Category: होम

वगनाट्याची ‘परंपरा आणि योगदान’ सांस्कृतिक महत्त्व अधोरेखित करणारे

वगनाट्याची ‘परंपरा आणि योगदान’ सांस्कृतिक महत्त्व अधोरेखित करणारे लोककला अभ्यासकांचे चर्चासत्रात परखड मत मुंबई, दि (प्रतिनिधी) : लोकसंस्कृतीच्या समृद्ध परंपरेत तमाशा कलेने समाजमनावर कोरलेली अमिट छाप आजही तितकीच तेजस्वी आहे.…

अभिनव कॉलेजचा स्पंदन उत्सव उत्साहात संपन्न

अभिनव कॉलेजचा स्पंदन उत्सव उत्साहात संपन्न मिरा -भाईंदर – विद्यार्थ्यांच्या कला गुणांना वाव देण्यासाठी अभिनव कॉलेजच्या वतीने दरवर्षी स्पंदन उत्सवाचे आयोजन केले जाते. या वर्षी या उत्सवाचे आयोजन मिरा रोड…

ज्येष्ठ नागरिकांना बस प्रवासासाठी डिजिटल ओळखपत्रासाठी अर्ज स्वीकृतीला सुरुवात

ज्येष्ठ नागरिकांना बस प्रवासासाठी डिजिटल ओळखपत्रासाठी अर्ज स्वीकृतीला सुरुवात ठाणे : ठाणे महानगरपालिका परिवहन सेवेच्या बसमधून ६० वर्षे व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना प्रवासासाठी डिजिटल ओळखपत्र देण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्यासाठी नमुना अर्ज वितरित करून तो भरून आवश्यक कागदपत्रांसह जमा करण्याची कार्यवाही सुरू आहे. सध्या ठाणे स्थानक, कोपरी आगार, आनंदनगर व वागळे आगार येथे अर्ज स्वीकृती सुरू करण्यात आली आहे. ज्येष्ठ नागरिकांचा वाढता प्रतिसाद लक्षात घेता शनिवार, ७ फेब्रुवारीपासून वृंदावन सोसायटी, लोकमान्यनगर टर्मिनस, पवारनगर टर्मिनस व धर्मवीर चौक येथेही अर्ज स्वीकृती सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या केंद्रांवर सकाळी ९.०० ते सायंकाळी ४.०० या वेळेत अर्ज स्वीकारले जाणार असून नागरिकांनी नमुना अर्ज भरून आवश्यक कागदपत्रांसह जमा करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे. डिजिटल ओळखपत्रानुसार सदर योजना १ मार्च २०२६ पासून सुरू करण्याचे नियोजन आहे. दरम्यान, ओळखपत्रासाठी आलेल्या अर्जांचा विचार करून सर्व अर्जदार ज्येष्ठ नागरिकांना ओळखपत्र मिळेपर्यंत जुन्या पद्धतीप्रमाणे मोफत प्रवासाची सवलत सुरू राहणार आहे याची नोंद ज्येष्ठ नागरिकांनी घेवून परिवहन सेवेचे सहकार्य करावे, असे आवाहन परिवहन विभागाकडून करण्यात आले आहे.

केडीएमसीची रुग्णालये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अंबरनाथ यांना संलग्नित करणार

