१५ वी ज्यो फर्नांडिस हॉकी स्पर्धा २०२६
मुंबई : एएचडब्ल्यूए आयोजित १५व्या ज्यो फर्नांडिस हॉकी स्पर्धेत (२०२६) एलिट पुरुष गटाच्या सामन्यात मध्य रेल्वेने युनियन बँक ऑफ इंडियावर २-१ अशी मात केली. वांद्रे येथील सेंट स्टॅनिस्लॉस हायस्कूलच्या टर्फ मैदानावर खेळल्या गेलेल्या स्पर्धेत सुंदरम सिंग आणि अनुप वाल्मिकीने प्रत्येकी एक गोल करत विजयात मोलाचा वाटा उचलला. युनियन बँकेकडून कार्तिक एम. ने गोल केला. दुसऱ्या सामन्यात, मुंबई कस्टम्सने सीटीसी ‘ए’ संघाला २-१ अशा फरकाने हरवले. विजयी संघासाठी अनुभवी फॉरवर्ड जयेश जाधव आणि व्यंकटेश केंचेने गोल केले. पराभूत संघाकडून एकमेव गोल देवेंद्र वाल्मिकीने केला.
निकाल – एलिट पुरुष: मध्य रेल्वे २ (सुंदरम सिंग, अनुप वाल्मिकी) विजयी वि. युनियन बँक ऑफ इंडिया १ (कार्तिक एम.).मुंबई कस्टम्स २ (जयेश जाधव, व्यंकटेश केंचे) विजयी वि. सीटीसी ‘ए’ १ (देविंदर वाल्मिकी).
फोटो ओळ: अनुप वाल्मिकी (डावीकडे) आणि सुंदरम सिंगने प्रत्येकी एक गोल करत मध्य रेल्वेच्या विजयात निर्णायक भूमिका बजावली.
