Category: होम

चॅम्पियन्स ट्रॉफी तायक्वांडो स्पर्धा

चॅम्पियन्स ट्रॉफी तायक्वांडो स्पर्धा युवा खेळाडू विवांश घोषचे शानदार यश मुंबई : नुकत्याच मरीन लाईन्स येथील विद्यापीठ क्रीडा संकुलात झालेल्या “चॅम्पियन्स ट्रॉफी तायक्वांडो” स्पर्धेत युवा तायक्वांडोपटू विवांश घोषने शानदार यश…

राष्ट्रीय आपत्तीच्या काळात इराणमध्ये बहाई समुदायावर दोषारोप

राष्ट्रीय आपत्तीच्या काळात इराणमध्ये बहाई समुदायावर दोषारोप रमेश औताडे मुंबई: इराणमध्ये सुरू असलेल्या राष्ट्रीय संकटाच्या पार्श्वभूमीवर बहाई समुदायाला पुन्हा एकदा दोषारोपांचे लक्ष्य बनवले जात असून त्यांच्या विरोधात द्वेष भडकवला जात…

 डॉ. हेमराज शाह यांच्या जीवनावर आधारित नाटक रंगभूमीवर

डॉ. हेमराज शाह यांच्या जीवनावर आधारित नाटक रंगभूमीवर २४ फेब्रुवारी रोजी ‘हेमूदादा’चा माटुंगा येथील यशवंत नाट्यगृहात प्रयोग मुंबई : बृहन्मुंबई गुजराती समाज, महाराष्ट्र गुजराती समाज महामंडळाची स्थापना करुन मुंबईत गुजराती समाज बांधवांना विविध व्यासपीठ उपलब्ध करुन देणारे, मराठी आणि गुजराती साहित्य निर्मिती मध्ये महत्वपूर्ण योगदान देणारे तसेच सुमारे ६० वर्षांहून अधिक काळापासून कच्छशक्ती नियतकालिक अखंडपणे प्रकाशित करणारे डॉ. हेमराज शाह यांच्या जीवनावर आधारित ‘हेमूदादा’ हे नाटक मंगळवार, २४ फेब्रुवारी २०२६ रोजी रंगमंचावर सादर करण्यात येणार आहे. वसंत मारु आणि कवल सावला लिखित आणि दिग्दर्शित या नाटकाचा प्रयोग माटुंगा (पश्चिम) येथील यशवंत नाट्यगृहात रात्री ८.४५ वाजता होणार आहे. त्याचप्रमाणे या नाटकाचे प्रयोग २५ फेब्रुवारी २०२६ रोजी झवेरबेन हॉल, घाटकोपर आणि २२ मार्च २०२६ रोजी न्यू मरीन लाईन्स येथील बिर्ला मातुश्री सभागृहात रात्री ८.४५ रोजी सादर करण्यात येणार आहेत. विशेष म्हणजे २२मार्च रोजी डॉ. हेमराज शाह हे वयाची ८५ वर्षे पूर्ण करुन ८६ व्या वर्षात पदार्पण करीत आहेत. डॉ. हेमराज शाह यांच्या जीवनावर आधारित हेमूदादा या नाटकाप्रमाणेच ‘डॉ. हेमराज शाह : एक समर्पित जीवन’ या शीर्षकाखाली डॉक्युमेंटरी फिल्म सुद्धा बनविण्यात आली आहे जी आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हलमध्ये चमकली आहे. याच विक्रमादित्य व्यक्तिमत्वावर ‘कलष छलके’ ही कादंबरी सुद्धा प्रकाशित करण्यात आली आहे.

