Category: होम

अमीत साटम यांचे शक्ती प्रदर्शन करत नामांकन दाखल

    मुंबई: अंधेरी पश्चिम विधानसभा मतदार संघासाठी भाजप, शिवसेना, रिपाई महायुतीचे उमेदवार अमीत भास्कर साटम यांनी आज गुरुवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी आमदार साटम यांनी जुहू कोळीवाडा जंक्शन…

विधानसभा निवडणूक ‘स्वीप’ कार्यक्रमांतर्गत स्वाक्षरी मोहिम

    महाराष्ट्र विधानसभा निवडणूक मतदार जनजागृती ‘स्वीप’ कार्यक्रमांतर्गत नमुंमपा मुख्यालयात लावण्यात आलेल्या ’20 नोव्हेंबर 2024 रोजी विधानसभा निवडणूकीत मी मतदानाचा हक्क बजावणार आहे’ या स्वाक्षरी फलकावर नमुंमपा आयुक्त डॉ.…

ठाणे जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघातून 17 उमेदवारांनी केले अर्ज दाखल

तर एकूण 241 नामनिर्देशन पत्रांचे वाटप   ठाणे,दि.24(जिमाका):- ठाणे विधानसभा निवडणूक 2024 साठी नामनिर्देशन अर्जाचे वाटप करण्यास सुरूवात झाली असून आज ठाणे विधानसभा मतदारसंघातून विविध पक्षांच्या एकूण 17 उमेदवारांनी नामनिर्देशन…

 मी जिंकायला उभा राहणार आहे, वोट फोडायला नाही – हंसू कुमार पांडे

   मिरा भाईंदरमधील 145 या मतदारसंघातून पहिला फॉर्म अपक्ष उमेदवार हंसू कुमार पांडे यांनी भरला.   मिरा भाईंदर : 145 विधानसभा क्षेत्रातील अपक्ष उमेदवार हंसू कुमार पांडे पत्रकारांशी संवाद साधताना…

पनवेल येथे बुध्दिष्ट वधु-वर परिचय महामेळावे

  ठाणे.भव्य बुध्दिष्ट वधू-वर परिचय महामेळावे रविवारी २७ ऑक्टोबर रोजी ठाणे,पनवेल येथे होणार आहेत. हे महामेळावे ठाणे जिल्हा परिषदेसमोर मराठी ग्रंथ संग्रहालय येथे स.१० ते दु.२ पर्यत तर जुने पनवेल…

‘राष्ट्रीय बेंचप्रेस’ स्पर्धेत महाराष्ट्राचे शानदार यश….

    मुंबई : वास्को -गोवा येथील रवींद्र भवन येथे संपन्न झालेल्या राष्ट्रीय बेंचप्रेस स्पर्धेत महाराष्ट्र संघाने शानदार कामगिरी करताना विविध गटातील तब्बल चौदा‌‌ सांघिक जेतेपद मिळवली.. ही स्पर्धा पॉवरलिफ्टिंग…

ओम साईश्वर सेवा मंडळाचे राजेश मंडल व रश्मी दळवी मुंबईचे कर्णधार

 सुवर्णमहोत्सवी ज्युनिअर राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो-खो स्पर्धेसाठी मुंबईचा संघ जाहीर   मुंबई, : महाराष्ट्र खो-खो असोसिएशनच्या मान्यतेने उस्मानाबाद जिल्हा खो-खो असोसिएशनने धाराशिव (उस्मानाबाद) येथे सुवर्णमहोत्सवी (५० वी) कुमार-मुली…

 आरवसह अर्जुनचे आव्हान संपुष्टात

 एमएसएलटीए-सीसीआय अखिल भारतीय रँकिंग टेनिस स्पर्धा   मुंबई : एमएसएलटीए-सीसीआय अखिल भारतीय रँकिंग टेनिस स्पर्धेत 14 वर्षांखालील मुले गटात दुसरा मानांकित आरव छल्लानीसह तिसरा मानांकित अर्जुन मणिकानंदचे उपांत्यपूर्व फेरीत संपुष्टात…

