Category: होम

अनधिकृत शाळांमुळे विद्यार्थ्यांचे नुकसान, अश्विनी केंद्रे यांचा प्रशासनाला इशारा

दिवा: दिवा शहरातील बोगस व अनधिकृत शाळांवर तात्काळ कारवाई करून विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी समाजसेविका अश्विनी केंद्रे यांनी प्रशासनाकडे केली आहे. शिक्षणाच्या नावाखाली सुरू असलेल्या गैरप्रकारांमुळे…

दादर येथे साने गुरुजी यांचा स्मृतिदिन साजरा

ठाणे, मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय (शतकोत्तर रौप्यमहोत्सवी संस्था) आणि साने गुरुजी बालविकास मंदिर यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रसंत, थोर देशभक्त आणि प्रेमधर्माचा संदेश देणारे पूज्य साने गुरुजी यांच्या ७६ व्या स्मृतिदिनानिमित्त विशेष…

केडीएमसीच्या वतीने ‘अत्याधुनिक आगरी ग्रंथालय’ सुरू करण्याची मागणी

 ‘आगरी ग्रंथालय चळवळ’ संस्था आणि ‘ब-बोली’ मासिकाचे प्रतिनिधी मंडळ यांचे महापौर, आयुक्तांना पत्र कल्याण : आगरी भाषेच्या जतन आणि संवर्धनासाठी कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या सहकार्याने ४००-५०० चौरस फूट जागेत १० हजार पुस्तके, डिजिटल ऑडिओ स्टेशन, ई-लायब्ररी आणि स्मार्ट क्लासरूमसह ‘अत्याधुनिक आगरी ग्रंथालय’ सुरू करण्याची मागणी ‘आगरी ग्रंथालय चळवळ’ संस्था आणि ‘ब-बोली’ मासिकाचे प्रतिनिधी मंडळ यांच्यावतीने करण्यात आली असून त्यांनी याबाबत केडीएमसी महापौर, आयुक्तांना पत्र दिले आहे. कल्याण-डोंबिवली, ठाणे, पालघर आणि रायगड हा संपूर्ण भौगोलिक पट्टा ऐतिहासिकदृष्ट्या आगरी आणि कोळी समाजाचे मूळ वसतिस्थान आहे. या भूमीच्या विकासात आणि शहरीकरणात इथल्या मूळ भूमिपुत्रांनी आपल्या जमिनी देऊन मोठे योगदान दिले आहे. परंतु, झपाट्याने होणाऱ्या या शहरीकरणामुळे आणि जागतिकीकरणाच्या रेट्यामुळे आमची मातृभाषा असलेली ‘आगरी बोली’, आमची लोकगीते, पारंपरिक ज्ञान आणि आमचा शेकडो वर्षांचा सांस्कृतिक वारसा हळूहळू लोप पावत चालला आहे. कोणत्याही समाजाची भाषा जिवंत ठेवायची असेल, तर केवळ मौखिक परंपरेवर अवलंबून न राहता तिचे आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने दस्तावेजीकरण करणे काळाची गरज बनली आहे. याच उदात्त हेतूने, ‘आगरी ग्रंथालय चळवळ’ संस्थेच्या वतीने आम्ही आपणास एक नावीन्यपूर्ण ‘अत्याधुनिक डिजिटल आणि ऑडिओ आगरी ग्रंथालय’ उभारण्याचा प्रस्ताव सादर करत आहोत. यासाठी कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेने आपल्या मालकीच्या कोणत्याही मध्यवर्ती ठिकाणी अथवा समाजमंदिरात अंदाजे ४०० ते ५०० चौरस फूट जागा उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली आहे. या मर्यादित जागेत ‘मोबाईल कॉम्पॅक्टर’  तंत्रज्ञानाचा वापर करून १० हजार पुस्तकांचे संकलन, आगरी साहित्यासाठी एक ई-लायब्ररी, लुप्त पावत चाललेल्या ‘धवला’ गीतांचे जतन करण्यासाठी ‘डिजिटल ऑडिओ स्टेशन’ आणि भावी पिढीला या भाषेची ओळख करून देण्यासाठी एक ‘स्मार्ट क्लासरूम’ उभारण्याचे अत्यंत सूक्ष्म तांत्रिक नियोजन सविस्तर प्रकल्प अहवालात  मांडले आहे. हा प्रकल्प महाराष्ट्र शासनाच्या ‘मराठी भाषा धोरण २०२४’ आणि ‘सांस्कृतिक थोरण २०२४’ मध्ये नमूद केलेल्या बोलीभाषा संवर्धनाच्या उद्दिष्टांशी पूर्णपणे सुसंगत असून, यामुळे केडीएमसीचा नावलौकिक संपूर्ण महाराष्ट्रात एका ‘संस्कृती-रक्षक’ महानगरपालिकेच्या रूपात प्रस्थापित होईल. महानगरपालिका आयुक्त अभिनव गोयल यांनी प्रशासनात तंत्रज्ञानाचा वापर आणि ‘सिटीझन सेंट्रिक’ कारभार राबवण्याचा जो संकल्प केला आहे, त्याला हा डिजिटल प्रकल्प अत्यंत पूरक ठरणारा आहे. त्यामुळे या प्रस्तावाचा सकारात्मक विचार करून या ग्रंथालयासाठी जागा आणि आवश्यक प्रशासकीय व आर्थिक मंजुरी प्रदान करण्याची मागणी आगरी ग्रंथालय चळवळ संस्था आणि ब-बोली च्या वतीने करण्यात आले आहे.

