Category: होम

सावरकरांना भारत रत्न दिल्यास किताबाची प्रतिष्ठा वाढेल– भागवत

सावरकरांना भारत रत्न दिल्यास किताबाची प्रतिष्ठा वाढेल– भागवत संदीप चव्हाण मुंबई:  स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारत रत्न किताब दिल्यास या किताबाची प्रतिष्ठा वाढेल अशा शब्दात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी आपल्या भावना व्यक्त…

अर्थसंकल्प क्रीडाक्षेत्राचा शिस्त क्रीडा संघटनांना !

नुकताच केंद्रातील अर्थ मंत्रालयांच्यावतीने अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात क्रीडा विकास आणि विविध खेळांच्या क्षेत्रात घोडदौड करण्यासाठी प्रयत्न सुरू करीत असल्याचे चित्र दाखविण्यात आलेले आहे. यंदाच्या…

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मराठा, बहुजन राजकारणाचा नवा पासवर्ड आहे

जेंव्हा मला महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने लिहिण्याची विनंती ज्यावेळी आली तेंव्हा एकूणच महाराष्ट्रच्या राजकारणाचा चाळीस वर्षांचा पट माझ्या समोर उभा राहील आणि त्यात एकनाथ शिंदे यांची पंचवीस…

एआयचा मोठा दणका

एआयचा मोठा दणका चार दिवसांपूर्वी जगातील आयटी आणि एआय उद्योगांना प्रचंड मोठा हादरा बसला. जगभरातील या क्षेत्रातील सर्वच बडया दादा कंपन्यांनी मिळून, त्यांच्या शेअर बाजारातील मूल्यामधून, २५ लाख कोटी रुपयांचे…

  पाटील बालमंदिर शाळेत संस्कृती, परंपरा व इतिहास प्रकल्पाचे भव्य आयोजन

पाटील बालमंदिर शाळेत संस्कृती, परंपरा व इतिहास प्रकल्पाचे भव्य आयोजन त्रिदल नॉलेज सिटी प्रकल्प प्रदर्शनाचे आयोजन कल्याण: मोहने येथील त्रिदल एज्युकेशन सोसायटीच्या पाटील बालमंदिर शाळेत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी “संस्कृती, परंपरा आणि इतिहास” या विषयावर त्रिदल नॉलेज सिटी प्रकल्प हा एक महत्वपूर्ण शैक्षणिक प्रकल्प यशस्वीरीत्या राबविण्यात आला. या उपक्रमाचा उद्देश विद्यार्थ्यांमध्ये भारतीय संस्कृतीची ओळख निर्माण करणे, पारंपरिक मूल्यांचे महत्त्व समजावून सांगणे तसेच भारताच्या गौरवशाली इतिहासाची माहिती देणे हा होता. कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी भाषण, नाट्यछटा, गीत, वेशभूषा व चित्रप्रदर्शनाच्या माध्यमातून आपली कला सादर केली. विद्यार्थ्यांनी भारतीय सण-उत्सव, सामाजिक परंपरा तसेच छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांसारख्या थोर व्यक्तिमत्त्वांच्या कार्यावर प्रभावी सादरीकरण केले. त्यांच्या सादरीकरणातून संस्कृती जपण्याचा आणि इतिहासातून प्रेरणा घेण्याचा संदेश देण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल मुख्याध्यापक, शिक्षकवृंद व पालकांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये देशप्रेम, सामाजिक जाणीव आणि नैतिक मूल्ये रुजतात, असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले. पाटील बालमंदिर शाळेच्या या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना आपल्या संस्कृतीचा अभिमान वाटावा, हीच या कार्यक्रमाची खरी फलश्रुती ठरली. या कार्यक्रमासाठी केडीएमसीच्या महापौर  हर्षाली चौधरी थविल, कोकण पदवीधर मतदार संघाचे आमदार निरंजन डावखरे, नगरसेवक गणेश कोट, रोहन कोट, राहुल कोट, नगरसेविका  तेजश्री गायकवाड, माजी नगरसेवक दुर्योधन पाटील,  दशरथ तरे,सामाजिक कार्यकर्ते  सुरेश सोनार, जेसी कटारिया, रामा कांबळे, वैभव पाटील आदी मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते. तर त्रिदल एज्युकेशन सोसायटीचे  पदाधिकारी एस जे पाटील, जी एल पाटील, प्राचार्य बी एन पाटील, संध्या पाटील, सुदर्शन पाटील, आशिष पाटील, स्वप्निल पाटील, शाळेचे मुख्याध्यापक बी.पी. निचिते, व्हि.डी. चौथे, रुपाली   सावदेकर, लिजी नांबियार, वरिष्ठ शिक्षिका संगिता पाटील, वरिष्ठ शिक्षक विकास पाटील, समस्त शिक्षक वृंद शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

