Category: होम

पावसाळ्यातील उपाययोजना संदर्भात श्वेतपत्रिका काढावी : नम्रता कोळी

ठाणे : ठाणे महापालिका क्षेत्रात जुलैच्या पहिल्या आठवड्यात आलेल्या पावसानंतर महापालिकेच्या यंत्रणेविषयी गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. अशा प्रकारची संकटे आल्यास महापालिकेने हाताळण्याची परिस्थिती, उद्भवलेल्या अडचणी, त्या दूर करण्यासाठी आलेले…

 ठाण्यातील नालेसफाईचा गाळ कागदोपत्री अंबरनाथच्या जमिनीवर?

 भाजप नगरसेविका अर्चना मणेरा यांचा आरोप, निविदांच्या चौकशीची मागणी अनिल ठाणेकर ठाणे : ठाणे महापालिकेच्या क्षेत्रातील नालेसफाईतून काढलेला गाळ चक्क अंबरनाथ तालुक्यातील ज्युवेली व दिवा येथील जमिनीवर टाकण्यात आल्याची कागदोपत्री नोंद आहे. मात्र, शहरातील खाडी परिसरातच गाळ फेकला गेल्यामुळे पूरस्थिती निर्माण झाली, असा आरोप भाजपच्या नगरसेविका अर्चना मणेरा यांनी केला. तसेच जमिनीच्या सातबारा उताऱ्यांची छाननी न करताच बेकायदेशीरपणे नालेसफाईच्या तांत्रिक निविदा मंजूर केल्यामुळे चौकशी करावी, अशी मागणी अर्चना मणेरा यांनी महासभेत सोमवारी केली. ठाणे महापालिका क्षेत्रात नालेसफाई न झाल्यामुळे ठिकठिकाणी पाणी तुंबले. प्रत्यक्षात बहुसंख्य नाल्यांची सफाई झाली नाही. तर किरकोळ गाळ काढून खाडी परिसरातच फेकला गेला. महापालिकेच्या नियमानुसार, गाळ काढण्यासाठी कंत्राटदाराकडे स्वत:ची किंवा भाड्याची जमीन असावी. मात्र, दिवा, मुंब्रा, माजिवडा आणि उथळसर येथील कंत्राटदारांनी एकाच व्यक्तीच्या दिवा येथील जमिनीवर गाळ टाकल्याची नोंद आहे. एका कंत्राटदाराने ठाण्यापासून ४० किलोमीटरवरील अंबरनाथ तालुक्यातील ज्युवेली येथील जमीन दाखविली. तसेच या जमिनीचा जुना सातबारा दाखविला असून, महापालिकेला दिलेल्या `एनओसी’वर पाचपैकी केवळ एकाच मालकाची नोंद आहे. दिवा येथील जमीनमालकाने स्टँम्प पेपरऐवजी साध्या कागदावर `एनओसी’ दिली आहे. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी करून कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकून फौजदारी गुन्हे दाखल करावेत. चौकशी पूर्ण होईपर्यंत बिले अदा करू नयेत, अशी मागणी अर्चना मणेरा यांनी केली. अंबरनाथ तालुक्यातील जमिनीवर गाळ टाकण्यात आलेला नाही, असा थेट आरोप नगरसेविका अर्चना मणेरा यांनी केला. तसेच संबंधित कंत्राटदारांकडून गाळ वाहून नेताना जीपीएस ट्रॅक रेकॉर्डिग प्रशासनाने उपलब्ध करावे, अशी मागणी करीत अर्चना मणेरा यांनी त्रयस्थ संस्थेकडून चौकशी करण्याची विनंती महासभेत केली. चौकट कंत्राटदाराच्या बेजबाबदारपणे, खड्ड्यात बुडून मुलाचा मृत्यू बोरिवडे येथील मैदानाच्या विकासासाठी नियुक्त केलेल्या कंत्राटदाराने खोदलेल्या खड्ड्यात बुडून १६ वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला, असा आरोप नगरसेविका अर्चना मणेरा यांनी केला. मुंबईतील मिठी नदी गाळ उपसा प्रकरणातील काळ्या यादीतील कंत्राटदाराला नियमबाह्यपणे हे कंत्राट दिले गेले. या कंत्राटदाराने खड्डा खोदताना कोणतेही बॅरिकेड व सुरक्षा फलक लावले नव्हते. या प्रकरणी कंत्राटदारावर कासारवडवली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतरही महापालिकेकडून दंडात्मक वा कंत्राट रोखण्याची कारवाई झालेली नाही. संबंधित कंत्राटदार हा काळ्या यादीत असल्याबाबत वर्षभरापूर्वी तक्रार करूनही अद्यापी, मुंबई महापालिकेकडे पत्रव्यवहार सुरू असल्याचे कारण सांगण्यात येत आहे. या प्रकरणी चौकशी करून महापालिकेच्या संबंधित अभियंत्याला निलंबित करून कंत्राट रद्द करावे. तसेच मुलाच्या कुटुंबियांना कंत्राटदार व महापालिकेने आर्थिक नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी नगरसेविका अर्चना मणेरा यांनी दिली. 0000000000

