Category: होम

दिव्यातील ग्लोबल इंग्लिश स्कूलमध्ये आषाढी एकादशी उत्साहात साजरी

दिवा : दिवा येथील ग्लोबल इंग्लिश स्कूलमध्ये आषाढी एकादशीचा पवित्र सण अत्यंत भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात शाळेचे विश्वस्त महेंद्र दळवी सर यांच्या हस्ते पालखी पूजनाने…

ज्येष्ठ नागरिकांना मोफत छत्री वाटप उपक्रम

अनिल ठाणेकर ठाणे, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, कल्याण लोकसभेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच शिवसेनेचे ज्येष्ठ नेते दशरथ पाटील यांच्या पुढाकाराने व प्रेरणेने सन १९८६ पासून माजी नगरसेवक उमेश पाटील यांचा सामाजिक बांधिलकी जपणारा हा उपक्रम अखंडपणे राबविण्यात येत आहे. पावसाळ्यात ज्येष्ठ नागरिकांना आवश्यक असलेली छत्री मोफत उपलब्ध करून देत त्यांच्या सेवेसाठी हा उपक्रम दरवर्षी आयोजित केला जातो. कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून महापौर शर्मिला पिंपलोळकर उपस्थित होत्या. यावेळी सभागृह नेते हणमंत जगदाळे, उपशहरप्रमुख नथु पाटील, उद्योजक जगदीश पाटील, सिकंदर केणी, उपशहरप्रमुख राकेश पाटील, कळवा-मुंब्रा विधानसभा सहसंघटक रचना पाटील, शाखाप्रमुख राधेय वराडकर, शाखाप्रमुख निनाद बोऱ्हाडे, बाळकृष्ण म्हात्रे, प्रविण पवार, गणेश परब, जय पाटील, दुर्गेश चाळके, प्रशांत पाटील, पूनम पाटील, कुणाल म्हात्रे, सुजय पाटील, अर्चना पाटील, प्रियंका भरम, निर्मला कदम, रेखा रहाटे, रश्मी दळवी, स्मिता आयरे उपस्थित होते. काशिनाथ पाटील, सयाबाई पाटील, जयराम पाटील आणि स्व. लक्ष्मण काशिनाथ पाटील यांच्या स्मरणार्थ खारीगाव व पारसिक नगर परिसरातील ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत छत्री वाटप कार्यक्रम उत्साहात पार पडला. गेल्या चार दशकांपासून सुरू असलेल्या या सामाजिक उपक्रमाची परंपरा यंदाही कायम राखण्यात आली. यावर्षीही मोठ्या संख्येने ज्येष्ठ नागरिकांनी कार्यक्रमाला उपस्थित राहून छत्र्यांचा लाभ घेतला. या उपक्रमामुळे परिसरातील नागरिकांनी आयोजकांचे कौतुक करत सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या या परंपरेचे स्वागत केले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी सामाजिक उपक्रमांची परंपरा कायम ठेवण्याची गरज व्यक्त करत, ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान आणि सेवाभाव हीच खरी समाजसेवा असल्याचे सांगितले. गेल्या ४० वर्षांपासून अखंडपणे सुरू असलेला हा छत्री वाटपाचा उपक्रम परिसरातील सामाजिक बांधिलकीचे प्रेरणादायी उदाहरण ठरत असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