ठाण्यात विकास प्रदर्शनी, चित्रकला स्पर्धा व गुणवंत विद्यार्थी गौरव सोहळा संपन्न

००००००० ठाणे : देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सेवा, सुशासन आणि विकासाला समर्पित १२ वर्षांचा यशस्वी कार्यकाळ पूर्ण झाल्याबद्दल भारतीय जनता पार्टी, कोपरी मंडलच्या वतीने विद्यासागर विद्यालय, ठाणे…

कल्याणमधील अल्पवयीन मुलीवरील सामूहिक अत्याचारानंतर राजकीय वातावरण तापले

 शिवसेना शिंदे व ठाकरे गट आक्रमक कल्याण : कल्याणमध्ये कचरा वेचून स्वतःचा आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या १५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना समोर आल्यानंतर राजकीय वातावरण तापले आहे. या प्रकरणात शिवसेना शिंदे गट आणि ठाकरे गट दोन्ही आक्रमक झाले असून आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे. कोळसेवाडी पोलिसांनी या प्रकरणी अख्तर मणियार आणि सलीम शेख या दोन आरोपींना अटक केली आहे. शनिवारी रात्री ही घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. घटनेनंतर शिवसेना शिंदे गटाचे नगरसेवक महेश गायकवाड आणि माया कांबळे यांनी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात जाऊन पोलिसांकडून घटनेची माहिती घेतली. आरोपींना कठोरात कठोर शिक्षा देण्याची मागणी त्यांनी केली. महेश गायकवाड म्हणाले, “ही घटना कल्याण-डोंबिवलीसाठी अत्यंत लाजिरवाणी आहे. अशा आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे. पीडित मुलगी आणि तिच्या कुटुंबाला आम्ही सर्वतोपरी मदत करू.” दरम्यान, ठाकरे गटाने या घटनेवरून सरकार आणि पोलिस प्रशासनावर टीका केली आहे. ठाकरे गटाचे अॅडव्होकेट नीरज कुमार यांनी महिला सुरक्षेच्या प्रश्नावर सरकारला धारेवर धरले. “कल्याण पूर्व भागात यापूर्वीही अशा घटना घडल्या आहेत. घटना घडल्यानंतर नेते आणि लोकप्रतिनिधी पोलीस ठाण्यात येतात, मात्र महिला सुरक्षेसाठी ठोस उपाययोजना केल्या जात नाहीत,” असा आरोप त्यांनी केला. तसेच, “लाडक्या बहिणींच्या नावाने राजकारण केले जाते, पण महिलांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष केले जाते,” अशी टीकाही त्यांनी केली. या घटनेनंतर कल्याणमध्ये महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून नागरिकांकडून आरोपींवर तातडीने आणि कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे. दरम्यान, कल्याणचे सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक होनमाने यांनी सांगितले की, अल्पवयीन मुलीवर दोन जणांनी अत्याचार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने २४ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

