Category: होम

Heading – ठाणे जिल्ह्यातील शालेय क्रीडा स्पर्धांच्या आयोजनास सुरुवात

जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांच्या अध्यक्षतेखाली बैठक अशोक गायकवाड ठाणे : ठाणे जिल्ह्यातील सन २०२६-२७ या वर्षातील शालेय क्रीडा स्पर्धांच्या आयोजनास औपचारिक सुरुवात झाली असून, या स्पर्धांचे बिगुल वाजले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी तथा जिल्हा क्रीडा परिषदेचे अध्यक्ष डॉ.श्रीकृष्ण पांचाळ यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी जिल्हा क्रीडा परिषदेची महत्त्वाची बैठक संपन्न झाली. या बैठकीमध्ये आगामी तालुका, जिल्हा, विभागीय आणि राज्यस्तरीय शालेय क्रीडा स्पर्धांचे अत्यंत प्रभावी आयोजन, सुटसुटीत नियोजन व कडक अंमलबजावणी करण्यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. आगामी स्पर्धा सर्व दृष्टीने यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी आवश्यक पूर्वतयारी करणे, विविध सरकारी व क्रीडा विभागांमध्ये उत्तम समन्वय राखणे, स्पर्धास्थळांची योग्य तयारी करणे आणि सहभागी खेळाडूंना आवश्यक त्या सर्व सोयी-सुविधा पुरवणे या बाबींना प्राधान्य देण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी दिले. तसेच सर्व स्पर्धा वेळेत आणि अत्यंत नियोजनबद्ध रीतीने पार पाडण्याबाबत त्यांनी उपस्थित अधिकारी व सदस्यांना मार्गदर्शन केले. जिल्ह्यातील जास्तीत जास्त विद्यार्थी-खेळाडूंना या स्पर्धांमध्ये सहभागी करून घेण्यासाठी जिल्ह्यातील सर्व शाळा, क्रीडा संघटना आणि संबंधित विभागांनी परस्पर समन्वयाने काम करावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले. दर्जेदार व गुणवत्तापूर्ण आयोजनाच्या माध्यमातून ठाणे जिल्ह्यातील क्रीडापटूंना राज्य व राष्ट्रीय स्तरावर उत्तुंग कामगिरी करण्यासाठी अनुकूल वातावरण निर्माण करण्यावर या बैठकीत विशेष भर देण्यात आला. या बैठकीस जिल्हा क्रीडा परिषदेचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, जिल्हा क्रीडा अधिकारी सुवर्णा बारटक्के, ठाणे ग्रामीणच्या पोलीस उपअधीक्षक श्रीमती निलम वाव्हळ, माध्यमिक विभागाचे उपशिक्षणाधिकारी भाऊराव मोहिते, प्राथमिक शिक्षण विभागाचे प्रतिनिधी अनिल कुऱ्हाडे, जिल्हा ॲथलेटिक्स संघटनेचे सचिव अशोक आहेर, जिल्हा खो-खो संघटनेचे प्रतिनिधी विकास कोळी व कमलाकर कोळी, जिल्हा क्रीडा परिषदेचे सर्व सदस्य तसेच जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातील संबंधित अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

