Category: होम

मविआचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला

शरद पवारांच्या घरी बैठक, मुंबई: आगामी विधानसभा निवडणुकीसाठी मविआच्या जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला आहे. मविआचे शिल्पकार शरद पवार यांच्या मुंबईतील सिल्व्हर ओक या निवासस्थानी नुकतीच एक बैठक झाली. या बैठकीत प्राथमिक जागावाटपासाठी  नेत्यांनी एक…

कॅबिनेट बैठकीत निधीवरून अजित पवारांबरोबर खडाजंगी?

मुंबई : निधी वाटपावरून राज्याचे अर्थमंत्री अजित पवार आणि ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्यात राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत खडाजंगी झाल्याचे सुत्रांनी सांगितले. “आमच्या खात्याला निधी देत नसाल तर आम्ही काय जमिनी विकायच्या का?” असा प्रश्न महाजन…

ठाण्यातील तरुणीने निकाहसाठी पाकिस्तान गाठलं!

ठाणे : ठाण्यातील लोकमान्य नगर परिसरात राहणाऱ्या २३ वर्षीय महिलेने निकाह करण्यासाठी थेट पाकिस्तान गाठल्याचे समोर आले होते. यासाठी तीने बनावट कागदपत्रांच्या आधारे पासपोर्ट तयार केल्याची माहीतही समोर आली आहे. निकाहानंतर ती भारतात परतल्याचे समोर…

वंचित बहुजन आघाडीची आरक्षण  बचाव यात्रा आजपासून सुरू होणार

मुंबई : महाराष्ट्रात वनवा पेटू नये. महाराष्ट्र शांत रहावा. सलोखा टिकून रहावा या दृष्टिकोनातून आम्ही २५  तारखेपासून आरक्षण बचाव यात्रा सुरू करत आहोत. उद्या चैत्यभूमीपासून ही यात्रा सुरू होणार असल्याची माहिती वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय…

कळवा-मुंब्य्रात जितेंद्र आव्हाड यांना धक्का

ठाणे : कळवा-मुंब्रा परिसरातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या आठ माजी नगरसेवकांसह अनेक पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षात जाहीर प्रवेश केला असून त्यापैकी अनेक पदाधिकाऱ्यांची विविध पदांवर नेमणुका करण्यात आल्या आहेत. यानिमित्ताने…

महायुती सरकारच्या घोषणा फसव्या- विजय वडेट्टीवार

नाशिक – केंद्र आणि राज्य सरकारच्या नो गॅरंटी कारभारामुळे राज्यातील शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे. निसर्गाची अवकृपा आणि सरकारकडून होणारी फसवणूक यामुळे शेतकरी पिळवटून निघाला आहे. दुष्काळ, अवकाळी, गारपीट, कमी पर्जंन्य, पाणी टंचाई, पिकावरील रोग, वादळं अशी नैसर्गिक संकटं कायम उभी आहेतच. वाढता कर्जाचा बोजा, पिकविमा कंपन्यांकडून…

अर्थसंकल्पावरून राज्यसभेत गदारोळ

नवी दिल्ली : मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील पहिला अर्थसंकल्पावरू लोकसभेत काँग्रेस खासदार आक्रमक झालेले असताना राज्यसभेतही काँग्रेस, समाजवादी पार्टी, शिवसेनेचा ठाकरे गट, तृणूल काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या शरद पवार गटातील खासदार आक्रमक झाले. दरम्यान, विरोधी पक्षांमधील खासदारांनी…

ठामपातर्फे 27 जुलै ते 4 ऑगस्ट दरम्यान ‘पर्यावरणपूरक गणेशोत्सव 2024’ प्रदर्शन

ठाणे (24) : पर्यावरणाचे संवर्धन होण्याच्या दृष्टीकोनातून पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याचे निर्देश राज्यशासनाने दिले आहेत. या पार्श्वभूमीवर ठाणे महानगरपालिकेतर्फे पर्यावरणपूरक गणेशोत्सव 2024 हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. या उपक्रमातंर्गत…

लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांना नायब तहसीलदार सचिन राऊत यांनी केले अभिवादन