मुलुंड फोर्टिस हॉस्पिटलचे उल्हासनगरमध्ये मेडिकल सेंटर सुरू

डोंबिवली, २१ जून : फोर्टिस हॉस्पिटल मुलुंडने उल्हासनगर येथे नवीन फोर्टिस मेडिकल सेंटर सुरू करून परिसरातील नागरिकांसाठी दर्जेदार आरोग्यसेवा अधिक सुलभ केली आहे. या केंद्रामुळे उल्हासनगर आणि आसपासच्या भागातील नागरिकांना…

एस. एम. जी. विद्यामंदिर शाळेच्या प्राथमिक विभागात आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा

आरती परब दिवा : एस. एम. जी. विद्यामंदिर शाळेच्या प्राथमिक विभागात २० जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात आणि प्रेरणादायी वातावरणात साजरा करण्यात आला. यानिमित्त विद्यार्थ्यांनी विविध योगासने, प्राणायाम आणि ध्यानाचे प्रात्यक्षिक सादर करून योगाचे महत्त्व अधोरेखित केले. कार्यक्रमाची सुरुवात प्रार्थनेने करण्यात आली. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षकवृंद तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. योग दिनाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांनी विविध योगासने सादर करत निरोगी जीवनशैलीचा संदेश दिला. याप्रसंगी शिक्षकांनी विद्यार्थ्यांना योगाचे महत्त्व, नियमित योगाभ्यासामुळे होणारे शारीरिक व मानसिक आरोग्याचे फायदे तसेच दैनंदिन जीवनात योगाचा समावेश करण्याची गरज याविषयी मार्गदर्शन केले. योगामुळे शरीर तंदुरुस्त राहण्याबरोबरच मन एकाग्र व शांत राहते, असेही त्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांनी उत्साहाने योगासने आणि प्राणायाम करून कार्यक्रमात सक्रिय सहभाग नोंदविला. कार्यक्रमाच्या शेवटी सर्व विद्यार्थी व शिक्षकांनी नियमित योगाभ्यास करण्याचा संकल्प केला. अशा प्रकारे एस. एम. जी. विद्यामंदिर प्राथमिक विभागात आंतरराष्ट्रीय योग दिन आनंददायी, उत्साहपूर्ण आणि आरोग्यदायी संदेश देणाऱ्या वातावरणात यशस्वीरीत्या संपन्न झाला.

उत्तम आरोग्यासाठी दैनंदिन जीवनात योगाचा समावेश करावा- मनुज जिंदल

अशोक गायकवाड रत्नागिरी : “योग हा आपल्या जीवनाचा अत्यंत महत्त्वपूर्ण भाग असून संपूर्ण जगाने याचा स्वीकार केला आहे. योगामुळे आरोग्याला भरपूर फायदे होत असल्याने प्रत्येकाने आपल्या दैनंदिन जीवनात योगाचा समावेश…

