Category: होम

 डोंबिवलीत रविवारी जगद्गुरुंच्या सिद्ध पादुकांचे दिव्य दर्शन

डोंबिवलीत रविवारी जगद्गुरुंच्या सिद्ध पादुकांचे दिव्य दर्शन शाळेतील ३० गरजू विद्यार्थ्यांना सायकल वाटप कल्याण : हिंदू धर्मसंस्कृतीत पादुका पूजन व दर्शनाची परंपरा अत्यंत पवित्र मानली जाते. गुरु-शिष्य परंपरेतून आलेल्या या परंपरेला सगुण स्वरूपाचे प्रतीक मानले जाते. याच भक्तीभावातून जगद्गुरु रामानंदाचार्य श्री नरेंद्राचार्यजी यांच्या दिव्य सिद्ध पादुकांच्या दर्शन सोहळ्याचे भव्य आयोजन रविवार, २२ फेब्रुवारी, दुपारी ४ वाजता डोंबिवली पूर्व येथील चंद्रेश नीलकंठ बिल्डिंग मागील मैदान, छत्रपती शिवाजी महाराज चौक, लोढा हेवन, निळजे, कल्याण-शिळ रोड येथे करण्यात आले आहे. रामानंद संप्रदाय – जिल्हा दक्षिण ठाणे भक्त सेवा मंडळाच्या वतीने आयोजित या सोहळ्यात सामाजिक बांधिलकी जपत ३० गोरगरीब व गरजू विद्यार्थ्यांना सायकल वाटप करण्यात येणार आहे. शिक्षणासाठी दूरवर पायी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना या उपक्रमामुळे मोठा दिलासा मिळणार आहे. अनंत श्री विभूषित जगद्गुरु रामानंदाचार्य श्री नरेंद्राचार्यजी यांनी दिलेल्या ‘ तुम्ही जगा, दुसऱ्याला जगवा’ या संदेशातून प्रेरणा घेऊन हा उपक्रम आयोजित करण्यात आला आहे. विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत ज.न.म. संस्थानाद्वारे जिल्हा परिषद शाळांतील विद्यार्थ्यांना सायकल वितरण होणार आहे. या सोहळ्याच्या निमित्ताने हजारो भक्त, साधक, शिष्य मोठ्या भक्तिभावाने सहभागी होणार असून सिद्ध पादुका रथात विराजमान करून डोंबिवली परिसरातून कार्यक्रमस्थळी भव्य पालखी मिरवणूक काढण्यात येणार आहे. भजन, नामगजर, टाळ-मृदुंगांचा नाद, भगव्या पताका, पारंपरिक वेशभूषा, कलशधारी महिला, लेझीम, फुगड्या आणि आकर्षक देखावे यामुळे परिसर भक्तिरसात न्हाऊन निघणार आहे. वेदोक्त मंत्रोच्चारात पूजन, शेकडो अनुयायांना उपासक दीक्षा दिली जाणार आहे. संस्थानाच्या पुरोहितांकडून वेदोक्त मंत्रोच्चारात सिद्ध पादुकांचे पूजन करण्यात येईल.  त्यानंतर प्रवचन सेवा, भजन सेवा आयोजित करण्यात आली आहे. याप्रसंगी सर्वांनी सहकुटुंब, सहपरिवार, इष्ट मित्रांसह उपस्थित राहून सिद्ध पादुका दर्शनाचा लाभ  घ्यावा, असे आवाहन रामानंद संप्रदाय – जिल्हा दक्षिण ठाणे भक्त सेवा मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

काळ्या दाताचीही फॅशन…

पूर्वी फॅशन बदलायची ती कधीतरी दोन चार वर्षांनी आणि उत्सुक लोकाना कपड्यांची फॅशन कळायची ती सिनेमातून आणि मग त्यानुसार शिंप्याकडून कपडे शिवून घेतले जात. आजची दुनिया तयार कपड्यांची आहे. आकार…

सकारात्मक विचार करुन परीक्षा द्या!

फेब्रुवारी मार्च महिना म्हटलं की परीक्षांचा हंगाम. दरवर्षी याच दोन महिन्यात परीक्षा होतात. दहावी बारावी या बोर्डाच्या परीक्षाही याच काळात असतात. इतकेच काय तर शिष्यवृत्ती, नवोदय यासारख्या स्पर्धा परीक्षाही याच…

वार्ता आणि वास्तव

अलिकडच्या काळात अर्थनगरीमध्ये प्रत्ययाला आलेली काही तथ्ये अधिक महत्वाची आहेत. जीवनावश्यक वस्तूंपेक्षा सोने-चांदी महागाईला जास्त जबाबदार ठरतात, हा असा पहिला महत्वाचा साक्षात्कार म्हणता येईल. दरम्यान, काही कंपन्यांचा ‌‘एआय‌’संदर्भात होणारा खर्च…

काय धडा घेणार?