 माळशेज घाटात अभुतपुर्व सौंदर्य

 पावसाळ्यात पर्यटकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी अविनाश उबाळे ठाणे : पावसाळा मोसम सूरु होताच सहयाद्रीच्या उंच पर्वत रांगेतील माळशेज घाटातील डोंगर माथे,हे हिरवेगार दिसतात जशी काय डोंगरांनी हिरवी शाल परिधान केल्याचा भास होतो.आकाशाला गवसणी घालणाऱ्या उंच डोंगर माथ्यावरुन खोसळणारे धबधबे व रिपरिप पाऊस व पांढऱ्याशुभ्र धुक्यात दिसेनासे होणारे डोंगर जणू काही आकाशातील ढग जमिनीवर उतरल्याचा भास आपणास होतो.चहूबाजूने दिसणारी हिरवीगार वृक्षांची रांग आणि पावसाळ्यातील गडद पांढऱ्या धुक्यांचा खेळ आणि धुक्यांत हरविलेल्या वाटा असा अद्वभूत नजरा प्रत्यक्ष अनुभवयाचा असेल तर पावसाळ्यात माळशेज घाटाची सफर करायलाच हवी असं हे माळशेज घाट सध्या पावसाळ्यात  पर्यटकांना भुरळ घालत आहे. ठाणे जिल्ह्यातील मुरबाड नगर पुणे या मार्गावर माळशेज घाट लागतो उंच डोंगर माथे,घनदाट असं जंगल,दुर्मिळ वन्यप्राणी,पशुपक्षी, यांचा मुक्त संचार घाटातील नागमोडी रस्ते वृक्षांची सभोवताली दिसणारी रांग,उंच डोंगर माथे व खोल दऱ्या,पक्षांचा किलबिलाट पांढऱ्या शुभ्र गडद दाट धुक्यांत लपलेले डोंगर आणि धुकं व पाऊस यांचा शिवाशिवीचा खेळ रस्त्याकडेला मुक्तपणे संचार करणारी वानरं हा सारा अनमोल ठेवा माळशेज घाटात आहे.पावसाळ्यात तर येथील धबधब्यांत चिंब भिजण्यासाठी पर्यटक मोठ्या प्रमाणावर येथे येतात पावसाळ्या मोसमात पर्यटकांनी माळशेज घाटाल विशेष अशी पसंती दिली आहे.निसर्गाची मजा लुटण्यासाठी पावसाळ्यात पर्यटकांची पावले माळशेज घाटाकडे वळत आहेत.  मुंबई ,ठाणे,कल्याण,उल्हासनगर, अंबरनाथ,बदलापूर,डोंबिवली,शहापूर ,मुरबाड, कर्जत,नगर पुणे,नाशिक,या भागातील पर्यटक मोठ्या प्रमाणात माळशेज घाटात सहलीसाठी येत असतात घाटात येणाऱ्या पर्यटकांना सर्वप्रथम दर्शन होतं ते इथल्या जंगली वानरांचं रस्त्यावर घाटात वानरांचे तांडेच तांडेच येथे पहावयास मिळतात माळशेज घाटातील ही अनोखी सफर करताना निसर्गाच्या जवळ गेल्याचा एक विलक्षण अविस्मरणीय आनंद मिळतो असे शहापूरचे पर्यटक गजानन वरकुटे यांनी बोलतांना सांगितले.माळशेज घाटा जवळील स्थानिक आदिवासी येथे आवळे,रानभाज्या,विकतांना नजरेस पडतात तर घाटात गरमागरम  चहा,वडापाव,भाजलेले कणीस, विक्रीतुन स्थानिकांना मोठा रोजगार मिळतो आहे हे विशेष आहे . माळशेज घाटात जायचे कसे – माळशेज घाटात जाण्यासाठी खाजगी वाहनाने अथवा कल्याणहून आळेफाटा,नगर,पुणे या परिवहनच्या एसटी बसने जाता येते पर्यटकांना राहण्यासाठी पर्यटन विकास महामंडळाचे रेस्टॉरंट व येथे निवासस्थांन उपलब्ध आहेत.तसेच येथे भोजनासाठी असंख्य लहान मोठे हॉटेल व ढाबे मुरबाड,सरळगाव,टोकावडे,व माळशेज घाटा पर्यंत रस्त्याकडे ला पाहण्यास मिळतात.