विठू नामाच्या गजरात दुमदुमले माथेरान

मुकुंद रांजाणे माथेरान : आषाढी एकादशीनिमित्त माथेरान ग्रामस्थ उत्सव मंडळाच्या आयोजनातून ज्ञानदिंडी सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. आषाढी एकादशीच्या पावन पर्वावर शाळा,आणि विविध सांस्कृतिक संस्थांच्या वतीने ‘ज्ञानदिंडी’ सोहळ्याचे अतिशय भक्तिमय आणि उत्साही वातावरणात आयोजन करण्यात आले होते. अध्यात्माची जोड देत शिक्षणाचे आणि विचारांचे महत्त्व समाजात रुजवावे,या उद्देशाने या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. अंगणवाडीतील मुलांनी विठ्ठल-रुक्मिणी,वारकरी,संत ज्ञानेश्वर,संत तुकाराम आणि संत जनाबाई यांचे रूप परिधान करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. टाळ-मृदंगाचा गजर:”विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल” आणि “ज्ञानोबा माऊली तुकाराम”च्या गजराने परिसर दुमदुमून गेला होता. केवळ धार्मिक सोहळा न ठेवता दिंडीमध्ये ‘झाडे लावा, झाडे जगवा’,’प्लास्टिक मुक्ती’, ‘मुली वाचवा, मुली शिकवा’ आणि ‘ग्रंथ हेच आमचे गुरु’ अशा विविध सामाजिक संदेश देणाऱ्या पाट्या आणि फलक घेऊन विद्यार्थी सहभागी झाले होते. अभंग आणि फुगड्या: दिंडीच्या मार्गावर विद्यार्थ्यांनी पारंपरिक अभंग गायले आणि फुगड्यांचा आनंद लुटला. “ज्ञानोबा-तुकाराम” च्या नामघोषात आणि रिंगण सोहळ्यात तल्लीन झालेले विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यामुळे संपूर्ण परिसरात पंढरपूरच्या वारीचा भास होत होता. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये भारतीय संस्कृती, परंपरा, सामाजिक भान आणि वाचनाची आवड निर्माण होण्यास मदत होते,अशी भावना शिक्षकांनी व पालकांनी व्यक्त केली.सोहळ्याच्या शेवटी उपस्थितांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.यावेळी नगरसेवक मा सुनील शिंदे,पर्यावरण सभापती शिवाजी शिंदे ग्रामस्थ उत्सव मंडळाचे अध्यक्ष  प्रकाश सुतार उपाध्यक्षा सुहासिनी शिंदे, चंद्रकांत जाधव, अनंत शेलार मुख्याध्यापक रमेश ढोले ,शिक्षक संघपाल वाठोरे, अंधारे,शिक्षिका विदुला गोसावी,अंगणवाडी सेविका सुरेखा जमदाडे, रमा आखाडे, मनिषा दळवी, श्रद्धा रामाणे, वनिता कदम, अनिता चव्हाण, कांचन केतकर मनिषा चौधरी,साक्षी कदम, शीतल कदम, हरिपाठ वारकरी संप्रदायचे  विजय सनगरे, नंदू साबळे,भालचंद्र सावंत,मृदूंगमणी संदीप जाबरे,नंदू सनगरे,शैलेंद्र दळवी,दत्तात्रय सनगरे,प्रदीप शिंदे,प्रदीप घावरे राजेश चौधरी, शैलेश चाफेरकर, नरेश शिंदे,सर्व शिक्षक वृंद अंगणवाडीतील बालविद्यार्थी व शालेय विद्यार्थी आदिनी उपस्थित राहून ज्ञानदिंडीमध्ये सहभाग घेतला.

गांधीनगरचा विकास रखडविणाऱ्या बिल्डरला एसआरए अधिकाऱ्यांकडून नळपाडा आंदण

नळपाड्यातील रहिवाशी आक्रमक  सोमवारी एसआरए कार्यालयावर धडक देणार ठाणे : ज्या विकासकालाने गांधीनगर,  सुभाष नगरचा पुनर्विकास सुमारे १५ वर्षे रखडविला आहे. त्याच विकासकाला नळपाड्याचा पुनर्विकास करण्याची सुपारी देण्यात येत आहे, असा आरोप करीत नळपाड्यातील सुमारे १५०० लोकांनी एसआरए अधिकाऱ्यांच्या या निर्णयाला विरोध करण्याची भूमिका घेतली असून सोमवारी खेवरा सर्कल येथील एसआरए कार्यालयांवर रहिवाशी धडक देणार आहेत, असे येथील रहिवाशी तथा मुख्य प्रवर्तक अमोल जानवलकर, यांनी सांगितले. अमोल जानवलकर, जगदीश चौहाण,  प्रभात सिंग, प्रदीप साहू  यांनी दिलेल्या माहितीनुसार,  नळपाडा येथील १५०० घरांचा पुनर्विकास करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. त्यासाठी एसआरए अधिकाऱ्यांनी रिट्स प्राॅपर्टी इंडिया या विकासकाला पुढे केले आहे. ही कंपनी महाकाली बिल्डर्सचा एक भाग आहे. या कंपनीला या आधी गांधी नगरमधील २२०० झोपडीधारकांनी सहमती पत्र दिले होते. त्यानंतर ४०० घरे पाडण्यात आली. मात्र, त्यांना अद्याप भाडे अदा करण्यात आलेले नाही. तसेच, सुभाष नगर येथील एसआरए प्रकल्प १५ वर्षे रखडला आहे. आता गांधीनगर येथील उर्वरित १८०० झोपडीधारकांनी घरे रिकामी करण्यास नकार दिला आहे. आर्थिक डबघाईस आलेल्या महाकाली डेव्हलपर्स संचालित रिट्स प्रॉपर्टी इंडिया या कंपनीसाठी एसआरए अधिकारी पायघड्या का घालत आहेत, असा सवाल अमोल जानवलकर यांनी उपस्थित केला. दरम्यान,  या विकासकाला विरोध करणारा पत्रव्यवहार एसआरएकडे करण्यात आलेला आहे. त्याच अनुषंगाने अधिकाऱ्यांच्या सांगण्यानुसार १२ जुलै रोजी जनरल बाॅडीची सभा घेण्यात आली होती. मात्र या बैठकीस अधिकारी उपस्थित राहिले नाहीत. तसेच, इतिवृत्त सादर करूनही कार्यवाही करण्यात आलेली नाही, असेही  अमोल जानवलकर, यांनी सांगितले.