  प्रस्तावित वैनगंगा, नळगंगा प्रकल्पात दुष्काळी भागावरील अन्याय टाळा…

प्रस्तावित वैनगंगा, नळगंगा प्रकल्पात दुष्काळी भागावरील अन्याय टाळा… जल अभ्यासक डॉ. प्रवीण महाजन यांची मागणी राजेंद्र साळसकर नागपूर : वैनगंगा, नळगंगा नदीजोड प्रकल्पांतर्गत गोसीखुर्द राष्ट्रीय प्रकल्प ते नळगंगा प्रकल्प पाणी वहन करताना पहिल्या टप्प्यात गरज नसतानाही ८३६ दशलक्ष घनमीटर पाणी देण्यात आले आहे, तर दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यात तिथे दुष्काळी भाग असतानाही पाणी कमी देण्यात आले आहे. याकडे जल अभ्यासक आणि वैनगंगा, नळगंगा नदीजोड प्रकल्पाची प्रथम मागणी करणारे सामाजिक कार्यकर्ते डॉ. प्रवीण महाजन यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे लक्ष वेधले आहे. मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या एका पत्रात त्यांनी याबाबत फेरविचार करून दुष्काळी भागावर अन्याय होणार नाही याची काळजी घ्यावी, अशी मागणी केली आहे. या पत्रात डॉ. महाजन यांनी नमूद केले आहे की, गोसीखुर्द राष्ट्रीय प्रकल्प वैनगंगा नदी ते नळगंगा प्रकल्प इथे १८०४.७८ दशलक्ष घनमीटर पाणी वहन प्रस्तावित आहे. हे पाणी विदर्भातील नागपूर वर्धा अमरावती यवतमाळ अकोला वाशिम आणि बुलढाणा या जिल्ह्यांमध्ये सिंचन, घरगुती आणि औद्योगिक पाणीपुरवठ्यासाठी प्रस्तावित आहे. या योजनेमुळे ४०४२८१ हेक्टर क्षेत्रास सिंचन सुविधा उपलब्ध होणार आहेत. ही विदर्भासाठी अत्यंत आनंदाची बाब आहे. गोसीखुर्द ते निम्न वर्धा प्रकल्प असा या योजनेतील पहिला टप्पा हा असून दुसरा टप्पा निम्न वर्धा प्रकल्प ते काटेपूर्णा प्रकल्प असा आहे. तिसरा टप्पा हा नियमबाह्य बाबी टाळण्यात याव्यात. आतापर्यंतच्या अनेक कागदपत्रांवरून आपल्या लक्षात येईल की, या प्रकल्पासाठी खूपच घाई करण्यात येत आहे आणि या प्रकल्पात रोज नवनवीन कागदपत्रांचा खेळ खेळला जात आहे. तिथे अनेक बाबी महत्त्वाच्या असून भविष्यात जेव्हा हा प्रकल्प महाराष्ट्रातून केंद्रीय जल आयोगाकडे जाईल, त्यावेळी या आकड्यांच्या खेळावर बोट ठेवले जाण्याची शक्यताही नाकारता येत नाही, अशी भीतीही या पत्रात व्यक्त करण्यात आली आहे आणि असे होऊ नये यासाठी नियमात्मक बाबी स्विकाराव्या. नियमबाह्य बाबी टाळण्यात याव्या, अशी सूचनाही केली आहे. त्यामुळेच वैनगंगा, नळगंगा नदीजोड प्रकल्पाला कुठल्याही प्रकारचे गालबोट न लागता हा प्रकल्प आपल्या मार्गदर्शनात पुढे जावा, अशी अपेक्षा या पत्रात व्यक्त करण्यात आली आहे.

