Category: होम

ठाणे जिल्ह्याचे प्रतिपंढरपूर असलेले शहाड बिर्ला विठ्ठल मंदीर भक्तांनी दुमदुमले

उल्हासनगर :ठाणे जिल्ह्यातील प्रतिपंढरपूर म्हणून ओळख असलेले शहाड बिर्ला विठ्ठल मंदिरात विठ्ठल भक्तांनी एकच गर्दी केली होती. सकाळी कल्याणचे उपविभागीय अधिकारी विश्वास गुजर यांनी सहपत्नी मंदिराची पूजा केल्यानंतर विठ्ठल भक्तांना…

विजेअभावी बदलापुरकरांवर आरोग्य, उद्योग आणि पाणी संकट

कार्यालये, बँका, शाळा, दुकानांसह सर्वसामान्य नागरिक जेरीस     बदलापूरः सुमारे तीन लाख लोकसंख्या असलेल्या आणि चौथी मुंबई अशी बिरुदावली मिरवणाऱ्या बदलापूर शहरात गेल्या काही वर्षात बिघडलेल्या वीज वितरण व्यवस्थेमुळे आता नागरिक मेटाकुटीस आले आहेत. एकीकडे विजेअभावी पिण्याचे पाणी मिळणेही दुरापास्त झाले असताना वीज नसल्याने ग्रामीण उपजिल्हा रूग्णालयातही वाताहत झाल्याचे चित्र दोन दिवसांपूर्वी दिसले. बदलापुरातील औद्योगिक वसाहतीतील कंपन्यांवरही वीजसंकट असून उद्योग चालवायचे कसे असा प्रश्न निर्माण झाला आहे. वारंवार खंडीत होणाऱ्या वीज पुरवठ्यामुळे शाळा, बॅँकाचे व्यवहार आणि दुकानदार हैराण आहेत. गेल्या काही वर्षात अंबरनाथ आणि बदलापूर या चौथ्या मुंबईतील दोन शहरांची लोकसंख्या वेगाने वाढली. अनेका नामांकीत बांधकाम व्यावसायिकांनी बदलापूरसारख्या शहरात गृहसंकुले उभी केली. निसर्ग, पाणी आणि मोकळीक यामुळे शहराला नागरिकांनी पसंती दिली खरी मात्र आता शहराच्या लोकसंख्येला पायाभूत सुविधा पुरवणे यंत्रणांना कठीण होते आहे. त्यातही विजपुरवठा यंत्रणा काळानुरूप सक्षम झाली नाही. गेल्या काही दिवसात येथील महावितरणाच्या यंत्रणेने वीज पुरवठा करण्यासाठी सक्षम नसल्याचे दाखवून गुढघे टेकले आहेत. त्याचा परिणाम संपूर्ण शहरातील नागरिकांच्या आयुष्यावर होतो आहे. शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या यंत्रणेलाही सुरळीत वीजपुरवठा होत नसल्याने शहरात पाणीबाणी आहे. खुद्द प्राधिकरणाने याबाबत नागरिकांना सूचीत करत पाणी व्यवस्थापन करण्याचे आवाहन केले आहे. जलशुद्धीकरण केंद्राला होणारा पुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रयत्न सुरू असून त्यासाठी स्थानिक आमदार, महावितरणाचे वरिष्ठ आणि स्थानिक अधिकाऱ्यांशी संपर्क सुरू असल्याचे प्राधिकरणाच्या अभियंत्या माधुरी पाटील यांनी सांगितले आहे. दोनच दिवसांपूर्वी एका रोहित्राच्या दुरूस्तीमुळे येथील उपजिल्हा रूग्णालयाला पाच तास विजेविना काढावे लागले. रूग्णालयाची पर्यायी व्यवस्था सक्षम नसल्याने रूग्णांना त्याचा फटका बसला. त्यावरून गदारोळ झाल्यानंतर महावितरणाकडून रूग्णालायातील रोहित्राची दुरूस्ती करण्याऐवजी थेट नवे रोहित्र बसवून देण्यात आले. सहा महिन्यात २७५ वेळा वीज खंडीत आधीच औद्योगिक वसाहतींभोवती वाढलेल्या रहिवासी इमारतींमुळे धोक्यात सापडलेल्या आणि स्थलांतरणाची टांगती तलवार असलेल्या बदलापूरच्या औद्योगिक वसाहतीतील उद्योगांना आता सातत्याने खंडीत होणाऱ्या वीज पुरवठ्याचा फटका बसतो आहे. येथील उद्योजकांच्या बदलापूर इंडस्ट्रीयल वेल्फेअर असोसिएशन अर्थात बिवा संघटनेने गेल्या सहा महिन्यात २७५ वेळा वीज पुरवटा खंडीत झाल्याची नोंद केल्याची माहिती संघटेनेचे अध्यक्ष कुशल जैन यांनी दिली आहे. या औद्योगिक क्षेत्रात २९० कंपन्या असून त्यात कापड उद्योग, रसायन आणि अभियांत्रिकी कंपन्यांचा समावेश आहे. रासायनिक कंपनीत प्रक्रियेवेळीच वीज खंडीत झाल्यास काही अपघात घडण्याचीही भीती जैन यांनी व्यक्त केली आहे. शाळा, कार्यालयांनाही फटका सातत्याने खंडीत होणाऱ्या वीज पुरवठ्यामुळे लहान शाळा, दुकानदार, कार्यालयांनाही फटका बसतो आहे. बॅंकांचे कामही विजेअभावी खोळंबते. तर शीतगृह, शीतकपाट असणाऱ्या दुकानदारांना याचा त्रास सहन करावा लागतो आहे.

