Category: होम

नेपाळ दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना ५ लाखांची मदत

मुख्यमंत्र्यांची मदतीची घोषणा जळगाव: नेपाळ येथील काठमांडू येथे देवदर्शनासाठी जात असताना भाविकांची बस दरीत कोसळली होती. या दुर्दैवी अपघातात जळगावच्या 26 भाविकांचा मृत्यू झाला. या नेपाळ येथील दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्याच्या कुटुंबियांना राज्य सरकारतर्फे ५…

महिलांवरील अत्याचार हा अक्षम्य अपराध–पंतप्रधान नरेंद्र मोदी

जळगाव : महिलांवर अत्याचार हा अक्षम्य अपराध आहे. तो करणारा कोणीही असो, तो सुटता कामा नये, असे प्रतिपादन नरेंद्र मोदी यांनी केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत आज जळगाव येथे लखपती दीदी कार्यक्रम पार पडला. या वेळी…

मुंबईकरांना यंदा डे-नाईट गणपती बाप्पाचे दर्शन !

मुंबई : मुंबईकरांसाठी खुषखबर आहे. यंदा मुंबईकरांना गणपती बाप्पाचे डे -नाईट दर्शन घेता येणार आहे. मुंबईतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या गणपतींचे दर्शन डे-नाईट गणेशभक्तांना घेता यावे, यासाठी ‘बेस्ट’ (BEST) उपक्रमाने यंदाही रात्रभर सेवा देण्याचा निर्णय घेतला…

‘माथेरान-कर्जत मार्गावर मिनीबसेस उपलब्ध कराव्यात’

पालिकेची स्वतःची मिनीबस सुरू होण्याच्या प्रतिक्षेत नागरिक ! माथेरान : माथेरान करांच्या कर्जत ते माथेरान दरम्यानच्या वाहतूक व्यवस्थेचा मुख्य कणा म्हणून मिनीबस सेवेला अधिकाधिक प्राधान्य दिले जाते.या सेवेचा लाभ सर्वसामान्य लोकांना, व्यापारी त्याचप्रमाणे शैक्षणिक दृष्टीने महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठया प्रमाणावर होत आहे. ११ ऑक्टोबर २००८ मध्ये तत्कालीन नगराध्यक्ष मनोज खेडकर यांच्या शर्थीच्या प्रयत्नांमुळेच अनेक खडतर आव्हाने पेलून ही मिनीबस सेवा उपलब्ध झाली असून आजवरच्या काळात याच सेवेच्या माध्यमातून असंख्य विद्यार्थ्यांना महाविद्यालयीन शिक्षण घेऊन आपले करियर करता आले आहे.सुरुवातीला ह्या बसने उत्तम प्रकारे सेवा उपलब्ध करून दिली होती. परंतु काही वर्षांपासून ह्या बसने कात टाकण्यास सुरुवात केली आहे. त्यातच या मार्गावरील दोन बसेसची पुरती वाताहत झाली असल्याने घाटरस्त्यात कुठेही बंद पडण्याचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे ही बस व्यवस्थित प्रवास देईल याचीही शाश्वती राहिलेली नाही. पर्यटनस्थळ माथेरान मध्ये स्थानिकांना आजवर आपल्या मूलभूत अधिकार असो किंवा गावाची विकासात्मक कामे असोत नेहमीच इथल्या गलिच्छ राजकारणापायी संघर्ष करावा लागत आहे.राज्यातील विविध ठिकाणी सर्वत्रच शासनाच्या मिनीबसेस प्रवाशांना सेवा देत आहेत. त्यामुळे माथेरान नगरपरिषदेच्या माध्यमातून लवकरच या मार्गावर स्वतःच्या दोन बसेस उपलब्ध करून दिल्यास शालेय विद्यार्थ्यांना त्याचप्रमाणे नियमित प्रवास करणाऱ्या व्यापारी वर्गाला, नागरिकांना सोयीचे ठरू शकते असे स्थानिक बोलत आहेत. महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या माध्यमातून चालविण्यात येणारी कर्जत माथेरान मिनीबसची अवस्था अत्यंत बिकट झाल्याने प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.सुरुवातीच्या काळात माथेरानसाठी दोन मिनी बस दिल्या गेल्या होत्या नंतर त्यातील एक बस ही पनवेल येथे फिरविण्यात आली त्यामुळे येथील नागरिकांना एकाच बसवर अवलंबून राहून खडतर प्रवास करावा लागत आहे.फार जुनी बस असल्याने नेरळ माथेरान घाटात अचानक बंद पडल्याने प्रवाशांना खूप त्रास सहन करावा लागतो. संबंधित प्रशासनाने याची गंभीर दखल घेऊन किमान दोन नवीन बस नागरिकांच्या सेवेत आणल्यास नागरिकांचा प्रवास सुखकर होईल आणि महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाला देखील याचा निश्चित फायदा होईल. चंद्रकांत जाधव— अध्यक्ष क्षत्रिय मराठा समाज माथेरान  

