Category: होम

रमेश म्हात्रेंच्या मुलाच्या अटकेसाठी तक्रारदाराचे कल्याणमध्ये बेमुदत उपोषण

कल्याण : शिवसेनेचे नगरसेवक रमेश म्हात्रे यांचा मुलगा प्रवीण म्हात्रे हे विष्णुनगर पोलीस ठाण्यात दाखल एका गुन्ह्यामुळे मागील वर्षभरापासून फरार आहेत. सतत पाठपुरावा करूनही पोलीस त्यांना अटक करत नाहीत म्हणून…

ऐतिहासिक भटाळे तलावाच्या पुनरुज्जीवनासाठी १० कोटींचा निधी द्या

– माजी आमदार नरेंद्र पवार यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी कल्याण : कल्याण शहराच्या ऐतिहासिक वारशाचा महत्त्वाचा भाग असलेल्या आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पवित्र पदस्पर्शाने पावन झालेल्या ऐतिहासिक भटाळे तलावाचे पुनरुज्जीवन, सुशोभीकरण आणि विकास करण्यासाठी १० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्याची मागणी भाजप भटके-विमुक्त मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष तथा माजी आमदार नरेंद्र पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. यासंदर्भात नरेंद्र पवार यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबईत भेट घेऊन याबाबतचे निवेदन सादर केले आणि भटाळे तलावाच्या जतन – संवर्धनाची आवश्यकता अधोरेखित केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, कल्याणच्या इतिहासात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भटाळे तलावाला ऐतिहासिक महत्त्व आहे. याच परिसरात पूर्वी ऐतिहासिक दुर्गाडी किल्ल्याच्या पायथ्याशी विस्तीर्ण भटाळे तलाव अस्तित्वात होता. मात्र कालांतराने या तलावात मोठ्या प्रमाणावर भराव टाकण्यात आल्याने तसेच अतिक्रमण झाल्याने तलावाचे मूळ स्वरूप नष्ट होत चालले असून आज तलाव शोधावा लागेल, अशी परिस्थिती निर्माण झाल्याची खंत पवार यांनी व्यक्त केली आहे. तसेच तलावामध्ये हळूहळू बेकायदा बांधकामे उभी राहिल्याचे सांगत जनावरांचे मलमूत्र तसेच सांडपाणीही सोडले जात आहे. परिणामी तलावातील पाणी प्रदूषित झाले असून पर्यावरणीय संतुलनावरही त्याचा परिणाम होत असल्याचे त्यांनी निवेदनात नमूद केले आहे. इतिहास आणि पर्यावरण या दोन्ही दृष्टीने महत्त्व असलेल्या या तलावाचे संवर्धन, संरक्षण आणि पुनरुज्जीवन करणे अत्यावश्यक असल्याचे सांगत तलावाचा सर्वंकष विकास आराखडा तयार करून त्याचे सुशोभीकरण करण्यात यावे, अशी मागणी पवार यांनी केली आहे. यासाठी १० कोटी रुपयांचा विशेष निधी मंजूर करून भटाळे तलावांचे पुनरुज्जीवन आणि विकास कामे तातडीने हाती घेण्यात यावीत, अशी विनंती त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. ०००००

ज्येष्ठ कबड्डी पंच अनिल शेजवळ यांचा पुरस्काराने गौरव

कल्याण : कबड्डी महर्षी स्व. शंकरराव उर्फ बुवा साळवी यांच्या जयंतीनिमित्त आयोजित २६ व्या ‘कबड्डी दिन’ सोहळ्यात ज्येष्ठ कबड्डी पंच अनिल शेजवळ यांचा त्यांच्या उल्लेखनीय योगदानाबद्दल आमदार भाई जगताप आणि…

डोंबिवलीत टोईंग व्हॅन सुरु करण्याची माजी नगरसेवकाची मागणी

०००००००००००० कल्याण : डोंबिवली पूर्व पश्चिमेतील स्टेशन परिसरात वाहतूक कोंडी होते. चुकीच्या पद्धतीने वाहने रस्त्याच्या कडेला उभी केली जातात. त्या वाहनांच्या विरोधात कारवाई करण्यासाठी टोईंग व्हॅन सुरु करण्याची मागणी माजी…

 वेश्याव्यवसायासाठी महिलांना प्रवृत्त करणारी महिला दलाल अटकेत

 दोन पीडित महिलांची सुटका अनिल ठाणेकर ठाणे, ठाणे गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने (AHTC) केलेल्या कारवाईत वेश्याव्यवसायासाठी महिलांना प्रवृत्त करणाऱ्या एका महिला दलालाला अटक करण्यात आली असून दोन पीडित महिलांची सुटका करण्यात आली आहे. पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, ठाणे पश्चिम येथील हॉटेल रोहेलो फॅमिली रेस्टॉरंट अँड बार, शंभुजी हॉटेलजवळ, विजय गार्डन रोड, कावेसर येथे काही महिलांना फूस लावून वेश्याव्यवसायासाठी आणले जात असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार १६ जुलै रोजी अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने सापळा रचून छापा टाकला. या कारवाईत एका महिला दलालाला ताब्यात घेऊन अटक करण्यात आली. तसेच वेश्याव्यवसायात अडकलेल्या दोन पीडित महिलांची सुटका करण्यात आली. आरोपीविरुद्ध कासारवडवली पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ मधील कलम १४३(१), १४३(३) तसेच अनैतिक व्यापार (प्रतिबंध) अधिनियम, १९५६ मधील संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुटका करण्यात आलेल्या दोन्ही महिलांना त्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने मुंबईतील कांदिवली येथील रेस्क्यू फाउंडेशनमध्ये दाखल करण्यात आले आहे.ही कारवाई पोलिस उपायुक्त (गुन्हे) यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस आयुक्त (प्रतिबंध) यांच्या नेतृत्वाखाली अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.