 ठाणे जिल्ह्यात डेंग्यू, मलेरियासह स्वाईन फ्ल्यूची साथ

ठाणे शहरात स्वाईन फ्ल्यूचे १३१ रुग्ण     ठाणे : यंदाच्या पावसाळ्यात ठाणे जिल्ह्यात साथीच्या आजाराने डोकेवर काढले आहे. जिल्ह्यात डेंग्यू आणि मलेरियासह स्वाईन फ्ल्यूचे रुग्णही आढळून येत आहेत. जिल्ह्यात मागील दोन आठवड्यात डेंग्यूचे १०२ तर, मलेरियाचे १९ रुग्ण आढळून आले आहेत. ठाणे शहरात स्वाईन फ्ल्यूचे १३१ रुग्ण आढळून आले असून हे शहर वगळता जिल्ह्यात स्वाईन फ्ल्युचा एकही रुग्ण आढळून आलेला नाही. यंदाच्या पावसाळ्यात ठाणे जिल्ह्यात डेंग्यू, मलेरिया आणि स्वाईन फ्ल्यूच्या रुग्णांमध्ये वाढ होऊ लागली आहे. जिल्ह्यात २० जून ते ७ जुलै या कालावधीत डेंग्यू चे ४३ रुग्ण तर, ८ जुलै ते १४ जुलै या कालावधीत ५९ डेंग्यूचे रुग्ण आढळून आले आहे. यामध्ये डेंग्यू चे सर्वाधिक रुग्ण हे कल्याण शहरात आढळले आहेत. तर, मलेरियाचे सर्वाधिक रुग्ण ठाणे शहरात आढळले आहेत. तसेच ठाणे शहरात गेल्या काही दिवसापासून स्वाईन फ्लुच्या रुग्ण संख्येतही वाढ होताना दिसत आहे. ठाणे शहरात जुन महिन्यात स्वाईन फ्ल्युचे ८ रुग्ण आढळले होते. तर, ९ जुलैपर्यंत स्वाईन फ्ल्यूच्या रुग्णांची संख्या ७० वर पोहोचली होती. या आठवड्यात रुग्णसंख्येत आणखी वाढ झाली असून सद्यस्थितीला रुग्णांची संख्या १३१ इतकी आहे. या सर्व रुग्णांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरु असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली. दिवसेंदिवस वाढत असलेल्या या रुग्ण संख्येमुळे आरोग्य यंत्रणा सर्तक झाली आहे. कळवा रुग्णालयात स्वाईन फ्ल्यू रुग्णांसाठी विशेष कक्ष ठाणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात स्वाईन फ्लुच्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी विशेष कक्ष तयार करण्यात आला आहे. याठिकाणी एकूण १९ खाटा सज्ज असून त्यातील ४ खाटा या अतिदक्षता विभागातील असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली. या रुग्णालयात स्वाईप टेस्टींगची सुविधा देखील उपलब्ध करण्यात आली आहे. साथीच्या आजारांमध्येही वाढ डेंग्यू, मलेरिया आणि स्वाईन फ्ल्यू या आजारांसह डायरियाच्या रुग्णांची संख्या देखील दिवसेंदिवस वाढत असून सध्या ही संख्या १६० वर पोहचली आहे. शहरात स्वाईन फ्ल्यूची वाढती रुग्ण संख्या लक्षात घेऊन महापालिकेने कळवा रुग्णालयात विशेष कक्ष तयार केला आहे. तसेच औषधांचा पुरेसा साठा उपलब्ध केला आहे. नागरिकांनी पाणी उकळून आणि गाळून प्यावे. डॉ. चेतना नितील (मुख्य वैद्यकीय आरोग्य अधिकारी, ठाणे महापालिका) पावसाळ्याच्या दिवसात सखल भागात पाणी साचून तिथे डासांचा प्रादूर्भाव वाढतो. त्यातून, डेंग्यू मलेरिया सारखे आजार उद्भवतात. पावसाळ्याच्या काळात बाहेरचे अन्न पदार्थांचे सेवन करणे टाळले पाहिजे. सकस आहार घेतला पाहिजे. पाणी उकळून प्यावे अशी काळजी नागरिकांनी घेतली पाहिजे. डॉ. कैलास पवार, शल्यचिकित्सक (जिल्हा रुग्णालय, ठाणे) 00000

