Category: होम

 कृषी क्रांतीचा जनक

मुख्यमंत्र्यांनी स्वीकारला महाराष्ट्राचा सर्वोत्कृष्ट कृषी राज्याचा पुरस्कार       नवी दिल्ली : पर्यावरण रक्षण, अन्न सुरक्षा यांच्या माध्यमातून राज्याकडून घेतल्या गेलेल्या शाश्वत विकास धोरणांची दखल घेत, 15व्या कृषी नेतृत्व समितीचा 2024 चा प्रतिष्ठित सर्वोत्कृष्ट कृषी राज्य पुरस्कार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हा पुरस्कार राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्यासोबत स्वीकारला. केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंग चौहान यांच्या हस्ते हा पुरस्कार आज प्रदान करण्यात आला. १५ व्या कृषी नेतृत्व समितीच्या- 2024 काँनक्लेव्हचे एग्रीकल्चर टुडे समूहाच्या वतीने आयोजन करण्यात आले आहे. सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश व केरळचे राज्यपाल पी. सदाशिवम यांच्या अध्यक्षतेखाली 15व्या कृषी नेतृत्व पुरस्कार समितीने राज्यातील पर्यावरण रक्षण, अन्न सुरक्षा आणि शाश्वत विकास धोरणांची दखल दखल घेत महाराष्ट्र राज्याला सर्वोत्तम कृषी राज्य म्हणून निवड केली आहे. पुरस्कार वितरण सोहळ्यात केंद्रीय रस्ते परिवहन आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान, एग्रीकल्चर टुडे समूहाचे अध्यक्ष डॉ. एम.जे. खान, राज्याच्या कृषी मुल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल व इतर मान्यवर उपस्थित होते. ०००००

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात कचऱ्याचे साम्राज्य – नरेंद्र पंडित

अनिल ठाणेकर     ठाणे : जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात कचऱ्याचे साम्राज्य निर्माण झालेले असून, यामुळे प्रचंड दुर्गंधी पसरुन, रोगराई पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही. जिल्हाधिकारी कार्यालयाव्यतिरिक्त, याच परिसरात असणाऱ्या शिधावाटप कार्यालयाच्या दारातच कचऱ्याचे ढिगारे साचलेले असून, याचा अभ्यांगतांना मोठ्याप्रमाणात त्रास होत आहे, अशी तक्रार धर्मराज्य पक्षाचे सहसचिव नरेंद्र पंडित यांनी, ठाण्याचे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांच्याकडे एका लेखी पत्राद्वारे केली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातील या कचऱ्यातून निर्माण झालेल्या दुर्गंधीमुळे, रोगराई पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने, साचलेल्या कचऱ्यावर डासांचे प्रमाण वाढलेले आहे. परिणामी, डेंग्यू आणि मलेरिया या आजारांची लागण होण्याचा धोका जास्त आहे. संतापजनक बाब म्हणजे, जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातच महाराष्ट्र शासनाचे “राष्ट्रीय हिवताप प्रतिरोध योजना, ठाणे जिल्हा” यांचे कार्यालय याच ठिकाणी असून, दुर्दैवाने या कार्यालयात कोणीही संबंधित अधिकारी उपस्थित नसल्याची बाब ‘धर्मराज्य पक्षा’च्या निदर्शनास आलेली आहे. पावसाळ्याच्या दिवसांत साथीचे आजार मोठ्याप्रमाणात उद्भवत असतात. त्यातच ठाणे शहर आणि जिल्ह्यात, डेंग्यूचे रुग्ण आढळून आल्याचे वृत्त, प्रसिद्धीमाध्यमांतून प्रकाशित झालेले असताना, या पार्श्वभूमीवर, खुद्द ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातच कचऱ्याचे साम्राज्य निर्माण होणे, हे प्रशासनाला नक्कीच भूषणावह नाही. तरी, याप्रकरणी गांभीर्याने दखल घेत, रोगराईला आमंत्रण देणारे, कचऱ्याचे ढिगारे त्वरित काढून टाकण्यात येऊन, स्वच्छता राखावी आणि नागरिकांच्या आरोग्याची काळजी घ्यावी, अशी विनंती ‘धर्मराज्य पक्षा’चे सहसचिव नरेंद्र पंडित यांनी, ठाण्याचे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांच्याकडे केली आहे. 00000

