Category: होम

 ट्रान्सफॉर्मरमुळे उद्यानात बागडणाऱ्या मुलांच्या जीवाशी खेळ

विक्रांत चव्हाण यांचा उपोषणाचा इशारा अनिल ठाणेकर ठाणे : उद्यानात लहान मुले खेळत असतात, तर वयोवृध्द नागरिक फेरफटका मारत असतात, या कारणांमुळे वर्तकनगर येथील उद्यानात ट्रान्सफोर्मर बसविण्यास नकार देणाऱ्या उपायुक्तांच्या आदेशाला अभियंत्यांनी केराची टोपली दाखवत एमएसईबीला परवानगी दिली आहे. यामुळे येथील रहिवासी संतप्त असून काँग्रसचे माजी अध्यक्ष आणि माजी स्थानिक नगरसेवक विक्रांत चव्हाण यांनी `काम थांबवा’ अन्यथा २३ जून रोजी पालिका मुख्यालयावर उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. वर्तकनगर प्रभाग समिती अंतर्गत भीमनगर येथील बिल्डिंग नं. ५४ च्या पाठीमागे ठाणे महापालिका निगा व देखभाल करत असलेले म्हाडाचे उद्यान आहे. एमएसईबीने या उद्यानात ट्रान्सफोर्मर बसविण्याची विनंती केल्यानंतर म्हाडाने ठाणे मनपाकडे `ना हरकत पत्र’ मिळविण्यासाठी पत्रव्यवहार सुरु केला होता. उद्यानाच्या जागेत असलेले मंदिर तसेच प्रवेशद्वाराकरीता जागा उपलब्ध नसलयाने आणि ट्रन्सफोर्मर मधून स्पार्क किंवा शार्ट सर्किट सारखी दुर्घटना घडल्यास लहान मुलांच्या जीवितास धोका निर्माण होऊ शकतो, या कारणांमुळे उपायुक्तांनी ना हरकत प्रमाण पत्र देऊ नये असे स्पष्ट केले होते, अशी माहिती विक्रांत चव्हाण यांनी दिली आहे. उपायुक्तांचे आदेश धाब्यावर बसवत बांधकाम खात्याचे किरण भोये, संदीप गायकवाड, रणधीर राणे, सुधीर गायकवाड, शहर विकास विभागाचे रविशंकर शिंदे यांनी परस्पर ना हरकत प्रमाणपत्र देण्याबरोबरच उद्यानही म्हाडाकडे वर्ग करण्यासंदर्भात पत्रव्यवहार केला आहे. लहान मुलांच्या जीवशी खेळणाऱ्या  या अधिकाऱ्यांचा विक्रांत चव्हाण यांनी निषेध केला असून या  अधिकाऱ्यांच्या निलंबासाठी व ट्रन्सफोर्मर  बसवू नये या मागण्यांसाठी  २३ जून पासून पालिका मुख्यालयावर आमरण उपोषण करण्याचा इशारा विक्रांत चव्हाण यांनी महापालिका आयुक्त सौरभ राव यांना पत्राद्वारे दिला आहे. 0000000000

 संवेदनशील कल्याणकराने सुरू केलीय माणुसकीची नवी चळवळ ‘हॉस्पिटल लिफाफा’

 मुकुल गरे यांचा हृदयस्पर्शी उपक्रम कल्याण :  लग्नसमारंभात आपण आनंदाने जातो. मंडप सजलेला असतो, सनईचे सूर घुमत असतात, नवदांपत्याच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत असतो. अशा वेळी आपण खिशातून लिफाफा काढतो आणि…

– कल्याण पूर्वेत पिस्टल विक्रीसाठी आलेल्या तरुणाला अटक

 कोळशेवाडी पोलिसांची धडक कारवाई; आरोपीकडून अवैध पिस्टल जप्त कल्याण : कल्याण पूर्व परिसरातील वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी कोळशेवाडी पोलिसांनी मोठी कारवाई करत अवैध पिस्टल विक्रीसाठी आलेल्या एका तरुणाला अटक केली आहे. आरोपीकडून एक पिस्टल जप्त करण्यात आली आहे. पोलिसांना गुप्त माहिती मिळाली होती की, एक तरुण कल्याण पूर्वेतील १०० फूटी रोड परिसरात पिस्टल विक्रीसाठी येणार आहे. या माहितीच्या आधारे पोलीस उपायुक्त  अतुल झेंडे आणि सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक होनमाने यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक हेमंत गुरव तसेच गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक गणेश न्हायदे यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांच्या पथकाने परिसरात सापळा रचला. रात्री सुमारे साडेबारा वाजण्याच्या सुमारास संशयित तरुण घटनास्थळी येताच पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्याची ओळख निलेश शिरसागर अशी पटली. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडून एक पिस्टल जप्त करण्यात आली. त्यानंतर त्याला अटक करण्यात आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निलेश शिरसागर याच्याविरोधात यापूर्वीही गुन्हा दाखल आहे. जप्त करण्यात आलेली पिस्टल कुठून आणण्यात आली होती, ती कोणाला विकली जाणार होती आणि या अवैध शस्त्र व्यवहारामध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा सखोल तपास कोळशेवाडी पोलीस करत आहेत. याबाबत माहिती देताना वरिष्ठ पोलीस निरीक्षक हेमंत गुरव यांनी सांगितले की, परिसरातील गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांकडून विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. अवैध शस्त्रे बाळगणारे तसेच त्यांची खरेदी-विक्री करणाऱ्यांविरोधात पुढेही कठोर कारवाई सुरू राहणार आहे.