केडीएमसीची रुग्णालये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अंबरनाथ यांना संलग्नित करणार कल्याण: अंबरनाथ येथे १०० विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे नविन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व त्यास संलग्नित ४३० रुग्ण खाटांचे रुग्णालय स्थापन करण्यास मान्यता देण्यात आली आहे. अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय अंबरनाथ जिल्हा ठाणे यांनी त्यांच्याकडील विद्यार्थ्यांसाठी प्रत्यक्ष रुग्णालयीन अनुभव मिळण्यासाठी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची बाई रुमिणीबाई रुग्णालय, कल्याण (प.), शक्तीधाम रुग्णालय, कल्याण (पू.) व गौरीपाडा रुग्णालय, कल्याण (प.) ही रुग्णालये तात्पुरत्या स्वरुपात किमान सात वर्षांसाठी किंवा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची स्वतःची स्वतंत्र ईमारत निर्माण होईल यापैकी जे अगोदर घडेल तोपर्यंत सामंजस्य कराराद्वारे वापरण्याकरिता हस्तांतरण करण्यासाठी अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय अंबरनाथ जिल्हा ठाणे यांनी विनंती केली आहे. त्या अनुषंगाने वरीलप्रमाणे रुग्णालये सामंजस्य कराराद्वारे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय यांना संलग्नित करुन देण्यासाठी सामंजस्य करार करण्यात येत आहे. प्रथमतः बाई रुक्मिणीबाई रुग्णालय येथे आयसीयू करणे व अत्यावश्यक सेवा सुरू करण्यासाठी बाई रुक्मिणीबाई रुग्णालय, कल्याण (प.) हे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, अंबरनाथ यांचेमार्फत ताब्यात घेऊन आयसीयू व अत्यावश्यक सेवा तात्काळ कार्यान्वित करण्यात येईल. तद्नंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, अंबरनाथ यांच्या  आस्थापनेवर आवश्यक अध्यापकीय तसेच तांत्रिक व अतांत्रिक अधिकारी व कर्मचारी वर्ग उपलब्ध झाल्यानंतर गौरीपाडा रुग्णालय करिता असलेली इमारत ताब्यात घेऊन Gynaecology & Paediatrics Department कार्यान्वित करण्यात येतील. सर्वात शेवटी शक्तिधाम रुग्णाल, कल्याण (पू.) येथील ईमारतीचे आरक्षण बदल झाल्यानंतर सदर रुग्णालय ताब्यात घेऊन तेथे इतर विभाग कार्यान्वित करण्यात येतील. हि रुग्णालये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अंबरनाथ यांच्याशी संलग्नित झाल्यावर महाविद्यालयामार्फत तज्ञ वैद्यकीय अधिकारी व इतर मनुष्यबळ उपलब्ध होणार असून त्यांचेमार्फत प्रगत वैद्यकीय सुविधा, विशेषज्ञ सेवा व अतिदक्षता विभागाची सुविधा कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांसाठी उपलब्ध होणार आहेत. हा प्रस्ताव राज्य शासनाच्या मान्यतेसाठी वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रशासनाकडून पाठविण्यात येणार असून शासनाची मान्यता प्राप्त झाल्यास याबाबतची प्रत्यक्ष कार्यवाही नवनिर्वाचित महापौर, उपमहापौर व आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली पार पाडण्यात येईल

कलर मराठी वाहिनीने अंधश्रद्धा पसरविल्याबद्दल दिलगिरी व्यक्त करावी- अंनिसची मागणी

कलर मराठी वाहिनीने अंधश्रद्धा पसरविल्याबद्दल दिलगिरी व्यक्त करावी- अंनिसची मागणी अनिल ठाणेकर मुंबई, कलर मराठी वाहिनी कडून अंधश्रद्धा पसरविली गेल्याने त्यांनी दिलगिरी व्यक्त करावी व समाजात चुकीचा संदेश जाईल असे प्रसारण करू नये अशी मागणी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने केली आहे. तसे त्यांनी संबंधितांना निवेदन पाठविले आहे. कलर मराठी वाहिनीवरील बिग बॉस मराठी हा महाराष्ट्रातील प्रेक्षकांच्या आवडीचा व लोकप्रिय कार्यक्रम आहे. त्याद्वारे बहुजन कलाकारांना आपण लोकप्रियता मिळवून दिली आहे.त्याचा सहावा सीज़न आता चालू आहे.पण त्यात अंधश्रद्धा पसरवली गेली आहे. ४ फेब्रुवारीच्या २५ व्या भागात अंधश्रद्धायुक्त प्रसंगाचे प्रसारण झाले  आहे. त्यामध्ये  कलाकारांची नजर उतरविण्याचे दृश्य आहे. काही शब्द पुटपुटत मिरची कलाकाराच्या शरीरावरून ओवाळून गॅसवरील तव्यावर टाकली असल्याचे दिसत आहे. खरं तर ही अतिशय गंभीर बाब असून ती निखालसपणे अंधश्रद्धा आहे. यामुळे प्रेक्षकांच्या मनात अंधश्रद्धा रुजण्याचा धोका संभवतो. ही बाब वाहिनीसह दिग्दर्शक व पुरोगामी विचाराचे निवेदक रितेश देशमुख यांच्या नजरेतून सुटली गेली किंवा त्याचे गांभीर्य त्यांना समजले नाही. तरी त्यांनी ही चूक सुधारून तसे निवेदन त्यांच्या येणाऱ्या भागात प्रसिद्ध करावे म्हणजे प्रेक्षकांना मनात अंधश्रद्धा बळावण्याचा धोका टळेल. असे अंनिसने निवेदनात म्हटले आहे. या विषयी सकारात्मक विचार करून या पुढे अंधश्रद्धायुक्त प्रसंगांची दृश्य सदर वाहिनीवर प्रसारित केले जाणार नाहीत, उलट अंधश्रद्धांच्या विरोधात प्रबोधन करावे असेही पुढे म्हटले आहे. निवेदनावर राज्य प्रधान सचिव डॉ टी आर गोराणे व राज्य कार्यवाह कृष्णा चांदगुडे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

 आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी सर्व अधिकारी समन्वेत महापौर, उपमहापौर यांची भेट घेत केले अभिनंदन

आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी सर्व अधिकारी समन्वेत महापौर, उपमहापौर यांची भेट घेत केले अभिनंदन महापौर व उपमहापौर निवडणूकीनंतर आज महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी सर्व विभागप्रमुख व अधिकारी यांच्यासह महापौर श्रीम.सुजाता पाटील व उपमहापौर श्री.दशरथ भगत यांची भेट घेत पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. यावेळी सर्व अधिका-यांनी ओळख करुन दिली व आपल्याकडे असलेल्या विभागांची दिली. याप्रसंगी  विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांनी परस्पर समन्वयाने नागरिकांना अपेक्षित असलेले शहर विकासाचे काम करुया असे महापौर श्रीम.सुजाता पाटील यांनी प्रतिपादन केले.

  माथेरानच्या हातरीक्षा,ई रिक्षा १० फेब्रुवारीपासून बेमुदत बंद!

माथेरानच्या हातरीक्षा,ई रिक्षा १० फेब्रुवारीपासून बेमुदत बंद! मुकुंद रांजाणे माथेरान : हातरीक्षाच्या अमानवीय प्रथेतून श्रमिकांना कायमस्वरूपी मुक्ती मिळावी यासाठी सर्वोच्च न्यायालयाने सद्यस्थितीत सुरू असलेल्या सर्वच  हातरीक्षा बंद करून ई रिक्षांच्या संख्येत वाढ करावी असे स्पष्ट आदेश दिलेले असताना देखील राज्य सरकारने याबाबत काहीही ठोस उपाययोजना केलेली नाही. सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश भूषण गवई यांनी ६ ऑगस्ट २०२५ रोजी दिलेल्या आदेशानुसार हातरीक्षा सारखी अमानवीय प्रथा बंद करून सर्व ९४ हातरीक्षा चालकांचे ई रिक्षाच्या माध्यमातून पुनर्वसन करावे तसेच नवीन ई रिक्षा ह्या राज्य सरकारने खरेदी कराव्यात असे स्पष्ट निर्देश दिले होते. ६ फेब्रुवारी रोजी या आदेशाला सहा महिन्यांचा कालावधी पूर्ण होत असतानाही राज्य शासनाकडून अद्याप काहीही ठोस भूमिका बजावली नाही.त्यामुळेच श्रमिक रिक्षा संघटनेने १० फेब्रुवारी पासून सर्वच रिक्षा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत विविध संबंधित अधिकारी वर्गाला संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी निवेदन सादर केले आहे. या बंदच्या दरम्यान शालेय विद्यार्थ्यांना आणि रुग्णांसाठीच ही सेवा उपलब्ध असणार आहे या व्यतिरिक्त अन्य कुणालाही ह्या सेवेचा लाभ दिला जाणार नाही. राज्य सरकारकडुन जोपर्यंत ई रिक्षा वाढीसंदर्भात निर्णय घेतला जात नाही तोपर्यंत हा बंद ठेवण्यात यावा जेणेकरून सर्वांना या सुविधेची झळ सहन करावी लागणार आहे. रुग्णांसाठी नगरपरिषदेची रुग्णवाहिका उपलब्ध आहे. निर्णय लागेपर्यंत शालेय विद्यार्थी सुध्दा पायी चालत जाऊ शकतात. अधिकारी वर्गाला सुध्दा ही सुविधा बंद केल्याशिवाय त्यांना इथले रस्ते कशा पद्धतीचे झाले आहेत याचे आकलन होईल.असे ई रिक्षा समर्थकांमधून बोलले जात आहे. कोट सर्वोच्च न्यायालयाने माथेरान मधील सर्व ९४ हातरीक्षा कायमस्वरूपी बंद करून सहा महिन्यांत त्यांचे पुनर्वसन करण्याचे स्पष्ट निर्देश दिले असून ई रिक्षाच्या संख्येत वाढ करण्याची जबाबदारी राज्य सरकारवर सोपविली आहे.परंतु सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी केली जात नसल्याने सर्वच रिक्षा बंद करण्याचा निर्णय संघटनेने घेतला आहे. सुनील शिंदे–सचिव श्रमिक रिक्षा संघटना