 महाराष्ट्र पोलिसांना मोठा दिलासा, तीन वर्षांपासून रखडलेले डिजी लोन अखेर मंजूर

 दिव्यातील धडाकेबाज युवा प्रतिष्ठान, महाराष्ट्र राज्यचे संस्थापक अध्यक्ष अमोल केंद्रे यांचा पाठपुरावा दिवा, दि. २१ जून (आरती परब): महाराष्ट्र पोलीस दलातील अधिकारी व अंमलदारांसाठी गेल्या तीन वर्षांपासून प्रलंबित असलेला पोलीस गृहअग्रीम कर्ज (DG Loan) प्रश्न अखेर निकाली निघाला आहे. शासनाने सुमारे १,७६८ कोटी रुपयांच्या निधीस मंजुरी दिल्याने राज्यातील हजारो पोलीस कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून, पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात येत्या सोमवारी रक्कम जमा होण्याची शक्यता आहे. दरम्यान, DG Loan संदर्भातील समस्या शासनाच्या निदर्शनास आणून देण्यासाठी दिव्यातील धडाकेबाज युवा प्रतिष्ठान, महाराष्ट्र राज्यचे संस्थापक अध्यक्ष अमोल केंद्रे, पोलीस बॉईजचे प्रदीप वाघमारे तसेच राज्यभरातील अनेक पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी सातत्याने प्रयत्न केले. विविध निवेदने, पाठपुरावा आणि संघटित प्रयत्नांमुळे हा विषय चर्चेत राहिला आणि शासनाचे लक्ष वेधण्यात यश आले. पोलीस कर्मचाऱ्यांच्या गृहस्वप्नांशी निगडित असलेल्या या महत्त्वाच्या विषयासाठी विविध स्तरांवर सातत्याने पाठपुरावा करण्यात आला. माजी मंत्री तथा विद्यमान आमदार सुधीर भाऊ मुनगंटीवार यांनी शासनाकडे हा विषय सातत्याने मांडला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून निधी मंजुरीचा मार्ग मोकळा झाल्याने दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या या प्रश्नाला अखेर न्याय मिळाला आहे. या निर्णयामुळे घरकुलासाठी आर्थिक मदतीची प्रतीक्षा करणाऱ्या हजारो पोलीस कर्मचाऱ्यांना मोठा आधार मिळणार आहे. अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर कर्ज मंजुरीचा मार्ग मोकळा झाल्याने पोलीस कर्मचारी व त्यांच्या कुटुंबीयांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. महाराष्ट्र पोलीस दलाच्या कल्याणासाठी घेतलेला हा निर्णय महत्त्वपूर्ण मानला जात असून, पोलीस कर्मचाऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने तो एक मोठे पाऊल असल्याची भावना पोलीस वर्तुळातून व्यक्त होत आहे.

Heading – कल्याण पुर्वेत केडीएमसीच्या नालेसफाईची पोलखोल

 नाल्यातील कचरा जैसेथे असल्याने पहिल्याच पावसात सखल भागात पाणी साचण्याची शक्यता कल्याण : कल्याण पुर्वेतील पिसवली परिसरातील ५० – ५० हाँटेलच्या मागून वाहणाऱ्या नाल्यामध्यील कचरा जैसे थे असल्याने कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या नालेसफाईची पोलखोल झाल्याचे दिसत आहे. या नाल्यामध्यील कचरा न काढल्याने तुंबापुरीचा फटका सखल भागातील घरांना बसु शकतो यांस जबाबदार कोण असा सवाल यानिमित्ताने उभा ठाकला आहे. कल्याण पुर्वेतील पिसवली परिसरातील ५०- ५० धाबा मागील बाजु एकवीरा अपार्टमेंट शेजारील नाला अद्यापही देखील कचरा आणि प्लास्टिक पिशव्या यांच्या गर्तेत सापडला असून यंदा १९ जून ओलांडलेले असले तरी पावसाचा तपास नाही. अशी परिस्थिती असताना लाखो रूपये नालेसफाईसाठी प्रशासन खर्च करते पंरतु ठेकेदाराने या नाल्यासंर्दभात दुर्लक्ष का केले आहे. की,पावसाची वाट पाहत पहिल्या पावसात नाल्यातील कचरा वाहून जाण्याची वाट पाहत आहे, असा आरोप यानिमित्ताने होत आहे. नाल्यातील कचरा  सफाई तसेच तळापर्यंत गाळ न काढल्यास या नाल्याच्या तुंबापुरीमुळे परिसरातील सखल भागातील घरामध्ये पहिल्या पावसात घरामध्ये पाणी शिरण्याचा संभाव्य धोका निर्माण झाला आहे. प्रशासनाने आता तरी डोळसपणे या नाल्याची सफाई कशी होईल याकडे लक्ष देणे गरजेचे असल्याचे चित्र यानिमित्ताने दिसत आहे. याबाबत केडीएमसीचे कार्यकारी अभियंता प्रसाद सखदेव यांच्याशी संपर्क साधला असता, या नाल्याची यापूर्वी सफाई केली होती, नाल्यात अद्यापही देखील कचरा आणि स्वच्छता नीट झाली नसेल तर, नाल्याची स्वच्छता संदर्भीत एजन्सी मार्फत करून घेणार असल्याचे सांगितले. ००००००००००