 कल्याणमधील फडके मैदानात तरुणाई एकवटली

– दिल्लीतील लाठीचार्जचा केला निषेध  धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर केला जल्लोष कल्याण : दिल्लीत विद्यार्थ्यांवर झालेला लाठीचार्ज व केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान, यांच्या राजीनाम्यासाठी कॉकरोच जनता पार्टीच्या समर्थनार्थ आयोजित केलेल्या आंदोलनात कल्याणमध्ये फडके मैदानात तरुणाई एकवटल्याचे पाहायला मिळाले. यावेळी विद्यार्थी, तरुण आणि त्यांचे पालक देखील या आंदोलनात सहभागी झाले होते. दुपारी शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिल्याचे वृत्त येताच आंदोलनस्थळी एकच जल्लोष करण्यात आला. ठाणे जिल्ह्यातून सर्वच भागातून या आंदोलनासाठी तरुण सहभागी झाले होते. दिल्लीतील विद्यार्थ्यांवरील लाठीचार्ज आणि केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीवरून देशभर संतापाची लाट उसळली आहे. “एका प्रधानासाठी संपूर्ण देशाला सरकारने वेठीस धरले आहे,” अशी टीका आंदोलनकर्त्यांनी केली. विद्यार्थ्यांच्याच नव्हे, तर देशातील सर्वसामान्य नागरिकांच्याही भावना तीव्र असल्याचे सांगत, विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ मोठ्या संख्येने नागरिक रस्त्यावर उतरल्याचा दावा आंदोलनकर्त्यांनी केला. तर या आंदोलनाला विविध राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटना यांनी देखील पाठींबा दर्शविला. यामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी शरद पवार गट, शिवसेना शिंदे गटातील काही लोकप्रतिनिधी देखील या आंदोलनात सहभागी झाले होते. तर कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. दरम्यान या आंदोलनात घुसलेल्या काही असामाजिक घटकांनी काही पत्रकारांना मारहाण केल्याची घटना घडली. ०००००

डोंगरी म्युनिसिपल शाळेच्या विद्यार्थ्यांच्या दिंडीत दुमदूमला हरीनामाचा गजर

दिनेश मराठे मुंबई : दक्षिण मुंबईतील डोंगरी येथील मुंबई महानगरपालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी आषाढी एकादशी निमित्त विठू नामाचा गजरकरीत डोंगरी परिसरात दिंडी सोहळा साकारला. या दिंडी सोहळ्यात एका फुलांनी सजविलेल्या एका खास पालखीत श्री हरी विठ्ठल रखुमाई यांची मूर्ती विराजित केले होते. यावेळी स्पीकर्सवरील ढोल ताशाच्या वादनाने संगीतमय वातावरणात मुलींनी लेझिम खेळत पालखी सोहळ्यात सहभागी झालेल्या तसेच रस्त्याच्या धुतर्फा उभे राहून पालखी सोहळ्याचा आनंद घेणाऱ्या लोकांचे लक्ष वेधलेच नव्हे तर त्यांच्या कौतुकाची टाळयांच्या गजरात झालेल्या स्वागतमय  कमान उभारली. यावेळी मुलींनी खास करून जय जय राम कृष्ण हरिचा जप केला.तर काही मुलांनी विठ्ठलाचे अभंग गात वातावरण भक्तीमय केले. या दिंडी सोहळ्यात शाळेतील महिला शिक्षिकांनी विशेष मेहनत घेत मुलींना नटवले होते.प्रत्येक मुलीने नेसलेली नऊवारी साडी, केसांचा अंबाडा, गळ्यातील इमिटेशन ज्वेलरी दागिने,कानातील कर्ण फुले, हातातील बांगड्या आणि चेहऱ्यावर साजेसा शृंगार यांच्यासह सादर केलेल्या लेझिम नृत्याचा सुरेख संगम पाहताना एक अनोखा आनंद साऱ्यांच्या चेहऱ्यावर होता. डोईवर भरलेल्या पाण्याच्या घागरी, कलश आणि तुळशी वृंदावन, मुलांच्या हातातील भगवी केशरी अशी भागवत संप्रदयाची धर्मध्वजा, मुखाने होणारा निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम या संत शिरोमणीचा जय घोष आणि भेटी लागी जीवा अशी पंढरपूरातील सावळ्या विठ्ठल रखुमाईला घातलेली आर्त साद ही वरुणाच्या वर्षावात जलधारांच्या अभिषेकात  वातावरणात विठ्ठलमय झाले होते.