रायगड : लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांना नायब तहसीलदार सचिन राऊत यांनी कर्जत तहसीलदार कार्यालयात केले अभिवादन भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील थोर सेनानी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या जयंतीनिमित्ताने मंगळवार,(दि.२३ जुलै) रोजी कर्जत तहसील कार्यालयात अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी निवासी नायब तहसीलदार सचिन राऊत, महसूल नायब तहसीलदार सोपान बाचकर, निवडणूक नायब तहसीलदार गोविंद प्रल्हाद कोटंबे, संजय गांधी निराधार योजना नायब तहसीलदार आशा म्हात्रे यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला. यावेळी अव्वल कारकून , महसूल सहायक यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते. 0000

राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती योजनेसाठी अर्ज सादर करा-सुनील जाधव

 अशोक गायकवाड     रायगड : सामाजिक न्याय विभागामार्फत राज्यातील अनुसूचित जातीच्या १०० विद्यार्थ्यांना देशातील नामांकित शैक्षणिक संस्थांमध्ये उच्च शिक्षण घेण्यासाठी राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती योजनेसाठी अनुसूचित जातीच्या प्रवर्गातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी आवश्यक त्या कागदपत्रांसह दि.२६ ऑगस्ट २०२४ पूर्वी आयुक्त, समाज कल्याण, महाराष्ट्र राज्य, ३ चर्च पथ, पुणे ४११००१ यांच्याकडे अर्ज सादर करावेत, असे आवाहन सहाय्यक आयुक्त समाजकल्याण सुनील जाधव यांनी केले आहे. या योजनेचे अटी व शती :- महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जातीचा (नवबौध्दासहित) व महाराष्ट्र राज्यातील रहिवाशी असावा, विद्यार्थ्याने पदवी अभ्यासक्रमासाठी अर्ज करताना पदवीसाठी राज्य शासनाच्या किंवा इतर राज्याच्या केंद्र शासनाच्या शिष्यवृत्तीचा लाभ घेतलेला नसावा, पदवी अभ्यासक्रमासाठी विद्यार्थ्यांची कमाल वयोमर्यादा २५ वर्षे व पदव्युत्तर पदवी/पदविका अभ्यासक्रमासाठी कमाल वयोमर्यादा ३० वर्षे इतकी राहील, उत्पन्न मर्यादा रु.६ लक्ष राहील (फॉर्म नं. १६ व तहसिलदार/नायब तहसिलदार सक्षम प्राधिकाऱ्याचे उत्पन्नप्रमाणपत्र सादर करणे आवश्यक. शैक्षणिक अर्हता :- महाराष्ट्र राज्य विभागीय माध्यमिक व उच्च माध्यमिक परिक्षा मंडळ अथवा महाराष्ट्र राज्य क्षेत्रातील अन्य परिक्षा मंडळातून इयत्ता १० वी व १२ वी ची परिक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. व इयत्ता १२ वी च्या परीक्षेतील गुण विचारात घेऊन गुणानुक्रमे निवड करण्यात येईल. त्याकरीता विद्याथ्यांने इयत्ता १२ वी च्या परीक्षेत किमान ५५ टक्के गुण व पदवी अभ्यासक्रमासाठी डिप्लोमाच्या परिक्षेत किमान ५५ टक्के गुण मिळविणे आवश्यक राहील. लाभाचे स्वरूप :- राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्तीसाठी पात्र झालेल्या विद्यार्थ्यास संबंधित विद्यापीठ/ शैक्षणिक संस्थेने अभ्यासक्रमासाठी ठरवून दिलेले पूर्ण शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क, नोंदणी फी, जिमखाना, ग्रंथालय, संगणक,शैक्षणिक संस्थेच्या वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना संस्थेने आकारणी केलेले शुल्क तसेच भोजन शुल्काची, इत्यादी शुल्क मंजुरी. योजनेंतर्गत पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांस अभ्यासक्रमासाठी लागणाऱ्या पुस्तकांसाठी रु.५ हजार व शैक्षणिक साहित्य तसेच, इतर शैक्षणिक खर्च यासाठी एकूण रु.५ हजार अशी एकूण रु.१० हजार प्रत्येक वर्षी संबंधित विद्यार्थ्यास त्याच्या आधार संलग्न बँक खात्यावर दोन टप्प्यात अदा करण्यात येईल. अर्ज मिळण्याचे व सादर करण्याचे ठिकाण : विहित नमुन्यातील अर्जाचा नमुना महाराष्ट्र शासनाचे संकेतस्थळ (वेबसाईट) www.maharashtra.gov.in/ ताज्या घडामोडी आणि सामाजिक न्याय विभागाच्या संकेतस्थळावर संपर्क साधावा. 00000