 गरजू महिलांना घरघंटी, शिलाई मशीनचे वाटप

गरजू महिलांना घरघंटी, शिलाई मशीनचे वाटप शिवसेनेच्या नवनिर्वाचित नगरसेविकेने सुरु केले विधायक कार्य मुंबई : मुंबई महापालिकेच्या निवडणुका पार पडल्या परंतु अद्यापही महापौर आणि उपमहापौर यांची निवड करण्यात आलेली नाही. परंतु उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या नवनिर्वाचित नगरसेविका सौ सारिका शशीकांत झोरे यांनी गरजू महिलांना मदतकार्य करण्याचे विधायक कार्य सुरु केले आहे. मुंबई महानगरपालिका प्रभाग क्र.१२ बोरिवली आर मध्य विभागात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नगरसेविका सारिका शशिकांत झोरे यांच्या माध्यमातून महिलांना घरघंटी, शिलाई मशीन, मसाला कांडप मशीनचे वाटप माजी महापौर, शिवसेनेच्या महानगरपालिका गटनेत्या सौ किशोरी पेडणेकर यांच्या शुभहस्ते झाले. याप्रसंगी माजी आमदार विलास पोतनीस, विभागप्रमुख उदेश पाटेकर, महिला विभाग संघटक शुभदा शिंदे, विधानसभा प्रमुख अशोक म्हामूणकर, विधानसभा निरीक्षक सिनेट सदस्य शशिकांत झोरे, नगरसेवक धरम काळे, माजी नगरसेवक सुजाता पाटेकर, चेतन कदम, सुनिल चव्हाण, सिनेट सदस्य मिलिंद साटम, सचिन मोरे, इतिश्री महाडिक आदी मान्यवर उपस्थित होते.

एक देश एक परवान्यामुळे शेतकऱ्यांना दर्जेदार खते मिळणार

एक देश एक परवान्यामुळे शेतकऱ्यांना दर्जेदार खते मिळणार रमेश औताडे मुंबई : सध्या वेगवेगळ्या राज्यांमध्ये खत विक्रीसाठी वेगवेगळे परवाने घ्यावे लागतात. त्यामुळे कंपन्यांना अडचणी येतात आणि त्याचा फटका अप्रत्यक्षपणे शेतकऱ्यांनाच बसतो. एकच राष्ट्रीय परवाना प्रणाली लागू झाल्यास देशभर एकसारखी, दर्जेदार आणि योग्य दरातील खते शेतकऱ्यांना सहज मिळू शकतील. शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चात घट होऊन पीक उत्पादन वाढावे, यासाठी खत व सूक्ष्म पोषक तत्त्वांच्या धोरणात बदल होणे गरजेचे असल्याचे मत  परिषदेत व्यक्त करण्यात आले. ५ व ६ फेब्रुवारी रोजी मुंबईतील नॅशनल स्टॉक एक्स्चेंज येथे ही दोन दिवसांची परिषद झाली. परिषदेत बोलताना भारत सरकारचे कृषी आयुक्त डॉ. पी. के. सिंह यांनी सांगितले की, शेतीची खरी ताकद माती, पीक आणि शेतकरी यांच्यात आहे. माती निरोगी नसेल तर उत्पादन वाढणार नाही. त्यामुळे संतुलित खत वापर आणि एकात्मिक पोषण व्यवस्थापन  शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. महाराष्ट्र शासनाचे मंत्री जयकुमार जितेंद्रसिंह रावल यांनी सांगितले की, सूक्ष्म खतांनी गेल्या अनेक वर्षांत पीक उत्पादन आणि गुणवत्तेत मोठी भर घातली आहे. शेतकरी, खत उत्पादक, बियाणे उद्योग आणि प्रक्रिया उद्योग यांनी एकत्र काम केल्यास शेती अधिक फायदेशीर होईल. सूक्ष्म खते, जैविक खते आणि विशेष खतांना जलद मंजुरी बनावट व निकृष्ट खते विकणाऱ्यांवर कडक कारवाई चांगल्या दर्जाच्या भारतीय खतांच्या निर्यातीला प्रोत्साहन नियम सोपे करून शेतकऱ्यांपर्यंत नव्या तंत्रज्ञानाचे फायदे पोहोचवणे एकूणच, या शिखर परिषदेत शेतकऱ्यांना योग्य खत, योग्य वेळी आणि योग्य दरात मिळावे, तसेच शेती शाश्वत व फायदेशीर व्हावी, यासाठी सरकार आणि उद्योगांनी एकत्र काम करण्याची गरज अधोरेखित करण्यात आली.