पद्मश्री नामदेवराव ढसाळ स्मृती साहित्य संमेलन

पद्मश्री नामदेवराव ढसाळ स्मृती साहित्य संमेलन रमेश औताडे मुंबई : कुलस्वामिनी साहित्य परिषद आयोजित तिसरे विश्वसाहित्यिक पद्मश्री नामदेवराव ढसाळ स्मृती साहित्य संमेलन नामदेव ढसाळांच्या जयंतीदिनी रविवार १५ फेब्रुवारी रोजी नीलकमल लाॅन्स, पुणे-नाशिक रोड, राजगुरुनगर येथे संपन्न होणार आहे अशी माहिती संमेलनाचे निमंत्रक अशोकराव टाव्हरे यांनी प्रसिध्दिपत्रकाद्वारे दिली आहे. ज्येष्ठ साहित्यिक व ८९ व्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डाॅ.श्रीपाल सबनीस हे उद्घाटक असून,कनेरसर गावचे सुपुत्र, ज्येष्ठ साहित्यिक, महा.राज्य साहित्य व संस्कृती मंडळाचे माजी सदस्य कांताराम सोनवणे हे संमेलनाचे अध्यक्षपद भूषविणार आहेत.ज्येष्ठ गझलकार व साहित्यिक म.भा.चव्हाण हे परिसंवादप्रमुख असून कविसंमेलनाचे अध्यक्ष मुंबई येथील ज्येष्ठ साहित्यिक व पत्रकार अनंत धनसरे आहेत. ज्येष्ठ विधिज्ञ व साहित्यिक प्रकाश शितोळे हे स्वागताध्यक्ष आहेत असे टाव्हरे यांनी सांगितले.साहित्य संमेलनात ग्रंथदिंडी,परिसंवाद,काव्यसंमेलन,गुणवंतांचा सन्मान   याचे आयोजन केले आहे. कनेरसर येथे १५ फेब्रुवारी २०२४ रोजी पहिले व यशवंतराव चव्हाण सेंटर मुंबई येथे १५ फेब्रुवारी २०२५ रोजी दुसरे साहित्य संमेलन झाले होते. खेड येथे नामदेवराव ढसाळ यांचा जन्म झाला असून कनेरसर येथे शालेय शिक्षण झाले होते.ढसाळ हे मुंबई येथे उपजिवीकेसाठी गेले व तीच  त्यांची कर्मभूमी ठरली.साहित्य क्षेत्रात तसेच दलित पँथर च्या माध्यमातून त्यांनी अलौकिक योगदान दिले आहे.विश्व साहित्यिक म्हणून त्यांची गणना होते. भारत सरकारने नामदेवराव ढसाळ यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले होते.साहित्य अकादमी पुरस्कार त्यांना मिळाला होता.विद्रोही कवी- लेखक म्हणून ढसाळांची गणना होते.गोलपिठा या त्यांच्या पहिल्या काव्यसंग्रहाला राज्य शासनासह अनेक पुरस्कार मिळाले होते.हाडकी हाडवळा,मी मारले सुर्याच्या रथाचे सात घोडे,गांडु बगीचा,तुही यत्ता कंची, मुर्ख म्हातार्‍याने डोंगर हलविले, या सत्तेत जीव रमत नाही,प्रियदर्शनी, खेळ व इतर विपुल साहित्य संपदा ढसाळांनी निर्माण केली आहे. खेड तालुक्यातील विविध क्षेत्रातील मान्यवर,साहित्यिक,साहित्य प्रेमी यांनी ढसाळांचा वारसा जतन करण्यासाठी व वाचन संस्कृती वृध्दींगत होण्यासाठी उपस्थित रहावे असे आवाहन टाव्हरे यांनी केले आहे.

बल्याणी येथे उर्स निमित्त लावलेले ठाकरे गटाचे बॅनर फाडले

बल्याणी येथे उर्स निमित्त लावलेले ठाकरे गटाचे बॅनर फाडले कल्याण: बल्याणी विभागात पीर वली शाह दर्गा ऊर्स २०२६ निमित्त प्रभाग क्र. 4 मध्ये लावण्यात आलेले शिवसेना ठाकरे गटाचे केडीएमसीचे नवनिर्वाचित नगरसेवक राहुल कोट आणि तेजश्री गायकवाड यांचे अधिकृत बॅनर काही समाजकंटकांकडून फाडण्यात आल्याची घटना घडली आहे. या प्रकारामुळे परिसरात नाराजीचे वातावरण निर्माण झाले असून संबंधितांनी जाणूनबुजून सामाजिक सलोखा बिघडवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात येत आहे. सदर कृत्य अत्यंत निंदनीय असून लोकप्रतिनिधी व नागरिकांच्या भावना दुखावणारे आहे. या घटनेमागील दोषींवर पोलिस प्रशासनाने तातडीने कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात येत आहे. जर संबंधितांवर योग्य ती कारवाई करण्यात आली नाही, तर लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे. या संपूर्ण घटनेचा जाहीर निषेध करण्यात येत असून पोलिस प्रशासनाने याची गंभीर दखल घ्यावी, अशी मागणी स्थानिक नागरिक व कार्यकर्त्यांकडून करण्यात आली आहे.

