Category: होम

 शासनाच्या निधीचा अनियमिततेमुळे म्हसा आरोग्य केंद्र बिनकामाचा?

 आदिवासींच्या आरोग्यावर विपरीत परिणाम.. दखल घेण्याची काळाची गरज… राजीव चंदने मुरबाड : तालुक्यातील नऊआरोग्य केंद्रा पैकी सर्वात जास्त लोकसंख्या असलेल्या म्हसा आरोग्य केंद्रात उपचारासाठी येणाऱ्या आदिवासी बांधवाची पायपीट होऊ नये यासाठी शासनाने सन २०२२ मध्ये पाटगाव परिसरातील चाफेवाडी,गेटाची वाडी,बाटलीची वाडी.वाघाची वाडी अशा सुमारे दहा हजार लोकसंख्या असलेल्या आदिवासी बांधवांना स्थानिक ठिकाणी उपचार मिळावेत यासाठी सुमारे एक कोटी पासष्ट लाख रुपये खर्च करून बांधलेले आरोग्य केंद्र ,गेल्या तीन वर्षांपासून धुळखात पडले असल्याने हजारो आदिवासी बांधवांचा आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला असल्याने आरोग्य विभागाचे कारभारावर सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे. तालुक्यातील म्हसा प्राथमिक आरोग्य केंद्राचे कार्यक्षेत्रात सुमारे सत्तर हजार लोकसंख्या असल्याने त्यांना छोट्या मोठ्या आजारावर उपचार घेण्यासाठी म्हसा आरोग्य केंद्रात धाव घ्यावी लागते.त्यामुळे छोटे मोठे अपघात, सर्पदंश तसेच गर्भवती महिलांना तातडीचे उपचार वेळीच मिळत नसल्याने काहीना उपचारा अभावी आपला जीव गमवावा लागला आहे.यावर पर्याय म्हणुन शासनाने पाटगाव परिसरातील अनेक आदिवासी वाड्या वर वास्तव्य करणाऱ्या आदिवासी बांधवांना तात्काळ उपचाराची सुविधा मिळण्यासाठी तेथे सुमारे एक कोटी पासष्ट लाख रुपये खर्च करून प्रशस्त असे आरोग्य केंद्राची उभारणी केली.त्या ठिकाणी लाईट , पिण्याचे पाणी.तसेच डॉक्टर आणि कर्मचारी यांचे निवासाची सुविधा उपलब्ध करून दिली.तसेच त्या आरोग्य केंद्रात लागणाऱ्या मशिनरी पुरविल्या परंतु आरोग्य विभाग हे केंद्र सुरू करण्यात उदासीनता दाखवत असल्याने.सध्या पावसाने विश्रांती घेतल्याने डासांचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाल्याने मलेरिया टायफॉइड तसेच इतर आजारांनी डोके वर काढल्याने अनेक नागरिकांना त्याची बाधा झाली असुन ते आपल्या शेजारी मोफत उपचार मिळण्यासाठी बांधण्यात आलेले आरोग्य केंद्र धुळखात पडले असल्याने सुमारे पाच ते सात किलोमीटर ची पायपीट करून म्हसा येथे मोफत उपचारासाठी येतात,परंतु तेथे ही डॉक्टर नसल्याने खाजगी उपचार घेण्यासाठी भटकंती करत असल्याचे वास्तव समोर येत आहे. या बाबतीत आदिवासी क्रांती सेनेचे अध्यक्ष दिनेश जाधव यांनी चौकशी करण्याची मागणी केली आहे.. कोट पाटगाव येथील आरोग्य केंद्रात जिल्हा परिषदेने कर्मचाऱ्यांची नेमणूक करुन ते तातडीने सुरू करण्याचे आदेश जिल्हा आरोग्य अधिकारी तसेच तालुका आरोग्य दोनअधिकारी यांनी वेळोवेळी वैद्यकीय अधिकारी.प्राथमिक आरोग्य केंद्र म्हसा यांना दिलेले आहेत. त्यांनी अजुन ते सुरू का केले नाही,याचा लेखी खुलासा मागविण्यात येत आहे.  —-डॉ.श्रीधर बनसोडे.तालुका आरोग्य अधिकारी.पं. समिती मुरबाड. ००००००००००

