Category: होम

 नगरपालिका सभांचे थेट प्रक्षेपण करा

स्थानिकांची मागणी मुकुंद रांजाणे माथेरान : सत्ता स्थापन होऊन पाच महिन्यांचा कालावधी लोटला असून अद्यापही सभागृहात सर्वसाधारण सभा झालेली नाही त्यामुळे जनतेच्या समस्या, विकास कामे, प्रलंबित प्रश्न, पर्यटनाच्या वाढीसाठी धोरणात्मक निर्णय याबाबत काही ठोस उपाययोजना करता आलेली नाही. आज १५ जूनला नगरपालिकेची सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली आहे. या महत्वपूर्ण सभेतील विषय जनतेला माहीत व्हावे यासाठी ही सभा थेट प्रक्षेपण द्वारे दाखविण्यात यावी अशी मागणी जोर धरू लागली आहे. जवळपास तीन वर्षापेक्षा अधिक काळ प्रशासकीय राजवट असल्याने त्या कार्यकाळात जो काही अनागोंदी कारभार सुरू होता. जी कामे पूर्ण करण्यासाठी घाईघाईने प्रयत्न करण्यात आले ती कामे पूर्णपणे निकृष्ठ दर्जाची आणि शासनाच्या पैशाची एकप्रकारे उधळपट्टी झाल्याचे बोलले जात आहे. एकंदरीत ह्या गोष्टींचा उहापोह जनतेसमोर यायला हवा. कोणती कामे कशाप्रकारे मार्गी लावली गेली आहेत. काही महत्वपूर्ण कामे पूर्ण झालेली नसताना सुध्दा संबंधित ठेकेदारांना बिले अदा करण्यात आली आहेत. यामध्ये काय गौडबंगाल आहे हे सर्व जनतेच्या निदर्शनास आले पाहिजे यासाठी विरोधी पक्षांच्या सदस्यांनी सुध्दा ही सर्वसाधारण सभा थेट प्रक्षेपण द्वारे दाखविण्यात यावी अशी मागणी केली आहे. महाराष्ट्र नगरपरिषदा अधिनियम १९६५ कलम ८१ (२) नगरपरिषदेची सर्वसाधारण सभा सार्वजनिक असली पाहिजे,कोणत्याही नागरिकाला सभेला हजर राहण्याचा अधिकार आहे. कोट सभा लाईव्ह असणे पारदर्शक कारभाराचे लक्षण आहे आहे.जनतेला या गावाविषयी घेतलेल्या निर्णयांची थेट माहिती मिळणे हा त्यांचा अधिकार आहे.आपला लोकप्रिय लोकप्रतिनीधी प्रभागातील समस्या कशा मांडुन सोडुन घेतोय हे त्या मतदाराला पाहायला भेटले तर या लोकशाहीत यापेक्षा मोठा आनंद नाही. भास्करराव शिंदे–उद्योजक माथेरान