पातलीपाडा येथील महापालिका शाळेची महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी केली पाहणी

ठाणे : ठाणे महापालिकेच्या पातलीपाडा येथील शाळेची महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी गुरूवारी सकाळी पाहणी केली. या शाळेच्या इमारतीची प्रस्तावित दुरुस्ती आणि इतर कामांबद्दल आयुक्त राव यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला…

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचे काम त्वरीत पूर्ण करणार-  देवेंद्र फडणवीस

मुंबई : मुंबईतील इंदू मिल येथे उभारण्यात येणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचे बांधकाम वेगाने पूर्ण करण्यात येत आहे. पुतळ्याचे प्रारुप (मॉडेल) सुद्धा मान्य झाले आहे. तथापि आंतरराष्ट्रीय दर्जाच्या या…

गणवाड्या उभारणी, दुरुस्तीसाठी अर्थसंकल्पात तरतुदीसाठी प्रस्ताव तयार करणार- आदिती तटकरे

मुंबई : अंगणवाड्या उभारणी तसेच दुरुस्तीसाठी पुढील अर्थसंकल्पात तरतूद करण्यासाठी आवश्यक प्रस्ताव महिला व बाल विकास विभागामार्फत तयार करण्यात येईल, अशी माहिती महिला बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी आज विधानसभेत…

ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या सुधारित

किमान वेतनातील फरकाच्या रकमेसाठी अर्थसंकल्पात तरतूद- गिरीश महाजन     मुंबई : राज्यात सध्या २७ हजार ९११ ग्रामपंचायती असून त्यात ४८ हजार १८८ कर्मचारी कार्यरत आहेत. या ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना उद्योग, उर्जा व कामगार विभागाच्या अधिसूचनेनुसार किमान वेतन लागू करण्यात आले आहे. शासनाने या कर्मचाऱ्यांना सुधारित किमान वेतनातील फरकाची रक्कम प्रदान करण्याचा निर्णय घेतला असून यासाठी अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली असल्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी विधानसभेत लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात दिली. याबाबत सदस्य सुनील भुसारा यांनी लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती. या सूचनेच्या चर्चेमध्ये ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू, नाना पटोले, दीपक चव्हाण, सुरेश वरपूडकर यांनी सहभाग घेतला. मंत्री श्री. महाजन म्हणाले की, ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे वेतन व आकृतीबंधाबाबत शिफारस करण्यासाठी यावलकर समिती गठित करण्यात आली होती. या समितीने सादर केलेल्या अहवाल  वित्त विभागाकडे पाठवण्यात आला आहे. तसेच ग्रामपंचायतीचे उत्त्पन्न व लोकसंख्येचा विचार करून ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या किमान वेतनासाठी सहाय्यक अनुदानाच्या हिस्साची टक्केवारी ठरविण्यात आली आहे. ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा भविष्य निर्वाह निधीची रक्कम नियमानुसार जमा करण्यात येत असून ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या किमान वेतनात वाढ करण्यात आली असून अनुदानही वेळोवेळी देण्यात येत असल्याचे मंत्री श्री. महाजन यांनी यावेळी सांगितले.