लाडक्या भावासाठी बहिणींची महाआरती

लाडक्या भावासाठी बहिणींची महाआरती अनिल ठाणेकर मुंबई, शिवसेना पक्षाच्या महिला आघाडीतर्फे ९ फेब्रुवारीला राज्यभरातील प्रमुख मंदिरांमध्ये लाडका भाऊ एकनाथ शिंदे यांच्या निरोगी आणि दीर्घायुष्यासाठी महाआरती आणि प्रार्थना करण्यात येणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दुर्दैवी निधनाने महाराष्ट्राला धक्का बसला आहे. या दुःखातून महाराष्ट्र अद्याप सावरलेला नाही.  त्यामुळे ९ फेब्रुवारी रोजी आपल्या वाढदिवसानिमित्त राज्यभर कोणतेही सोहळे, कार्यक्रम आयोजित करू नयेत, असे शिवसेनेचे मुख्य नेते राज्याचे उपमुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे यांनी सांगितले आहे. त्यानुसार राज्यात कोणत्याही कार्यक्रमांचे आयोजन होणार नाहीत. तसेच शिंदे स्वतःही वाढदिवस साजरा करणार नाहीत. त्यामुळेच शिवसेनेच्या महिला आघाडीने त्या दिवशी कोणत्याही सोहळ्याचे किंवा कार्यक्रमाचे आयोजन न करता महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ  एकनाथ शिंदे यांच्या निरोगी आणि दीर्घायुष्यासाठी राज्यातील विविध मंदिरांमध्ये महाआरती आणि प्रार्थना करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामध्ये शिवसेना महिला आघाडीच्या स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्या सहभागी होणार आहेत, असे महिला आघाडीच्या वतीने सांगण्यात आले.

  संरक्षण भिंतीमुळे पंचवटी नगरच्या रहिवाशांना दिलासा

संरक्षण भिंतीमुळे पंचवटी नगरच्या रहिवाशांना दिलासा नगरसेवक शिवाजी शिंदेंच्या प्रयत्नांना यश! मुकुंद रांजाणे माथेरान : माथेरानचा परिसर हा चोहोबाजूंनी डोंगर दर्यांनी हा संपूर्ण भूभाग व्यापलेला आहे. जागेअभावी अनेकांनी पूर्वीपासून जवळपास(चार दशकांपासून) कड्यालगत कुटुंबाच्या निवाऱ्यासाठी घरे बांधलेली आहेत.झोपडपट्टी म्हणून हा भाग आजही ओळखला जात आहे.पावसाळ्यात पावसाचे प्रमाण अधिक असल्याने कड्यालगत असणाऱ्या घरांच्या बाजूच्या मातीची पूर्णपणे धूप होऊन वाहून गेली आहे त्यामुळे तेथील रहिवाशांना अतिवृष्टी काळात जीव मुठीत धरून रात्रभर जागे राहून आपले जीवन कंठावे लागत होते. पंचवटी नगर येथील रहिवासी राकेश कोकळे यांनी याबाबत मागील पंधरा वर्षांपासून अनेकदा प्रशासनाला निवेदने देऊनही काहीएक साध्य झाले नव्हते.अखेरीस ही बाब विद्यमान नगरसेवक शिवाजी शिंदेंच्या प्रत्यक्ष निदर्शनास आणून दिल्यावर त्यांनी आपल्या परीने अधिकारी वर्गाशी चर्चा करून याभागात संरक्षण भिंतीचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे.या महत्वपूर्ण कामामुळे नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. मागील अनेक वर्षा पासून पंचवटी नगर भागात जमिनीची धूप होत होती. अनेक वर्षे त्या ठिकाणचे रहिवासी असणारे राकेश कोकळे पाठपुरावा करीत असताना मी पाहत होतो. प्रत्येक वेळी या कामासाठी राजकीय अडथळे येत असताना या भागातील गोर गरीब व्यक्तीची घरे वाचली पाहिजे या सामाजिक भावनेने मी ठेकेदार आणि पालिका अधिकारी यांना सूचना केली होती.त्यानुसार याठिकाणी संरक्षण भिंतीचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे. शिवाजी शिंदे—गटनेते माथेरान नगरपरिषद आमच्या पंचवटी नगर येथील माझ्या घराच्या मागील बाजूस दरवर्षीच्या अतिवृष्टीमुळे मोठया प्रमाणावर पावसाचे पाणी वाहून जात होते. त्यामुळे तेथील मातीची प्रचंड प्रमाणात धूप होऊन हा भाग पूर्णपणे धोकादायक बनला होता. याठिकाणी वास्तव्यास असणाऱ्या रहिवाशांना जीव मुठीत धरून पावसाळ्यात जीवन जगावे लागत होते. मी अनेकवेळा याबाबत प्रशासनाला लेखी निवेदने दिली होती की या ठिकाणी संरक्षण भिंत उभारावी परंतु याकडे दुर्लक्ष करण्यात आले होते. अनेकवेळा विविध वर्तमानपत्रात बातम्या सुध्दा दिल्या होत्या. अखेरीस नगरसेवक शिवाजी शिंदे यांनी पाठपुरावा करून याठिकाणी संरक्षण भिंतीचे काम सुरू करण्यात आले आहे त्यामुळे आम्हा रहिवाशांना दिलासा मिळाला आहे याबद्दल मुख्याधिकारी राहुल इंगळे,  नगराध्यक्ष चंद्रकांत चौधरी, नगरसेवक तथा गटनेते शिवाजी शिंदे,तसेच पत्रकार मुकुंद रांजाणे यांच्या अथक प्रयत्नांमुळेच हे शक्य झाले आहे. राकेश कोकळे–पंचवटी नगर रहिवासी,माथेरान