– शिळफाटा- कल्याण फाटा चौकात लवकरच वाहतूक सिग्नल

 कोंडी व अपघातांवर उपाययोजना नगरसेवक बाबाजी पाटील यांच्या पाठपुराव्याला यश आरती परब दिवा: शिळफाटा-कल्याणफाटा परिसरातील वाढती वाहतूक कोंडी आणि वारंवार घडणाऱ्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर अखेर या दोन्ही महत्त्वाच्या चौकात वाहतूक सिग्नल यंत्रणा…

 विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जचा राष्ट्रवादी शरद पवार गटाने व्यक्त केला निषेध

 शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची केली मागणी कल्याण : दिल्लीत विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठी चार्जच्या निषेधार्थ कल्याणमध्ये  राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) गटाच्या वतीने तहसीलदार कार्यालयावर मोर्चा काढत निषेध व्यक्त करण्यात आला. या सर्व घटनेला केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान जवाबदार असून त्यांनी आपली नैतिक जवाबदारी स्वीकारून राजीनामा देण्याची मागणी यावेळी करण्यात आली. याबाबत राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष डॉ. वंडार पाटील यांच्या शिष्टमंडळाने निवेदन देत आपली मागणी लावून धरली. यावेळी जिल्हाध्यक्ष डॉ. वंडार पाटील यांच्यासह जिल्हा निरीक्षक अविनाश देशमुख, प्रदेश सरचिटणीस रमेश साळवे, कल्याण पश्चिम विधानसभा अध्यक्ष स्वप्निल रोकडे, कार्याध्यक्ष रुपेश थळे, जिल्हा उपाध्यक्ष राजेश शिंदे, नरेश वायले, अनिल सावंत, निखिल कदम, वैभव माळी, संगीता मोरे, शिल्पा कांबळे, प्रेरणा तांबे, भानुदास घुगे, स्वप्निल शेळके आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. राज्यातील लाखो विद्यार्थी आणि युवकांचे भविष्य धोक्यात आलेले असतानाही सरकार केवळ बघ्याची भूमिका घेत आहे. स्पर्धा परीक्षांचे वारंवार पेपर फुटणे. भरती प्रक्रियेतील कठीण गैरव्यवहार ऑनलाइन परीक्षा व्यवस्थेतील त्रुटी पोलीस भरतीतील कथित अन्याय तसेच विद्यार्थी युवकांच्या प्रश्नांकडे सरकारने केलेले दुर्लक्ष यामुळे संपूर्ण राज्यात संतापाची लाट निर्माण झालेली आहे. विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याऐवजी सरकारने जबाबदारी टाळण्याचा मार्ग स्वीकारलेला आहे. विद्यार्थी व युवकांच्या प्रश्नासाठी सोनम वांगचुक यांनी केलेल्या उपोषण आंदोलनाला सरकारने प्रतिसाद दिलेला नाही. तसेच देशातील 20 हून अधिक विद्यार्थ्यांनी या संदर्भात आत्महत्या केल्या असताना नैतिक जबाबदारी स्वीकारून शिक्षण मंत्री यांनी राजीनामा देणे आवश्यक होते. परंतु असंवेदनशील सरकारने अद्याप पर्यंत शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतला नाही. त्यामुळे विद्यार्थी व युवकांच्या न्याय मागण्याबाबत सरकारची भूमिका निराशाजनक व अन्यायकारक असल्याची भावना समाजात वाढत आहे. या सर्व जनविरोधी आणि विद्यार्थ्यांच्या विरोधी धोरणांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष जाहीर निषेध करत असल्याचे जिल्हाध्यक्ष डॉ. वंडार पाटील यांनी सांगितले. यावेळी दिलेल्या निवेदनात  केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा तात्काळ राजीनामा घ्यावा. ज्या कंपनीने ब्लॅक लिस्टेड आहेत त्या व अशा कंपन्यांमधील संचालक असलेल्या संस्थांना काम देण्यात येऊ नये. एनटीए संबंधित विभागांची जबाबदारी निश्चित करून आवश्यक ती कारवाई करावी. ऑनलाइन परीक्षा व्यवस्थेमधील त्रुटी दूर करून पारदर्शक व विश्वासार्य प्रणाली लागू करावी. पोलीस भरती प्रक्रियेतील कथित अन्याय दूर करून पात्र उमेदवारांना न्याय द्यावा. विद्यार्थी व युवकांच्या प्रश्नावर तातडीने ठोस निर्णय जाहीर करावे. महाराष्ट्रातील स्पर्धा परीक्षा, ऑनलाईन घेण्यात येऊ नयेत व त्यासाठी कायमस्वरूपी ऑफलाइन पद्धतीने घेण्यात याव्यात आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या.