 कोवळ्या बालकांसाठी ‘गोमांस’ खाण्याचा अजब सल्ला

 वाशी रुग्णालयातील आक्षेपार्ह पत्रक नष्ट करून सर्व दोषींवर गुन्हे दाखल करा  हिंदु जनजागृती समितीची मागणी कल्याण : नवी मुंबई महानगरपालिकेच्या वाशी सार्वजनिक रुग्णालयात ‘भारतीय बालरोग अकादमी’ द्वारे लहान मुलांच्या पूरक आहार पत्रकात ‘गोमांस’  खाण्याचा सल्ला दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. राज्यात गोवंश हत्याबंदी कायदा लागू असतांना आणि शासनाने गोमातेला ‘राज्य माता’ घोषित केले असतांना सरकारी रुग्णालयात असा बेकायदेशीर प्रचार करणे हा कायद्याचा भंग व शासनाचा थेट अवमान आहे. याप्रकरणी दोषी संस्था व अधिकाऱ्यांवर तात्काळ फौजदारी गुन्हे दाखल करावेत, अशी आग्रही मागणी हिंदु जनजागृती समितीचे राज्य संघटक सुनील घनवट यांनी मुख्यमंत्री व गृहमंत्र्यांकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे. याविषयीचे निवेदन नवी मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त  सुनील पवार यांनाही दिले आहे. हे निवेदन रवींद्र नलावडे, अशोक सावंत, गोविंद प्रसाद दुबे यांनी सुपूर्त केले. या निवेदनाची प्रत नवी मुंबई पोलीस आयुक्त यांच्याकड़ेही पाठवली आहे. हिंदु धर्मीय जनमानसात गाईला अनन्यसाधारण धार्मिक महत्त्व असून गोहत्येला महापातक मानले गेले आहे; तसेच आईचे दूध न मिळणाऱ्या बालकांसाठी गोमाता हीच दुसरी माता असते. अशा अत्यंत संवेदनशील पार्श्वभूमीवर कोवळ्या बालकांना गोमांस खाण्यास प्रवृत्त करणारी ही विकृत धारणा कोट्यवधी हिंदूंच्या धार्मिक भावना तीव्रतेने दुखावणारी आणि समाजात धार्मिक तेढ निर्माण करणारी आहे. आज एकीकडे पाश्चात्य देश भारतीय वंशाच्या देशी गाईंचे महत्त्व ओळखून मानसिक शांतीसाठी ‘काऊ थेरपी’चा मोठ्या प्रमाणावर वापर करत आहेत, तर दुसरीकडे आपल्याच देशातील गीर, साहिवाल आणि देवणी यांसारख्या दुर्मिळ प्रजातींची संख्या घटत आहे. अशा स्थितीत भारतातील एका जबाबदार आरोग्य संस्थेकडून गोमांस भक्षणाला छुपे प्रोत्साहन दिले जाणे हे एका मोठ्या षडयंत्राचा भाग असून यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण होण्याची दाट शक्यता आहे. या गंभीर गैरप्रकाराचा जाहीर निषेध करत हिंदु जनजागृती समिती प्रशासनाकडे ही आग्रही मागणी करत आहे की, भारतीय बालरोग अकादमी  या संस्थेवर आणि वाशी महानगरपालिका रुग्णालयातील ज्या संबंधित जबाबदार अधिकाऱ्यांनी या विघातक पत्रकाला परवानगी दिली, त्यांच्यावर तात्काळ फौजदारी गुन्हे दाखल करून त्यांना अटक करण्यात यावी, तसेच नवी मुंबई क्षेत्रातील व राज्यातील सर्व सरकारी रुग्णालयांतून ही विवादास्पद व आक्षेपार्ह पत्रके तात्काळ जप्त करून ती नष्ट करण्याचे कडक आदेश प्रशासनाला देण्यात यावेत. प्रशासनाकडून यावर वेळेत आणि ठोस कायदेशीर कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशाराही घनवट यांनी दिला आहे.

कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीतील अनधिकृत बांधकामांवर कारवाईची मागणी

 शिवसेना नगरसेवक रोहन कोट यांचे केडीएमसी आयुक्त, महापौरांना पत्र कल्याण : कल्याण कृषी उत्पन्न बाजार समिती आवारातील काही बांधकामांवरून नवा वाद निर्माण झाला आहे. या बांधकामांना आवश्यक परवानग्या आहेत का, यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत शिवसेना नगरसेवक रोहन कोट यांनी संबंधित बांधकामांची चौकशी करून तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे. याबाबत त्यांनी केडीएमसी महापौर हर्षाली चौधरी, आयुक्त अभिनव गोयल यांना पत्र दिले आहे.  तसेच ही बांधकामे अनधिकृत असल्याचे आढळल्यास संबंधितांवर एमआरटीपी अर्थात महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियमांतर्गत गुन्हे दाखल करावेत, अशी मागणीही त्यांनी केली आहे. या प्रकरणामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीतील कामकाज आणि बांधकामांच्या वैधतेबाबत नव्याने चर्चा सुरू झाली असून प्रशासनाची भूमिका काय असणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. कल्याण डोंबिवली महापालिकेच्या मासिक महासभेमध्ये नगरसेवक मंदारं हळवे यांनी कृषी उत्पन्न बाजार समिती यांच्या अनधिकृत बांधकाम व अनागोंदी कारभाराबाबत तहकुबी ठेवलेली होती. या तहकुबी मध्ये दोन वेळा सभागृहाचे कामकाज स्थगित करण्यात आले. याचे मुख्य कारण कृषी उत्पन्न बाजार समिती कल्याण यांचा अंधाधुंदी कारभार व अनधिकृत बांधकाम. या तहकुबी मध्ये कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बांधकामाबाबत नगरसेवक रोहन कोट यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले की, बाजार समितीच्या मंजूर नकाशामध्ये ८-४ येथे २० व्यापारी गाळ्याचे बांधकाम चालू आहेत. प्रत्यक्षात कृ. उत्पन्न बाजार समितीची मासिक सभा ३० जानेवारी २०२४ येथे २० गाळे बांधण्याचा ठराव करण्यात आला व त्या अनुषंगाने ११ डिसेंबर २०२४ रोजी आपल्या नगर रचना विभागाकडून बांधकाम परवानगी २० दुकाने प्लस, १८ ऑफिस अशी घेण्यात आली. हे कोट यांनी पिठासन अधिकारी, आयुक्त व सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले. नगर रचना विभागात माहिती घेतली असता संचालक मंडळाचा ठराव बांधकाम घेताना नगर रचना विभागाला दिलेला नाही. नगर रचना विभागाकडून ही बांधकाम परवानगी कोणत्या अधिकारात देण्यात आले याचा अहवाल येणाऱ्या महासभेच्या २ दिवस आधी देण्याची मागणी रोहन कोट यांनी केली आहे. तसेच हा विषय गंभीर असून या प्रकरणाची आपण कसून चौकशी करावी व ही बांधकाम परवानगी रद्द करावी, कृषी उत्पन्न बाजार समितीवर एमआरटीपी अंतर्गत गुन्हा दाखल करून हे बांधकाम निष्कासित करण्याची मागणी नगरसेवक रोहन कोट यांनी केली आहे.

