Category: होम

अध्यात्मिक गुरुकुल आश्रमातील लहान मुलांना विविध  वस्तूंची भेट

ठाणे : नगर, सामाजिक कार्यात अग्रेसर असलेला “आम्हाला गर्व हिंदुत्वाचा” या  समूहाच्या वतीने ३० जून २०२४ रोजी शिर्डी, राहुरी, नगर, उंबरे या गावी विश्व माऊली अध्यात्मिक गुरुकुल या आश्रमात लहान मुलांस गरम पाणी उपलब्ध करून देण्यासाठी सोलर पॅनल, अन्नधान्य, शालेय वस्तू, रोख रक्कम तसेच आश्रमच्या पटांगणात वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी  प्रमुख पाहुणे म्हणुन शिवसेना युवासेना तालुका प्रमुख राहुल जुवाडी,  सचिन मोरे, राहुल मोरे, ग्रुपचे संस्थापक, संचालक, अध्यक्ष, सेक्रेटरी, सल्लागार व ग्रुप मधील ७० ते ८० सदस्य उपस्थित होते. आम्हाला गर्व हिंदुत्वाचा या ग्रुपच्या वतीने समाजसेवे अंतर्गत हा २२ वा उपक्रम साजरा करण्यात आला. या आश्रमचे सर्वेसर्वा दुशिंग महाराज यांनी आम्हाला गर्व हिंदुत्वाचा या ग्रुपचे संस्थापक संतोष पाटील यांचे मनापासून आभार व्यक्त करून त्यांचा व सौ.सोनिया वहिनी यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

मला एक रुपयाचाही निधी दिला नाही-आव्हाड

मुंबई : शिंदे-फडणवीस सरकारने आजपर्यंत मला एक रुपयांचा निधी दिलेला नाही. मी अजित पवारांच्या पीएला १०० वेळा फोन केले, पण त्यांनी मला भेटीची वेळही दिली नाही, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे…

उत्तर प्रदेशात भीषण अपघात

उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेशातील उन्नाव येथे बुधवारी पहाटे सव्वा पाचच्या सुमारास आराम बस आणि टँकरच्या धडकेत बसमधील १८ प्रवाशांचा मृत्यू झाला, तर १९ जखमी झाले. मृतांमध्ये १४ पुरुष, २…

मराठा आरक्षणावरील सुनावणी पाच ऑगस्टपर्यंत तहकूब

आयोगाला 3 आठवडे मुदतवाढ मुंबई :  राज्य सरकारने मराठा समाजाला दिलेल्या १० टक्के आरक्षणाची कायदेशीर लढाई सुरू असून आज मुंबई उच्च न्यायालयात याबाबत सुनावणी झाली. मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्या याचिकांवर सरकारच्यावतीने राज्य मागास आयोगाकडून बाजू…

आयएएस पुजाचा बोगसपणा उघड ?

मुंबई : अपंग असल्याचा बोगस दाखला देतानाचा ओबीसीचेही बोगस प्रमाणपत्र दाखल करीत आयएएस बनल्याचा पुजा खेडेकर यांच्यावर आरोप होत असून त्याची गंभीर दखल घेतली गेली आहे. अपंग असल्याचा बनावट दाखला देऊन कलेक्टर झालेल्या…

वरळी हिट अँण्ड रनप्रकरणी आरोपी मिहीरला ७ दिवसांची पोलिस कोठडी

मुंबई : वरळी हिट अॅड रन प्रकरणातील मुख्य आरोपी मिहीर शाहाला शिवडी दंडाधिकारी न्यायालयाने सात दिवसांची म्हणजेच येत्या १६ जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणात अधिक तपास करायचा असून अपघात ज्या गाडीने…

आरक्षणप्रश्नी सरकारच्या मंत्र्यांमध्येच एकवाक्यता नाही: नाना पटोले

मुंबई  : राज्यात आरक्षणाचा प्रश्न गंभीर होण्यास महायुती सरकारच जबाबदार आहे. सरकारने २०१४ पासून मराठा समाजाला आरक्षणाचे आश्वासन दिले आहे. केंद्रात व राज्यातही भाजपाचे सरकार आहे, त्यांची इच्छाशक्ती असती तर त्यांनी आरक्षण दिले असते. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी…

अदानी विरोधात आज काँग्रेसचा जनआक्रोश मोर्चा

मुंबई  : महागाईने जनता त्रस्त असताना महायुती सरकारने वीज दर वाढ करुन जनतेचे कंबरडे मोडले आहे. ही दरवाढ केवळ ७ टक्के असल्याचा सरकारचा दावा असला तरी प्रत्यक्षात मात्र ही दरवाढ ३० टक्के आहे. एवढी…

आरक्षणाच्या मुद्द्यावरून विधिमंडळात गदारोळ

कामकाज दिवसभरासाठी तहकूब   गदारोळात ९४ हजार कोटींच्या पुरवणी मागण्या  मंजूर मुंबई   :  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आरक्षणाच्या मुद्द्यावर काल  बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीस महाविकास आघाडीने बहिष्कार टाकल्यानंतर बुधवारी महाराष्ट्र विधिमंडळाच्या दोन्ही…

आमदार ‘पक्ष’कैदेत

० विधान परिषदेसाठी सर्वच पक्षांची मोर्चेबांधणी ० आमदारांवर हॉटेलच्या सीसीटीव्हीची नजर ० मतदान होईपर्यंत आमदारांचा मुक्काम पंचतारांकीत हॉटेलमध्ये स्वाती घोसाळकर मुंबई: विधान परिषदेच्या मतदानाआधी सावधगिरीचा उपाय म्हणून प्रत्येक पक्षाने आपल्या आमदांराना…