 गणेश टेकडीचा छोटासा भाग देखील बिल्डरांना गिळंकृत करू देणार नाही – अंकुश राजपूत

 कल्याण पूर्वेत मनसेच्यावतीने ५८ वृक्षांचे वृक्षारोपण कल्याण : कल्याण पूर्वेतील गणेश टेकडीचा छोटासा भाग देखील कोणत्याही बिल्डरांना गिळंकृत करू देणार नाही असा इशारा मनसे पदाधिकारी अंकुश राजपूत यांनी दिला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून कल्याण पूर्वेत गणेश टेकडी येथे ५८ वृक्षांचे वृक्षारोपण करण्यात आले यावेळी अंकुश राजपूत बोलत होते. राज ठाकरे हे एकमेव नेते असे आहेत जे त्यांच्या वाढदिवसाला देखील कुठलीही गोष्ट कोणत्याही कार्यकर्त्यांकडून मागत नाहीत. राज ठाकरे यांनी आपल्या जन्मदिनी कार्यकर्त्यांना झाडे लावण्याचे तसेच पाणवठे तयार करण्याचे आवाहन केले होते. जंगलातील झाडे तोडल्यामुळे जंगलातील प्राणी शहरात येत असून हि झाडे तोडण्यामागे बिल्डर लॉबी असून त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात वृक्षतोड केली जात आहे. त्यासाठी कल्याण पूर्वेतील गणेश टेकडीवर मनसेच्या वतीने वृक्षारोपण करण्यात आले. हि टेकडी काही वर्षांपूर्वी खूप मोठी होती, मात्र आता हि टेकडी कमी झाली असून आजूबाजूच्या बिल्डरांनी पोखरून खाल्ली असल्याचा आरोप यावेळी अंकुश राजपूत यांनी केला. राज ठाकरे यांच्या आदेशानुसार गणेश टेकडी येथे वृक्षारोपण करण्यात आले असून, नागरिकांनी देखील त्यांना जिथे जिथे जागा मिळेल तिथे वृक्षारोपण करा. अनेक ठिकाणी झाडे तोडून इमारती उभ्या केल्या जात असून यामुळे प्रदूषण वाढले आहे. आजार वाढले आहेत. सत्तेत असलेले सरकार देखील झाडांची कत्तल करत असून, नाशिक मध्ये महाकुंभ मेळ्यासाठी लाखो झाडांची कत्तल करण्यात येत आहे. मनसेची नाशिक मध्ये सत्ता असताना कुंभमेळा झाला होता. यावेळी एकही झाड तोडण्यात आले नाही. त्यामुळे नागरिकांनी देखील झाडे न तोडता वृक्षारोपण करण्याचे आवाहन मनसे पदाधिकारी अंकुश राजपूत यांनी केले आहे. ००००