काय धडा घेणार? मुंबई-पुणे महामार्गावरील बोरघाटात अलिकडेच अनुभवायला मिळालेली तब्बल 32 तासांची वाहतूक कोंडी ही केवळ एक अपघाती घटना नव्हती, तर आपल्या व्यवस्थेतील ढिसाळपणा, नियोजनशून्यता आणि प्रशासनाच्या निष्क्रियतेचे जिवंत उदाहरण…

मेक इन इंडियाचा ‘कुत्रा’ अखेर चायनाचा निघाला !

नवी दिल्ली : जगभराला नादावलेल्या आर्टीफिशिएल टेक्नॉलॉजी म्हणजेच एआयच्या नवी दिल्लीत सुरू असलेल्या  समिटमध्ये आज एका कुत्र्यावरून वाद उद्भवला. मेक इन इंडियाचे प्रॉडक्टम्हणून या समिटमध्ये भारतीय युनिव्हर्सिटी नोएडाच्या गलगोटियाने दावा केलेला रोबॅटिक कुत्रा हा मुळ चायनिज बनावटीचा…

विमानाचा अपघात पायलटनेच घड़वून आणला- रोहीत पवार

स्वाती घोसाळकर मुंबई: जोवर संपुर्ण तपास पुर्ण होत नाही तोवर अजित दादांच्या विमान अपघाताला घात झाल्याचा संशय कायम राहणार आहे. आम्हाला जी माहिती मिळाली आहे ती इतकी चक्रावणारी आहे की त्यामुळे…

शिंदेंच्या भेटीसाठी राज ठाण्याच्या नंदनवनात !

मुंबई : महापालिका निवडणुकीतील कडूगोड आठवणी बाजूला सारत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेण्यासाठी शिंदेंचे ठाण्यातील घर नंदनवन गाठले. राज ठाकरे नंदनवनात आल्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली होती. एकनाथ…

महाराष्ट्रातील राज्यसभेच्या ७ जागांसाठी १६ मार्चला मतदान

 नवी दिल्ली : राष्ट्रवादीचे संस्थापक शरद पवार यांच्या राज्यसभेतील जागेसह अनेक दिग्गजांचा समावेश असलेल्या महाराष्ट्रातील राज्यसभेच्या रिक्त होणाऱ्या ७ जागांसाठी येत्या सोमवारी १६ मार्चला मतदान होणार आहे. भारतीय निवडणूक आयोगाने राज्यसभेच्या देशभरात रिक्त होणाऱ्या ३७ जागांसाठी द्विवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला असून, यामध्ये महाराष्ट्रातील ७ जागांचा समावेश आहे. महाराष्ट्रासोबतच ओडिसा, तामिळनाडू, पश्चिम बंगाल, आसाम, बिहार, छत्तीसगड, हरियाणा, हिमाचल प्रदेश आणि तेलंगणा या राज्यांतील रिक्त होणाऱ्या जागासाठी ही निवडणूक होणार आहे. महाराष्ट्रातील राज्यसभेचे सदस्य असलेले डॉ. भागवत किशनराव कराड, डॉ. फौजिया तहसीन अहमद खान, प्रियंका विक्रम चतुर्वेदी, शरदचंद्र गोविंदराव पवार, धैर्यशील मोहन पाटील, रजनी अशोकराव पाटील आणि रामदास आठवले या सात सदस्यांचा कार्यकाळ २ एप्रिल रोजी संपणार आहे. या निवडणुकीची २६ फेब्रुवारी रोजी अधिसूचना जारी केली जाईल, तर उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख ५ मार्च २०२६ असेल. अर्जांची छाननी ६ मार्च रोजी केली जाणार असून ९ मार्चपर्यंत उमेदवारांना आपले अर्ज मागे घेता येतील. मतदान १६ मार्च रोजी सकाळी ९ ते दुपारी ४ या वेळेत होईल आणि त्याच दिवशी संध्याकाळी ५ वाजता मतमोजणी करून निकाल जाहीर केला जाईल.