चार नक्षलवाद्यांचा खात्मा
गडचिरोली : महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेवर पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत चार नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. या चकमकीत चार नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. ठार झालेल्यामध्ये 2 पुरुष आणि 2 महिला माओवाद्यांचा समावेश आहे. छत्तीसगड-महाराष्ट्र सीमेवरील कांकेर जिल्ह्यातील पांखाजूर…
शिवरायांची वाघनखं साताऱ्यात दाखल
सातारा : छत्रपती शिवाजी महाराजांच्या ऐतिहासिक वाघनखांचे महाराष्ट्राची राजधानी मुंबईत स्वागत करण्यात आले. त्यानंतर, स्वराज्याची राजधानी म्हणून प्रसिद्ध असलेल्या सातारा जिल्ह्यात आता ही वाघनखे दाखल झाली आहेत. लंडनच्या व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियममधून ही वाघनखे तीन वर्षांसाठी भारतात आणली जात असून…
बा विठ्ठला ! देशातील प्रत्येकाला सुखी कर
मुख्यमंत्र्यांचे विठ्ठलाकडे साकडे पंढरपूर : वारकऱ्यांचे संकट दूर कर. चांगला पाऊस पडू दे. शेतकऱ्यांच्या शेतात चांगलं पीक येऊ दे. देशातील प्रत्येक घटक सुखी होऊ दे. या व्यतिरिक्त आपण देवाला काही मागत नसल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. विठ्ठलाची शासकीय महापूजा झाल्यानंतर मानाचे वारकरी बाळू शंकर अहिरे ( वय ५५) व आशाबाई बाळू अहिरे ( वय ५०, रा. अंबासन, ता. सटाणा, जिल्हा नाशिक) यांचा सत्कार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी आरोग्य मंत्री तानाजी सावंत, पालक मंत्री चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन समितीचे सहअध्यक्ष गहिणीनाथ महाराज औसेकर, भरतशेट गोगावले, आ. समाधान आवताडे, समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, व्यवस्थापक बालाजी पुदलवाड, ॲड. किर्तीपाल सर्वगोड उपस्थित होते. पुढे एकनाथ शिंदे म्हणाले, वारी हा आनंदाचा दिवस आहे. सलग तिसऱ्यांदा मला देवाची पूजा करण्याचा मान मला मिळालं आहे. ही पांडुरंगाची कृपा आहे. मागील वर्षापेक्षा वारकऱ्यांची संख्या ३० टक्के अधिक वाढली आहे. अनेक योजना नागरिकांना दिल्या आहेत. पांडुरंगाच्या आशीर्वादाने हे सरकार आपला कारभार करत आहेत. मंदिर समितीने केलेल्या मागण्याबाबत सकारात्मक निर्णय घेणार आहे. भाविकांना योग्य सोयीसुविधा मिळवून देण्यासाठी आरोग्यमंत्री तानाजी सावंत, पालकमंत्री चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन हे तिघे पंढरपूर येथे मुक्कामी असल्याचे शिंदे यांनी सांगितले. पर्यावरणाची वारी सगळ्यात भारी. पर्यावरण राहिले तर आपण राहू. त्यामुळे आपण पर्यावरण वाचवले पाहिजे. मागील 15 वर्षांपासून ही पर्यावरणाची वारी सुरू आहे. यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि पर्यावरणीय बदल विभागाचे अभिनंदन करतो, असे शिंदे म्हणाले. तसेच एक वारकरी, एक झाड ही संकल्पना आहे. पुढील वर्षी पालखी मार्गावर वृक्षारोपण करतोय. 20 लाख बांबूची रोपे लावणार आहोत. बांबू किती उपयुक्त आहे हे आपल्याला लक्षात आले. आपण फक्त कोणाला बांबू…. तो पण लावावा लागतो. तो वेगवेगळ्या पद्धतीने लावावा लागतो. माणसाला पण शेवटी बांबूच लागतो, अशा शब्दांत शिंदेंनी राजकीय फटकेबाजी केली. तसेच पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांनाही उत्तरे दिली. वारकऱ्यांसाठीच्या योजना, महामंडळाबात माहिती दिली. तसेच पुढील वर्षी तुम्हीच मुख्यमंत्री म्हणून येणार का, या प्रश्नावर पुढच्या वर्षी मी मुख्यमंत्री म्हणून यायचे की नाही हे विठुरायावर आणि जनता जनार्दनावर अवलंबून आहे, असे शिंदे म्हणाले. यावेळी…
खड्ड्यांकडे दुर्लक्ष करणे भोवले;
पालिकेच्या २ अभियंत्यांना नोटिसा, अतिरिक्त आयुक्तांची कारवाई मुंबई : पावसाळ्यात खड्ड्यांकडे दुर्लक्ष होऊ नये, यासाठी महापालिका प्रशासनाकडून २२७ निवडणूक प्रभागांमध्ये दुय्यम अभियंत्यांची नेमणूक करण्यात आली आहे.…
सायन उड्डाणपुलावरून अवजड वाहनांसाठी बंदी
पुल धोकादायक असल्याने प्रवास टाळावा मुंबई : सायन पूर्व आणि पश्चिम भागाला जोडणारा शिव उड्डाणपूल मध्य रेल्वेने धोकादायक घोषित केला आहे. त्यामुळे या उड्डाणपुलावरून अवजड वाहने…
रस्ते दुरुस्तीच्या कामांची आयुक्त सौरभ राव यांनी पुन्हा केली पाहणी
ठाणे : ठाणे महापालिका क्षेत्रात सुरू असलेल्या रस्ते दुरुस्तीच्या कामाची बुधवारी सायंकाळी महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी पाहणी केली. तीन हात नाका, माजिवडा नाका, आनंद नगर, कासारवडवली, नागला…
दिंडीतून दाखवली गोरा कुंभाराची कथा
भजनी मंडळींचा रेल्वे स्थानकात दिंडी सोहळा मुंबई : विठ्ठल माझा, मी विठ्ठलाचा… ज्ञानोबा माउली तुकाराम, असे म्हणत मुंबईतील वारकऱ्यांच्या अनेक दिंड्या सकाळी ७.३० वाजल्यापासून चर्चगेट स्थानकात दाखल…
मुंबईकरांना वेगाचा मोह आवरेना
विरुद्ध दिशेने वाहन चालवणाऱ्यांवर महिनाभरात १, ८१३ गुन्हे मुंबई, ता. १७ : घराजवळील बाजारात-दुकानात जाण्यासाठी, मुलांना शाळेत सोडण्यासाठी अशी विविध कारणे देत काही वाहनचालक विरुद्ध दिशेने वाहने…
उमेदवारांना उद्योजकाकडे प्रत्यक्ष कार्यप्रशिक्षणाद्वारे रोजगारक्षम करण्याचा उद्देश-अमिता पवार
अशोक गायकवाड रायगड : उमेदवारांना उद्योजकाकडे प्रत्यक्ष कार्यप्रशिक्षणाद्वारे रोजगारक्षम करणे, या उद्देशाने मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजना प्रस्तावित असून जिल्ह्यातील सर्व इच्छूक उमेदवार,आस्थापना, उद्योजक यांनी या योजनेचा लाभ…
