल या झंकार वाद्याला एक परंपरा आणि अनन्य साधारण महत्व आहे. शास्त्रीय संगीतातील गायक या वाद्याचा उपयोग करत असतात. असाच एक स्वरमंडल पनवेलमध्ये दाखल झाला आहे,…
पनवेल : शास्त्रीय गायनात स्वरमंडल या झंकार वाद्याला एक परंपरा आणि अनन्य साधारण महत्व आहे. शास्त्रीय संगीतातील गायक या वाद्याचा उपयोग करत असतात. असाच एक स्वरमंडल पनवेलमध्ये दाखल झाला आहे,…
शाश्वत भविष्याकरिता माहिती व ज्ञानाच्या आदानप्रदानासाठी नवी मुंबई : नॅशनल युनिव्हर्सिटीच्या विद्यार्थ्यांनी नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयास भेट देत महानगरपालिकेच्या विविध प्रकल्पांची व उपक्रमांची माहिती जाणून घेतली आणि भारतातील एका आधुनिक…
नवी दिल्ली : बांगलादेशात हिंदू अल्पसंख्याकांवर होत असलेल्या हल्ल्यांविरोधात विरोधात शिवसेनेचे ठाणे लोकसभा खासदार नरेश म्हस्के यांनी संसदेत शून्य प्रहरात जोरदार आवाज उठविला. बांगलादेशातील हिंदू अल्पसंख्याकांच्या संरक्षणाची मागणी खासदार नरेश…
मुंबई : दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने गीता व ज्ञानेश्वरीवर आधारित डॉ. रवींद्र थत्ते यांचे `तत्वज्ञान सोपे आहे’ हे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. कै. वासुदेव आणि नलिनी परांजपे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ…
आंबेडकरी संघटनांची ठाण्यात जोरदार निदर्शने अनिल ठाणेकर ठाणे : परभणी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यावरील दगडफेक आणि संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना या निषेधार्थ आंदोलन करणाऱ्या सोमनाथ सुर्यवंशी या तरुणाचा पोलीस कोठडीत संशयास्पद मृत्यू झाला आहे. त्या निषेधार्थ विविध आंबेडकरी संघटनांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शने केली. दरम्यान, आंबेडकरवादी संघटनांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय ते तहसील कार्यालय अशी निषेध रॅली काढण्यात आली. परभणी येथे एका समाजकंटकांने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यावर दगडफेक केली होती. तसेच, तेथील संविधानाच्या प्रतिकृतीची नासधूस करण्यात आली होती. त्यानंतर सबंध परभणी शहरात जनक्षोभ उसळला होता. या प्रकरणी सोमनाथ सुर्यवंशी या कार्यकर्त्यास अटक करण्यात आली . पोलिसांच्या कोठडीत असताना त्याचा संशयास्पद मृत्यू झाला. हा मृत्यू नैसर्गिक नसून त्याला ठार मारण्यात आले असल्याचा आरोप करीत पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष राजाभाऊ चव्हाण, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आबासाहेब चासकर, पीआरपीचे जिल्हा महासचिव शंकर जमदाडे , पीआरपीच्या महिलाध्यक्षा मीनाताई अलिंग, संदीप खांबे , प्रमोद इंगळे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शने करण्यात आली. यावेळेस कार्यकर्त्यांनी पोलिसांच्या कारभाराविरुद्ध जोरदार घोषणाबाजी केली. याप्रसंगी राजाभाऊ चव्हाण यांनी, सोमनाथ सुर्यवंशी याचा नैसर्गिक मृत्यू झालेला नसून तो अनैसर्गिक मृत्यू आहे. पोलिसी मारहानीमुळेच सोमनाथ दगावला आहे. याची चौकशी करून पोलीस अधीक्षक, वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि तपासी अंमलदार यांना बडतर्फ करावे; पुतळ्यावर दगडफेक करणार्यामागील मास्टर ऑफ माईंडचा शोध घ्यावा; अन्यथा हे आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशारा दिला. तर, आबासाहेब चासकर यांनी, सोमनाथ सुर्यवंशी याचा मृत्यू नसून खूनच झालेला आहे. त्याचा निषेध म्हणून आम्ही हे आंदोलन करीत आहोत. जर, सोमनाथच्या मारेकऱ्यांना अटक झाली नाही तर राज्यभर जनक्षोभ उसळेल, असा इशारा दिला.