‘चित्रमय म्हणी आणि वाक्प्रचार’ पुस्तकाचे राज ठाकरे यांच्या हस्ते प्रकाशन

 व्यंगचित्रांच्या माध्यमातून म्हणी नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न मुंबई : महाराष्ट्राच्या भाषिक आणि सांस्कृतिक ठेव्याचा भाग असलेल्या जुन्या मराठी म्हणी आणि वाक्प्रचार नव्या पिढीपर्यंत सोप्या, रंजक पद्धतीने पोहोचावेत या उद्देशाने तयार करण्यात आलेल्या ‘चित्रमय म्हणी आणि वाक्प्रचार’ या सचित्र पुस्तकाचे प्रकाशन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते नुकतेच झाले. सांताक्रूझ येथील ओला वाकोला बँक्वेट हॉल येथे झालेल्या या कार्यक्रमाला ग्रंथालीचे सुदेश हिंगलासपूरकर, पुस्तकाचे संपादक संजय मिस्त्री, ज्येष्ठ व्यंगचित्रकार प्रशांत कुलकर्णी आणि पुस्तकाचे प्रकाशक संदेश चव्हाण यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. या पुस्तकात प्रशांत कुलकर्णी, प्रभाकर वाईरकर, संजय मिस्त्री, चारूहास पंडित, विश्वास सूर्यवंशी, योगेंद्र भगत, विवेक प्रभूकेळूसकर, उमेश कवळे आदी महाराष्ट्रातील नामवंत व्यंगचित्रकारांनी रेखाटलेली म्हणी आणि वाक्प्रचारांवरील चित्रे समाविष्ट आहेत. यावेळी बोलताना राज ठाकरे म्हणाले, “हजार काम एक चित्र करते आणि हजार अनुभवांचे ज्ञान एक म्हण देते. पंचतंत्र, हितोपदेश, इसापनीतीने जसे नीतीमूल्ये शिकवली, तसेच काम या म्हणी आणि वाक्प्रचार करतात. जे सांगायला निबंध लिहावा लागेल ते एका ओळीची म्हण सांगते.” आजच्या पिढीपासून हा अमूल्य ठेवा दूर होत चालला आहे. तो पुन्हा रुजविण्यासाठी व्यंगचित्र हे सर्वात प्रभावी माध्यम आहे, असे मत पुस्तकाचे प्रकाशक संदेश चव्हाण यांनी व्यक्त केले. जुन्या काळातील म्हणी हसत-खेळत, हलक्या-फुलक्या पद्धतीने नव्या पिढीपर्यंत पोहोचविणे हाच या पुस्तकामागचा मुख्य उद्देश असल्याचे ते म्हणाले. हे पुस्तक अॅमेझॉनवर तसेच ओला वाकोला बँक्वेट, सांताक्रूझ येथे उपलब्ध आहे. पुस्तकासाठी ९७०२3८६७६७ या क्रमांकावर संपर्क साधता येईल.

दिव्यांग मुलांना ब्लाइंड काठी भेट

पारनेर : जिल्हा सहकारी बँक व जीएस महानगर बँकेचे दिवंगत माजी अध्यक्ष अॅड. उदयराव गुलाबराव शेळके यांच्या जयंतीनिमित्त  मुंबईतील शेकडो दिव्यांग मुलांना काठी वाटप (ब्लाइंड स्टीक) करण्यात आले. जीएस महानगर बँकेच्या…

रक्तदान हेच सर्वात श्रेष्ठदान- आरती साळवी

मुंबई : रक्तदान हेच सर्वात श्रेष्ठ दान असून नागरिकांनी रक्तदान जरूर करावे असा सामाजिक संदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा पवार पक्षाच्या मुंबई महिला अध्यक्षा आरतीताई साळवी यांनी अजित दादा पवार…

– जागतिक कांदळवन दिनी तरुणाई मैदानात, प्रशासन मात्र गायब!