जुन्या वादातून कल्याण पूर्वेत तरुणाची धारधार शस्त्राने हत्या

कल्याण : जुन्या वादातून चाकूने बारा ते तेरा वार केल्याने गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना कल्याण पूर्वेतील आडीवली परिसरात घडली आहे. कल्याणच्या आडीवली परिसरात मध्यरात्री हि धक्कादायक हत्याकांडाची…

अमेरिका-इस्रायल-इराण युद्धाचा भारतावर होणाऱ्या परिणामांवर आज मुंबईत सार्वजनिक चर्चा

अनिल ठाणेकर मुंबई, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने ‘अमेरिका-इस्रायल आणि इराण युद्ध व त्याचा भारतावर होणारा परिणाम’ या विषयावर सार्वजनिक चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम शनिवार, १८ जुलै रोजी दुपारी ३.३० ते सायंकाळी ६.३० या वेळेत टिळक भवन ऑडिटोरियम, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस मुख्यालय, काकासाहेब गाडगीळ मार्ग, दादर (पश्चिम), मुंबई येथे होणार आहे. या चर्चासत्रात जागतिक युद्धनीती व संरक्षणविषयक अभ्यासक तसेच ‘फोर्स’ मासिकाचे संपादक प्रवीण साहनी हे प्रमुख वक्ते म्हणून मार्गदर्शन करणार आहेत. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ असतील. कार्यक्रमाचे समन्वयक म्हणून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या अर्थ विभागाचे अध्यक्ष विश्वास उतगी हे जबाबदारी सांभाळत आहेत. या कार्यक्रमाला माजी खासदार कुमार केतकर, सामाजिक कार्यकर्ते फिरोज मिठीबोरवाला आणि माजी खासदार हुसेन दलवाई हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. मध्यपूर्वेतील युद्धस्थिती, त्याचे जागतिक राजकारण, अर्थव्यवस्था, ऊर्जा सुरक्षा तसेच भारताच्या परराष्ट्र धोरण आणि राष्ट्रीय हितांवर होणाऱ्या परिणामांचा सखोल आढावा या चर्चासत्रात घेतला जाणार असून, विविध क्षेत्रांतील अभ्यासक, नागरिक, विद्यार्थी आणि माध्यम प्रतिनिधींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे. ०००००००

 सोनम वांगचुंग यांच्या आंदोलनावर तातडीने तोडगा काढावा

केंद्र सरकारला माकपचे आवाहन अनिल ठाणेकर ठाणे : सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुंग यांच्या आंदोलनाचा आज अठरावा दिवस असून, त्यांच्या आंदोलनाची केंद्र सरकारने तातडीने दखल घेऊन सकारात्मक तोडगा काढावा, अशी मागणी भारताचा कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) अर्थात माकपने केली आहे. माकपचे राज्य सचिव डॉ. अजित नवले यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सलग १८ दिवसांच्या उपोषणामुळे सोनम वांगचुंग यांच्या प्रकृतीवर गंभीर परिणाम होत असून, त्यांच्या काही सहआंदोलकांची प्रकृतीही चिंताजनक बनली आहे. त्यामुळे आंदोलकांचा जीव धोक्यात येण्यापूर्वी केंद्र सरकारने तातडीने हस्तक्षेप करून त्यांच्याशी चर्चा करावी आणि आंदोलनावर मार्ग काढावा. निवेदनात पुढे म्हटले आहे की, नीट परीक्षेतील पेपरफुटीप्रकरणी आंदोलनकर्त्यांनी मांडलेल्या मागण्या योग्य असून, लोकशाही व्यवस्थेत अशा मागण्यांची दखल घेणे ही सरकारची जबाबदारी आहे. त्यामुळे केंद्र सरकारने आंदोलकांशी संवाद साधून त्यांच्या प्रश्नांचे निराकरण करावे. डॉ. नवले यांनी युवक व विद्यार्थ्यांनाही आवाहन करताना सांगितले की, सोशल मीडियावर आंदोलनाला मोठ्या प्रमाणावर पाठिंबा देणाऱ्या युवकांनी आता प्रत्यक्ष लोकशाही आंदोलनात सहभागी होऊन सोनम वांगचुंग यांच्या मागण्यांना बळ द्यावे. दरम्यान, माकपने केंद्र सरकारला आंदोलनाची गंभीर दखल घेऊन आंदोलकांचे प्राण वाचवण्यासाठी तातडीने पावले उचलण्याचे आवाहन केले आहे.