मच्छीमारांच्या विविध प्रश्नांबाबत मंत्री नितेश राणे यांच्यासोबत महत्त्वपूर्ण बैठक

पनवेल (प्रतिनिधी) – मत्स्यव्यवसाय क्षेत्रातील विविध प्रश्न, अडचणी आणि प्रलंबित मागण्यांबाबत महाराष्ट्र राज्याचे मत्स्य व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांच्यासोबत भाजपचे महाराष्ट्र प्रदेश चिटणीस आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश…

कल्याण डोंबिवली महानगर साहित्य भारतीच्या वतीने कालिदास जयंती उत्साहात 

कल्याण : कल्याणच्या नमस्कार मंडळ सभागृहात रविवारी कालिदास जयंती कार्यक्रम पार पडला.‌ कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी साहित्य भारतीच्या कल्याण-डोंबिवली महानगराचे अध्यक्ष प्रा. नारायण फडके हे होते. महानगर कार्याध्यक्ष अश्विनी मुजुमदार यांनी प्रास्ताविक…

 पात्र लाभार्थ्यांना योजनांचा लाभ मिळवून द्या : खासदार सुनील तटकरे, नारायण राणे यांचे प्रशासनाला निर्देश

 दिशा समितीच्या बैठकीत योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीवर भर रत्नागिरी | अशोक गायकवाड राज्य आणि केंद्र शासनाच्या कोणत्याही कल्याणकारी योजनेपासून एकही पात्र लाभार्थी वंचित राहणार नाही, याची प्रशासनाने दक्षता घ्यावी. सर्व विभागांनी परस्पर समन्वयाने काम…

आझाद मैदानात अजून किती वर्ष न्याय मागायचा

रमेश औताडे मुंबई : प्रत्येक वेळी आश्वासन देणाऱ्या सरकारने एकदा सांगून टाकावे की आम्ही अजून किती वर्ष आंदोलन करायचे असा सवाल करत शेतकरी लोकनेते रमेश हिंदुराव यांनी आझाद मैदानात साखळी उपोषण आंदोलन सुरू केले आहे. भिवंडी येथील सार्वजनिक बांधकाम विभागातील कथित भ्रष्टाचार चौकशीच्या मागणीसाठी भाई आकाश निर्मळ आणि रमेश हिंदुराव त्यांच्या सहकाऱ्यांनी आझाद मैदानात साखळी उपोषण सुरू केले. उपविभागीय अभियंता दत्तू गीते ३ वर्ष भिंवडी सार्वजनिक बांधकाम उपविभागात सेवा पूर्ण होऊनही त्यांची बदली का झाली नाही. एक कोटी १७ लाख ७२ हजार ६४८ इतक्या रकमेचे वाढीव बिल काढल्याचा आरोप करत संबंधित भ्रष्ट अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात यावी, अशी मागणी उपोषणकर्त्यांनी केली आहे. याप्रकरणी निष्पक्ष चौकशी करावी अन्यथा आंदोलन तीव्र करण्यात येईल, असा इशारा दिला आहे. आझाद मैदानात न्याय मिळणार आहे की फक्त आश्वासनच असा सवाल रमेश हिंदुराव यांनी केला आहे.

