Category: होम

कोकण भवनात स्वातंत्र्य दिनानिमित्त पूर्व तयारीची बैठक संपन्न

नवी मुंबई : स्वातंत्र्य दिनाच्या अनुषंगाने आज पूर्व तयारीची बैठक कोकण विभागाचे उप आयुक्त (सामान्य प्रशासन) अमोल यादव यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. कोकण भवनातील पहिला मजला समिती सभागृह येथे झालेल्या…

राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये अंदाजे १९ कोटी तडजोड रक्कम वसूल – न्या. अमोल शिंदे

अशोक गायकवाड     अलिबाग : दाखलपूर्व आणि प्रलंबित खटल्यांचा जलद निपटारा व्हावा आणि प्रलंबित खटले सामोपचाराने मिटावेत या हेतूने आयोजित केलेल्या लोकन्यायालयात अनेक प्रकरणे निकाली काढण्यात आली असून वादपूर्व…

टिटवाळा येथे बेकायदा चाळींची उभारणी करणाऱ्या भूमाफियावर गुन्हा दाखल

कल्याण : टिटवाळा कल्याण डोंबिवली पालिका हद्दीतील बेकायदा चाळींचे सर्वात मोठे आगर म्हणून डोंबिवलीतील ह प्रभाग ओळखला जातो. त्यानंतर टिटवाळा भागातील अ प्रभागाची गणना होते. टिटवाळा भागातील उंभर्णी भागात बनेली…

वाशी विभागात अनधिकृत बांधकामावर तोडक कारवाई

नवी मुंबई : महानगरपालिका फार्यक्षेत्रातील सी विभाग वाशी कार्यक्षेत्रातील सी-१ (अतिधोकादायक, राहण्यास अयोग्य व तात्काळ निष्काशीत करणे) या प्रवर्गात घोषित करण्यात आलेल्या इमारतीचे मा. आयुक्त डॉ. कैलाश शिंदे यांचे आदेशान्वये…

मोबाईल मेडिकल युनिटसाठी ३८ कर्मचाऱ्यांची नियुक्ती

ठाणे : आरोग्य विभाग अंतर्गत आरोग्य आणि पोषण सारख्या मुलभुत सुविधा देण्याबाबत लक्ष केंद्रित करण्यात येत आहे. ठाणे जिल्ह्यात अदिवासी व अतिदुर्गम भागात १० मोबाईल मेडिकल युनिटसाठी ३८ कर्मचारी यांना…

डॉ.कैलास शिंदे यांनी घेतला सर्व विभागांच्या कामकाजाचा सविस्तर आढावा

नवी मुंबई : महानगरपालिकेने जाहीर केलेल्या धोकादायक इमारतींच्या यादी व्यतिरिक्त ज्या इमारती प्रथमदर्शनी धोकादायक दिसून येत आहेत अशा इमारतींना नोटीसा देऊन स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे सूचित करावे तसेच अनधिकृत बांधकाम विरोधात…

 महिलांवरील वाढत्या अत्याचारविरोधात राष्ट्रवादी महिला काँग्रेस- शरदचंद्र पवार पक्षाची जोरदार निदर्शने

निवडणुकांकडे पाहून तरी बहिणींना सुरक्षा द्यावी – ॠता आव्हाड     ठाणे : निवडणुका जवळ आल्याने लाडकी बहीण योजना आणली असेल तर निवडणुकांकडे पाहून तरी बहिणींना सुरक्षा द्यावी, असे मत…

मुंबईची पाणीकपात मागे

धरणांमध्ये ७३ टक्के साठा   मुंबई : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ झाल्यामुळे पाणी कपात मागे घेण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. त्यानुसार सोमवार, २९ जुलैपासून मुंबईकरांवरील १० टक्के…

नूसीच्या वतीने नोकरीसाठी प्रशिक्षण आणि कल्याणकारी योजना – मिलिंद कांदळगावकर

ठाणे : नाविकांनी नाविकांसाठी चालवलेली नूसी ही कामगार संघटना आहे. नूसीच्या वतीने नोकरी मिळण्यासाठी तरुणांना  प्रशिक्षण व नाविक आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी कामगार कल्याणकारी योजना राबविल्या जातात, अशी माहिती नुसीचे जनरल सेक्रेटरी…