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’साठी दुसऱ्या टप्प्यात

 १ लाख महिला ठरल्या पात्र एकूण लाभार्थी महिलांची संख्या सुमारे २ लाख ठाणे- राज्य सरकारच्या दुसऱ्या टप्प्यातील एक लाख अर्जांची छाननी ठाणे महापालिकेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी अहोरात्र काम करून वेळेत…

जिजामातानगर गणेशोत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी सुशील साळसकर यांची निवड

मुंबई : जिजामातानगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची   सन २०२४ -सन २०२५ ची कार्यकारिणीची निवड जाहिर करण्यात आली असून मंडळाच्या अध्यक्षपदी सुशील मनोज साळसकर यांची तर सरचिटणीसपदी मंगेश घेगडे यांची निवड करण्यात आली. जिजामातानगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ हे  कामगार विभागातील प्रख्यात मंडळ असून या मंडळ आजवर धार्मिक तसेच राष्ट्रीय व विविध सामाजिक  विषयांवर आधारित देखावे सादर करून समाजप्रबोधनाचे  कार्य करण्यासाठी सुपरिचीत आहे. भूकंप , पूर यासारख्या  नैसर्गिक आपत्ती प्रसंगी मदतनिधी देऊन आपल्यापरीने खारीचा वाटा उचलून आपले सामाजिक दायित्व बजावण्याचं कामही हे मंडळ  करीत असते. यंदा मंडळाचे हे ७३ वे वर्ष असून मंडळाची ७२वी वार्षिक सभा मंडळाचे विश्वस्त महेश पावसकर,प्रशांत सुर्वे,राजू नाईक यांंच्या उपस्थितीत नुकतीच संपन्न झाली. या सभेत सन २०२४ ते सन २०२५ या वर्षासाठी कार्यकारी मंडळाची निवड करण्यात आली.कार्यकारी मंडळ पुढीलप्रमाणे.अध्यक्ष- सुशील मनोज साळसकर  कार्याध्यक्ष – सुनिल जुवळे. उप कार्याध्यक्ष – ऋषिकेश खोत, कल्पेश नागे, अक्षय गोसावी. उपाध्यक्ष -राहूल कदम,वैभव गवस,अभिनय राणे. सरचिटणीस- मंगेश घेगडे  चिटणीस- शुभम घाटगे,सिद्धार्थ कदम,अभिषेक नलावडे. खजिनदार- संदीप मेंगडे.हिशोब तपासणीस- राकेश खानविलकर.

श्रीकांत शिंदे आणि आशिष शेलार यांनी फोडली विधानसभा निवडणुकीच्या विजयाची हंडी

मुंबई : कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ श्रीकांत शिंदे आणि आमदार यांनी विजयाची हंडी फोडत आगामी विधानसभा निवडणुकीसाठी विजयाचा एल्गार पुकारला. निमित्त होते राहुल नारायण कनल आणि जश वीरा यांच्या…