मुंबई शहरातील प्रकल्पबाधितांना घरे देण्याबाबत शासन सकारात्मक-उदय सामंत

मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रात विविध नागरी विकास प्रकल्प सुरू आहेत. त्यामुळे प्रकल्पबाधितांची संख्या वाढत असल्याने त्यांच्याकडून सदनिका, अनिवासी गाळ्यांची मागणी वाढत आहे. मुंबई शहरात 2017 पासून 4870 प्रकल्पबाधितांना घरे…

पुढील टप्प्यातील परिक्षा 18 जुलैपासून सुरू

 जिल्हा परिषद ठाणे अंतर्गत गट- क सरळ सेवा भरती 2023     ठाणे : जिल्हा परिषद गट क सरळसेवा पदभरती प्रक्रिया 2023 मध्ये आतापर्यंत विविध संवर्गातील परिक्षा पार पडलेल्या आहेत. पुढील टप्प्यात ठाणे जिल्ह्यातील परिक्षा केंद्राची निवड केलेल्या  आरोग्य सेवक (पुरुष) 40%, आरोग्य सेवक (पुरुष) 50% (हंगामी फवारणी क्षेत्र कर्मचारी), आरोग्य परिचारिका (आरोग्य सेवक (महिला)), कंत्राटी ग्रामसेवक, मुख्य सेविका/ पर्यवेक्षिका या संवर्गातील बिगर पेसा क्षेत्रातील परिक्षा 18 जुलै ते 30 जुलै पर्यंत होणार आहेत. जिल्हा परिषद ठाणे कार्यालयातील अधिकृत संकेतस्थळावर परिक्षे संदर्भात वेळोवेळी प्राप्त झालेल्या सूचना उमेदवारांसाठी उपलब्ध करून देण्यात येत आहे. सरळ सेवा भरती पुढील टप्प्यातील परिक्षा 18 जुलै रोजी मुख्य सेविका/ पर्यवेक्षिका, 19 व 23 जुलै रोजी आरोग्य परिचारिका (आरोग्य सेवक (महिला)), 20, 22 व 23 जुलै रोजी आरोग्य सेवक (पुरुष) 40%, 19 व 24 जुलै रोजी आरोग्य सेवक (पुरुष) 50% (हंगामी फवारणी क्षेत्र कर्मचारी), 25,29 व 30 जुलै रोजी कंत्राटी ग्रामसेवक या पदाची परीक्षा घेण्यात येणार आहे. त्यासाठी उमेदवारांना जिल्हा परिषद ठाणे कार्यालयातील अधिकृत संकेतस्थळावरून माहिती घेण्याचे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांनी केले आहे. परीक्षेसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांना परिक्षेचे हॉल तिकीट उपलब्ध करून देण्यात येत आहे. परीक्षेसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांनी जिल्हा परिषद ठाणे कार्यालयातील अधिकृत संकेतस्थळावरील आयबीपीएस द्वारे उपलब्ध करून दिलेल्या लिंकवरून हॉल तिकीट डाउनलोड करून घ्यावे. विशेष सुचना ज्या महिला उमेदवारांनी त्यांचे नाव बदलले आहे त्यांच्या बाबतीत त्यांनी मूळ राजपत्र अधिसूचना / त्यांचे विवाह प्रमाणपत्र सादर केल्यास परिक्षेस बसण्याची परवानगी दिली जाईल. अन्यथा महिला उमेदवारांना परिक्षेसाठी बसू दिले जाणार नाही याची दक्षता घ्यावी, अशी माहिती जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे. 000000