– रानभाज्या विक्रीसाठी दाखल!

– शहापूरात हिरव्यागार रानभाज्यांचा  बाजार फुलला आदिवासींना मिळाली रोजीरोटी ! अविनाश उबाळे ठाणे : शेवळी,तेलपाट,ससेकांद, कोळु ,अळू ,कोरडु ,पेंढरं खुरनासनी ,तेरा ,लोत,या दुर्मिळ अशा दाट जंगलात खास पावसाळ्याच्या मोसमातील मिळणाऱ्या रान…

अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरण आंदोलन निर्धार सभा

रमेश औताडे मुंबई: अनुसूचित जाती आरक्षणाचे ऊपवर्गीकरण लवकर करावे या करीता आझाद मैदान मुंबई येथे २९ सप्टेंबर २०२६ रोजी होत असलेल्या आंदोलनाचाआढावा घेण्यासाठी सकल मातंग समाजाची निर्धार बैठक शेगाव बुलढाणा येथे पार पडली. या संभाव्य आंदोलनाची पुढील दिशा कशी असेल याबाबत राज्य समन्वयक बाबूराव मुखेडकर यांनी मुंबई मराठी पत्रकार संघ येथे माहिती दिली. बैठकीचे अध्यक्षपद निमंत्रक विजयभाऊ आंभोरे यांनी भूषवले. बैठकीस राज्य समन्वयक बाबूराव मुखेडकर, सुदाम धुपे, पंडित सूर्यवंशी, कैलाश डाखोरे, ॲडव्होकेट राम चव्हाण,परिमल कांबळे, रणधीर कांबळे, लहुजी शक्ती सेनेचे प्रदेशाध्यक्ष कैलास दादा खंदारे, ल. सा. क. म. चे विश्वस्त अध्यक्ष ऊपाडे, सचिव  सुभाष तोंडारकर, प्रा. अंबादास सकट, ए टी अवचार, प्रदेश अध्यक्ष प्रा संजय गायकवाड, अविनाश  बागवे मातंग एकता आंदोलन प्रमुख, सुनिल बावकर, दयानंद आडागळे,विलास साबळे ,संजय कठाळे, संजय उबाळे जी, विनोद जोगदंड देवीलाल अवचार, ऍड नरसिंग सूर्यवंशी, मंदाकिनी चव्हाण, संजय कठाले,आणि डॉ. चंदन शिवे आदी मान्यवरांची उपस्थिती होती. विभागीय बैठक, जिल्हा निहाय, तालुका निहाय बैठका घेत ऑगस्ट महिन्यात साहीत्यसम्राट आण्णाभाऊ साठे यांच्या जयंती कार्यक्रमात अंदोलनाविषयी जनजागृती करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे बाबूराव मुखेडकर यांनी यावेळी सांगितले.