 केडीएमसी महापौरांनी अधिकाऱ्यांसमवेत केली महापौर निवासाची पाहणी

केडीएमसी महापौरांनी अधिकाऱ्यांसमवेत केली महापौर निवासाची पाहणी केडीएमसी प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे करदात्या नागरिकांच्या पैशांचा चुराडा कल्याण : कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीनंतर महापौरांची निवड देखील झाली आहे. मात्र महापौरांसाठी महापालिकेच्या वतीने बांधण्यात आलेल्या महापौर निवासस्थानाची दुरावस्था झाली आहे. गेली कित्येक वर्षे हा बंगला बंद असल्याने वाळवी लागली आहे. या महापौर निवासस्थानाची आज केडीएमसी  महापौर हर्षाली चौधरी थविल यांनी शहर अभियंता अनिता परदेशी, अतिरिक्त शहर अभियंता जगदीश कोरे, प्रशांत भागवत, शिवसेना गटनेते विश्वनाथ राणे यांच्यासह पाहणी केली. कल्याण पश्चिमेतील आधारवाडी जेल परिसरात २०१० साली जनतेचे लाखो रुपये खर्च करून हे महापौर निवासस्थान बांधण्यात आले होते. मात्र, या निवासस्थानाला जाण्यासाठी रस्ता नसल्याने तसेच इतर वादामुळे हे निवासस्थान सुरुवातीपासूनच चर्चेत राहिले. बांधकामानंतर अनेक वर्षे हा बंगला वापराविना ओस पडून होता. यानंतर पुन्हा लाखो रुपये खर्च करून बंगल्याची डागडुजी करण्यात आली. मात्र, तत्कालीन महापौरांनी केवळ बंगल्याची पूजा करून त्यामध्ये वास्तव न करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे पुन्हा एकदा हा बंगला वापरात आला नाही. कोरोना काळापासून तर हा बंगला पूर्णपणे बंद अवस्थेत असून, देखभालीअभावी त्याची अवस्था अधिकच बिकट झाली आहे. सध्या बंगल्यातील संपूर्ण लाकडी फर्निचर खराब झाले असून, अनेक ठिकाणी वाळवीचा प्रादुर्भाव झाल्याचे दिसून येत आहे. नियमित देखभाल व संरक्षण न केल्यामुळे महापौर निवासस्थानाची मोठ्या प्रमाणावर नासधूस झाली आहे. केडीएमसी प्रशासनाने या बंगल्याकडे सातत्याने दुर्लक्ष केल्याने पुन्हा एकदा दुरुस्तीसाठी जनतेच्या लाखो रुपयांची उधळपट्टी होणार आहे. या या निवासस्थानाची पाहणी करण्यात येऊन लवकरच या निवासाच्या डागडुजीचे काम हाती घेण्यात येणार असल्याचे शहर अभियंता अनिता परदेशी यांनी सांगितले. दरम्यान महापौर हर्षाली चौधरी थविल या सद्ध्या मोहने येथे भाड्याच्या घरात राहत असून, महापौर निवासस्थानाची डागडुजी लवकर झाल्यास कल्याणमध्ये महापौर निवासस्थानी राहून नागरिकांच्या कामासाठी जास्तीत जास्त वेळ देता येईल.

अपयशात दिसला आशेचा किरण

अपयशात दिसला आशेचा किरण अलिकडे इस्रो‌’च्या दोन मोहिमा अयशस्वी झाल्या. ‌‘इस्त्रो‌’च्या माध्यमातून परकीय चलन मिळवून देशाला अर्थकारणाचे नवे साधन मिळवून देताना हे अपयश चिंताजनक ठरले. मात्र याच सुमारास भारतीय अंतराळ…