बडोदा-मुंबई महामार्गाच्या माथेरान डोंगरातील दुसऱ्या बोगद्याचे काम पूर्ण

पनवेल – बडोदा-मुंबई महामार्गाच्या शेवटच्या पॅकेजमधील माथेरान डोंगर रांगांखालील शिरवली गावालगतचा पहिल्या बोगद्याचे खोदकाम ऑगस्ट महिन्यात आरपार झाल्यानंतर दूसरा बोगद्याचे खोदकाम कधी पुर्ण होईल, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. १६…

भाजपचे माजी नगरसेवक दिनकर पाटील आता मनसेचे उमेदवार

हरिभाऊ लाखे नाशिक : भाजपने तिकीट वाटपात डावलल्याने बंडाचे निशाण फडकविणारे माजी नगरसेवक दिनकर पाटील यांना मनसेने नाशिक पश्चिम मतदार संघातून मैदानात उतरविले आहे. पाटील यांच्या उमेदवारीने ही लढत रंगतदार होणार आहे. मध्यंतरी नाशिक दौऱ्यात राज ठाकरे यांनी कोणत्या भागात कोणत्या समाजाचे प्राबल्य आहे, याचा अभ्यास करण्याची सूचना पदाधिकाऱ्यांना केली होती. त्या आधारे मराठा समाजातील नाराज पाटलांना पक्षात प्रवेश देतानाच लागलीच उमेदवारी बहाल करण्याची चाल मनसेने खेळली आहे. नाशिक पश्चिम मतदारसंघात भाजपकडून इच्छुकांची संख्या मोठी होती. स्थानिक आमदार सीमा हिरे यांच्या उमेदवारीला संबंधितांनी जाहीर विरोध केला होता. तथापि, पक्षाने त्यास न जुमानता पहिल्याच यादीत हिरे यांना उमेदवारी जाहीर केली. त्याचे पडसाद स्थानिक पातळीवर उमटले. माजी सभागृहनेते दिनकर पाटील यांनी समर्थकांचा मेळावा घेऊन कोणत्याही परिस्थितीत निवडणूक लढणार असल्याचे जाहीर केले. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी त्यांचा मनसेत पक्ष प्रवेश होऊन उमेदवारी निश्चित झाली. मनसेने पहिल्या यादीत राज्यातील अनेक मतदारसंघातील उमेदवार जाहीर केले होते. मात्र, त्यामध्ये नाशिकचा समावेश नव्हता. पाटील यांच्या प्रवेशानंतर तिसऱ्या यादीत नाशिक पश्चिमचा समावेश झाला आहे. नाशिक पश्चिम मतदारसंघात गंगापूर, सातपूर, अंबड, चुंचाळे, मोरवाडी, कामटवाडे अशा आठ ते १० गावांचा समावेश आहे. महापालिकेत समाविष्ट झालेल्या या गावांमध्ये मराठा समाजाचे प्राबल्य आहे. मतदारसंघाचा बराचसा भाग कामगारबहुल असून कळवण, सटाणा, मालेगाव, देवळा (कसमादे) भागातून स्थायिक झालेल्यांची संख्या मोठी आहे. या सर्व बाबी मनसेनेही विचारात घेतल्याचे दिसून येते. मतांची टक्केवारी कशी ? नाशिक पश्चिम मतदारसंघात नितीन भोसले यांच्या माध्यमातून २००९ मध्ये पहिल्यांदा मनसेचा आमदार निवडून आला होता. तेव्हा पक्षाला ३५ टक्के मते मिळाली होती. त्यापुढील २०१४ च्या निवडणुकीत मतांची टक्केवारी ४.४ पर्यंत घसरून भोसले हे पराभूत झाले होते. गतवेळी म्हणजे २०१९ मध्ये मनसेच्या दिलीप दातीर यांना ११.८ टक्के मते मिळाली होती. सलग दोनवेळा गमवाव्या लागलेल्या या जागेवर पक्षाने यावेळी वेगळा प्रयोग केला आहे.