 ‘मूलद्रव्यांच्या जादुई दुनियेत’ पुस्तकाचे ठाण्यात प्रकाशन

मराठीतून विज्ञान प्रसाराचा उपक्रम ‘मूलद्रव्यांच्या जादुई दुनियेत’ पुस्तकाचे ठाण्यात प्रकाशन  सिद्धेश शिगवण ठाणे :मराठी विज्ञान परिषद, ठाणे विभाग आणि मराठा मंडळ, ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने हेमंत साने लिखित व लोकवाङ्मय गृह प्रकाशित ‘मूलद्रव्यांच्या जादुई दुनियेत’ या पुस्तकाचे प्रकाशन सोमवार, ९ फेब्रुवारी रोजी मराठा मंडळ हॉल, पाचपाखाडी, ठाणे (प.) येथे होणार आहे. या कार्यक्रमाला ‘जिज्ञासा’ संस्थेचे अध्यक्ष सुरेंद्र दिघे, ज्येष्ठ विज्ञान प्रसारक व लेखिका डॉ. मानसी राज्याध्यक्ष आणि मराठी विज्ञान परिषद ठाणे विभागाचे कार्यवाह प्रा. नामदेव मांडगे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. तसेच मराठा मंडळ, ठाणेचे अध्यक्ष सुरेश सुर्वे व सरचिटणीस राजेंद्र साळवी यांचीही उपस्थिती राहणार आहे. ‘मूलद्रव्यांच्या जादुई दुनियेत’ या पुस्तकात ११८ मूलद्रव्यांची माहिती मराठीत देण्यात आली असून विविध वैज्ञानिक व अभियांत्रिकी संकल्पना सोप्या भाषेत उलगडून सांगितल्या आहेत. अशा स्वरूपाचे हे मराठीतील पहिलेच पुस्तक असल्याचे आयोजकांनी नमूद केले. विद्यार्थी, पालक, शिक्षक तसेच विज्ञानप्रेमी नागरिकांनी या मराठीतून विज्ञान प्रसाराच्या उपक्रमाला उपस्थित राहून पाठबळ द्यावे, असे आवाहन मराठी विज्ञान परिषद, ठाणे विभागाचे अध्यक्ष व ज्येष्ठ खगोल अभ्यासक सोमण यांनी केले आहे.