आखाड्यांना त्यांच्या पारंपरिक जागा तातडीने द्याव्या’

– सिंहस्थ कुंभमेळा प्राधिकरणाच्या बैठकीत साधू-महंतांची मागणी हरिभाऊ लाखे नाशिक : नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर विविध आखाड्यांच्या साधू-महंतांनी कुंभमेळा प्रशासनाकडे साधुग्राम आणि कुंभग्रामसाठी जागा उपलब्ध करून देण्याची आग्रही मागणी केल्याची माहिती राष्ट्रीय आखाडा परिषदेचे प्रवक्ते संजयदास महाराज यांनी पत्रकार परिषदेत दिली. नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाच्या कार्यालयातील सभागृहात सोमवारी कुंभमेळा आयुक्त शेखर सिंह, नाशिक मनपा आयुक्त मनीषा खत्री आणि पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या उपस्थितीत महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीनंतर निर्मोही आखाड्याचे महंत तथा राष्ट्रीय आखाडा परिषदेचे प्रवक्ते संजयदास महाराज यांनी पत्रकार परिषद घेत कुंभमेळा प्राधिकरणाच्या बैठकीत निर्वाणी, निर्मोही आणि दिगंबर आखाड्यांच्या महंतांनी आपल्या पारंपरिक जागा लवकरात लवकर उपलब्ध करून द्याव्यात, तसेच या जागांवर अतिक्रमाणे असल्यास ती तातडीने हटवून आखाड्यांना जागा ताब्यात देण्यात यावीत, अशी आग्रही मागणी करण्यात आल्याचे सांगितले. यावेळी राष्ट्रीय आखाडा परिषदेचे प्रवक्ते संजयदास महाराज यांच्यासह महंत मोहनदास महाराज (खाकी आखाडा), रामजीदास महाराज (निर्मोही आखाडा, चित्रकूट), महंत राजेंद्रदास महाराज (महामंत्री, आखाडा परिषद), मुलीदास महाराज (निर्वाणी आणि आखाडा), भक्तीचरणदास महाराज (पंचवटी, नाशिक), हेमंतदास महाराज (हनुमान गढी, अयोध्या) आदी उपस्थित होते. नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्याचे ध्वजारोहण ३१ ऑक्टोबर रोजी होणार असून, या सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आमंत्रित करण्यात येणार असल्याची माहिती साधू-महंतांनी पत्रकार परिषदेत दिली. त्याचप्रमाणे साधू-महंतांच्या मागणीनुसार पारंपरिक जागा उपलब्ध झाल्यास आखाड्यांचे निवास आणि धार्मिक कार्यक्रम सुव्यवस्थितपणे पार पडतील, असा विश्वास साधू-महंतांनी व्यक्त केला. सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर आयोजित कुंभमेळा प्राधिकरणाच्या कार्यालयात झालेल्या बैठकीत प्रशासनाने साधू-महंतांसोबत बंद दाराआड चर्चा केली. यावेळी साधू-महंतांनी साधुग्राम उभारणी व साधू-महंतांच्या सुरक्षेविषयी प्रशासनाकडून काय तयारी सुरू आहे? याविषयी माहिती घेतल्याचे सूत्रांनी सांगितले. ०००००००००