सावरकर नगर येथे झोपडपट्टी पुनर्वसन योजनेची जनजागृती कार्यशाळा संपन्न

 मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळवी यांचे मार्गदर्शन ठाणे, मुंबई महानगर प्रदेश झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, ठाणे यांच्यावतीने शहरातील सावरकर नगर येथे झोपडपट्टी पुनर्वसन योजनेबाबत जनजागृती व मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. ठाणे महानगरपालिकेच्या महापौर शर्मिला पिंपळोलकर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झालेल्या या कार्यशाळेला स्थानिक नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळवी यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या या कार्यशाळेला उपमुख्य अभियंता राजकुमार पवार, सक्षम प्राधिकरण अधिकारी मिनल पालांडे, कार्यकारी अभियंता सलीम सय्यद, सहाय्यक निबंधक रोहिदास बांगर, वास्तुविशारद निलेश सावंत यांच्यासह परिसरातील नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण ठाणे शहरात प्रभावीपणे कार्यरत असून, नागरिकांनी पुनर्वसन योजनेत सक्रिय सहभाग नोंदवून या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.प्राधिकरणामार्फत आयोजित करण्यात आलेल्या या कार्यशाळेत झोपडपट्टी पुनर्वसन योजनेची उद्दिष्टे, योजनेचे फायदे, पुनर्वसनाची प्रक्रिया, पात्रता निकष तसेच नागरिकांच्या शंकांचे निरसन आदी विषयांवर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी उपस्थित नागरिकांच्या विविध प्रश्नांची समाधानकारक उत्तरे देत पुनर्वसन प्रक्रियेतील प्रत्येक टप्प्याची सविस्तर माहिती दिली. तसेच, स्थानिक नागरिकांमध्ये जनजागृती करून योजनेचा लाभ अधिकाधिक पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहनही प्राधिकरणामार्फत करण्यात आले. या कार्यशाळेत परिसरातील स्थानिक नागरिक, झोपडपट्टीधारक तसेच सामाजिक कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

 कोणत्याही पुर्वसूचनेशिवाय स्मार्ट मीटर बसवल्याचा आरोप

 कर्मचाऱ्यांवर कारवाईची ग्राहकांची मागणी अनिल ठाणेकर ठाणे, ठाणे पश्चिम येथील ओम श्री स्वामी समर्थ सोसायटीतील रहिवासी जगदीश कमलसिंह खैरालिया यांनी महावितरणाकडे लेखी तक्रार करून कोणतीही पूर्वसूचना किंवा संमती न घेता त्यांच्या घरातील जुना वीज मीटर काढून स्मार्ट वीज मीटर बसविण्यात आल्याचा आरोप केला आहे. तसेच संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांवर चौकशी करून कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे. जगदीश खैरालिया यांनी कार्यकारी अभियंता, महावितरण (ठाणे विभाग) यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, १ जुलै २०२६ रोजी वीजबिलाचा धनादेश भरण्यासाठी गेल्यानंतर त्यांना कार्यालयात समजले की, त्यांच्या घरातील जुना वीज मीटर काढून त्याजागी स्मार्ट मीटर बसविण्यात आला आहे. मात्र याबाबत कोणतीही पूर्वकल्पना, सूचना किंवा संमती घेण्यात आली नव्हती. ही बाब ग्राहक संरक्षणाच्या अधिकारांचे उल्लंघन असून ग्राहकांची फसवणूक असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. खैरालिया यांनी आपल्या निवेदनात नमूद केले आहे की, ते २६९ चौरस फूट क्षेत्रफळाच्या १ बीएचके सदनिकेत राहतात. घरात अत्यल्प वीज वापर होत असून टीव्ही, फ्रिज व वॉशिंग मशीनचा वापरही केला जात नाही. तरीदेखील स्मार्ट मीटर बसवल्यानंतर वीजबिलात अचानक वाढ झाल्याने संशय निर्माण झाला. त्यानंतर कार्यालयात चौकशी केली असता स्मार्ट मीटर बसविल्याची माहिती मिळाली. मात्र तो नेमका कधी बसविण्यात आला, याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे. या निवेदनाद्वारे त्यांनी तीन प्रमुख मागण्या केल्या आहेत. त्यामध्ये तात्काळ स्मार्ट मीटर काढून पूर्वीप्रमाणे जुना वीज मीटर बसविणे, स्मार्ट मीटरमुळे वसूल झालेली अतिरिक्त रक्कम व्याजासह परत देणे आणि संबंधित अधिकारी-कर्मचाऱ्यांची चौकशी करून त्यांच्यावर कठोर कारवाई करणे यांचा समावेश आहे. या मागण्यांची तातडीने पूर्तता न झाल्यास पुढील कायदेशीर कारवाई तसेच आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल, असा इशाराही जगदीश खैरालिया यांनी दिला आहे. या निवेदनाच्या प्रती ठाण्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा न्यायदंडाधिकारी आणि ठाणे शहर पोलीस आयुक्त यांनाही पाठविण्यात आल्या आहेत.