 कांदळवन वाचवा… पर्यावरण वाचवा… भविष्यातील पिढ्या वाचवा! – पर्यावरणीय गुन्ह्यांच्या निष्पक्ष तपासासाठी युवकांचे पोलिसांना शांततापूर्ण साकडे मिरा – भाईंदर जागतिक कांदळवन दिनानिमित्त आज भाईंदर (पूर्व) येथील जैसल पार्क खाडी परिसरात फॉर फ्यूचर इंडिया, मँग्रोव्ह फाउंडेशन आणि महाराष्ट्र वन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य कांदळवन स्वच्छता अभियान आयोजित करण्यात आले. या अभियानामध्ये १०० हून अधिक स्वयंसेवकांनी उत्स्फूर्त सहभाग घेत सुमारे ७५० किलोहून अधिक कचरा कांदळवनातून बाहेर काढला. या उपक्रमात पाटकर कॉलेज NSS युनिट, LRMC कॉलेज NSS युनिट, रॉयल कॉलेज NSS युनिट, तसेच शहरातील अनेक विद्यार्थी, पर्यावरणप्रेमी, युवक, सामाजिक संस्था आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला. मिरा-भाईंदर महानगरपालिकेच्या स्वच्छता विभागानेही या अभियानात सहकार्य केले. कार्यक्रमादरम्यान उपस्थितांना कांदळवनांचे पर्यावरणीय, जैवविविधता, हवामान बदल नियंत्रण तसेच किनारपट्टी संरक्षणातील राष्ट्रीय व जागतिक महत्त्व याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. संपूर्ण परिसर स्वच्छ करून कांदळवन संवर्धनाचा संदेश देण्यात आला. स्वच्छता अभियानानंतर उपस्थित पर्यावरणप्रेमी युवकांनी पर्यावरणीय गुन्ह्यांच्या तपासाबाबत गंभीर चिंता व्यक्त केली. विशेषतः मिरा-भाईंदर परिसरातील कांदळवन नाश प्रकरणांमध्ये दाखल झालेल्या एफआयआर व आरोपपत्रांमधील कथित प्रक्रियात्मक त्रुटी, तपासातील विसंगती आणि मुख्य आरोपींना वगळल्याच्या आरोपांमुळे युवकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. युवकांनी निदर्शनास आणून दिले की, काही प्रकरणांमध्ये मुख्य आरोपींना वगळून इतर व्यक्तींवर जबाबदारी टाकल्याचा संशय निर्माण होतो, तसेच पर्यावरण (संरक्षण) अधिनियम, १९८६ अंतर्गत आवश्यक कायदेशीर प्रक्रियेचे पालन झाले आहे का, याबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. त्यामुळे संबंधित प्रकरणांमध्ये पारदर्शक, निष्पक्ष आणि कायद्यानुसार तपास व्हावा, अशी मागणी करण्यात आली. यावेळी उपस्थितांनी सांगितले की, भाईंदर पश्चिम पोलीस स्टेशन आणि नवघर पोलीस स्टेशन येथील पर्यावरणीय गुन्ह्यांशी संबंधित दोन स्वतंत्र प्रकरणांमध्ये तपासातील अनेक विसंगती प्रथमदर्शनी दिसून येत असल्याचा आरोप करण्यात आला असून, यासंदर्भात एसीपी, डिसीपी, अडिशनल सीपी आणि पोलीस आयुक्त यांच्याकडे लेखी तक्रारी देऊनही अद्याप समाधानकारक कारवाई झालेली नसल्याची खंत व्यक्त करण्यात आली. उपस्थित युवकांनी स्पष्ट केले की, हा उपक्रम पोलिसांविरोधातील आंदोलन नसून, पर्यावरणीय गुन्ह्यांचा तपास अधिक निष्पक्ष, पारदर्शक आणि कायदेशीर पद्धतीने व्हावा यासाठी केलेले शांततापूर्ण आवाहन आहे. पर्यावरणीय गुन्ह्यांमध्ये कोणालाही अभय मिळू नये, दोषींवर कठोर कारवाई व्हावी आणि तपास प्रक्रियेवर जनतेचा विश्वास कायम राहावा, हीच या उपक्रमामागील भूमिका असल्याचे त्यांनी सांगितले. स्वच्छता अभियानानंतर युवकांनी हातात विविध जनजागृतीपर फलक घेऊन पोलिसांना शांततापूर्ण पद्धतीने साकडे घातले. “निष्पक्ष तपास करा, पर्यावरणाला न्याय द्या”, “पोलीस जागे व्हा, पर्यावरण वाचवा”, “पर्यावरणीय गुन्ह्यांचा तपास पारदर्शक करा”,…