– अजित पवार यांच्या आवडीच्या गीतांमधून ठाण्यात २२ जुलै रोजी आदरांजली कार्यक्रम

वसंतराव डावखरे फाउंडेशनतर्फे आयोजन, प्रसिद्ध गायिका वैशाली सामंत यांची उपस्थिती ठाणे : राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्ताने वसंतराव डावखरे फाउंडेशन यांच्या वतीने अजितदादांच्या मनपसंत गीतांचा कार्यक्रम आयोजित केला असून, त्यांच्या स्मृतींना शब्दसुमनांनी आदरांजली वाहिली जाणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते प्रबोध वसंतराव डावखरे यांनी ठाण्यात २२ जुलै रोजी गडकरी रंगायतनमध्ये विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. प्रसिद्ध पार्श्वगायिका व संगीतकार वैशाली सामंत यांच्यासह कलाकारांकडून विविध गीते सादर केली जातील. वसंतराव डावखरे फाउंडेशनचे अध्यक्ष प्रबोध डावखरे यांनी आज पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे शहर जिल्हाध्यक्ष नजीब मुल्ला, राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक सुहास देसाई, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष वीरू वाघमारे यांची उपस्थिती होती. दिवंगत अजितदादा पवार यांची स्मृती जतन करण्याबरोबरच ठाणेकरांच्या वतीने आदंराजली वाहण्यासाठी हा कार्यक्रम होत आहे, असे नमूद करीत प्रबोध डावखरे यांनी कार्यक्रमाची माहिती दिली. ते पुढे म्हणाले, “दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे ठाण्याबरोबर ऋणानुबंध होते. अजितदादांचा शिस्तप्रिय स्वभाव, प्रशासनाचे सखोल ज्ञान आणि त्यांना सामान्यांविषयी आत्मियतेचा धागा होता. त्याचबरोबरच राज्याच्या सांस्कृतिक, कला, नाट्य क्षेत्रातही त्यांना विशेष रुची होती. त्याअनुषंगाने वसंतराव डावखरे फाउंडेशनतर्फे अजितदादांच्या मनपसंत गीतांचा कार्यक्रम सादर केला जाईल. उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांच्याकडून अजितदादांना आवडणाऱ्या गीतांची माहिती घेऊन कार्यक्रम तयार करण्यात आला आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून गडकरी रंगायतनमध्ये २२ जुलै रोजी दुपारी ४ वाजता होणाऱ्या कार्यक्रमात अजितदादांविषयी कृतज्ञता व्यक्त केली जाईल. या कार्यक्रमात महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचा गौरव केला जाणार आहे. या कार्यक्रमाला राज्यातील संगीत, साहित्य आणि कला क्षेत्रातील मान्यवरांचीही उपस्थिती राहील. त्याचबरोबर या कार्यक्रमात दिव्यांग व अनाथ विद्यार्थ्यांना मदतीचा हात दिला जाणार आहे. या कार्यक्रमाला ठाणेकरांनी उपस्थित राहावे, असे आवाहन प्रबोध डावखरे यांनी केले. त्याचबरोबर यापुढील काळात ठाण्यातील नागरिकांसाठी दरमहा विविध उपक्रमांबरोबरच कार्यक्रम सादर करण्यात येतील, असे प्रबोध डावखरे यांनी सांगितले. ००००००००  

मजूर ते उद्योजक प्रेरणा सन्मान उपक्रम

रमेश औताडे मुंबई : बांधकाम साहित्य क्षेत्रातील अदानी सिमेंट ने मजूर ते उद्योजक या प्रेरणा सन्मान उपक्रमात बांधकाम क्षेत्रात यशस्वी कारकीर्द घडवणारे  मजूर ते उद्योजक असा प्रवास करणारे सुरेंदर चौहान यांचा प्रेरणा सन्मान उपक्रमात सन्मान केला. १० वी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर सुरेंदर अधिक चांगल्या संधी आणि स्थिर भविष्यासाठी मुंबईत आले. त्यांनी बांधकामाच्या ठिकाणी मजूर आणि गवंडी म्हणून काम करायला सुरुवात केली. या काळात त्यांनी बांधकाम तंत्र, कारागिरी आणि बांधकाम स्थळावरील कामकाजाचा प्रत्यक्ष अनुभव मिळवला. कौशल्य आणि आत्मविश्वास वाढत गेल्यानंतर सुरेंदर यांनी स्वतंत्रपणे छोटे बांधकाम प्रकल्प स्वीकारण्यास सुरुवात केली. ०००००००००