दिवा रेल्वे स्थानकातील गृहफलाट रखडल्याने प्रवाशांचे हाल

कल्याण: मध्य रेल्वेच्या दिवा रेल्वे स्थानकातील गृह फलाटाचे काम (होम प्लॅटफाॅर्म) गेल्या वर्षभरापासून रखडले आहे. हे काम पूर्ण करण्याच्या दृष्टीने रेल्वे प्रशासनाकडून कोणत्याही हालचाली केल्या जात नसल्याने प्रवासी, रेल्वे प्रवासी…

लक्षभेदी सामाजिक संस्थेने काढली आषाढी एकादशी निमित्त पालखी दिंडी

ठाणे : ठाण्यातील लक्षभेदी सामाजिक संस्थेच्या वतीने पाचपाखाडी भागातून आषाढी एकादशी निमित्त पालखी दिंडी काढण्यात आली . लक्षभेदी सामाजिक संस्थेच्या अध्यक्ष व भाजपा ठाणे शहर जिल्हा सचिव माधुरी मेटांगे यांच्या…

उल्हासनगर महापालिकेत अभय योजना आणि लोकअदालतीचे आयोजन

उल्हासनगर : उल्हासनगर महानगरपालिकेत २२ जुलै ते २६ जुलै रोजी मालमत्ता कर वरील शंभर टक्के दंड माफ करण्यासाठी अभय योजना तसेच  २७ जुलै रोजी राष्ट्रीय लोकअदालत आयोजन करण्यात आले असून जास्तीत…

 कल्याण-मुरबाड राष्ट्रीय महामार्गाच्या संथ कामावर रिपाइं आक्रमक

आंदोलनाचा इशारा राजीव चंदने     मुरबाड : मुरबाड कल्याण राष्ट्रीय महामार्गाच्या संथरित्या सुरू असलेल्या चौपदरीकरण कामामुळे ऐन पावसाळ्यात निर्माण झालेल्या दयनीय अवस्थेला प्रवाशांसह सामान्य नागरिक देखील हैराण झाले असून याविरोधात रिपाइं सेक्युलर पक्षाने विविध मागण्यांचे पत्र दिले आहे. महामार्ग खोदून ठेऊन दोन्ही बाजूने केवळ गटाराची कामे अत्यंत संथ गतीने सुरू असून यामुळे रोज प्रवास करणाऱ्या प्रवाशांना विलंबाने प्रवास करावा लागतो. खाजगी चारचाकी – दुचाकी धारकांना रात्री अपरात्री प्रवास करताना पावसात रस्त्यावरील भरावाचा अंदाज न आल्याने अपघाताला सामोरे जावे लागत आहे. आतापर्यंत ज्या अंतरापर्यंत रस्ता उखडून ठेवला आहे, त्या गावापर्यंत रस्ता पूर्ण केल्याशिवाय पुढील रस्ता खोदून ठेवू नये, आज पर्यंत या रस्त्यावर झालेल्या अपघाताची जबाबदारी संबंधीत ठेकेदारानी घेऊन अपघात पीडितांना नुकसान भरपाई द्यावी, मुरबाड तालुक्याच्या हद्दीतील बाधित शेतकऱ्यांना त्यांच्या जागेचा मोबदला दिल्या शिवाय काम सुरू करू नये, मुरबाड शहरालगत रस्त्याच्या कडेला बसून व्यवसाय करणाऱ्या छोट्या व्यवसायीकांना दिवाळी पर्यंत उठवू नये अशा विविध मागण्यांचे निवेदन आंबेडकरी नेते श्यामदादा गायकवाड यांच्या रिपाई सेक्युलर पक्षाच्या वतीने राष्ट्रीय महामार्ग ६१ च्या सहाय्यक कार्यकारी अभियंता यांच्या हस्ते देण्यात आले असून याप्रकरणी गांभीर्यपूर्वक निर्णय न घेतल्यास ठाणे जिल्हाध्यक्ष रविंद्र चंदने यांच्या नेतृत्वाखाली आंदोलनाचा ईशारा देण्यात आला आहे. तर प्रवासी व चालक यांच्या व्यथा महामार्ग प्रशासनाच्या दरबारी मांडण्यात आल्याने पुढील कार्यवाहीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 00000