१८ फेब्रुवारी पर्यंत उन्नती मैदान ठाण्यात मालवणी महोत्सवाची धूम

१८ फेब्रुवारी पर्यंत उन्नती मैदान ठाण्यात मालवणी महोत्सवाची धूम अनिल ठाणेकर ठाणे : दरवर्षीप्रमाणे यंदाही ठाण्यात मालवणी महोत्सवाची धूम नागरिकांना अनुभवयास मिळणार आहे. कोकण ग्रामविकास मंडळातर्फे कालपासून सुरू झालेल्या “मालवणी महोत्सव- २०२६” चे आयोजन ठाणे पश्चिमेकडील पोखरण रोड नं. १, शिवाईनगर येथील उन्नती गार्डन मैदानातील स्व. अजित पवार महोत्सव नगरीमध्ये करण्यात आले आहे. १८ फेब्रुवारीपर्यंत हा महोत्सव असणार आहे. महोत्सवाचे यंदा २७ वे वर्ष असुन मालवणी मेजवानीसह वेंगुर्लेकरांचे दशावतारी नाटक, डबलबारी,गणपतीचे अथर्वशीर्ष, राज्यस्तरीय स्तोत्रपठण स्पर्धा आणि दररोज पवित्र अग्निहोत्र आदी महाराष्ट्राच्या विविधांगी संस्कृतीचे अविष्कार महोत्सवात पाहायला मिळणार आहेत. याशिवाय विद्यार्थ्यांसाठी समुह नृत्यस्पर्धा तसेच दोन दिवसीय साहित्य संमेलन, काव्यलेखन स्पर्धा स्वर्गीय कवीवर्य मंगेश पाडगावकर दालनात होणार असुन रिल स्पर्धाही आयोजित केली आहे. तर, महिलावर्गासाठी “खेळ पैठणीचा”मध्ये महाराणी पैठणी जिंकण्याची संधी महोत्सवात मिळणार आहे. अशी माहिती मालवणी महोत्सवाचे आयोजक तथा कोकण ग्रामविकास मंडळ व ठाणे जिल्हा हौसिंग फेडरेशनचे अध्यक्ष, भाजप नगरसेवक सीताराम राणे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.कोकणातील शेतकरी, व्यावसायिकांना बाजारपेठ उपलब्ध व्हावी तसेच, मालवणी कला – संस्कृतीचा प्रसार आणि प्रचार व्हावा, या हेतुने नगरसेवक सीताराम राणे गेली २७ वर्षे ठाण्यात मालवणी महोत्सवाचे भव्य आयोजन करतात. सलग ११ दिवस चालणाऱ्या या महोत्सवाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, माजी केंद्रीय मंत्री खासदार नारायण राणे, सांस्कृतिक मंत्री ॲड. आशिष शेलार,वनमंत्री गणेश नाईक, उद्योग व मराठी भाषा मंत्री उदय सामंत, मत्स्य व बंदरे मंत्री नितेश राणे, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, भाजप प्रदेशाध्यक्ष माजी मंत्री रविंद्र चव्हाण, विधान परिषदेचे गटनेते आ. प्रविण दरेकर, आ. निलेश राणे, भाजप जिल्हाध्यक्ष संदीप लेले, जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ, ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव आदीसह विविध क्षेत्रातील मान्यवर भेट देणार आहेत. चौकट – रामती येथे नुकतेच अपघाती दुःखद निधन झालेले राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना श्रद्धांजली म्हणुन कोकण ग्रामविकास मंडळाच्या ठाण्यातील उन्नती गार्डन मैदानातील मालवणी महोत्सवासाठी स्व. अजितदादा पवार महोत्सव नगरी उभारण्यात आली आहे. या मालवणी महोत्सवात एकुण ७५ च्या आसपास व्यावासायिकांचे स्टॉल्स आहेत. प्रवेशद्वारावर कोकणस्थ रेखीव मंदिरामध्ये गणपती बाप्पाचे दर्शन भाविक आणि खवय्यांना घेता येणार असुन या मंदिरात दररोज भजन आणि मालवणी पद्धतीतील आरती केली जाणार आहे.तसेच, श्री स्वामी समर्थाची महती विषद करणारे विशेष भजन कणकवली वाघेरी येथील भजनी मंडळ सादर करणार आहे. चौकट – मालवणी महोत्सवात ११ दिवस दररोज अग्निहोत्र विधी होणार असुन विविध लोककलांचा जागर आणि कथा – कविता आदी साहित्यरूची वाढवणारे रंगतदार कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे. महिलावर्गासाठी खेळ पैठणीचा, डबलबारी भजनाची जुगलबंदी आणि वेंगुर्ला येथील दशावतारी नाट्यप्रयोग आदी कलाकृती सादर केल्या जाणार आहेत. याशिवाय, मालवणी महोत्सवात दररोज स्थानिक बालगोपाळांचे कार्यक्रम व स्पर्धा सादर होणार असुन राज्यस्तरीय स्त्रोत्र पठण स्पर्धा व काव्यलेखन स्पर्धा होणार आहे. १८ फेब्रुवारी रोजी महोत्सवाची सांगता होईल. तरी, खेळ पैठणीचा व विविध स्पर्धामध्ये सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांनी आपली नावे नोंदवावीत.असे आवाहन मालवणी महोत्सवाचे आयोजक नगरसेवक सीताराम राणे यांनी केले आहे.

केरळमध्ये पदवीपर्यंत मोफत शिक्षण

केरळमध्ये पदवीपर्यंत मोफत शिक्षण अनिल ठाणेकर केरळ : केरळ राज्यातील डाव्या आघाडीच्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या सरकारने खऱ्या अर्थाने क्रांती घडवली आहे! २०२६ च्या अर्थसंकल्पात अर्थमंत्री के. एन. बालागोपाल यांनी मोठी घोषणा…