 केडीएमसी आयुक्तांची शास्त्रीनगर रुग्णालयास अचानक भेट

केडीएमसी आयुक्तांची शास्त्रीनगर रुग्णालयास अचानक भेट रुग्णांची केली आपुलकीने विचारपूस कल्याण:  कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांनी शनिवारी सकाळी साडेआठ वाजता डोंबिवली पश्चिम येथील शास्त्रीनगर सामान्य रुग्णालयाला अचानक भेट दिली. यावेळी त्यांनी रुग्णालयात दैनंदिन स्वरूपात केली जाणारी स्वच्छता, उपलब्ध औषध साठा, रुग्णांना दिल्या जाणाऱ्या सेवा सुविधा इत्यादी बाबींचा आढावा घेतला तसेच रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णांची आपुलकीने विचारपूसही केली. यावेळी त्यांनी नवजात अतिदक्षता विभाग, बालरोग अति दक्षता विभाग या विभागांची तसेच इतर विभागांची देखील  पाहणी केली त्याचप्रमाणे रुग्णालयात चालू असलेल्या दुरुस्ती कामाची देखील पाहणी केली.  महापालिका रुग्णालयातील रुग्ण काही वेळेस तातडीने इतर रुग्णालयात संदर्भित करावे लागतात यासाठी एसओपी तयार करण्याच्या सूचना त्यांनी उपस्थित वैद्यकीय अधिकारी यांस दिल्या. रुग्णालयाच्या ओपीडीमध्ये केस पेपर काढण्यासाठी त्याचप्रमाणे अपघात कक्षात  रोकड रक्कम देऊन केस पेपर काढण्याच्या प्रक्रियेस लागणारा वेळ पाहता, केस पेपर काढण्यासाठी क्यूआर कोड आधारित  प्रणालीचा अवलंब करण्याचे निर्देश त्यांनी उपस्थित डॉक्टरांना दिले तसेच रुग्णांना दिल्या जाणाऱ्या सुविधेमध्ये कुठल्याही प्रकारची हयगय काय होता कामा नये असे स्पष्ट निर्देश त्यांनी उपस्थित वैद्यकीय अधिकारी यांना दिले. यावेळी शास्त्रीनगर सामान्य रुग्णालयाच्या मुख्य वैद्यकीय अधिकारी  डॉ.सादिया पिंजारी, डॉ. विनोद दौंड, बालरोगतज्ञ डॉ. हेमराज देवरे उपस्थित होते.