 व्हॉट्सॲपवर बनावट संदेश व्हायरल

 निवडणूक आयोगाचे अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन ठाणे, विशेष संक्षिप्त पुनरीक्षण (SIR-२०२६) प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर व्हॉट्सॲपवर भारत निवडणूक आयोग (@ecisveep) आणि महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकारी (@ceo_maharashtra) यांच्या नावाने बनावट संदेश आणि मोबाईल क्रमांक व्हायरल होत असल्याची माहिती समोर आली आहे. या संदेशांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन निवडणूक यंत्रणेने केले आहे. व्हायरल होत असलेल्या संदेशात, “SIR-२०२६ दरम्यान मतदाराच्या कागदपत्रांमध्ये विसंगती आढळली असून, दिलेल्या मोबाईल क्रमांकावर संपर्क न केल्यास मतदार ओळखपत्र हटवले जाईल,” असा दावा करण्यात आला आहे. मात्र हा दावा पूर्णपणे खोटा, दिशाभूल करणारा आणि निराधार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. निवडणूक आयोगाने नागरिकांना अशा कोणत्याही बनावट संदेशांना किंवा अनोळखी मोबाईल क्रमांकांना प्रतिसाद देऊ नये, तसेच कोणतीही वैयक्तिक माहिती किंवा कागदपत्रे शेअर करू नयेत, असे आवाहन केले आहे. मतदार यादी, विशेष संक्षिप्त पुनरीक्षण (SIR-२०२६) किंवा मतदार ओळखपत्रासंबंधी कोणतीही माहिती केवळ भारत निवडणूक आयोग आणि महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या अधिकृत माध्यमांवरूनच पडताळून पाहावी, असेही नागरिकांना सांगण्यात आले आहे. दरम्यान, सोशल मीडियावर पसरवल्या जाणाऱ्या अफवा आणि बनावट संदेशांपासून सावध राहण्याचे आवाहन करत, नागरिकांनी कोणतीही अप्रमाणित माहिती पुढे पाठवू नये, असेही निवडणूक यंत्रणेने स्पष्ट केले आहे. ००००

आयडियल १४ वर्षाखालील बुध्दिबळ स्पर्धेत ९२ खेळाडूंमध्ये आज चुरस

मुंबई : आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी-ग्रुपतर्फे दि न्यू इंडिया अॅशुरन्स कंपनी लिमिटेड सहप्रायोजित १४ वर्षाखालील शालेय मुलामुलींच्या बुध्दिबळ स्पर्धेत ६ वयोगटामधील विजेतेपदासाठी एकूण ९२ खेळाडूंमध्ये १८ जुलै रोजी चुरस राहील. आंतरराष्ट्रीय…

 गांडूळवाड येथे घरावर वीज पडून घराचे नुकसान

 कुटुंबाची मदतीची मागणी ठाणे : शहापूर तालुक्या मध्ये डोलखांब विभागतील परिसरात बुधवारी विजांच्या कडकडास पाऊस झाला गांडूळवाड येथील  बुधा धर्मा हंबीर यांच्या घरावर वीज पडून शेतकरी कुटूंबाचे नुकसान झाले. ही घटना बुधवारी साकाळच्या सुमारास घडली. ठाणे जिल्ह्यासह डोलखांब परिसरात पाऊस सुरू होता. त्यामुळे विजेच्या कडकडाटासह पाऊस पडत असल्याने. याचा फटका हंबीर कुटुंबीयांना बसला. बुधवारी त्यांच्या घरावर वीज पडून घराचे पत्रे कौले फुटली व इलेक्ट्रिक उपकरणे जळून खाक झाली. तसेच घराच्या भिंतीलाही विजेच्या प्रवाहामुळे भगदाड पडले आहे. घरावर वीज पडताच मोठा आवाज झाला  घरामध्ये बुधा हंबीर व दोन महिला व लहान मुलं इतर सदस्य होते. घरातील एका पुरुषाला आणि दोन महिलांना विजेचा धक्का बसल्याची माहिती मिळाली असून सुदैवाने त्यांना कोणतीही मोठी इजा झाली नाही.

अजितदादा पवार यांची स्मृतीपत्रे उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्याकडे सुपूर्द

मुंबई : राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या कार्याचा गौरव म्हणून विधानपरिषद आणि विधानसभेचे स्मृतीपत्र तसेच तामिळनाडू विधानसभा शोक प्रस्तावाची प्रत उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्याकडे…