नाल्यातील कचरा जैसेथे असल्याने पहिल्याच पावसात सखल भागात पाणी साचण्याची शक्यता
कल्याण : कल्याण पुर्वेतील पिसवली परिसरातील ५० – ५० हाँटेलच्या मागून वाहणाऱ्या नाल्यामध्यील कचरा जैसे थे असल्याने कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या नालेसफाईची पोलखोल झाल्याचे दिसत आहे. या नाल्यामध्यील कचरा न काढल्याने तुंबापुरीचा फटका सखल भागातील घरांना बसु शकतो यांस जबाबदार कोण असा सवाल यानिमित्ताने उभा ठाकला आहे.
कल्याण पुर्वेतील पिसवली परिसरातील ५०- ५० धाबा मागील बाजु एकवीरा अपार्टमेंट शेजारील नाला अद्यापही देखील कचरा आणि प्लास्टिक पिशव्या यांच्या गर्तेत सापडला असून यंदा १९ जून ओलांडलेले असले तरी पावसाचा तपास नाही. अशी परिस्थिती असताना लाखो रूपये नालेसफाईसाठी प्रशासन खर्च करते पंरतु ठेकेदाराने या नाल्यासंर्दभात दुर्लक्ष का केले आहे. की,पावसाची वाट पाहत पहिल्या पावसात नाल्यातील कचरा वाहून जाण्याची वाट पाहत आहे, असा आरोप यानिमित्ताने होत आहे.
नाल्यातील कचरा सफाई तसेच तळापर्यंत गाळ न काढल्यास या नाल्याच्या तुंबापुरीमुळे परिसरातील सखल भागातील घरामध्ये पहिल्या पावसात घरामध्ये पाणी शिरण्याचा संभाव्य धोका निर्माण झाला आहे. प्रशासनाने आता तरी डोळसपणे या नाल्याची सफाई कशी होईल याकडे लक्ष देणे गरजेचे असल्याचे चित्र यानिमित्ताने दिसत आहे. याबाबत केडीएमसीचे कार्यकारी अभियंता प्रसाद सखदेव यांच्याशी संपर्क साधला असता, या नाल्याची यापूर्वी सफाई केली होती, नाल्यात अद्यापही देखील कचरा आणि स्वच्छता नीट झाली नसेल तर, नाल्याची स्वच्छता संदर्भीत एजन्सी मार्फत करून घेणार असल्याचे सांगितले.
००००००००००