  ठाण्याच्या संस्कृतीचे वैभव असणाऱ्या ११ व्या संस्कृती आर्ट फेस्टिव्हलचे उद्घाटन

ठाण्याच्या संस्कृतीचे वैभव असणाऱ्या ११ व्या संस्कृती आर्ट फेस्टिव्हलचे उद्घाटन नृत्य, कला, संगीताची पर्वणी असणाऱ्या संस्कृती आर्ट फेस्टिव्हलला सुरुवात – मंत्री प्रताप सरनाईक अनिल ठाणेकर ठाणे : ठाण्याच्या सांस्कृतिक वैभवाचे प्रतीक असलेल्या ११ व्या संस्कृती आर्ट फेस्टिव्हलचे उद्घाटन  दिमाखात पार पडले. छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना देत या फेस्टिव्हलची सुरुवात करण्यात आली, अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. यावेळी ठाण्याच्या महापौर शर्मिला पिंपलोळकर आणि उपमहापौर कृष्णा पाटील, ठाण्याचे पोलिस आयुक्त आशुतोष डुंबरे, ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त  सौरभ राव यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. यंदा फेस्टिव्हल हा ‘कला संगमाची विठ्ठलवारी’ या संकल्पनेवर आधारित आहे. ढोल ताशांच्या गजरात आणि टाळ मृदुंगाच्या निनादात विठू माऊलीच्या भक्तिभावात भव्य शोभा यात्रा काढण्यात आली. शोभा यात्रेत सादर होणारे मर्दानी खेळ प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत होते. भव्य दिव्य शोभा यात्रेस ठाणेकरांचा भरभरून प्रतिसाद मिळाला. उपवन तलावाच्या शीतल प्रवाहात आणि विठुमाउलीच्या सानिध्यात प्रसिद्ध शास्त्रीय गायक पंडित आनंद भाटे यांच्या सुरेल स्वरांनी आजची संध्या मंत्रमुग्ध झाली. जणू काही इथेच पंढरी अवतरल्याचा भास होत होता. आपल्या सर्वांचे लाडके दादा उपमुख्यमंत्री स्व. अजित पवार यांच्या स्मृतिप्रित्यर्थ फेस्टिव्हलमध्ये कलादालनाला त्यांचे नाव देत त्यांना आदरांजली वाहण्यात आली आहे. ७ फेब्रुवारी रोजी ज्येष्ठ गायक आनंद शिंदे आणि आदर्श शिंदे ही पिता-पुत्राची जोडी शिंदेशाही या कार्यक्रमातून रसिकांची मने जिंकली. ८ फेब्रुवारी रोजी बॉलीवूडचे सुप्रसिद्ध गायक शान यांच्या सुमधुर आवाजाने सुरेल संध्या रंगली. ९ फेब्रुवारी रोजी तारक मेहता फेम कवी व अभिनेते शैलेश लोढा यांची काव्य मैफल रंगणार आहे. याच बरोबर ज्येष्ठ कथ्थक नृत्यांगना मंजिरी देव, ज्येष्ठ अभिनेत्री सुधा चंद्रन, ओडिसी नृत्यांगना सुजाचा मोहपात्रा, भरतनाट्यम् कलाकार दीपक मुजुमदार अशा दिग्गजांचे सादरीकरण होणार आहे. तसेच लोकनृत्य, शास्त्रीय नृत्य, सुफी संगीत, भारूड, पोवडा, अभंग आदींचा सुंदर मिलाफ फेस्टिव्हल मध्ये रसिकांना अनुभवता येणार आहे. याचबरोबर विविध कार्यशाळा, धाडसी खेळांचे प्रात्यक्षिक, चित्रप्रदर्शनाचाही समावेश आहे. विविध खाद्य स्टॉलवर ठाणेकरांना रुचकर मेजवानीचा स्वाद घेता येईल. ठाणेकरांनी संस्कृती आर्ट फेस्टिव्हलमध्ये सहभागी होऊन विविध कलांचा मनमुराद आनंद घ्यावा, असे आवाहन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केले.