विवाहविषयक जाहिरातीतून महिलांना गंडविणाऱ्या भामट्याला अटक

– घटस्फोटित, दिव्यांग आणि असुरक्षित महिलांना लक्ष्य; गुन्हे शाखेची मोठी कारवाई मिरा -भाईंदर : एका महत्त्वपूर्ण कारवाईत, गुन्हे शाखा युनिट-१ ने एका आंतरराज्यीय ठगाला अटक केली आहे. हा आरोपी विवाहविषयक संकेतस्थळे आणि वर्तमानपत्रांमधील जाहिरातींच्या माध्यमातून घटस्फोटित, दिव्यांग, मानसिकदृष्ट्या अक्षम आणि असुरक्षित महिलांना लक्ष्य करत असे. तसेच, बनावट विवाह आणि खोट्या ओळखीचा वापर करून त्याने या महिलांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. ही अटक २०२२ मध्ये दाखल झालेल्या एका गुन्ह्याच्या संदर्भात करण्यात आली आहे. या प्रकरणात एका ७५ वर्षीय महिलेने आरोप केला होता की, आरोपीने “अजय अग्रवाल” असल्याचे भासवून २०१९ मध्ये तिच्या ४५ वर्षीय मुलीशी लग्न केले आणि नंतर कुटुंबाची ९७ लाख रुपयांची फसवणूक केली. पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपीने लखनौमध्ये घर बांधून देण्याचे आणि नवीन फ्लॅट घेऊन देण्याचे आश्वासन देऊन त्या कुटुंबाला त्यांचा मीरा रोड येथील फ्लॅट विकण्यास प्रवृत्त केले. त्याने टप्प्याटप्प्याने ८२ लाख रुपये रोख रक्कम घेतल्याचा आरोप आहे. आणखी एका घटनेत, त्याने पीडितेला कौटुंबिक लग्नासाठी दिल्लीला नेले आणि तिथे तिला सोडून पळून जाण्यापूर्वी ३३ तोळे सोने व हिऱ्यांचे दागिने चोरल्याचा आरोप आहे. तपासादरम्यान, गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी आरोपीचा मागोवा घेत त्याला उत्तर प्रदेशातील ग्रेटर नोएडा येथे शोधून काढले आणि २४ मे २०२६ रोजी अटक केली. पोलिसांनी त्याच्याकडून “जयप्रकाश गुप्ता” या नावाने बनवलेले बनावट आधार कार्ड, तीन मोबाईल फोन आणि एक एटीएम कार्ड जप्त केले. तपासात असे निष्पन्न झाले की, आरोपीचे खरे नाव अनुज कुमार चंद्रप्रकाश त्रिवेदी असे आहे. महिलांचा विश्वास संपादन करून त्यांची आर्थिक फसवणूक करण्यासाठी तो अजय अग्रवाल, अजय संतोष सिंग आणि जयप्रकाश रमेशचंद्र गुप्ता अशा विविध बनावट नावांचा वापर करत असे. पोलिसांनी सुमारे २० लाख रुपये किमतीची BMW X१ कार देखील जप्त केली आहे, जी कथितरित्या फसवणुकीतून मिळालेल्या पैशातून खरेदी करण्यात आली होती. पुढील तपासात असे समजले की, आरोपी अमरावतीच्या गाडगे नगर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या फसवणुकीच्या आणखी एका गुन्ह्यात हवा होता; तिथे त्याने एका महिलेशी बनावट ओळख सांगून लग्न केले आणि तिची २५ लाख रुपयांची फसवणूक केली होती. अशाच पद्धतींचा वापर करून आरोपीने अनेक राज्यांमधील २५ हून अधिक महिलांची फसवणूक केली असावी, असा संशय अधिकाऱ्यांना आहे. तपासादरम्यान आरोपीचा मुलगा अविरल ऊर्फ प्रखर अनुज कुमार त्रिवेदी (वय २७) याचाही सहभाग असल्याचे समोर आले आहे; त्याच्यावर फसवणूक करण्यात वडिलांना मदत केल्याचा आरोप आहे. त्याला या प्रकरणात सह-आरोपी करण्यात आले आहे. गुन्हे शाखा युनिट-१ चे प्रभारी पोलीस निरीक्षक सुशीलकुमार शिंदे म्हणाले, “आरोपीने बनावट ओळख निर्माण करून आणि लग्न व सहजीवनाचे आश्वासन देऊन महिलांचा विश्वास संपादन करून त्यांना पद्धतशीरपणे लक्ष्य केले व त्यांची फसवणूक केली.” प्राथमिक निष्कर्षांवरून असे दिसून येते की, देशभरातील २५ हून अधिक महिला त्याच्या फसवणुकीला बळी पडल्या असाव्यात. “आम्ही अशा कोणत्याही महिलेला किंवा कुटुंबाला आवाहन करतो ज्यांची या व्यक्तीने मॅट्रिमोनिअल प्लॅटफॉर्म्स किंवा लग्नाच्या प्रस्तावाद्वारे फसवणूक केली असेल, की त्यांनी त्वरित ‘क्राइम ब्रँच युनिट-१’ शी संपर्क साधावा,” असे त्यांनी सांगितले. या प्रकरणाचा तपास सुरू असून, आणखी पीडित महिला पुढे येण्याची शक्यता आहे. आरोपी सध्या न्यायालयीन कोठडीत आहे, तर पोलीस या कथित देशव्यापी फसवणुकीच्या जाळ्याची व्याप्ती तपासण्याचे आणि आणखी पीडितांचा शोध घेण्याचे काम करत आहेत.

उल्हासनगरात मराठी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी गुलाब पवार यांची निवड

सुनिल इंगळे उल्हासनगर : उल्हासनगरात मराठी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी ठाणे वैभवचे उल्हासनगर प्रतिनिधी गुलाब पवार यांची निवड करण्यात आली आहे. मराठी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदाची निवड प्रक्रिया शुक्रवारी सायंकाळी पार पडली. मराठी पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष संजय राजगुरू यांनी आपला पदभार नवयुक्त अध्यक्ष गुलाब पवार यांच्याकडे सोपवला. त्यावेळी ज्येष्ठ दिनेश गोगी, राजू गायकवाड, रामेश्वर गवई प्रमोद दळवी, संजय राजगुरू तसेच पत्रकार सुनील इंगळे, शिवाजी वाघ, प्रकाश सोनवणे आधी पत्रकारांनी गुलाब पवार यांना शुभेच्छा दिल्या. गुलाब पवार यांची उल्हासनगर मराठी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याने त्यांच्यावर सर्वत्र अभिनंदन चा वर्षाव होत आहे. ००००००००

