Category: होम

जिल्हा परिषदेच्या पेसा क्षेत्रातील शाळांमध्ये शिक्षकांची कंत्राटी तत्वावर भरती – बाळासाहेब राक्षे

ठाणे : जिल्हा परिषद ठाणे, प्राथमिक शिक्षण विभागांतर्गत शैक्षणिक वर्ष २०२४-२५ या कालावधीसाठी मराठी माध्यमाच्या शाळांमध्ये पात्र उमेदवारांची उपशिक्षक, पदवीधर शिक्षक या पदावर एकत्रित मानधन तत्त्वावर तात्पुरत्या स्वरुपात कंत्राटी पध्दतीने…

२७ गावांतील सफाई कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांबाबत मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेणार- डॉ. श्रीकांत शिंदे

कल्याण : कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या २७ गावांतील सफाई कर्मचाऱ्यांनी आपल्या मागण्यांसाठी सोमवारपासून काम बंद आंदोलन सुरू केले आहे. या सफाई कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांबाबत लवकरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत बैठक घेऊन त्यांचे…

कर्जत तालुक्यात सुरळीत वीज पुरवठ्यासाठी उर्जामंत्र्यांसोबत बैठक घेणार : सुधाकर घारे*

अशोक गायकवाड   कर्जत : कर्जत तालुक्यातील वीज पुरवठा सुरळीत करण्याच्या मागणीसाठी महावितरणच्या विरोधात कर्जत तालुका वीज ग्राहक संघर्ष समितीने कर्जत येथील टिळक चौकात साखळी उपोषण सुरु केले आहे. रायगड…

 नवी मुंबई, पुण्यासह राज्यभर ईडीचे छापे

ज्ञानराधा मल्टिस्टेट कोऑपरेटीव्ह सोसायटी प्रकरण एक कोटी २० लाखांची मालमत्ता जप्त     मुंबई : ज्ञानराधा मल्टिस्टेट कॉ-ऑपरेटिव्ह सोसायटीतील १६८ कोटी रुपयांच्या गुंतवणूक फसवणुकीशी संबंधित प्रकरणात सुरेश कुटे व इतरांविरोधात सुरू असलेल्या तपासाअंतर्गत सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) बीड, छत्रपती संभाजीनगर, पुणे, नवी मुंबई येथे विविध ठिकाणी नुकतेच छापे टाकले. या कारवाईत डी-मॅट खाते, बँक खाते यांच्यासह संशयित कागदपत्रे, डिजिटल उपकरणे असे एकूण एक कोटी २० लाखांची मालमत्ता जप्त करण्यात आली. यातील आरोपी सुरेश कुटे आणि संबंधितांनी ज्ञानराधा मल्टिस्टेट को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेडच्या (डीएमसीएसएल) माध्यमातून गुंतवणूकदारांची फसवणूक करण्यासाठी अनेक गुंतवणूक योजना राबविल्या. त्यानंतर, कुटे यांच्या विरोधात फसवणुकीचे नऊ गुन्हे दाखल झाले. सहकारी संस्थेच्या माध्यमातून गुंतवणुकीच्या स्वरूपात १६८ कोटी रुपयांच्या करण्यात आलेल्या फसवणुकीच्या गुन्ह्याच्या आधारे ईडीने तपास सुरू केला आहे. ईडीने याप्रकरणात ९ ऑगस्ट रोजी बीड, छत्रपती संभाजीनगर, पुणे, नवी मुंबई येथील विविध ठिकाणी छापे टाकले. ईडीने या कारवाईत जप्त केलेल्या पुराव्यांच्या आधारे पुढील तपास सुरू असल्याचे ईडीकडून सोमवारी सांगण्यात आले. ईडीने दिलेल्या माहितीनुसार, ज्ञानराधा मल्टिस्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेडच्या वेगवेगळ्या जिल्ह्यात ५२ पेक्षा जास्त शाखा आहेत. याचे व्यवस्थापन आणि नियंत्रण सुरेश ज्ञानोबाराव कुटे, यशवंत व्ही. कुलकर्णी आणि अन्य संबंधित करत होते. विविध ठेव योजना आणत त्यांनी १२ ते १४ टक्क्यांपर्यंत व्याज देण्याचा दावा केला. वैयक्तिक कर्ज, साधे कर्ज, पगार कर्ज, मुदत कर्ज, सुवर्ण कर्ज आणि एफडीआर कर्ज अशा विविध योजना सुरू केल्या. यात आतापर्यंत नोंदवलेल्या गुन्ह्यांनुसार, गुंतवणूकदारांसह झालेल्या फसवणुकीची अंदाजित रक्कम १६८ कोटी रुपये आहे. सुरेश कुटे आणि इतरांनी उच्च परतावा देण्याचे आश्वासन देऊन गुंतवणूकदारांना डीएमसीएसएलकडे पैसे जमा करण्याचे आमिष दाखविल्याचे ईडीच्या तपासातून उघड झाले आहे. 0000

उल्हासनगर रस्त्यातील खड्डे भरण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर

आयुक्तांकडून पाहणी     उल्हासनगर : बृहमुंबई व ठाणे महापालिकेच्या धर्तीवर अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून रस्त्यातील खड्डे भरण्याचा निर्णय महापालिका आयुक्त अजीज शेख यांनी घेतला. या तंत्रज्ञानाचा वापर करून सोमवारी नेताजी चौकातील खड्डे भरण्यात आले असून आयुक्त अजीज शेख यांनी खड्डे भरण्याची पाहणी केली. उल्हासनगरातील रस्त्याची अवस्था दैयनिय झाली असून वाहन चालकासह नागरिक हैराण झाले. वाहन चालक व नागरिकांना दिलासा देण्यासाठी आयुक्त अजीज शेख यांनी मुंबई, ठाणे शहराच्या धर्तीवर अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून रस्त्यातील खड्डे भरण्याचा निर्णय घेतला. सोमवारी नेताजी चौकातील रस्त्याचे खड्डे या तंत्रज्ञानातून भरण्यात आले असून आयुक्त अजीज शेख यांनी भरलेल्या खड्ड्याची पाहणी केली. हे तंत्रज्ञान परिणामकारक ठरलेतर, हे तंत्रज्ञान रस्त्यातील खड्डे भरण्यासाठीं वापरणार असल्याची प्रतिक्रिया आयुक्त अजीज शेख यांनी दिली. याच आधुनिक तंत्रज्ञान वापरुन छत्रपती शाहू महाराज उड्डाण पुल, चालीया चौक, श्रीराम चौक, धोबीघाट रस्ता व शहाड रस्त्यातील खड्डे भरण्यात येणार असल्याचे संकेत आयुक्तांनी दिली.

कल्याणमधील शहाड, रामबाग परिसराचा पाणी पुरवठा रात्रीपासून बंद

कल्याण : कल्याण डोंबिवली पालिकेची उल्हास नदी काठच्या मोहिली येथील जलशुध्दीकरण केंद्राची कल्याण पश्चिमेतील शहाड, रामबाग, बिर्ला महाविद्यालय परिसर, जोशीबाग, मिलिंदनगर परिसराला पाणी पुरवठा करणाऱ्या जलवाहिनीला सोमवारी मध्यरात्री दीड वाजता…

ठाण्याला नवे सायबर पोलीस ठाणे, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लवकरच उद्घाटनाची शक्यता

ठाणे : गेल्याकाही वर्षांपासून ठाणे पोलीस आयुक्तालय क्षेत्रात सायबर गुन्ह्यांची मोठ्याप्रमाणात वाढ झाली आहे. फसवणूक झाल्यानंतर नागरिकांनी तक्रारी कुठे करायच्या असा प्रश्न निर्माण होत असे. अनेकदा तक्रारदाराला पोलीस ठाण्यातून मुख्यालय,…

‘आपले सरकार’ केंद्रांचा कारभार व्यवस्थापकाविना

ठाणे : सरकारच्या विविध योजनांची अंमलबजावणी, विविध दाखले तसेच ग्रामपंचायतीची ऑनलाइन कामे तातडीने होण्यासाठी राज्य शासनाने प्रत्येक ग्रामपंचायतीत सुरू केलेले ‘आपले सरकार’ सेवा केंद्रांचा कारभार गेले दहा दिवस व्यवस्थापकाविना सुरू…

नमुंमपा क्षेत्रात 24 ठिकाणी हिवताप, डेंग्यू प्रतिबंधात्मक शिबीर यशस्वी

नवी मुंबई : महानगरपालिका कार्यक्षेत्रा मध्ये सद्यस्थितीत पावसाची येजा सुरु असल्याने हिवताप /डेंग्‍यु, जललन्य व साथरोग या आजारांसाठी संवेदनशील आहे.  त्याअनुषंगाने नमुंमपा, आरोग्य विभागमार्फत हिवताप /डेंग्‍यु यासारखे आजाराचा प्रसार रोखणे करीता…

 सेवाव्रती उषा केळकर आणि बलुकाका पेंडसे यांचा गौरव  

न्यायमूर्ती अभय ओक यांच्या हस्ते रविवारी होणार गौरव       ठाणे : जन्मभूमी पेक्षा कर्मभूमीच श्रेष्ठ मानून ज्यांनी शाळेची जवळपास तीन ते चार दशके निरलसपणे सेवा केली अशा शिक्षण सेवेचे व्रत अंगीकारलेल्या  सेवाव्रती  उषा मुकुंद केळकर (वय 95) आणि गणेश हरी उपाख्य बलुकाका पेंडसे ( वय  91) या दोघांचा अभीष्टचिंतन सोहळा मो.ह. विद्यालयाच्या प्रांगणात 18 ऑगस्ट रोजी दुपारी  ४ वाजता संपन्न होणार आहे. न्यायिक क्षेत्रातील मूल्य जपणारे भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश अभय ओक आपल्या गुरुजनांसाठीच या कार्यक्रमाचे मुख्य अतिथी पद भूषवणार आहेत. उषाताई केळकर संगीताच्या उत्तम शिक्षिका तर बलूकाका पेंडसे सर शारीरिक शिक्षणाचे लाडके शिक्षक. संपूर्ण शाळा हे एक कुटुंबच आहे असे मानून मो.ह. परिवारातल्या प्रत्येकाला एका प्रेमळ धाग्याने अखंड बांधून ठेवण्याचं अजोड काम या दोहोंनी केले. निवृत्त होऊनही जवळपास तीन दशके लोटली तरीही शाळेबद्दल, संस्थेबद्दलचे त्यांचे प्रेम यत्किंचितही कमी झालेले नाही. शाळेत होणाऱ्या प्रत्येक उपक्रमाला हजर राहून कुटुंब प्रमुखाची भूमिका ते बजावत असतात. आनंद, उत्साह आणि सकारात्मक ऊर्जेचे जणू हे दोघे अक्षय पात्र आहेत. संस्कारांची पाठ राखण करणाऱ्या मो.ह. परिवाराला यांचा अत्यंत अभिमान आणि कौतुक आहे म्हणूनच या सोहळ्याचे आयोजन करण्यात आल्याची माहिती शाळेने दिली आहे. ०००००