 बोगद्यातील पाण्याने प्रवासी त्रस्त

निळजे ते लोढा संकुल दरम्यानच्या   डोंबिवली : कल्याण-शिळफाटा रस्त्यावरील निळजे गाव हद्दीत रेल्वे प्रशासनाने निळजे ते लोढा गृहसंकुल दरम्यान एक बोगदा नागरिकांना येण्या जाण्यासाठी बांधून दिला आहे. या बोगद्यात पाऊस सुरू झाल्यापासून पाणी तुंबत आहे. मुसळधार पाऊस असला की या बोगद्यात कंबरभर पाणी असते. त्यामुळे निळजे गावातील ग्रामस्थ, विद्यार्थी, महिलांचे हाल होत आहेत. निळजे गावातील ग्रामस्थांचे बहुतांशी व्यवहार लोढा गृहसंकुल भागात आहेत. या गावातील बहुतांशी मुले लोढा गृहसंकुल परिसरातील शाळांमध्ये, खासगी शिकवणीसाठी, तसेच रहिवासी बाजारपेठेसाठी याच भागात जातात. मध्य रेल्वेने निळजे गावाजवळील लोढा गृहसंकुलकडे जाणारे रेल्वे फाटक दोन महिन्यापूर्वी बंद केले. हे फाटक बंद करण्यापूर्वी फाटक भागात भुयारी मार्ग बांधून देण्याची मागणी निळजे ग्रामस्थांनी मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांकडे केली होती. अधिकाऱ्यांनी ती मागणी मान्य केली होती. परंतु, एक दिवस रेल्वेने निळजे गावाजवळील रेल्वे फाटक ग्रामस्थांच्या भुयारी मार्गाची पूर्तता न करता रेल्वेने बंद केले. निळजे गावातून रेल्वे फाटकातून गेले की लोढा हेवन गृहसंकुल कमी अंतरावर होते. त्यामुळे ग्रामस्थ याच मार्गाला सर्वाधिक प्राधान्य देत होते. रेल्वे फाटक बंद केल्याने ग्रामस्थांना सोयीचे होणार नाही अशा पध्दतीने रेल्वेने एका बोगदा बांधला आहे. हा बोगदा सखल आणि खोलगट भागात आहे. या बोगद्यातून निळजे ग्रामस्थांना लोढा हेवन भागात जाता येते. या बोगद्यात पाऊस सुरू झाल्यापासून पाणी तुंबते. हे पाणी जाण्यासाठी या भागात गटार किंवा अन्य कोणतीही सोय नाही. त्यामुळे बोगद्यात पाणी तुंबून राहते. या बोगद्यातून प्रवाशांची वर्दळ असते. त्याच बरोबर मोटारी, लहान मालवाहू वाहने याच बोगद्यातून धावतात. त्यामुळे बोगद्यात पाऊस नसला की चिखल होतो. आणि पाऊस सुरू असला की बोगद्यात पाणी तुंबते. मुसळधार पावसात कंबरभर पाणी साचते. त्यामुळे ग्रामस्थांना या भागातून जाणे मुश्किल होते. मुलांना लोढा हेवन भागातील शाळेत सोडण्यासाठी जाणाऱ्या महिला, मुलांचे या बोगद्यातील पाणी तुंबण्याचा सर्वाधिक त्रास होतो. ग्रामस्थांना विश्वासात न घेता घाईघाईने हा बोगदा बांधला आहे, अशा तक्रारी ग्रामस्थांनी केल्या. गावापासून दूर अंतरावर हा बोगदा आहे. त्यामुळे रात्रीच्या वेळेत या बोगद्यातून येणे धोकादायक आहे. रात्रीच्या वेळेत निळजे ग्रामस्थांची, नोकरदाररांची मोठी अडचण होते. निळजे गावातून बाहेर पडण्यासाठी रेल्वे फाटक हा एक मधला मार्ग होता. तोच रेल्वेने बंद केल्याने ग्रामस्थांचे खूल हाल सुरू आहेत. ग्रामस्थांना पाणी तुंबलेल्या बोगद्यातून सध्या प्रवास करावा लागतो. 00000