१० कोटीच्या महावितरण, बीएसएनएल केबल चोरी टोळीचे राज्यभर जाळे

 अधिकाऱ्यांसह नाशिकमधील बड्या राजकीय नेत्यांचाही सहभाग ? हरिभाऊ लाखे नाशिक –महावितरण कंपनी तसेच बीएसएनएलच्या महागड्या भूमिगत केबलची चोरी करणाऱ्या टोळीचे जाळे उदध्वस्त करण्यात नाशिक गुन्हे शाखेला यश आले असले तरी हे…

स्टँडर्ड चार्टर्ड बँकेचे राज्याच्या विकासात आणि सामाजिक उपक्रमांत मोलाचे योगदान : देवेंद्र फडणवीस

मुंबई : गेल्या सात वर्षांत स्टँडर्ड चार्टर्ड बँकेने महाराष्ट्रात जलसुरक्षा, आरोग्यसेवा, रोजगारनिर्मिती आणि हवामान बदलाला तोंड देण्यासाठी राबविलेल्या विविध सामाजिक उपक्रमांचा राज्यातील ८.३ लाखांहून अधिक नागरिकांना थेट लाभ झाला असून,…

डॉ. हेमराज शाह यांनी सत्तेशिवाय समाजसेवेचा आदर्श निर्माण केला : डॉ. कुंदन व्यास

गुजराती नगरसेवक सन्मान सोहळ्यात डॉ. हेमराज शाह यांच्या कार्याचा गौरव मुंबई : कोणतीही राजकीय सत्ता किंवा पद हाती नसतानाही बृहन्मुंबई गुजराती समाजाची स्थापना करून, सात मजली गुजराती समाज भवन उभारून आणि…

मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत निवडून आलेल्या गुजराती नगरसेवकांना बृहन्मुंबई गुजराती समाज आयोजित एका शानदार सोहळ्यात सन्मानित करण्यात आले. नवनीत गुजराती समाज भवन येथे झालेल्या या समारोहात पद्मभूषण डॉ कुंदन व्यास, बृहन्मुंबई गुजराती समाजाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. हेमराज शाह, माजी खासदार मनोज कोटक, प्रवीण छेडा, जितुभाई मेहता, डॉ. नागजी रीटा, राजेश दोशी, जितेंद्र पटेल, संध्या विपुल दोशी, सिद्धार्थ शर्मा, संदिप दिलीप पटेल, सुनीता मेहता आदी मान्यवर उपस्थित होते. (छाया : विरल जोशी) हा फोटो खालच्या बातमीत घेणे

बिळवसच्या श्रीदेवी सातेरी जल मंदिरात २६ जुलैला आषाढी जत्रोत्सव….!

०००००००० मालवण : भक्तांच्या हाकेला धावणारी आणि नवसाला पावणारी देवी म्हणून सर्वदूर ख्याती असलेली सिंधुदुर्गातील मालवण तालुक्यातील बिळवस येथील श्री देवी सातेरीचा(जलमंदीर ) आषाढ महिन्यात होणारा वार्षिक जत्रोत्सव यावर्षी २६…