मिरा भाईंदर महापालिकेच्या उपायुक्तांकडे पाच लाखांच्या खंडणीची मागणी

भाईंदर : मिरा-भाईंदर महापालिकेचे उपायुक्त रवी पवार यांची बदनामी करण्याची धमकी देत त्यांच्याकडे पाच लाख रुपयांच्या खंडणीची मागणी केल्याप्रकरणी भाईंदर पोलिस ठाण्यात अनोळख्या व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रवी…

 जलवाहिन्या सांडपाण्याच्या नाल्यातून

 उल्हासनगरवासीयांचे आरोग्य धोक्यात   उल्हासनगर –  शहरवासीयांना मुबलक शुद्ध पाण्याचा पुरवठा होण्यासाठी ३५० कोटींची पाणी वितरण योजना महापालिकेने राबवूनही जलवाहिन्या सांडपाण्याच्या गटारीतून गेल्या आहेत. यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला. पुन्हा दुसऱ्या टप्प्यातील १२६ कोटीच्या पाणी पुरवठा वितरण योजनेला मुहूर्त मिळाला आहे. उल्हासनगरातील पाणी टंचाईची समस्या निकाली काढण्यासाठी ३५० कोटींची पाणी पुरवठा वितरण योजना काही वर्षांपूर्वी राबविली. या योजने अंतर्गत नवीन जलवाहिन्या टाकणे, प्रत्येक घराला नवीन ब्ल्यू पाईपचे नळजोडणी देणे, पाणी मीटर बसविणे, पाणी वितरणासाठी ११ उंच जलकुंभ व एक भूमिगत जलकुंभ उभारणे, पंपिंग स्टेशन आदींचा समावेश होता. मात्र या योजनेतून काही भाग सुटल्याने, दुसऱ्या टप्प्यातील १२६ कोटींची पाणी पुरवठा वितरण योजनेचे काम सुरू आले. मात्र अवघ्या १३ कि.मी. क्षेत्रफळाच्या शहरात पहिल्या टप्प्याची ३५० कोटींची पाणी पुरवठा वितरण योजना राबवूनही पाणी टंचाई, पाणी गळती, अनियमित पाणी पुरवठा आदी समस्या कायम आहे. कॅम्प नं-३ हिराघाट परिसर, शिरू चौक, सुभाष टेकडी परिसर, गायकवाड पाडा, गोलमैदान येथील राहुलनगर परिसर, शांतीनगर येथील डॉल्फिन हॉटेल परिसर, कॅम्प नं-४ येथील महादेवनगर, संतोषनगर, भीम कॉलनी, मद्रासीपाडा आदी विविध भागात प्रत्येकाच्या घरापर्यंत जलवाहिनी टाकण्यात आल्या नाहीत. त्यामुळे मुख्य जलवाहिनीवरून लांब पाईप टाकून नळजोडणी घेण्यात आल्या आहेत. गटारी, सांडपाण्याच्या नाल्यातून जाणाऱ्या या पाईपलाईनला गळती लागली असून अश्या गळक्या पाईप मधून नागरिकांना प्रदूषित पाण्याचा पुरवठा होत आहे. अश्या प्रदूषित पाण्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. कोट्यवधींच्या योजना कोणासाठी नागरिकांना स्वच्छ, नियमित व मुबलक पाणी पुरवठा होण्यासाठी महापालिका केंद्राच्या अमृत योजने खाली कोट्यवधींचा पाणी पुरवठा वितरण योजना राबविते. मात्र त्याचा फायदा नागरिकांना होत नसल्याने, ह्या योजना कोणासाठी राबवितात. असा प्रश्न स्थानिक नागरिकांनी केला आहे.

मसाला बाजारात राडारोडा टाकून खड्डे बुजवण्याचा प्रकार

नवी मुंबई : वाशीतील एपीएमसी बाजारात खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. बाजार परिसरात दररोज लाखोंच्या घरात मोठे ट्रक, टेम्पोची रहदारी असते, मात्र बाजारातील अंतर्गत भागात पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहन चालकाला अडथळे निर्माण…