झाडांच्या पडलेल्या फांद्या मुळे कोपरीत साथीच्या रुग्णसंख्येत वाढ –  भरत चव्हाण

00000 अनिल ठाणेकर ठाणे : महापालिकेत चार वर्षांच्या प्रशासकीय राजवटीप्रमाणे कारभार सुरू असून, महापालिका अधिकाऱ्यांच्या अनास्थेचा फटका २८ लाख ठाणेकरांना बसला. पावसाच्या काळात झाडाच्या पडलेल्या फांद्या वेळीच उचलल्या न गेल्यामुळे कोपरीत साथीच्या रुग्णसंख्येत वाढ झाली आहे, असा आरोप भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक भरत चव्हाण यांनी महासभेत केला. तसेच पावसाळ्याच्या काळात अग्निशमन, घनकचरा, सार्वजनिक बांधकाम आणि आपत्कालीन विभागाने एकत्रितपणे समन्वयाने काम करावे, अशी मागणी भरत चव्हाण यांनी केली. जुलैच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या पावसाच्या पार्श्वभूमीवर नगरसेवक भरत चव्हाण यांनी महासभेत लक्षवेधी सूचना मांडली होती. पावसाळा लांबल्यानंतर महापालिकेने आपत्कालीन यंत्रणा सज्ज ठेवण्याची अपेक्षा होती. परंतु, पहिल्याच पावसात मोठ्या संख्येने झाडे पडण्याबरोबरच पूरस्थिती निर्माण झाली. त्यानंतर आपत्कालीन विभागाचा बोजवारा उडाल्याचे ठाणेकरांनी पाहिले. वृक्ष प्राधिकरणाच्या कर्मचाऱ्यांकडून अर्धे काम कोपरीत, तर अर्धे काम तीन हात नाका येथे सुरू होते. चेंदणी कोळीवाड्याजवळ रेल्वे बोगद्याखाली सातत्याने पाणी साचत असल्याची तक्रार केल्यावर, एसटीपी विभाग व सार्वजनिक बांधकाम विभाग एकमेकांवर जबाबदारी ढकलत होते. अशा परिस्थितीत अडचणीत सापडलेल्या सामान्य ठाणेकरांनी कोणाकडे दाद मागायची, असा सवाल नगरसेवक भरत चव्हाण यांनी केला. कोपरीमध्ये स्वच्छता निरीक्षकांच्या माध्यमातून दुसऱ्या दिवशी झाडाच्या पडलेल्या फांद्या उचलल्या जातात. तो कोपरी पॅटर्न ठाणे शहरात लागू करावा, अशी सूचना भरत चव्हाण यांनी केली. कोपरीहून पटणी पूलापर्यंत पूल उभारण्यासाठी निविदा काढण्यात आली आहे. परंतु, भूमाफियांकडून सर्रास अतिक्रमणे करून खाडी बुजूवूचाळी उभारल्या जात आहेत. त्यामुळे काही वर्षांनंतर पूल उभारण्याची गरजही लागणार नाही, असा टोला भरत चव्हाण यांनी लगावला. ठाण्यात होणाऱ्या वाहतूककोंडीच्या पार्श्वभूमीवर, महापालिकेने पोलिसांच्या वाहतूक विभागात ट्रॅफिक वॉर्डन उपलब्ध केले आहेत. मात्र, आजही अनेक भागातील वाहतूककोंडी अधिक भीषण होत आहे. दहा मिनिटांच्या प्रवासासाठी अर्धा ते पाऊण तास लागतो. वाहतूक कोंडीत शाळांमधील मुले अडकत आहेत. या पार्श्वभूमीवर महापालिकेने वाहतूक पोलिसांबरोबर समन्वय साधून कार्य करावे, अशी सूचना नगरसेवक भरत चव्हाण यांनी केली. मॅरेथॉनच्या प्रतिकाचा पुतळा गायब ठाणे शहराला मॅरेथॉनचा इतिहास आहे. मॅरेथॉननिमित्ताने कोपरीत तीन फूटांचा आकर्षक पुतळा उभारण्यात आला होता. मात्र, तो मुसळधार पावसानंतर गायब झाला आहे. त्याच्या चोरीबाबत महापालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांना काहीही माहिती नाही, याकडेही नगरसेवक भरत चव्हाण यांनी लक्ष वेधले. 00000000000

पारमिता धर्मादाय न्यासाकडून विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्याचे वाटप

कल्याण : पारमिता धर्मादाय न्यास, कल्याण (प.) या शैक्षणिक, सामाजिक व बहुउद्देशीय विकासकामे करणाऱ्या संस्थेच्या वतीने नालंदा विद्यालय, कल्याण (पूर्व) येथील इयत्ता १ ली ते ७ वीच्या सर्व विद्यार्थ्यांना मोफत…