 उल्हासनगर मनपा व प्रदूषण नियंत्रण मंडळाची संयुक्त कारवाई

उल्हासनगर शहरात प्रतिबंधित प्लास्टिकच्या विरोधात सुनिल इंगळे       उल्हासनगर : शहरात प्रतिबंधित प्लास्टिक बनवणाऱ्या कारखाने आणि त्याची विक्री करणाऱ्या दुकानदारांवर उल्हासनगर मनपा प्रशासन, प्लास्टिक निर्मूलन पथक, प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्या संयुक्त पथकाने  धडक कारवाई केली आहे. याप्रकरणी संबंधितांवर दंडात्मक कारवाई करून प्रतिबंधित प्लास्टिकचा साठा जप्त केला आहे. प्लास्टिकमुळे ठिकठिकाणी नाले तुंबलेले असून मोठ्या प्रमाणात अस्वच्छता पसरली असल्याचे दिसून येत आहे . उल्हासनगर शहरात मोठ्या प्रमाणात प्लास्टिक निर्मिती केली जात असून त्याची विक्रीही खुलेआमपणे केली जात आहे या संदर्भात शहरातील अनेक सामाजिक संघटनांच्या मनपा प्रशासन आणि प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्याकडे तक्रारी प्राप्त झाल्यानंतर उल्हासनगर मनपा आयुक्त अजीज  शेख, आयुक्त यांच्या मार्गदर्शखाली अतिरिक्त आयुक्त डॉ. किशोर गवस,  उपायुक्त डॉ. सुभाष जाधव, आरोग्य अधिकारी मनीष हिवरे, मुख्य स्वच्छता निरीक्षक विनोद केणे, एकनाथ पवार, तसेच प्लास्टिक निर्मूलन पथक प्रमुख  व प्रदूषण मंडळाचे अधिकारी सीमा दळवी व राजेश नदगावकर यांच्या सयुक्त विद्यमानाने  उल्हासनगर शहरात कॅम्प नं. 02 व कॅम्प नं. 03 मधील पेलूमल कंपाऊंड येथील एकल प्लास्टिक उत्पादक कारखान्यावर पाळत ठेऊन मंगळवारी अचानक पणे धाड टाकून कारवाई करण्यात आली. या कारवाई दरम्यान सदर कंपन्यांचा 365 किलो प्लास्टिक साठा जप्त करण्यात आला असून  10,000 रु. दंडात्मक कार्यवाही करण्यात आली.  प्लास्टिक विक्री करणाऱ्या दुकानदार व अस्वच्छता पसरवणाऱ्या व्यक्तींविरुद्ध  5000 रुपये दंडात्मक कारवाई करण्यात आले आहे. पावसाळ्यात नाल्यामध्ये प्लास्टिक  पिशव्या अडकून तुंबण्याच्या घटना शहरात होत आहेत या संदर्भात मनपा आयुक्त अजीज शेख आयुक्त यांनी संबंधित विभागांना सूचना देऊन  पावसाळ्यापूर्वी कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या होत्या. यानुषगाने  स्वच्छता विभागाद्वारे या आठवड्या अस्वच्छता करणाऱ्या  251 व्यक्तींविरुद्ध 98, 550/- व  एकल प्लास्टिक पिशवीचा वापर व विक्री करणाऱ्या विक्रीते विरुद्ध  55000  हजार रु. व 502 kg जप्ती 10 व्यक्तींविरुद्ध एकूण 1,48,550 /- रु. दंडात्मक कारवाई करण्यात आली होती अशी माहिती मनपा प्रशासनाने दिली आहे . शहरातील सर्व मुख्य रस्ते, अंतर्गत रस्ते, फुटपाथ, नाले यांची विषेश सफाई व स्वच्छता करुन नागरीकांना स्वच्छतेबाबत संदेश देवुन जनजागृती केली जात आहे. नागरीकांना शिस्त लागावी या करीता अस्वच्छता पसरविणाऱ्या नागरीकांना सूचना/नोटीसा  देऊनही सार्वजनिक रस्त्यावर अस्वच्छता करणाऱ्या आशा नागरिकांविरुद्ध ही कार्यवाही सातत्याने सुरु राहणार असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त डॉ. किशोर गवस यांनी दिली आहे. शहर स्वच्छ व सुंदर बनविण्यासाठी हातभार लावण्याचे त्यांनी आवाहन केले आहे. ०००००

चेंबूर जिमखान्याच्या वतीने राज्य कॅरम स्पर्धेचे आयोजन

मुंबई: चेंबूर जिमखान्याच्या वतीने उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक पुरस्कृत तिसऱ्या राज्य मानांकन कॅरम स्पर्धेचे आयोजन २० ते २२ जुलै २०२४ दरम्यान चेंबूर जिमखाना, चेंबूर ( पश्चिम ), मुंबई – ७१…