अशोक गायकवाड नवी मुंबई : ग्रामीण महिलांच्या व्यवसायाला अधिक व्यापक बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी महालक्ष्मी सरस हे एक उत्तम व्यासपीठ ठरले आहे. महालक्ष्मी सरस २०२४ प्रदर्शन व विक्रीचे भव्य उद्घाटन उमेद अभियानाचे मुख्य कार्यकारी अधिकारी रुचेश जयवंशी यांच्या हस्ते पार पडले त्यावेळी ते बोलत होते. सिडको एक्झिबिशन सेंटर, वाशी, नवी मुंबई याठिकाणी भरवण्यात आलेल्या या प्रदर्शनात ‘घे भरारी – मला पंख मिळाले’ या कार्यक्रमात सहभागी उमेद अभियानाच्या महिलांनी या कार्यक्रमाची शोभा वाढवली. या उद्घाटन सोहळ्या प्रसंगी उमेद अभियानचे अतिरिक्त संचालक परमेश्वर राऊत, अवर सचिव धनवंत माळी, श्रीमती मंजिरी टकले तसेच नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी बोलताना मुख्य कार्यकारी अधिकारी रुचेश जयवंशी म्हणाले की, ग्रामीण महिलांच्या व्यवसायाला अधिक व्यापक बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी महालक्ष्मी सरस हे एक उत्तम व्यासपीठ ठरले आहे. ग्रामीण महिला उद्योजकांच्या उत्पादनांना चालना मिळावी, त्यांना आर्थिक स्वावलंबनाचा आधार मिळावा, यासाठी हे प्रदर्शन अत्यंत महत्त्वाचे ठरेल. नागरिकांनी मोठ्या संख्येने प्रदर्शनाला भेट देऊन ग्रामीण महिलांना पाठिंबा द्यावा. असे अवाहान ही जयवंशी यांनी केले.या प्रदर्शनात ४०० पेक्षा अधिक स्टॉल्स उभारण्यात आले आहेत. यामध्ये हातमाग, कलाकुसर, हस्तकला, साड्या, कपडे, मसाले, सजावटीच्या वस्तू, तसेच विविध गृहपयोगी वस्तूंचा समावेश आहे.तसेच, महाराष्ट्राच्या विविध भागांतून आलेल्या अस्सल खाद्यसंस्कृतीचा आस्वाद घेण्यासाठी ७० भव्य स्टॉल्सचे फूड कोर्ट उभारण्यात आले आहे. या प्रदर्शनात ग्रामीण महिलांनी आपल्या कौशल्याने साकारलेल्या उत्पादनांचा विशेष ठसा उमटवला आहे. नवी मुंबईतील नागरिकांना या संधीचा लाभ घेता येणार आहे. महालक्ष्मी सरस २०२४ हे प्रदर्शन फक्त विक्रीसाठी नाही तर ग्रामीण संस्कृतीचा आणि कलेचा अनुभव घेण्यासाठी एक पर्वणी आहे. संपूर्ण वातानुकूलित व्यवस्थेमुळे खरेदीसाठी अतिशय सुखद वातावरण आहे. या प्रदर्शनाला महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यातील महिलांनी आपल्या उत्पादनांसह सहभाग घेतला आहे. सर्वांनी मोठ्या संख्येने या प्रदर्शनाला भेट द्यावी आणि ग्रामीण महिलांच्या यशाला प्रोत्साहन द्यावे.
सोमवारपासून नागुपरात आणखी एका हिवाळी अधिवेशनाची सुरुवात होते आहे. पण हे नेहमीसारखे मजेचे आणि हुरडा पार्ट्यांचे, जंगल सफारींचे अधिवेशन नाही. हे थोडे गरम वातावरणात होणारे अधिवेशन आहे. त्यामुळेच सध्या जरी नागपुरात…
गुजरात मधील नडियाद येथे ३१ ऑक्टोबर १८७५ ला सरदार वल्लभभाई पटेल नावाचा लोहपुरुष जन्माला आला आणि भारतीय राजकारणात एक पोलादी व्यक्तीमत्व उदयास आले. कारण त्यांनी देशांच्या स्वतंत्र लढ्यासाठी व स्वातंत्र्य…
भारताचे पहिले उपपंतप्रधान, पहिले गृहमंत्री, लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांची आज स्मृतिदिन. सरदार वल्लभभाई पटेल यांचा जन्म ३१ ऑक्टोबर १८७५ रोजी आणंद या छोट्याशा गावात झाला. त्यांचे वडील झव्हेरिभाई यांनी…