आधारचा आदिवासी गरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक आधार

मुंबई : लालबाग येथील आधार युवा प्रतिष्ठान ट्रस्ट गेली १५ वर्षे पालघर, जवार, विक्रमगड तसेच कर्जत येथील आदिवासी गरीब होतकरू विद्यार्थ्यांना शैक्षणिक क्रिडा तसेच जीवनावश्यक अशा अनेक स्वरुपात मदत करत…

भारतातील ३ कोटींहून अधिक नागरिकांवर मेंदू विकाराचे संकट

मिरा-भाईंदर जागतिक मेंदू दिनानिमित्त न्यूरोलॉजी तज्ज्ञांनी नागरिकांना मेंदूच्या आरोग्याला सर्वोच्च प्राधान्य देण्याचे आवाहन केले. त्यांच्या मते, भारतात ३ कोटींहून अधिक नागरिक न्यूरोलॉजिकल विकारांनी प्रभावित असून देशाच्या एकूण आजारांच्या भारापैकी सुमारे १० टक्के भार या आजारांचा आहे. वाढता ताण, वायू प्रदूषण, बदलती जीवनशैली, मधुमेह, उच्च रक्तदाब, लठ्ठपणा आणि वाढते वय यामुळे स्ट्रोक, एपिलेप्सी, मायग्रेन, पार्किन्सन्स, डिमेन्शिया यांसारख्या आजारांचे प्रमाण वाढत आहे. वोक्हार्ट हॉस्पिटल्स, मीरा रोड येथील इंटरव्हेन्शनल न्यूरोलॉजिस्ट व स्ट्रोक तज्ज्ञ डॉ. पवन पै  यांनी सांगितले की, स्ट्रोकच्या उपचारात प्रत्येक मिनिट महत्त्वाचे असते. अचानक हात-पायात अशक्तपणा, बोलण्यात अडचण, तीव्र किंवा वेगळी डोकेदुखी, चक्कर येणे, स्मरणशक्ती कमी होणे किंवा दृष्टीत बदल ही मेंदूची गंभीर इशारे असू शकतात. याशिवाय, अल्झायमर, डिमेन्शिया, पार्किन्सन्स, मेंदूतील गाठी (ब्रेन ट्यूमर), मल्टिपल स्क्लेरोसिस आणि मज्जातंतूंचे विकार यांसारख्या आजारांचे प्रमाणही वाढत आहे. या आजारांची सुरुवात अनेकदा अत्यंत सौम्य लक्षणांनी होते. वारंवार डोकेदुखी, विस्मरण, हात-पायात मुंग्या येणे, चालताना तोल जाणे, हात थरथरणे, झटके येणे किंवा बोलण्यात अचानक अडथळा निर्माण होणे ही लक्षणे दुर्लक्षित करू नयेत. जनजागृती, वेळेवर निदान, त्वरित उपचार आणि निरोगी जीवनशैली यामुळे लाखो नागरिकांना अपंगत्वापासून वाचवता येईल. योग्य वेळी निदान आणि तज्ज्ञांकडून उपचार सुरू केल्यास अनेक मेंदूविकारांवर प्रभावी नियंत्रण मिळवता येते आणि रुग्णाला दीर्घकाळ निरोगी व स्वावलंबी जीवन जगणे शक्य होते. यामुळे आरोग्यावरील खर्च कमी होईल, देशाची उत्पादकता वाढेल आणि भारत अधिक निरोगी व सक्षम राष्ट्र बनण्यास मदत होईल.