आज डोंबिवलीतील वर्दळीचे रस्ते वाहतुकीसाठी बंद

डोंबिवली : डोंबिवलीतील राजकीय दहीहंड्या मुख्य वर्दळीच्या रस्त्यांवर बांधण्यात येतात. या कालावधीत रस्त्यांवर वाहन कोंडी होऊ नये म्हणून वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त पंकज शिरसाट यांच्या आदेशावरून मंगळवारी कृष्ण अष्टमीच्या दिवशी दहीहंडी उत्सव असलेल्या रस्त्यांवरील वाहतूक पर्यायी रस्ते मार्गावरून वळविण्यात आली आहे. डोंबिवली पूर्व भागातील बाजीप्रभू चौकात भाजपतर्फे दहीहंडी उत्सव साजरा केला जातो. सर्वाधिक वर्दळीचा फडके रस्ता आणि रेल्वे स्थानक भागाशी निगडित हा चौक आहे. या चौकात मंगळवारी वाहन कोंडी होऊ नये म्हणून फडके रस्त्याने बाजीप्रूभ चौक भागात येणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना फडके रस्त्यावरील महावितरण कार्यालय आणि कुळकर्णी ब्रदर्स येथे प्रवेश बंद करण्यात येणार आहे. ही सर्व वाहने फडके रस्त्यावरून डावे वळण घेऊन अंबिका हॉटेल, के. बी. विरा शाळेवरून पी. पी. चेंबर्स मॉल किंवा पालिकेच्या डोंबिवली विभागीय कार्यालयावरून इच्छित स्थळी जातील. मानपाडा रस्त्यावरील चार रस्ता पाटणकर चौक येथे फडके वॉच दुकानाच्या बाजुला मनसेतर्फे दहीहंडी उत्सव साजरा केला जाणार आहे. डॉ. राजेंद्र प्रसाद रस्त्याने जोधपूर स्वीट ते गिरनार चौक भागातून चार रस्ता भागात येणाऱ्या वाहनांना अडथळा होणार आहे. त्यामुळे टंडन रस्त्याने, दत्तनगर भागातून राजेंद्र प्रसाद रस्त्याने चार रस्ता पाटणकर चौकाकडे येणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना गिरनार चौक येथे प्रवेश बंद केला जाणार आहे. ही वाहने लेवा भवन सभागृह येथील छेद रस्त्याने किंवा दत्तनगर चौकातील टिपटॉप कॉर्नर म्हाळगी चौकातून दत्तनगर चौकातून, संगीतावाडी, प्रगती महाविद्यालय दिशेने इच्छित स्थळी जातील. मानपाडा रस्ता, टिळक चौकाकडून चार रस्त्यावरून दत्तनगरकडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना पाटणकर चौक येथे प्रवेश बंद करण्यात येणार आहे. ही वाहने संत नामदेव पथ, मानपाडा रस्ता, ग्रीन चौक, चिपळूणकर मार्गे इच्छित स्थळी जातील. डोंबिवली पश्चिमेत माजी स्थायी समिती सभापती दिपेश म्हात्रे फाऊंडेशनतर्फे पंडित दिनदयाळ रस्त्यावरील सम्राट चौकात दहीहंडी उत्सव साजरा केला जाणार आहे. या उत्सवासाठी डोंबिवली पश्चिम रेल्वे स्थानकाकडून दिनदयाळ रस्त्याने सम्राट चौकाकडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना दिनदयाळ रस्त्यावरील गणपती मंदिर येथे प्रवेश बंद करण्यात येणार आहे. ही वाहने गणपती मंदिराजवळ डावे वळण घेऊन जी. एन. गॅरेज, येलोरा सोसायटीकडून सम्राट हॉटेल चौकाकडून रेतीबंदर, माणकोली पूल दिशेने जातील. रेतीबंदर, जुनी डोंबिवली, मोठागाव, देवीचापाडा भागातून सम्राट चौकाकडे येणाऱ्या वाहनांना सम्राट चौक व्यंकटेश सोसायटी येथे प्रवेश बंद करण्यात येणार आहे. ही वाहने सम्राट चौकात डावे वळण घेऊन नाना शंकरशेठ मार्गे घनश्याम गुप्ते रस्ता किंवा महात्मा फुले रस्ता मार्गे इच्छित स्थळी जातील. अत्यावश्यक सेवेच्या वाहनांना या प्रवेश बंदीमधून मुक्तता आहे. माणकोली पूल दिशेने जाणारी वाहने दिनदयाळ रस्त्यावरून धावतात. त्यामुळे रेतीबंदर चौक, गुप्ते रस्ता, सम्राट चौक भागात अभूतपूर्व वाहन कोंडी होण्याची शक्यता प्रवाशांकडून व्यक्त केली जात आहे. या तिन्ही ठिकाणी पुरेसा वाहतूक पोलीस, पोलीस बंदोबस्त ठेवण्याची प्रवाशांची मागणी आहे.