घरकामगार महिलांच्या स्वतंत्र महामंडळासाठी पाठपुरावा करणार -संजय केळकर

अनिल ठाणेकर ठाणे : ठाणे – मुंबईसह विविध शहरांत असंघटीत कामगारांचे सामाजिक आणि आर्थिक स्तरावर अनेक प्रश्न आ वासून उभे आहेत. गेली अनेक वर्षे घरकामगार महिलांच्या कल्याणकारी योजनांसाठी पाठपुरावा करत असून येत्या अधिवेशनात त्यांच्यासाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन करण्याबाबत आग्रही मागणी करणार आहे, अशी माहिती आमदार संजय केळकर यांनी दिली. आंतरराष्ट्रीय घरकामगार दिनानिमित्त राष्ट्रीय घरेलू कामगार चळवळ महाराष्ट्र व महाराष्ट्र राज्य घरकामगार युनियन यांच्यावतीने १६ जून रोजी श्रम सन्मान सोहळ्याचे आयोजन दादर येथील शिवाजी मंदिर नाट्यगृह येथे करण्यात आले होते. मंचावर संघटनेचे अध्यक्ष फादर फेलिक्स डिसूझा, आमदार संजय केळकर, कार्यक्रमाचे समन्वयक ज्ञानेश पाटील, असंघटित कामगार क्षेत्रातील अभ्यासक आणि जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र भिसे तसेच जेष्ठ पत्रकार संजय शिंदे हे ही मान्यवर उपस्थित होते. सोहळ्यात उपस्थित घरकामगार बांधवांना मार्गदर्शन करताना आमदार संजय केळकर म्हणाले, ठाणे-मुंबईसह राज्यभरात लाखो घरकामगार असंघटित असून त्यांचा सामाजिक आणि आर्थिक विकास दुर्लक्षित झाला आहे. घर कामगार महिला या घरातील जबाबदाऱ्या पार पाडून घरकाम करत कुटुंबाचा उदरनिर्वाह करत आहेत. या महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी कल्याणकारी योजना कशा देता येतील, त्यांच्या रोजच्या अडीअडचणी कशा सोडवता येतील यासाठी मी नेहमीच प्रयत्नशील असतो. येत्या पावसाळी अधिवेशनात देखील मी त्यांच्यासाठी स्वतंत्र कल्याणकारी मंडळ स्थापन करण्यासाठी आग्रह धरणार आहे. जोपर्यंत हे मंडळ स्थापन होत नाही, तोपर्यंत मी स्वस्थ बसणार नाही, असे प्रतिपादन श्री. केळकर यांनी केले. इतर कामगारांप्रमाणे या महिलांना देखील किमान वेतन, भरपगारी साप्ताहिक, प्रासंगिक, आजारपणाच्या सुट्ट्या, भविष्य निर्वाह निधी आदी सुविधा, विविध बँकांमार्फत कर्ज योजना, आरोग्य विमा, मातृत्व लाभ अनुदान, निवृत्ती वेतन आदी सुविधांचा लाभ या महिलांना मिळायला हवा यासाठी मी कायम प्रयत्नशील राहणार आहे, असेही  केळकर यांनी स्पष्ट केले. राष्ट्रीय घरकामगार चळवळ महाराष्ट्रचे अध्यक्ष फादर फेलिक्स डिसोझा यांनीही यथोचित मार्गदर्शन केले. ज्येष्ठ पत्रकार संजय शिंदे यांनी समाजातील या घटकांच्या प्रश्नांची दखल फार कमी घेतली जाते, असे सांगितले. या लढ्यात नेहमीच आपल्या सोबत असल्याचे आश्वासन शिंदे यांनी दिले. सोहळ्यात घरकामगार महिलांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. कार्यक्रमाचे समन्वयक ज्ञानेश पाटील यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना केली. मेळाव्यासाठी मुंबई, ठाणे जिल्हा, पालघर आदी भागातून घर कामगार महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रियांका जांभळे यांनी केले. तर आभार प्रदर्शन साधना मोरे यांनी केले.

– मालमत्तेला आपला मोबाईल क्रमांक जोडा, सवलतीची माहिती मिळावा

 कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचा उपक्रम कल्याण :  कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील करदात्यांना मालमत्ता करात मिळणा-या सवलतींचा लाभ मिळण्यासाठी आणि मालमत्ता करासंदर्भात इतर माहिती उपलब्ध होण्यासाठी त्यांचा मोबाईल क्रमांक व ई-मेल आयडी  हा मालमत्ता क्रमांकाशी नोंदणी  करण्याची सुविधा महानगरपालिकेच्या www.kdmc.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. महानगरपालिकेच्या www.kdmc.gov.in या संकेतस्थळावर Property KYC वर क्लिक करा आणि Property No नोंदवून, आपला मोबाईल क्रमांक  व ई-मेल आयडी अपडेट  करा. हि सुविधा  करदात्यांच्या सहकार्य व सहभागावर अवलंबून आहे. मालमत्ता करातील सवलतीचा लाभ घेण्यासाठी त्यांनी आपला मोबाईल क्रमांक व ई-मेल आजच नोंदणी करा. मोबाईल क्रमांक नोंदणीची सुविधा सर्व प्रभागात कार्यालयात देखिल उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. तरी, या सुविधेचा लाभ घेवून महानगरपालिकेस सहकार्य करावे असे आवाहन मालमत्ता कर विभागातर्फे उपायुक्त बाळासाहेब चव्हाण यांनी केले आहे.

राहुल गांधींच्या वाढदिवसानिमित्त मुंबई काँग्रेसचा शहरभर ‘वृक्षारोपण कार्यक्रम’.

मुंबई : लोकसभेतील विरोधी पक्ष नेते खासदार राहुल गांधी यांचा वाढदिवस काँग्रेस कार्यकर्त्यांसाठी एक ऊर्जा देणारा दिवस आहे. १९ जून हा राहुल गांधी यांचा वाढदिवस असून त्यांच्या वाढदिवसानिमित्त यावर्षी मुंबई…