 मिरारोडला स्वतंत्र शिधावाटप कार्यालयाला मंजुरी

अन्न,नागरी पुरवठा, ग्राहक संरक्षण विभागाकडून शासन निर्णय जारी मिरा भाईंदर : मिरा रोड परिसरातील नागरिकांना रेशनसंदर्भातील कामांसाठी होणारा त्रास कमी करण्याच्या दृष्टीने स्वतंत्र शिधावाटप कार्यालय सूरू करण्यात यावे अशी मागणी आमदार नरेंद्र मेहता यांनी १३ मार्च २०२५ मध्ये मुख्यमंत्री यांच्याकडे केली होती. त्यांच्या पाठपुराव्याला आता यश मिळाले असून एक वचनपूर्ती पूर्ण झाली आहे.राज्य शासनाने महत्त्वाचा निर्णय घेत शासन निर्णय जारी केला आहे. मिरा-भाईंदर शहरासाठी मिरा रोड येथे स्वतंत्र शिधावाटप (रेशन) कार्यालय सुरू करण्यास महाराष्ट्र शासनाने प्रशासकीय मान्यता दिली आहे. हा शासन निर्णय २१ जुलै २०२६ रोजी अन्न नागरि पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाकडून जारी करण्यात आला आहे. मिरा-भाईंदरमधील ३९ अधिकृत रेशन दुकाने आणि अतिरिक्त ३ दुकाने, अशी एकूण ४२ दुकाने नव्या मिरा रोड कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात समाविष्ट करण्याचा निर्णय शासनाकडून घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे रेशन कार्डधारकांना किरकोळ दुरुस्ती, नाव समाविष्ट करणे, पत्ता बदल, तक्रारी तसेच इतर शिधावाटपाशी संबंधित कामांसाठी दूरवर जावे लागणार नाही. स्थानिक पातळीवरच सेवा उपलब्ध झाल्याने नागरिकांचा वेळ आणि खर्च दोन्हीची बचत होणार आहे. त्यामुळे शिधावाटप संबंधित नागरिकांना असणाऱ्या अडचणी दूर होणार असून एक प्रकारचा मोठा दिलासा मिळाला आहे. मिरारोड येथे स्वतंत्र शिधावाटप कार्यालय सुरू करण्याचा निर्णय हा मिरा-भाईंदरमधील हजारो रेशन कार्डधारकांसाठी दिलासादायक ठरणार असून, शिधावाटप यंत्रणेची कार्यक्षमता वाढण्यासही मदत होणार आहे.नव्याने मंजूर करण्यात आलेल्या मीरारोड शिधावाटप कार्यालयामुळे नागरिकांना दिलासा मिळणार असल्याने आमदार नरेंद्र मेहता यांनी शासनाचे आभार व्यक्त केले आहे.

मुंबई–ठाणे आता तास नाही, मिनिटांत!

 अवघ्या ४ तासांत उभारला १६० टनांचा भव्य गर्डर लाँचर मुंबई : मुंबई–ठाणे दरम्यानचा प्रवास अधिक वेगवान करण्याच्या दिशेने आणखी एक महत्त्वाचा टप्पा गाठण्यात आला आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए)…

बी.पी. आर्ट्स, एस.एम.ए. सायन्स व के.के.सी. कॉमर्स कॉलेज, चाळीसगावला दुहेरी क्रीडा मानाचा बहुमान

आंतरविद्यालयीन क्रीडा स्पर्धा कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव व एरंडोल क्रीडा विभाग यांच्या अंतर्गत शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मध्ये आयोजित करण्यात आलेल्या विविध आंतरमहाविद्यालयीन क्रीडा स्पर्धांमध्ये बी.पी. आर्ट्स, एस.एम.ए.…