कास्ट्राईब महासंघाच्या प्रलंबित प्रश्नांवर जिल्हाधिकाऱ्यांसोबत सकारात्मक चर्चा

– किशन जावळे व संदेश शिर्के यांच्या सहकार्याबद्दल कृतज्ञता रायगड-अलिबाग : (अशोक गायकवाड )—-जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्यासमवेत कास्ट्राईब कर्मचारी महासंघाची प्रलंबित मागण्या आणि कर्मचाऱ्यांच्या विविध समस्यांबाबत एक अत्यंत महत्त्वाची बैठक गुरुवारी, दि.११ जून २०२६ रोजी आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत जिल्हाधिकारी जावळे आणि निवासी उपजिल्हाधिकारी संदेश शिर्के यांनी कर्मचाऱ्यांच्या सर्व प्रश्नांवर सविस्तर चर्चा केली. विशेष म्हणजे, जिल्हाधिकाऱ्यांनी अनेक अडचणींवर बैठकीदरम्यानच थेट फोन लावून तात्काळ निकाल काढला व कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा दिला. या महत्त्वपूर्ण बैठकीत प्रामुख्याने सरळ सेवा भरतीतील अनुशेष भरणे, अनुकंपा भरती प्रक्रियेला गती देणे आणि अधिसंख्य पदांच्या सद्य:स्थितीबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. तसेच आश्वासित प्रगती योजना लागू करणे, प्रलंबित वैद्यकीय बिले मंजूर करणे, निलंबन व पेन्शन प्रकरणांचा जलद निपटारा करणे या आर्थिक व प्रशासकीय लाभांच्या मागण्यांवर भर देण्यात आला. यासोबतच तीन वर्षे पूर्ण झालेल्या कर्मचाऱ्यांचे संकलन बदल करणे, सेवा वर्ग करणे आणि मागासवर्गीय कर्मचाऱ्यांचे गोपनीय अहवाल वेळेत सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या. ३ डिसेंबर १९८० च्या शासन निर्णयानुसार मागासवर्गीय कर्मचाऱ्यांना प्रशासनात महत्त्वाच्या पदांवर काम करण्याची संधी देण्याबाबत आणि पुरवठा विभागातील कर्मचाऱ्यांना महसूल विभागात काम करताना येणाऱ्या प्रशासकीय अडचणींवर मार्ग काढण्यावर यावेळी विचारविनिमय झाला. याव्यतिरिक्त, दुर्गम भागातील आदिवासी विद्यार्थ्यांना आधार कार्ड मिळवून देण्यासाठी विशेष उपाययोजना आखण्याचा सामाजिक उपक्रमही या बैठकीत निश्चित करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी संघटनेला आश्वस्त करताना सांगितले की, कास्ट्राईब कर्मचारी महासंघाच्या सर्व मागण्यांबाबत प्रशासन पूर्णपणे सकारात्मक असून, कर्मचाऱ्यांचा कोणताही प्रश्न प्रलंबित राहणार नाही याची पूर्ण काळजी घेतली जाईल. या बैठकीला कास्ट्राईब कर्मचारी महासंघ व संघटनेचे प्रतिनिधी म्हणून महाराष्ट्र राज्याचे महासचिव सुरेश तांबे, वरिष्ठ उपाध्यक्ष सुमित भुईगळ, कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष राजेश सदावर्ते, रायगड जिल्हाध्यक्ष संजीव मोरे, महसूल संघटनेचे जिल्हाध्यक्ष राहुल सूर्यवंशी, दिव्यांग विभागाचे सचिव शिवाजी बिवराळे, जिल्हा परिषद विभाग रायगडचे जिल्हाध्यक्ष खंडू बागुल, कार्याध्यक्ष सचिन ओव्हाळ, कोषाध्यक्ष विकास बडे, चिटणीस संतोष साळगावकर आणि उपाध्यक्ष राजेंद्र गायकवाड तर प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय तहसीलदार (महसूल) चंद्रसेन पवार व रायगड जिल्ह्यातील सर्व संबंधित विभागांचे विभाग प्रमुख उपस्थित होते. शेवटी रायगड जिल्हाध्यक्ष संजीव मोरे यांनी प्रशासनाचे आणि उपस्थित सर्व अधिकाऱ्यांचे आभार मानल्यानंतर बैठकीची सांगता झाली.