मानाच्या समजल्या जाणाऱ्या टेंभीनाका हंडीकरिता, गोविंदा पथकांसाठी प्रत्येकी  १ लाख ५१ हजार रुपयांचे पारितोषिक

अनिल ठाणेकर ठाणे : धर्मवीर आनंद दिघे यांनी ठाण्यात टेंभीनाका येथे दहिहंडी उत्सव सुरु करुन साहसी उत्सवाला एका उंचीवर नेऊन ठेवले. तोच उत्साह, तीच तरुणाईची धुम, थरांचा थरार आणि गोविंदा रे गोपाळाचा जयघोष, मान्यवरांची मांदियाळी, गीत संगीतासह भगव्याचा जल्लोष यंदा मंगळवार  २७ ऑगस्ट २०२४ रोजी टेंभीनाक्यावर पहायला मिळणार असून हा दिमाखदार सोहळा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली साजरा होणार आहे. मुंबईचा जल्लोष आणि उत्साह ठाण्यात आणण्यासाठी धर्मवीर आनंद दिघे यांनी टेंभीनाक्यावरची हंडी मोठ्या जल्लोषात साजरी करण्याचा चंग बांधला. दिघेसाहेबानंतर विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही परंपरा कायम ठेवत या महोत्सवाला वेगळे वलय निर्माण करुन दिले.  टेंभीनाक्यावरच्या  हंडीत बक्षीसांबरोबरच त्याच दिवशी जाहीर केलेली बक्षीसे रोख स्वरुपात देण्यात येऊ लागली. खास मराठमोळा साज दिमाखदार सोहळा व आकर्षक बक्षीसे यामुळे ठाण्यातील ही परंपरा असलेली हंडी ठाण्याची मानाची हंडी म्हणून ओळखली जात आहे. हा दिमाखदार सोहळा साजरा करताना ठाणे व मुंबईतील गोविंदा पथकांकरीता प्रत्येकी रोख बक्षीस व आकर्षक चषक देण्यात येणार आहे. या हंडीसाठी जाहीर करण्यात आलेले बक्षीस हे मानवीशक्ती असलेल्या थरांकरीता आहे. दहीहंडी हा पारंपारिक उत्सव असला तरी तो एक साहसी खेळ आहे. या दहीहंडी महोत्सवात मुंबई व ठाण्यातील गोविंदासाठी वेगवेगळी हंडी लावण्यात येणार आहे. मुंबईतील गोविंदा पथकासाठी व ठाण्यातील गोविंदा पथकासाठी प्रत्येकी १ लाख ५१ हजार रुपयांचे पारितोषिक, सन्मानचिन्ह देण्यात येणार आहे. महिला गोविंदा पथकासाठी १,००,०००/- रुपयांचे पारितोषिक ठेवण्यात आले आहे. तर सात थर लावणाऱ्या गोविंदा पथकांसाठी १२,००० हजार, सहा थरांसाठी ८,००० हजार, पाच थरांसाठी ६,००० हजार तर चार थर लावणाऱ्या गोविंदा पथकांसाठी ५००० हजार रुपयांचे पारितोषिक ठेवण्यात आले आहे. दहीहंडी फोडणान्या गोविंदांच्या सुरक्षेसाठी रॅपलिंगसाठी असणारे दोरखंड वापरण्यात येणार असल्याचे शिवसेना ठाणे जिल्हाप्रमुख  ,खासदार नरेश म्हस्के यांनी सांगितले आहे .या दहीहंडी उत्सवात नामवंत गायक तसेच चित्रपटसृष्टीतील नामवंत कलाकारांचा नृत्य व संगीतमय जल्लोष असणार आहे. तसेच सुप्रसिध्द मराठी व हिंदी चित्रपट व मालिकांमधील प्रसिद्ध नायक/नायिका उपस्थित राहणार आहेत. महाराष्ट्राच्या लोककलेचा नृत्याविष्कार सुप्रसिध्द लावणी सम्राज्ञी आपल्या आकर्षक नृत्याने प्रेक्षकांचे मनोरंजन तसेच या उत्सवात आपल्या सुमधूर व जल्लोषमय गाण्यांनी येणाऱ्या गोविंदांना बेधुंद करणार आहेत. त्याचबरोबर उत्तम असा साउंड तसेच नेत्रदिपक रोषणाई या कार्यक्रमाची शोभा वाढविणार आहे. हा दहीहंडी महोत्सव यशस्वी करण्याकरिता खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, हेमंत पवार (शिवसेना ठाणे शहर विधानसभा  प्रमुख ,टेंभीनाका मित्रमंडळाचे माजी नगरसेवक सुधीर कोकाटे विभाग प्रमुख कमलेश चव्हाण आदी विशेष प्रयत्न करीत असल्याचे शिवसेना ठाणे जिल्हाप्रमुख ,खासदार नरेश म्हस्के यांनी नमूद केले आहे.