रमेश औताडे
मुंबई: अनुसूचित जाती आरक्षणाचे ऊपवर्गीकरण लवकर करावे या करीता आझाद मैदान मुंबई येथे २९ सप्टेंबर २०२६ रोजी होत असलेल्या आंदोलनाचाआढावा घेण्यासाठी सकल मातंग समाजाची निर्धार बैठक शेगाव बुलढाणा येथे पार पडली. या संभाव्य आंदोलनाची पुढील दिशा कशी असेल याबाबत राज्य समन्वयक बाबूराव मुखेडकर यांनी मुंबई मराठी पत्रकार संघ येथे माहिती दिली.
बैठकीचे अध्यक्षपद निमंत्रक विजयभाऊ आंभोरे यांनी भूषवले. बैठकीस राज्य समन्वयक बाबूराव मुखेडकर, सुदाम धुपे, पंडित सूर्यवंशी, कैलाश डाखोरे, ॲडव्होकेट राम चव्हाण,परिमल कांबळे, रणधीर कांबळे, लहुजी शक्ती सेनेचे प्रदेशाध्यक्ष कैलास दादा खंदारे, ल. सा. क. म. चे विश्वस्त अध्यक्ष ऊपाडे, सचिव सुभाष तोंडारकर, प्रा. अंबादास सकट, ए टी अवचार, प्रदेश अध्यक्ष प्रा संजय गायकवाड, अविनाश बागवे मातंग एकता आंदोलन प्रमुख, सुनिल बावकर, दयानंद आडागळे,विलास साबळे ,संजय कठाळे, संजय उबाळे जी, विनोद जोगदंड देवीलाल अवचार, ऍड नरसिंग सूर्यवंशी, मंदाकिनी चव्हाण, संजय कठाले,आणि डॉ. चंदन शिवे आदी मान्यवरांची उपस्थिती होती.
विभागीय बैठक, जिल्हा निहाय, तालुका निहाय बैठका घेत ऑगस्ट महिन्यात साहीत्यसम्राट आण्णाभाऊ साठे यांच्या जयंती कार्यक्रमात अंदोलनाविषयी जनजागृती करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे बाबूराव मुखेडकर यांनी यावेळी सांगितले.
